Marathi Bible Reading |Friday 16th January 2026 | 1st Week in ordinary Time

सामान्यकाळातील पहिला सप्ताह 

शुक्रवार  दि. १६ जानेवारी  २०२६

✝️ 
पश्चात्ताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. 
Turn away from your sins and believe the Good News!"


सेंट जोसेफ वाझ
(वर्तनसाक्षी)(१६५१-१७११)

 ख्रिस्तसभा आज संत जोसेफ वाझ ह्यांची स्मृति साजरी करीत असताना  आपल्या सर्वांना पाचारणाचा संदेश देत आहे. 

आशिया खंडामधून जेवढे महान मिशनरी तयार झाले त्याच्यात धन्यवादित जोसेफ वाझ ह्यांचा फार वरचा क्रमांक लागेल. इ. स. १६५१ साली गोव्यातील बेनोली येथे त्यांचा जन्म झाला. १६७६ साली वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांना धगुरूपदाची दीक्षा देण्यात आली. १७११ साली श्रीलंकेतील कॅन्टी शहरात त्यांना मृत्यू आला.
आपल्या आयुष्याची ३६ मौल्यवान वर्षे धर्मगुरू म्हणून त्यांनी गोवा, कॅनरा आणि श्रीलंका ह्या ठिकाणी ईश्वरी सेवेत व्यतीत केली. समर्पित वृत्तीचा मिशनरी आणि कुशल प्रशासक म्हणून ते नावारुपाला आले. कॅनरा येथील ख्रिस्तसभेमध्ये प्रशासनावरून पाद्रो आदो-प्रोपोगांडा असा वाद निर्माण झाला. तेव्हा फा. जोसेफ ह्यांनी मोलाची कामगिरी बजावली आणि तो वाद मिटविला.
भारतीय मिशनऱ्यांमध्ये ऐक्य आणि त्यांच्या कार्यात एकवाक्यता असावी म्हणून त्यांनी जुन्या गोव्यामध्ये मिलाग्रीस क्रुसाच्या नावाने एक प्रशिक्षण केंद्र उभारले. श्रीलंकेतील आपले मिशनकार्य सदैव चालूच रहावे याकरिता त्यांनी ह्या केंद्रात अनेक मिशनरी घडविले. हे मिशनरी श्रीलंकेव्यतिरिक्त इतर अनेक भागात सुवार्ता प्रसार करीत असत. मात्र श्रीलंकेतील श्रद्धेची ज्योत नेहमी प्रज्वलित ठेवण्यासाठी ते आपल्या परिश्रमाचे तेल त्यात नेहमी ओतून ठेवीत.
जोसेफ वाझ ह्यांचे पवित्र जीवन, अथक परिश्रम, समर्पित आणि उत्साही वृत्ती, आशावादी दृष्टीकोन, धैर्य इ. सद्गुणांमुळे श्रीलंकेतील ख्रिस्तसभेत एक आगळेवेगळे चैतन्य संचारले.
फा. वाझ ह्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने गोव्याच्या आपल्या मातृभूमीत ब्रद्धेचे बीज पेरताना संस्कृतीला अजिबात धक्का लागणार नाही ह्याची काळजी घेतली. त्याकाळी अस्तित्वात असलेली पोर्तुगीजांची राजवट आणि त्यांच्यातर्फे आलेले पाश्चात्य ख्रिस्ती धर्माचे संस्कार ह्यांचा फारसा प्रभाव गोव्यातील नवख्रिस्तीयांवर पडू शकला नाही. कारण फा. वाझ ह्यांची कार्यप्रणाली चाणाक्ष आणि तितकीच कणखर होती.
'यथा राजा तथा प्रजा' या उक्तीनुसार “ज्यांचे राज्य त्यांचा धर्म” लोकांनी पाळावा ही त्याकाळी एक प्रथाच बनून गेलेली होती. परंतु फा. जोसेफ वाझ आणि त्यांचे सहकारी धर्मगुरू ह्यांनी ही प्रथा खंबीरपणे मोडीत काढली आणि आपल्या स्थानिक संस्कृतीशी व मातीशी इमान राखणारा ख्रिस्ती धर्म त्यांच्याच मातृभाषेत लोकांना शिकविण्यास सुरुवात केली. हे करीत असताना त्यांनी वसाहतवाद्याशी कुठलेही संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे गोव्यातील ख्रिस्ती धर्मतत्वे अबाधित राखण्यात त्यांना यश आले.
इ. स. १७११ साली मृत्यू पावलेल्या फा. जोसेफ वाझ ह्यांना पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी २१ जाने. १९९५ रोजी धन्यवादित म्हणून आल्ताराचा बहुमान दिला.१४ जानेवारी २०१५ रोजी पोप फ्रान्सिस यांनी त्यांना संत पद  घोषित केले 
पहिले वाचन   १कॉरिंथ १:१८-२५
वाचक : पाऊलचे कॉरिंथिकारास  पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन
कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वध-स्तंभाविषयींचा संदेश मूर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचें सामर्थ्य असा आहे; कारण 'मी ज्ञान्यांचें ज्ञान नष्ट करीन, व बुद्धि-मंतांची बुद्धि व्यर्थ करीन,' असा शास्त्रलेख आहे.  'ज्ञानी कोठें राहिले ? शास्त्री कोठें राहिले ? ह्या युगाचे वाद घालणारे 'कोठें राहिले ?' देवानें जगाचें 'ज्ञान मूर्खपणाचें ठर-विलें' कीं नाहीं ?  कारण जग देवाच्या ज्ञानानें वेष्टित असतांहि त्याला आपल्या ज्ञानाच्या योगानें देवाला ओळखतां आलें नाहीं,' तेव्हां गाजविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगें विश्वास ठेवणाऱ्या लोकांचें तारण करणे देवाला बरें वाटलें;  कारण यहूदी चिन्हें मागतात. व हेल्लेणी ज्ञानाचा शोध करितात, आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितों; हा यहूद्यांस अडखळण व हेल्लेण्यांस मूर्खपणा असा आहे खरा,  परंतु पाचारण झालेल्या यहूदी व हेल्लेणी अशा दोघांसहि देवाचें सामर्थ्य व देवाचें ज्ञान आहे; असा ख्रिस्त आम्ही गाज-वितों.  कारण देवाचा मूर्खप्णा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे; आणि देवाची दुर्बळता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे.
प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद. 

First Reading :1 Corinth 1:18-25
Christ the Power and the Wisdom of God
18 For the message about Christ's death on the cross is nonsense to those who are being lost; but for us who are being saved it is God's power. 19 The scripture says,
"I will destroy the wisdom of the wise and set aside the understanding of the scholars."
20 So then, where does that leave the wise? or the scholars? or the skilful debaters of this world? God has shown that this world's wisdom is foolishness!
21 For God in his wisdom made it impossible for people to know him by means of their own wisdom. Instead, by means of the so-called "foolish" message we preach, God decided to save those who believe. 22 Jews want miracles for proof, and Greeks look for wisdom. 23 As for us, we proclaim the crucified Christ, a mess-age that is offensive to the Jews and nonsense to the Gentiles; 24 but for those whom God has called, both Jews and Gentiles, this message is Christ, who is the power of God and the wisdom of God. 25 For what seems to be God's foolishness is wiser than human wisdom, and what seems to be God's weakness is stronger than human strength
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र  ११७:१ -२
प्रतिसाद : परमेश्वराचें स्तवन करा,
 १ अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराचें स्तवन करा,
अहो सर्व लोकांनो, त्याचें स्तवन करा.

२ कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे
आणि परमेश्वराचें सत्य सनातन आहे.
परमेशाचें स्तवन करा

 Psalms 117: In Praise of the LORD

Praise the LORD, all nations! 
Praise him, all peoples!

2 His love for us is strong and
 his faithfulness is eternal.

Praise the LORD!

जयघोष   
आलेलुया, आलेलुया! 
  हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव. मला सरळ मार्गाने ने
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
 A great prophet has arisen in our midst and God has visited his people.
R. Alleluia, alleluia.


शुभवर्तमान  मार्क १:१४-२०
वाचक :   मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
पहिल्या शिष्यांना पाचारण

योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गाजवीत गालीलांत आला व म्हणाला,  काळाची पूर्णता झाली आहे व देवाचें राज्य जवळ आलें आहे ; पश्चात्ताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. नंतर गालील समुद्राजवळून जात अस-तांना त्याला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रांत जाळे टाकतांना दिसले, कारण ते मासे धरणारे होते; येशू त्यांना म्हणाला, माझ्यामागें या म्हणजे तुम्ही माणसें धरणारे व्हाल, असें मी करीन. मग ते लागलेच जाळीं सोडून त्याला अनुसरले. तेथून कांहीसें पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवांत जाळीं नीट करतांना दिसले;  आणि त्यानें त्यांना लागलेंच बोलाविले; मग ते आपला बाप जब्दी ह्याला चाकरांबरोबर तारवांत सोडून त्याच्यामागें गेले.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Mark 1: 14-20
 Jesus Calls Four Fishermen 
After John had been put in prison, Jesus went to Galilee and preached the Good News from God.  "The right time has come," he said, "and the Kingdom of God is near! Turn away from your sins and believe the Good News!" As Jesus walked along the shore of Lake Galilee, he saw two fishermen, Simon and his brother Andrew, catching fish with a net.  Jesus said to them, "Come with me, and I will teach you to catch men."  At once they left their nets and went with him. He went a little farther on and saw two other brothers, James and John, the sons of Zebedee. They were in their boat getting their nets ready.  As soon as Jesus saw them, he called them; they left their father Zebedee in the boat with the hired men and went with Jesus.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
शुभवर्तमानात येशू प्रार्थनेबद्दल शिकवतो. पहिला धडा म्हणजे, प्रार्थना करण्यासाठी आपल्याला जास्त काही बोलण्याची गरज नाही. जितके कमी शब्द तितकी प्रार्थना चांगली. पक्षाघात झालेल्या व्यक्तीचे मित्र त्याला येशूकडे आणतात. या उताऱ्यात असे काहीही म्हटलेले नाही की पक्षाघात झालेल्या व्यक्ती त्याच्या मित्रांना विनंती करतो की तो येशूकडून बरा होऊ इच्छितो किंवा त्याच्या मित्रांकडून असे कोणतेही
शब्द आले नाहीत की, ते त्याला येशूकडे आणतील. तरीही, जरी ते एकमेकांना कधीही एकही शब्द बोलत नसले तरी, त्याला येशूकडे घेऊन जाण्याचा आणि तो बरा व्हावा अशी इच्छा व्यक्त करण्याची कृतीच एक प्रार्थना आहे. दुसरा धडा असा आहे की, जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देवाला आपल्यासाठी निर्णय घेऊ द्या. जेव्हा ते चार मित्र पक्षाघाती व्यक्तीला येशूकडे आणतात तेव्हा ते लगेच निघून जातात. जणू काही ते येशूला सांगत आहेतः आम्ही आधीच आमची जबाबदारी घेतली आहे. देवाने काय करावे याबद्दल सूचना देऊ नयेत. तिसरा धडा असा आहे की, त्याच्या मित्रांच्या विश्वासामुळे पक्षाघाती व्यक्ती बरी होते. सहसा, जेव्हा येशू आजारी व्यक्तीला बरे करतो, तेव्हा तो स्वतः त्या व्यक्तीचा विश्वास असतो जो पूर्ण ब्रे होण्याचा आधार असतो. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पक्षाघाती व्यक्तींचा विश्वास नाही, तर त्याच्या मित्रांचा विश्वास आहे की, पापे क्षमा केली जातात आणि माणसे बरी होतात. त्याच्या मित्रांचा विश्वासच येशूला स्पर्श करतो आणि तो आजारी व्यक्तीला बरे करण्यास प्रवृत्त करतो.

प्रार्थना: हे प्रभू येशू, विश्वासाने शरण येऊन तुझी क्षमा व कृपा मिळविण्यास आम्ही पात्र व्हावे म्हणून आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

✝️                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या