उपवासकाळाला सुरवात
शनिवार दि. २१ फेब्रुवारी २०२६
“निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते.
"Those who are well have no need of a physician, but those who are sick.
येशू जीवनात आल्यावर माणसाच्या हृदयाचे परिवर्तन होते व तो देवाच्या उदारतेबद्दल आनंद व्यक्त करतो. त्याच्या आनंदात तो सर्वांना सहभागी करुन घेतो. त्याचा भूतकाळ विसरून तो लोकांची पर्वा न करता देवाला प्राधान्य देतो. लेवीच्या जीवनाचे परिवर्तन झाले. लोकांनी येशूजवळ कूरकूर केली मात्र येशूने म्हटले, 'मी पापी लोकांस पश्चात्तापासाठी बोलविण्यास आलो आहे.'
ह्या उपवासकाळात प्रभू येशू आपल्याला पश्चात्तापासाठी आणि परिवर्तनासाठी बोलावित आहे. प्रभू येशूच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्याला अनुसरण्याचा निश्चय करु या. त्याग, समर्पण आणि सत्कृत्ये करुन देवाला आपल्या जीवनात प्रथम स्थान देऊ
पहिले वाचन यशया ५८:९-१४
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"स्वतःच्या मार्गाने न जाण्याने तू प्रभूचा आदर करशील."
प्रभू म्हणतो, “जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, दुःखग्रस्त जिवाला तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. तो अवर्षणसमयी तुझ्या जिवास तृप्त करील. तुझ्या हाडांना मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील. पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुनः बांधतील. पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन: उभारशील. मोडतोडीचा जीर्णोद्वार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा, असे तुझे नाव पडेल. तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहीस. माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस. शब्बाथ आनंद दिन आहे. परमेश्वराचा पवित्र व सन्मान दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालव नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस, तर तू परमेश्वराच्याठायी हर्ष पावशील. तू देशांच्या उच्च स्थलांचे जयोत्साहाने आक्रमण करशील, असे मी करीन आणि तुझा पिता याकोब याच्या वतनाचा तुला उपभोग घेऊ देईन. परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहेत."
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Isaiah 58:9c-14
Thus says the Lord: "If you take away the yoke from your midst, the
pointing of the finger, and speaking wickedness, if you pour yourself out for the hungry and satisfy sat the desire of the afflicted, then shall your light rise in the darkness and your gloom be as the noonday. And the Lord will guide you continually and satisfy your desire in scorched places and make your bones strong; and you shall be like a watered garden, like a spring of water, whose waters do not fail. And your ancient ruins shall be rebuilt; you shall raise up the foundations of many generations; you shall be called the repairer of the breach, the restorer of streets to dwell in. "If you turn back your foot from the Sabbath, from doing your pleasure on my holy day, and call the Sabbath a delight and the holy day of the Lord honourable; if you honour it, not going your own ways, or seeking your own pleasure, or talking idly; then you shall take delight in the Lord, and I will make you ride on the heights of the earth; I will feed you with the heritage of Jacob your father, for the mouth of the Lord has spoken."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ८६:१-६