सामान्यकाळातील पांचवा
रविवार दि.१५ फेब्रुवारी २०२६
तर तुमचे बोलणे, ‘होय तर होय,' ‘नाही तर नाही', एवढेच असावे, ह्याहून जे अधिक ते वाइटापासून आहे.
let your speech be yea, yea: no, no: and that which is over and above these, is of evil.
"त्याने कोणालाही अधार्मिक होण्याची आज्ञा केली नाही. "
तुमची इच्छा असेल तर तुम्ही आज्ञापालन कराल आणि विश्वासूपणाने वागणे हा सर्वस्वी तुमचा निर्णय राहील. त्याने तुमच्यासमोर विस्तव आणि पाणी ठेवले आहे; तेव्हा हात पुढे करून तुम्ही दोहोंपैकी काहीही निवडू शकता. माणसासमोर जीवन आणि मरण उभे असते आणि तो जे निवडील ते त्याला दिले जाईल. कारण देवाचे ज्ञान महान आहे; तो बलवान आहे आणि तो सर्व काही पाहतो. त्याचे डोळे, जे त्याला भितात त्यांच्याकडे लागलेले असतात आणि त्याला माणसांची सर्व कृत्ये माहीत आहेत. त्याने कोणालाही अधार्मिक होण्याची आज्ञा केली नाही, तसेच त्याने कोणालाही पाप करण्यास परवानगी दिली नाही.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : : Sirach 15: 15-20
He added his commandments and precepts. If thou wilt keep the commandments and perform acceptable fidelity for ever, they shall preserve thee. He hath set water and fire before thee: stretch forth thy hand to which thou wilt. Before man is life and death, good and evil, that which he shall choose shall be given him:
For the wisdom of God is great, and he is strong in power, seeing all men without ceasing.
The eyes of the Lord are towards them that fear him, and he knoweth all the work of man.
He hath commanded no man to do wickedly, and he hath given no man license to sin:
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११९:१-२, ४-५,१७-१८,३३-३४
