Marathi Bible Reading | Saturday 14th March 2026 | 3rd Week of Lent

 उपवासकाळातील तिसरा सप्ताह 

शनिवार  दि. ४ मार्च  २०२६

कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवतो तो उंच केला जाईल."
 For everyone who exalts himself will be humbled, but the one who humbles himself will be exalted."

संत मॅटिल्डा 
राणी (८९५-९६८)

मॅटिल्डाचे वडील तिच्या बालवयातच मरण पावले आणि तिच्या आईने कॉन्व्हेंटचा रस्ता धरला. त्यामुळे मॅटिल्डाचे बालपण व प्राथमिक शिक्षण मध्य जर्मनीतील एरफर्ट येथल्या एका कॉन्व्हेंटमध्ये झाले. अल्पावधीतच तिने आपले सद्गुण आणि कलाकौशल्ये दाखविण्यास सुरूवात केली. वयाच्या १४ व्या वर्षी सॅक्सनीचा हेन्री ह्या राजपुत्राबरोबर तिचे लग्न झाले.

पुढे हा हेन्री जर्मनीचा राजा कॉरेंड ह्याचा उत्तराधिकारी बनला. राणी या नात्याने मॅटिल्डा हिने आपले निष्कलंक जीवन व विवेकी राज्यकारभार ह्याचे दर्शन सर्वांना घडविले. गरीब आणि अडल्या-नडल्यांना तिने मोलाचा आधार दिला. परंतु इ. स. ९३६ साली राजा हेन्री मरण पावला आणि मॅटिल्डा राणीच्या डोक्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली.

अशा बिकट परिस्थितीत मात्र ती बिलकूल डगमगली नाही. तिने आपली प्रार्थना, उपवास, प्रायश्चित्त, दानधर्म यामध्ये वाढ केली. असंख्य इस्पितळे, मठ आणि ख्रिस्तमंदिरे उभारण्यासाठी सढळ हस्ते मदत केली. परंतु तिच्या ह्या दानधर्माला आणि उदारवृत्तीला तिच्या मुलांनी उधळपट्टी म्हणून हिणविले आणि त्यांनी तिला राजमहालाबाहेर हाकलून दिले.

मॅटिल्डा राजवाड्याबाहेर पडली आणि साम्राज्याची चक्रे उलट दिशेने फिरू लागली. सगळीकडे राजपुत्र हेन्री व ओट्टो ह्यांना दुर्दैवाचे परिणाम दिसू लागले. भरभराटीचा काळ संपुष्टात आला. अधोगतीने संपूर्ण राज्यात आपले पसरायला सुरवात केली. सेवक-सेनापती, नोकरचाकर, कामधंदे सोडून गेले. सर्वत्र उदासीनता आणि हलाखीची परिस्थिती निर्माण झाली. आपल्या आईच्या रुगने परमेश्वरालाच आपण घराबाहेर हाकलून दिल्याचे त्या राजपुत्रांना टोचू लागले. त्यांनी लागलीच आपल्या आईला परत माघारी बोलाविले. तिच्या आगमनाबरोबर राज्यात पुन्हा एकदा नवचैतन्य पसरले. गेलेली सर्व सुबत्ता आणि समृद्धी परत आली. तिचा मोठा मुलगा ओट्टो हा जर्मनीचा सम्राट बनला, दुसरा मुलगा कोलोन शहराचा आर्चबिशप (संत ब्रुनो) बनला. तिची मुलगी गर्बेरा फ्रान्सचा राजा लुईस चौथा याच्याशी विवाहबद्ध झाली आणि शेवटची मुलगी हेडविंग कॅपेरीयन साम्राज्याचा जनक यू कॅपेर ह्याची माता होय.
संत मॅटिल्डा १४ मार्च ९६८ रोजी मरण पावली.

पहिले वाचन :होशेय  ६:१-६
वाचक : होशेय या पुस्तकातून घेतलेले वाचन
    "मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे." प्रभू असे म्हणतो, "ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील, चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ. कारण त्याने आम्हांला झोडले आहे व तोच आम्हांला बरे करील. त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील. तो दोन दिवसात आमचे पुनरुज्जीवन करील; तिसऱ्या दिवशी तो आम्हांला उठवून उभे करील आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू. चला, आपण परमेश्वराला ओळखू. परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यासाठी झटू. त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणाच्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आम्हाकडे येईल."
हे एफ्राइम, मी तुझ्यासाठी काय करू ! हे यहुदा, मी तुला काय देऊ? तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उठून जाणाऱ्या दंहिवराप्रमाणे आहे. म्हणून मी त्याच्यावर संदेष्ट्यांच्या हातून कुऱ्ह्याड चालवली आहे. माझ्या तोंडच्या शब्दांनी त्यांना ठार केले आहे. माझा न्याय प्रकाशाप्रमाणे व्यक्त झाला आहे. मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. होमार्पणांपेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Hosea 6:1-6
"Come, let us return to the LORD: for he has torn us, that he may heal us; he has struck us down, and he will bind us up. After two days he will revive us; on the third day he will raise us up, that we may live before him. Let us know; let us press on to know the LORD; his going out is sure as the dawn; he will come to us as the showers, as the spring rains that water the earth." What shall I do with you, O Ephraim? What shall I do with you, O Judah? Your love is like a morning cloud, like the dew that goes early away. Therefore I have hewn them by the prophets; I have slain them by the words of my mouth, and my judgment goes forth as the light. For I desire steadfast love and not sacrifice, the knowledge of God rather than burnt offerings.
This is the word of God
 Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र १:३-४,१८-२१
प्रतिसाद :  मला यज्ञ नको तर प्रेम हवे.
१)  देवा, तुझ्या प्रेमाखातर माझ्यावर दया कर 
तुझ्या महान दयेस अनुसरून 
माझ्या अपराधांचे कलंक पुसून टाक. 
मला धुऊन माझा दोष पूर्णपणे दूर कर. 
माझ्या पापापासून मला शुद्ध कर.

२) यज्ञ केल्याने तू प्रसन्न होत नाहीस, 
नाही तर तो मी केला असता.
 होमार्पणांची देखील तुला आवड नाही. 
देवा, तुला शरण आलेला हा आत्मा हाच माझा यज्ञ. 
भग्न व पश्चात्तापी अंत:करण तू झिडकारणार नाहीस. 

३)  तू प्रसन्न होऊन सियोन नगरावर कृपादृष्टी कर. 
येरुशलेमची तटबंदी उभार. 
मग यथायोग्य यज्ञ व विविध होमार्पणे यांनी 
तू प्रसन्न होशील. 
तुझ्या वेदीवर गोहे बळी दिले जातील.

Psalm 51:3-4, 18-19, 20-21ab (R Hosea 6:6)

I desire steadfast love, and not sacrifice.

Have mercy on me, O God, 
according to your merciful love; 
according to your great compassion, 
blot out my transgressions. 
Wash me completely from my iniquity, 
and cleanse me from my sin. R 

For in sacrifice you take no delight; 
burnt offering from me
would not please you. 
My sacrifice to God, a broken spirit: 
a broken and humbled heart, 
O God, you will not spurn. R 

In your good pleasure, show favour to Sion; 
rebuild the walls of Jerusalem. 
Then you will delight in right sacrifice, 
burnt offerings wholly consumed. R

जयघोष  
आज तुम्ही आपली मने कठीण करू नका. तर प्रभूचे म्हणणे ऐका!

Acclamation: 
 O that today you would listen to his voice! Harden not your hearts.

शुभवर्तमान लूक  १८:९-१४
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
    आपण धार्मिक आहो असे जे कित्येक स्वत:विषयी भरवंसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानीत होते त्यांनाही येशूने एक दाखला सांगितला: "एक परुशी व एक जकातदार असे दोघेजण प्रार्थना करण्यास वर मांदिरात गेले. परुश्याने उभे राहून स्वत:शी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यासदेखील न धजता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर ! मी तुम्हांला सांगतो दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवतो तो उंच केला जाईल."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Luke 18:9-14
At that time: Jesus told this parable to some who trusted in themselves that they were righteous, and treated others with contempt: "Two men went up into the temple to pray, one a Pharisee and the other a tax collector. The Pharisee, standing by himself, prayed thus: 'God, I thank you that I am not like other men, extortioners, unjust, adulterers, or even like this tax collector. I fast twice a week; I give tithes of all that I get. But the tax collector, standing far off, would not even lift up his eyes to heaven, but beat his breast, saying, 'God, be merciful to me, a sinner!" I tell you, this man went down to his house justified, rather than the other. For everyone who exalts himself will be humbled, but the one who humbles himself will be exalted."
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
  
चिंतननम्र हृदय सर्व आशीर्वादाना सहज आपल्याकडे आकषून घेते. असे म्हणतात झुकते माप नेहमी वजनदार असते. प्रभू येशू मानवजातीसाठी नम्र झाला म्हणून त्याने आपणा सर्वासाठी स्वर्गाचे दार उघडले. त्याने क्रुसावरून मानवजातीच्या तारणासाठी प्रार्थना केली. ती स्वर्गातील पित्याने ऐकली. स्वर्गीय पित्याला दया हवी आहे म्हणून आपले अंतःकरण नेहमी नम्र आणि दयेने भरलेले असावे. आपल्या हातून अपराध झाले असतील तर पश्चात्तापी अंतःकरणाने त्याची माफी मागावी. कारण भग्न व पश्चात्तापी अंतःकरण तू झिडकारणार नाहीस असे स्तोत्रकार राजा दावीद आपणांस म्हणतो. जकातदाराने पश्चात्तापी आणि नम्र अंतःकरणाने प्रार्थना केली, "हे देवा, मज पाप्यावर दया कर!" आपलीही प्रार्थना तशीच असावी.

प्रार्थना : हे प्रभू येशू, मज पाप्यावर दया कर, मला तुझ्या सत्पथाने  चालण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या