Marathi Bible Reading | 12th week in ordinary Time |Saturday 27th June 2026 |

 सामान्यकाळातील बारावा  सप्ताह 

शनिवार  दि. २७ जून  २०२६

 "जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त होवो !" आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. 'Go back, then; let this be done for you, as your faith demands.' And the servant was cured at that moment.


आलेक्झांड्रीयाचे  संत सिरील
- महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (३७०-४४४)

प्रभू येशूठायी परमेश्वराचे सामर्थ्य असून तो केवळ शब्दाने सुद्धा जीवनदान देऊ शकतो. येशूचा सर्वांवर अधिकार आहे हे त्याने ओळखले होते. अधिकाराची जाणीव असलेल्या शताधिपतीचा विश्वास पाहून येशूने म्हटले, 'एवढा विश्वास मला इस्त्राएलांत आढळला नाही.' प्रभू येशूने त्याला म्हटले, 'जा, तू विश्वास ठेविल्याप्रमाणे तुला प्राप्त होतो.'
आज आपण प्रभू येशूवरील त्याच्या सामर्थ्यावरील आणि शब्दावरील आपला विश्वास पडताळून पाहू या. आपण अपात्र आहोत ह्याची जाणीव ठेवून सर्वस्वी प्रभूला शरण जाऊ या. विश्वासानेच आपले तारण होणार आहे. 
  
पहिले वाचन :विलापगीत २:२.१०.१४.१८-१९
वाचक :विलापगीत या पुस्तकातून घेतलेले वाचन
"हे सियोनकन्ये, प्रभूसमोर मोठ्याने विलाप कर."

प्रभूने याकोबची सर्व वसतिस्थाने गिळून टाकली आहेत, गय केली नाही. त्याने आपल्या क्रोधाने यहुदाच्या कन्येचे दुर्ग मोडून टाकले आहेत, त्याने ते धुळीला मिळवले आहेत. त्याने राज्य आणि त्यातले सरदार यांना भ्रष्ट केले आहे.
सियोनकन्येचे वडीलजन जमिनीवर बसले आहेत, ते स्तब्ध आहेत. त्यांनी अपल्या डोळ्यांवर धूळ उडवली आहे, त्यांनी गोणपाटाची वस्त्रे परिधान केली आहेत. येरुशलेमच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववीत आहेत.
माझे डोळे अश्रृंनी जर्जर होत आहेत, माझ्या आतड्यांना पीळ पडत आहे, माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशामुळे माझे काळीज फाटून गेले आहे, लहान मुले आणि तान्ही बाळे नगराच्या आळ्यात मूच्छित होऊन पडली आहेत.
घायाळ झाल्याप्रमाणे नगराच्या आळ्यांत मूच्छित होऊन आपल्या मातांच्या उराशी त्यांनी प्राण सोडला, तेव्हा तीआपल्या मातांना म्हणाली, "धान्य आणि द्राक्षरस ही कोठे आहेत ?"
मी तुला बोधाच्या कोणत्या गोष्टी सांगू ? हे यरुशलेमकन्ये मी तुला कोणाची उपमा देऊ ? हे सियोनच्या कुमारी कन्ये, तुझे सांत्वन करण्यासाठी मी तुझी कोणाबरोबर तुलना करू ? कारण तुझा विनाश सागरासारखा मोठा आहे, तुला कोण बरे करील ?
तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक आणि मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टान्त पाहिला. तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही, तर त्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक आणि तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टान्त पाहिले.
हे सियोनकन्ये प्रभूसमोर मोठ्याने विलाप कर, रात्रंदिवस जलप्रवाहाप्रमाणे अश्रू ढाळ, ते खळू देऊ नकोस, तुझ्या डोळ्यांच्या बाहुल्यांना विसावा देऊ नकोस.
ऊठ, रात्रीच्या प्रहरारंभी विलाप कर, प्रभूसमोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत. तुझी बालके हरएक गल्लीच्या चवाठ्यावर भुकेने व्याकूळ झाली आहेत, त्याच्या प्राणसंरक्षणासाठी त्याच्याकडे हात पुढे कर.
प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Lamentations 2:2, 10-14, 18-19

 The Lord hath cast down headlong, and hath not spared, all that was beautiful in Jacob: he hath destroyed in his wrath the strong holds of the virgin of Juda, and brought them down to the ground: he hath made the kingdom unclean, and the princes thereof. 
 The ancients of the daughter of Sion sit upon the ground, they have held their peace: they have sprinkled their heads with dust, they are girded with haircloth, the virgins of Jerusalem hang down their heads to the ground.
 My eyes have failed with weeping, my bowels are troubled: my liver is poured out upon the earth, for the destruction of the daughter of my people, when the children, and the sucklings, fainted away in the streets of the city.
 They said to their mothers: Where is corn and wine? when they fainted away as the wounded in the streets of the city: when they breathed out their souls in the bosoms of their mothers.
 To what shall I compare thee? or to what shall I liken thee, O daughter of Jerusalem? to what shall I equal thee, that I may comfort thee, O virgin daughter of Sion? for great as the sea is thy destruction: who shall heal thee?
 Thy prophets have seen false and foolish things for thee: and they have not laid open thy iniquity, to excite thee to penance: but they have seen for thee false revelations and banishments.
 Their heart cried to the Lord upon the walls of the daughter of Sion: Let tears run down like a torrent day and night: give thyself no rest, and let not the apple of thy eye cease.
 Arise, give praise in the night, in the beginning of the watches: pour out thy heart like water before the face of the Lord: lift up thy hands to him for the life of thy little children, that have fainted for hunger at the top of all the streets.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ७४:१-२,३-५अ,५व-७,२०-२१
प्रतिसाद :हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस.

१ हे देवा, तू आम्हाला कायमचे का टाकले आहेस ?
आपल्या कुरणातल्या कळपावर तुझा कोपाग्नी का धुमसतो ?
जी मंडळी पुरातन काळी तू विकत घेतली, जिला तू आपले वारस होण्याकरिता खंडणी भरून सोडवले तिचे, आणि ज्या सियोन पर्वतावर तू वस्ती केली त्याचे स्मरण कर.

२ सर्वस्वी उद्ध्वस्त झालेल्या स्थलांकडे पाय उचलून चल. 
वैऱ्याने पवित्रस्थानाची अगदी नासाडी केली आहे. 
तुझ्या मंदिरात तुझ्या शत्रूनी हलकल्लोळ मांडला आहे. 
त्यांनी आपले ध्वज, परदेशीय ध्वज, चिन्हांसाठी पवित्र स्थानाच्या प्रवेशद्वारावर उच्चस्थानी उभारले आहेत.

३ दाट झाडीवर कुऱ्हाड उचलणाऱ्या लोकांसारखे ते दिसले.
 त्याचे एकंदर नक्षीकाम ते कुऱ्हाडीने आणि हातोड्याने फोडून टाकतात.
 हे देवा, त्यांनी तुझ्या पवित्रस्थानाला आग लावली आहे;
 तुझ्या नावाचे निवासस्थान भ्रष्ट करून अगदी धुळीस मिळवले आहे.

४.तू कराराकडे लक्ष दे; 
कारण देशाचे कोनेकोपरे केवळ जुलमाची स्थाने झाली आहेत. 
पीडितांना लज्जित होऊन मागे फिरू देऊ नकोस. 
दीन आणि गरीबजन तुझ्या नावाची स्तुती करोत.

Psalm 74:1-2, 3-4, 5-7, 20-21
R. (19b) Lord, forget not the souls of your poor ones.

1b O God, why hast thou cast us off unto the end: why is thy wrath enkindled against the sheep of thy pasture?
2 Remember thy congregation, which thou hast possessed from the beginning. The sceptre of thy inheritance which thou hast redeemed: mount Sion in which thou hast dwelt.
R. Lord, forget not the souls of your poor ones.

3 Lift up thy hands against their pride unto the end; see what things the enemy hath done wickedly in the sanctuary.
4 And they that hate thee have made their boasts, in the midst of thy solemnity. They have set up their ensigns for signs,
5 And they knew not both in the going out and on the highest top. As with axes in a wood of trees,
R. Lord, forget not the souls of your poor ones.

6 They have cut down at once the gates thereof, with axe and hatchet they have brought it down.
7 They have set fire to thy sanctuary: they have defiled the dwelling place of thy name on the earth.
R. Lord, forget not the souls of your poor ones.

20 Have regard to thy covenant: for they that are the obscure of the earth have been filled with dwellings of iniquity.
21 Let not the humble be turned away with confusion: the poor and needy shall praise thy name.
R. Lord, forget not the souls of your poor ones.


जयघोष  
 फिलिप्पै २:१५.१६
आलेलुया, आलेलुया !
तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता.
 आलेलुया!


Acclamation:
Alleluia: 
R. Alleluia, alleluia.
 Christ took away our infirmities and bore our diseases.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान मत्तय  ८:५-१७
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून पुष्कळजण येतील आणि आब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील."

येशू कफर्णहूम येथे आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला आणि त्याला विनंती करून म्हणाला "प्रभुजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे." येशू त्याला म्हणाला, "मी येऊन त्याला बरे करीन." तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, "प्रभुजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण एक शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला 'जा' म्हटले की तो जातो, दुसऱ्याला 'अमुक कर' म्हटले की तो ते करतो." हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले आणि आपल्यामागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, "मी तुम्हांला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्राएलातआढळला नाही. मी तुम्हांला सांगतो की, पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून पुष्कळजण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात आब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील, परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील; तेथे रडणे आणि दात खाणे चालेल." मग येशू शताधिपतीला म्हणाला, "जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त होवो !" आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला.
नंतर येशू पेत्रच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली होती असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला आणि तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले; तेव्हा त्याने शब्दानेच भुते घालवली आणि सर्व रुग्णाइतांना बरे केले. "त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले," असे जे यशया संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading 


Matthew 8:5-17


When Jesus went into Capernaum a centurion came up and pleaded with him. 'Sir,' he said, 'my servant is lying at home paralysed and in great pain. Jesus said to him, 'I will come myself and cure him.' The centurion replied, 'Sir, I am not worthy to have you under my roof; just give the word and my servant will be cured. For I am under authority myself and have soldiers under me; and I say to one man, "Go," and he goes; to another, "Come here," and he comes; to my servant, "Do this," and he does it.' When Jesus heard this he was astonished and said to those following him, 'In truth I tell you, in no one in Israel have I found faith as great as this. And I tell you that many will come from east and west and sit down with Abraham and Isaac and Jacob at the feast in the kingdom of Heaven; but the children of the kingdom will be thrown out into the darkness outside, where there will be weeping and grinding of teeth.' And to the centurion Jesus said, 'Go back, then; let this be done for you, as your faith demands.' And the servant was cured at that moment. And going into Peter's house Jesus found Peter's mother-in-law in bed and feverish. He touched her hand and the fever left her, and she got up and began to serve him. That evening they brought him many who were possessed by devils. He drove out the spirits with a command and cured all who were sick. This was to fulfill what was spoken by the prophet Isaiah: He himself bore our sicknesses away and carried our diseases.

 This is the Gospel of the Lord  
Praise the Lord Jesus Christ .

चिंतनआजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की एक शताधिपती येशूकडे येतो आणि विनंती करतो की त्याचा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडलेला आहे. “तुम्ही माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल."
शताधिपतीचा विश्वास पाहून येशू सुद्धा आश्चर्यचकित झाला होता. अशा विश्वासामुळे येशू त्याच्या सेवकाला फक्त एका शब्दाने बरे करतो. येथे आपल्याला शताधिपतीचे आपल्या चाकरा विषयी असलेले प्रेम हे गौरवास्पद आहे हे समजून येते.
अनेकवेळेला आपण मालक व नोकर, गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करीत असतो. आपल्या कामगारांना तुच्छ लेखतो; मात्र येथे शताधिपतीची कृती ही खरोखरच देवाला स्मरून आहे असे दिसून येते.
मी माझ्या जीवनात इतरांप्रति प्रेम व आदर दाखवून त्यांच्या मदतीसाठी धावून जातोका ? आपल्या आजूबाजूला असलेल्या गरीब व गरजवंताच्या मदतीसाठी धावून जातो का ??

प्रार्थनाहे प्रभू येशू, आम्ही अपात्र असताना सुद्धा तू आमच्या जीवनात भाकरीच्या रुपाने येत असतोस. विश्वासाने तुला स्वीकारण्यास व तुजवर प्रीति करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या