सामान्य काळातील एकोणिसावा आठवडा
मंगळवार ११ ऑगस्ट २०२६
तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.
unless you turn and become like children, you will never enter the kingdom of heaven.
संत क्लेअर
कुमारिका (११९३-१२५३)
इ. स. १२१२ साली असिसी शहरातील संत जॉर्जच्या चर्चमध्ये असिसीच्या संत फ्रान्सिस ह्यांनी उपवासकालीन प्रवचने दिली. त्या प्रवचनाचा “क्यारा" नावाच्या एका अठरा वर्षीय मुलीवर एवढा जबरदस्त प्रभाव पडला की संत फ्रान्सिसच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या विचार सरणीनुसार व जीवन पद्धतीनुसार साधेपणाचे जीवन जगण्याची तीव्र उत्कंठा तिच्यात निर्माण झाली.
पुढे त्यानेच दिलेल्या सल्ल्यानुसार ती झावळ्यांच्या रविवारच्या रात्री आपल्या राजमहालातून गुपचूप बाहेर पडली. सोबत तिची मावशी बियांका आणि आणखी एक मैत्रीण होती. जवळच्याच पोर्टिउंकुलाच्या खोल्यापाशी असलेल्या लहानशा प्रार्थनामंदिरात संत फ्रान्सिस आणि त्यांचे धर्मबंधू तिच्यासाठी थांबलेले होते. इथेच तिने त्या सर्वांच्या साक्षीने आपले सोनेरी केस कापून घेतले. आपली भरजरी वस्त्रे काढून त्याऐवजी वैराग्याची वस्त्रे परिधान केली आणि ख्रिस्ताच्या नावाने गरिबीचे व्रत स्वीकारले. संत फ्रान्सिसच्या मार्गदर्शनानुसार तिला तात्पुरते जवळच्याच बेनेडिक्टाईन मठात ठेवण्यात आले.
ही बातमी तिच्या वडिलांच्या कानी पडताच त्यांचे रक्त उसळले. त्यांनी क्लेअरच्या लग्नाची व्यवस्था केलेली होती. तिच्यासाठी योग्य असा वर निवडलेला होता. आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात करून देण्याची मनोस्वप्ने ते पाहात होते. त्यामुळे त्यांना ह्या घटनेने धक्का बसला. बेनेडिक्टाईन कॉन्व्हेंटमधून तिला पळवून नेण्याचा मनसुबा देखील त्यांनी आखला. परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाला. क्लेअर आता पावित्र्याच्या व गरिबीच्या व्रताशी एकनिष्ठ राहण्यासाठी एका विशिष्ट संघाच्या स्थापनेचा विचार करू लागली.संत फ्रान्सिसला झालेल्या साक्षात्कारातून संत डेमियन चर्चच्या शेजारी मोडकळीस आलेल्या अवस्थेत उभ्या असलेल्या प्रार्थनामंदिरात आता क्लेअर अगदी साधेसुधे जीवन जगू लागली. पंधरा दिवसांच्या आतच तिची धाकटी बहीण आग्रेस तिला येऊन मिळाली. 'पुअर क्लेअर्सची संस्था हळूहळू वाढीस लागली. पुढील काही वर्षात क्लेअरची मावशी बियांका, तिची आई धन्यवादित ऑर्तोलाना, आणखी एक बहीण बियाट्रीस ह्यांनीसुद्धा क्लेअरचे आध्यात्मिक नेतृत्व स्वीकारले व त्या तिच्या संघात येऊन दाखल झाल्या.
क्लेअरच्या उर्वरित आयुष्यात ४० वर्षांत युरोपभरातील अनेक देशांमध्ये गरीब मुलींच्या शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी या संघाच्या पुष्कळशा शाखा उघडल्या गेल्या. असिसी येथील या संघाचे प्रमुख केंद्र मात्र क्लेअरच्या उतरत्या वयातही अध्यात्माचे केंद्र बनून राहिले. दोन पोप, अनेक कार्डिनल आणि बिशप्स तिचा सल्ला घेण्यासाठी येत असत. तिच्या अधिकृत निवृत्तीनंतरही असंख्य लोक तिच्याकडे आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी येत असत.
दीर्घकाळच्या आजारानंतर वयाच्या ५९व्या वर्षी १२ ऑगस्ट १२५३ रोजी साक्षात गरिबीचे मूर्तिमंत प्रतीक बनलेली 'संत फ्रान्सिसचे चिमुकले फूल' मानली गेलेली क्लेअर आपल्या स्वर्गीय निजधामी निघून गेली. त्यावेळी पोप इनोसेंट चौथे व त्यांच्या दरबारातील सर्व उच्च अधिकारी, तिच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते, अवघ्या दोनच वर्षांनी 'पुअर क्लेअर्स'ची ही पवित्र संस्थापिका पोपमहाशयांनी संतपदाने सन्मानित केली. तिच्या थडग्यावर असिसी येथे उभारलेले चर्च आतादेखील हजारो भाविकांसाठी तीर्थक्षेत्र बनलेलं आहे.
इ. स. १२२४ मध्ये फ्रेडरिक दुसरा ह्याच्या सारासेन सैन्याने जेव्हा असिसी
शहरावर हल्ला चढविला तेव्हा क्लेअर हिने अतिपवित्र ख्रिस्तशरीर असलेला प्याला आपल्या हाती घेऊन उंचाविला तेव्हा सर्व सैनिक आपोआप गर्भगळीत झाले. त्यांनी ताबडतोब तेथून पळ काढला. त्यामुळे काही चित्रांमध्ये क्लेअर हातात सिवोरियम (पवित्र भाकरींनी भरलेला प्याला) असलेल्या अवस्थेत दाखविण्यात येते.
अतिपवित्र साक्रामेंतातील येशूविषयी तिच्या मनात आत्यंतिक भक्तीभाव भरून उरलेला होता.
चिंतन: मला जसे वागवायचे तसे वागवा. मी माझी इच्छा सर्वस्वी देवाला अर्पण केलेली असल्याने मी पूर्णतः तुमचीच आहे. मला आता स्वत:ची अशी इच्छा उरलेली नाही. संत क्लेअर
लहान बालके ही देवाघरची जणू फुले आहेत. आज आपण त्यांच्यातील| निरनिराळ्या गुणांवर चिंतन करु या. विशेषतः प्रभूयेशू आपल्याला नम्रतेचा गुण लहान मुलांतून शिकण्यासाठी सांगत आहे.
नम्रता म्हणजे निरागसता, शुध्दता व आज्ञापालन. लहान बालकांच्या शब्दाद्वारे व आचरणाद्वारे त्यांच्यातील पवित्रता, शुध्दता आणि प्रेमळता दिसून येते. लहान बालके पूर्णतः आपल्या आई-वडिलांवर अवलंबून असतात. त्यांची पूर्ण भिस्त त्यांच्यावर असते. आपण आज चिंतन करु या की आपण त्या बालकांप्रमाणे शुध्द, पवित्र, निरागस, आज्ञाधारक व प्रेमळ आहोत का ?
पहिले वाचन : यहेज्केल २:८-३:४
वाचन :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन
"त्याने मला तो ग्रंथपट सेवन करायला दिला. तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला.'
“हे मानवपुत्रा, मी सांगतो ते ऐक, त्या फितुरी जातीप्रमाणे तू फितूर होऊ नकोस, आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा." मी पाहिले तो माझ्याकडे एक हात पुढे झाला आणि पाहा, त्या हातात ग्रंथपट होता, तो त्याने माझ्यापुढे पसरला, त्यावर पाठपोट लिहिले होते आणि त्यात विलाप, शोक आणि आकांत ह्यांविषयी लेख होता. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आले आहे ते सेवन कर. हा पट सेवन कर आणि जाऊन इस्राएल घराण्याबरोबर बोल." तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करायला लावले. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे, त्याने आपली आतडी भर." मी तो सेवन केला. तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला. मग़ तो मला म्हणाला, “मानवपुत्रा. जा, इस्राएल घराण्याकडे जा आणि त्याच्याजवळ माझी वचने बोल."
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Ezekiel 2:8-3:4
Thus says the Lord: "You, son of man, hear what I say to you. Be not rebellious like that rebellious house, Open your mouth and eat what I give you." And when I looked, behold, a hand was stretched out to me, and behold, a scroll of a book was in it. And he spread it before me.
And it had writing on the front and on the back, and there were written on it words of lamentation and mourning and woe. And he said to me, "Son of man, eat whatever you find here. Eat this scroll, and go, speak to the house of Israel. So I opened my mouth, and he gave me this scroll to eat. And he said to me, "Son of man, feed your belly with this scroll that I give you and fill your stomach with it." Then I ate it, and it was in my mouth as sweet as honey. And he said to me, "Son of man, go to the house of Israel, and speak with my words to them."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र : ११९:१४; २४, ७२.१०३,१११,१३१प्रतिसाद : प्रभू, तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात.
१ तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा असे मानून मी अत्यांनद करतो. तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत, ते माझे मंत्री आहेत.
२ सोन्यारुप्याच्या लक्ष्यावधी नाण्यांपेक्षा तुझे तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे. तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात! माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात.
३ तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो, मी तोंड उघडून धापा टाकल्या, कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला.
Psalm 119:14, 24, 72, 103, 111, 131 How sweet is your promise to my tongue, O Lord!
I rejoice in the way of your precepts. as though all riches were mine.
See, your decrees are my delight;your statutes are my counsellors. R
The law from your mouth means more to me than large quantities of silver and gold. R
How sweet is your promise to my tongue, more than honey in the mouth. R
Your decrees are my heritage forever, the joy of my heart. R
I have opened my mouth and I sigh, for I yearn for your commands. R
जयघोष आलेलुया, आलेलुया! हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव. आलेलुया!
प्रतिसाद स्तोत्र : ११९:१४; २४, ७२.१०३,१११,१३१
प्रतिसाद : प्रभू, तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात.
१ तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा
असे मानून मी अत्यांनद करतो.
तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत,
ते माझे मंत्री आहेत.
२ सोन्यारुप्याच्या लक्ष्यावधी नाण्यांपेक्षा
तुझे तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे.
तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात!
माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात.
३ तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन
म्हणून मी स्वीकारले आहेत,
कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो,
मी तोंड उघडून धापा टाकल्या,
कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला.
Psalm 119:14, 24, 72, 103, 111, 131
How sweet is your promise to my tongue, O Lord!
I rejoice in the way of your precepts.
as though all riches were mine.
See, your decrees are my delight;
your statutes are my counsellors. R
The law from your mouth means more to me
than large quantities of silver and gold. R
How sweet is your promise to my tongue,
more than honey in the mouth. R
Your decrees are my heritage forever,
the joy of my heart. R
I have opened my mouth and I sigh,
for I yearn for your commands. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास
आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव.
आलेलुया!
Acclamation:
Alleluia:
R. Alleluia, alleluia.
Take my yoke upon you, says and lowly in heart. the Lord; and learn from me, for I am gentle
R. Alleluia, alleluia.
