Marathi Bible Reading | 6 September 2026 |23rd Sunday in Ordinary Time

सामान्यकाळातील  वा  रविवार 

६ सेप्टेंबर २०२६ 

कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.For where two or three are gathered in my name, there am I among them

आज प्रभू येशू सामुदायिक प्रार्थनेचे महत्व पटवून देणारा आहे. सामुदायिक प्रार्थनेत प्रचंड शक्ती असते. एकत्र येऊन केलेल्या प्रार्थनेद्वारे आपण देवाचा सहवास अनुभवू शकतो. प्रभू येशू तर आज म्हणत  आहे, 'जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्या मध्ये मी  आहे.' प्रभू येशूच्या नावाने एकत्र जमलेल्या त्या समुदायामध्ये स्वतः प्रभू येशू हजर असतो. आपण आपल्या सामुदायिक प्रार्थनेत असताना कुटुंबात,| शेजोळात किंवा चर्चमध्ये प्रभू येशूचे अस्तित्व जाणण्याचा व अनुभवण्याचा प्रयत्न करू या. आपली सामुदायिक प्रार्थना आत्मियतेने व गंभीरपणे प्रभूकडे सादर करू या.
 

पहिले वाचन :यहेज्केल ३३:७-९
वाचक :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन ३३:७-९
"जर दुर्जनाला तू बोलून सावध केले नाहीस तर त्याच्या रक्तपाताला मी तुला जबाबदार धरीन."
परमेश्वराचे वचन यहेज्केल ह्याला प्राप्त झाले, ते असे : "हे मानवपुत्रा, मी तुला इस्राएल घराण्याचा पहारेकरी नेमले आहे. म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्यावतीने त्यांना सावध कर. हे दुर्जना, तू मरशील, असे मी कोणा दुर्जनाला म्हटले असता जर त्याला त्याच्या मार्गापासून मागे फिरण्याविषयी तू बोलून त्याला सावध केले नाहीस तर तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा; पण त्याच्या रक्तपाताला मी तुला जबाबदार धरीन. त्या दुर्जनाने आपल्या मार्गावरून मागे फिरावे म्हणून तू त्याला सावध केले असताही तो आपल्या मार्गावरून मागे न फिरल्यास तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा, पण तुझ्यावर त्याची काही जबाबदारी राहणार नाही. '
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Ezekiel 33:7-9

 Thus says the Lord: "You, son of man, I have made a watchman for the house of Israel. Whenever you hear a word from my mouth, you shall give them warning from me. If I say to the wicked, O wicked one, you shall surely die, and you do not speak to warn the wicked to turn from his way, that wicked person shall die in his iniquity, but his blood I will require at your hand. But if you warn the wicked to turn from his way, and he does not turn from his way, that person shall die in his iniquity, but you will have delivered your soul.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ९४:१-२, ६-७ अबक, ७ड-९
प्रतिसाद :आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल !

१ याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करुया,
 आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू.
 उपकारस्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ, 
स्तोत्र गाऊन त्याचा जयजयकार करू.

२ याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता 
त्याच्यापुढे आपले गुडघे टेकू, त्याची उपासना करू, 
त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे 
आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, 
त्याच्या हातचा कळप आहो.

३ आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर बरे होईल! 
मरिबा येथल्याप्रमाणे, रानात मस्सा येथील
 प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही 
आपले मन कठोर करू नका
तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती
 तरी त्यांनी माझी परीक्षा पाहिली व मला पारखले.


Psalm 95:1-2, 6-7abc, 7d-9
R.    O that today you would listen to his voice! Harden not your hearts.

Come, let us ring out our joy to the Lord;
hail the rock who saves us.
Let us come into his presence, giving thanks;
 let us hail him with a song of praise. R

O come; let us bow and bend low.
 Let us kneel before the God who made us, 
for he is our God and we
the people who belong to his pasture,
 the flock that is led by his hand. R

O that today you would listen to his voice!
 "Harden not your hearts as at Meribah,
as on that day at Massah in the desert 
when your forebears put me to the test; 
when they tried me,
though they saw my work. R

दुसरे वाचन  रोम  १३:८-१०
 वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
 "प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय."

एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. कारण "व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, लोभ धरू नकोस" ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर." ह्या वचनात आहे. प्रीती शेजाऱ्यांचे काही वाईट करत नाही, म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय..
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद

Second Reading  :
Romans 13:8-10
Brethren: Owe no one anything, except to love each other, for the one who loves another has fulfilled the law. For the commandments, "You shall not commit adultery, You shall not murder, You shall not steal, You shall not covet", and any other commandment, are summed up in this word: "You shall love your neighbour as yourself." Love does no wrong to a neighbour; therefore love is the fulfilling of the law.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास तुम्ही समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा.
  आलेलुया!

Acclamation: 
Alleluia: 
R. Alleluia, alleluia.
 In Christ, God was reconciling the world to himself, and entrusting to us the message of reconciliation..
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान मत्तय   १८:१५-२०
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  
“त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास, असे होईल. "
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखव. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल. परंतु त्याने जर ऐकले नाही तर तू आणखी एकादोघांना आपल्याबरोबर घे, अशासाठी की दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबित व्हावा आणि जर त्याने मंडळीचेही ऐकले नाही तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होतो. मी तुम्हांला नक्की सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. मी आणखी तुम्हांला
नक्की सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Matthew 18:15-20
At that time: Jesus said to his disciples, "If your brother sins against you, go and tell him his fault, between you and him alone. If he listens to you, you have gained your brother. But if he does not listen, take one or two others along with you, that every charge may be established by the evidence of two or three witnesses. If he refuses to listen to them, tell it to the church. And if he refuses to listen even to the church, let him be to you as a Gentile and a tax collector. Truly, I say to you, whatever you bind on earth shall be bound in heaven, and whatever you loose on earth shall be loosed in heaven. Again say to you, if two of you agree on earth about anything they ask, it will be done for them by my Father in heaven. For where two or three are gathered in my name, there am I among them
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन:  आजची वाचने आपणांस सांगतात की आपण सर्वजण देवाची मुले असल्याकारणाने भाऊ-बहिणी आहोत, म्हणून एकमेकांसंबंधी आपले बंधुत्वाचे नाते आहे आणि ह्या बंधुत्वाच्या नात्यामुळे आपण जेव्हा आपला भाऊ चुकतो तेव्हा त्याला प्रेमाने समजावणे हे आपले कर्तव्य बनते. आपण एकमेकांना मनापासून क्षमा केली पाहिजे आणि इतरांकडे क्षमा मागितली पाहिजे. प्रभू येशू आपल्यामधील वाद सोडवण्यासाठी आपण काय करावे हे सुचवत आहे. प्रथम, दोघांमधील वाद दोघांनीच मिटवावा. जर येथे वाद मिटला नाही; तर दोन-तीन साक्षीदार घ्यावे. येथे वाद मिटला नाही; तर प्रकरण चर्चकडे आणावे. अपराधी व्यक्तींनी चर्चचे ऐकावे व समेट करावा, कारण प्रभू येशू स्वतः चर्चमध्ये कार्यरत आहे. जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे मी स्वतः हजर आहे असे प्रभू येशू म्हणतो. परमेश्वराला समेट, प्रेम आणि क्षमा हवीमी देवाचे ऐकण्यास, प्रीती करण्यास आणि इतरांना मनापासून क्षमा करण्यास तयार आहे का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सहवासात तुझे प्रेम व कृपा अनुभवण्यास आम्हाला  प्रेरणा दे, आमेन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या