Marathi Bible Reading | 30th week in ordinary Time | Saturday 31st October 2026

 सामान्य काळातील  ३०वा  सप्ताह 

शनिवार ३१ ऑक्टोबर  २०२६

कारण जो कोणी आपणाला उंचावतो तो नमवला जाईल आणि जो आपणाला नमवतो तो उंचावला जाईल."Because every one that exalteth himself, shall be humbled; and he that humbleth himself, shall be exalted.

संत अल्फोन्सस रॉड्रीग्ज
वर्तनसाक्षी (१५३१-१६१७)

दक्षिण स्पेनमध्ये रेशीम कापडाचा एक व्यापारी राहत होता. एकाएकी त्याची बायको आणि मुले मरण पावली. त्याबरोबर त्याने मोठ्या उल्हासाने प्रार्थनामय जीवन सुरू केले. असह्य शारीरिक कष्ट आणि तपश्चर्या ह्यांद्वारे त्याने पावित्र्याचा अंगिकार केला आणि वयाच्या ३९ व्या वर्षी माजोकी बेटावरील येशूसंघियांमध्ये त्याने व्रतस्थ बंधू म्हणून दीक्षा घेतली. तेथे त्याने माऊंट सायन कॉलेज व सेमिनरीचा द्वारपाल म्हणून ३५ वर्षे नम्रपणे कार्य केले.

औपचारिकारित्या शिक्षण झालेले नसले तरी धर्मगुरूंकडे येणाऱ्या लोकांत एक ब्रदर म्हणून त्याने मोलाचे मार्गदर्शन व सल्ला देण्याचे काम केले. ख्रिस्ती धर्मतत्त्वांविषयी त्याला अगाध ज्ञान होते. पवित्र मरियेवरील बालसदृश मनोवृत्तीमुळे आणि आत्यंतिक शक्तीमुळे त्याने निष्कलंक गर्भसंभवाचा प्रार्थनापाठ लिहिला व त्याच्या प्रती सर्वत्र वाटून टाकल्या. प्रार्थनापाठ अल्पावधीत लोकप्रिय झाला.
द्वारपाल म्हणून कार्य करीत असताना तो स्वत:शी म्हणे, 'दरवाज्यावर बेल वाजली आणि कोणी आले तर तो ख्रिस्तच समजायचा' आणि मग मोठ्या प्रसन्न हसतमुख चेहऱ्याने तो त्यांचे स्वागत करीत म्हणे, “प्रभुजी, या मी आपली काय सेवा करू?"

संत पौल आजच्या पहिल्या वाचनात सांगत आहे की, त्याने  ख्रिस्ताठायी आपले सर्वस्व समर्पित करून केवळ ख्रिस्ताचीच सुवार्ता  घोषविण्यात त्याला आनंद होता. प्रभू येशूचा नम्र दास व सेवक बनून संत  पौलाने ख्रिस्ताची साक्ष सर्वांना दिली.
 प्रभू येशू आपल्याला देवाठायी नम्रता धारण करण्याचा सल्ला देत असताना समारंभातील आदरतिथ्य व नम्र वागणुकीची शिकवण देत आहे. आपल्याला विविध समारंभाची आमंत्रण येत असतात.  अशावेळी आपण सभ्यतेने वागावे. विशेषतः नम्रतेने खालच्या सामान्य जागेवर बसावे. आपल्याहिपेक्षा अधिक योग्यतेच्या माणसांसाठी समोरची व  वरची आसने राखून ठेवलेली असू शकतात. आपली प्रतिष्ठा धूळीस मिळू नये म्हणून बेनसीराच्या बोधवचनात म्हटले आहे, “स्वतःची प्रतिष्ठा मिरवू नकोस  नाही तर तू आपल्या तोंडाला काळिमा फासशील" (बेनसीरा १:१०). आपण आज आदरतिथ्य व समारंभात पाळावयाची पथ्ये ह्यावर चिंतन करू या. 
✝️   

पहिले वाचन : फिलीप्पैकरांस पत्र  १:१८-२६ 
वाचन :पौलचे फिलीप्पैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
 "मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे."
ख्रिस्ताची घोषणा होते ह्यात मी आनंद करतो आणि करणारच. कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही, जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा आणि आशा तिच्याप्रमाणे, ते तुमच्या प्रार्थनेने आणि येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धाराला कारण होईल, हे मला ठाऊक आहे. कारण मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी ह्या दोहोसंबधांने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे, कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुम्हांकरिता अधिक आवश्यक आहे. मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार आणि विश्वासात तुम्हांला वृद्धी आणि आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे. हे अशासाठी की, तुम्हांमध्ये माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हांला अधिक कारण व्हावे.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : : Philippians 1: 18b-26
So that by all means, whether by occasion, or by truth, Christ be preached: in this also I rejoice, yea, and will rejoice. For I know that this shall fall out to me unto salvation, through your prayer, and the supply of the Spirit of Jesus Christ, According to my expectation and hope; that in nothing I shall be confounded, but with all confidence, as always, so now also shall Christ be magnified in my body, wither it be by life, or by death. For to me, to live is Christ; and to die is gain. And if to live in the flesh, this is to me the fruit of labour, and what I shall choose I know not. But I am straitened between two: having a desire to be dissolved and to be with Christ, a thing by far the better. But to abide still in the flesh, is needful for you. And having this confidence, I know that I shall abide, and continue with you all, for your furtherance and joy of faith: That your rejoicing may abound in Christ Jesus for me, by my coming to you again.
This is the word of God 
Thanks be to God 

:  ४२:२, ३, ५बकड
प्रतिसाद : माझा जीव देवासाठी तहानलेला आहे. 

१) हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी कासावीस होते
तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी कासावीस झाला आहे.

२) माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानलेला आहे.
मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन ?

३) लोकसमुदायाच्या मेळयाबरोबर मी चालत असे 
आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे 
त्याला मी मिरवत नेत असे.

: Psalms 42: 2, 3, 5cdef
R. My soul is thirsting for the living God.

2 As the hart panteth after the fountains of water; so my soul panteth after thee, O God.
R. My soul is thirsting for the living God.

3 My soul hath thirsted after the strong living God; when shall I come and appear before the face of God?
R. My soul is thirsting for the living God.

5cdef I shall go over into the place of the wonderful tabernacle, even to the house of God: With the voice of joy and praise; the noise of one feasting.
R. My soul is thirsting for the living God.

 जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना 
ज्योतीसारखे जगात दिसता.
आलेलुया!

Acclamation:  
Alleluia: Matthew 11: 29ab
R. Alleluia, alleluia.
29ab Take my yoke upon you and learn from me, for I am meek and humble of heart.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  लूक १४:१,७-११
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जो कोणी आपणाला उंचावतो तो नमवला जाईल आणि जो आपणाला नमवतो तो उंचावला जाईल. "
येशू एका शब्बाथ दिवशी परुश्यातील कोणाएका अधिकाऱ्याच्या घरी भोजनाला गेला, तेव्हा ते त्याच्या पाळतीवर बसले होते.
 आमंत्रित लोक मुख्य मुख्य आसने कसे निवडून घेत आहेत हे पाहून येशू त्यांना दाखला देऊन म्हणाला: “कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस, कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल, मग ज्याने तुला आणि त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ह्यांना जागा दे, तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील, पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बैस, म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, मित्रा, वर येऊन बैस, म्हणजे तुझ्याबरोबर भोजनाला बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. कारण जो कोणी आपणाला उंचावतो तो नमवला जाईल आणि जो आपणाला नमवतो तो उंचावला जाईल."
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading : 
 Luke 14: 1, 7-11
 And it came to pass, when Jesus went into the house of one of the chief of the Pharisees, on the sabbath day, to eat bread, that they watched him. And he spoke a parable also to them that were invited, marking how they chose the first seats at the table, saying to them:
 When thou art invited to a wedding, sit not down in the first place, lest perhaps one more honourable than thou be invited by him:
 And he that invited thee and him, come and say to thee, Give this man place: and then thou begin with shame to take the lowest place.
 But when thou art invited, go, sit down in the lowest place; that when he who invited thee, cometh, he may say to thee: Friend, go up higher. Then shalt thou have glory before them that sit at table with thee.Because every one that exalteth himself, shall be humbled; and he that humbleth himself, shall be exalted.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
आजच्या शुभवर्तमानातून दोन मुख्य बाबींवर आपणांस चिंतन करावयाचे आहे.
१) नम्रता
२) आदरातिथ्य.
समारंभामध्ये आपण नेमके कुठे बसतो? मान मिळविण्यास पुढे किंवा अगदीच मागे ?
येशू सांगत आहे - समारंभात गेल्यावर मानाच्या जागेवर पहिल्याने बसू नकोस, त्याऐवजी खालची जागा घे. जर तुझी असेल तर तुला नक्कीच मिळणार. नम्रता ही उच्च स्थानी असून देवाला ती अधिक भावते.
"जो स्वतःला मोठा करतो तो नम्र केला जाईल आणि जो स्वतःला नम्र करतो तो मोठा केला जाईल."

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी योग्य ती स्तुती करण्यास व नम्रपणे इतरांना सन्मानाने वागविण्यास प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या