रविवार 27 सप्टेंबर 2020

वाचन 1, यहेज्केल 18: 25-28

 देव म्हणाला, “तुम्ही कदाचित् म्हणाला, ‘देव, आमचा प्रभू न्यायी नाही’ पण इस्राएलच्या लोकांनो, ऐका. तुम्हीच न्यायी नाही आहात.जर सज्जन बिघडला व दुष्ट झाला, तर त्याने त्याच्या दुष्कृत्याबद्दल मेलेच पाहिजे.पण वाईट माणूस सुधारला व सज्जन आणि प्रामणिक झाला, तर तो त्याचा जीव वाचवील. तो जिवंत राहील.तो किती वाईट होता. हे त्याचे त्यालाच कळेल व तो माझ्याकडे परत येईल. पूर्वीप्रमाणे वाईट गोष्टी तो करणार नाही. मग तो जगेल. तो मरणार नाही.”


गॉस्पेल, मॅथ्यू 21: 28-32

याविषयी तुम्हांला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मनुष्य आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’मुलाने उत्तर दिले, मी जाणार नाही, परंतु नंतर त्या मुलाने जायचे ठरविले व तो गेला.
 नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर. त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो. पण ते गेला नाही.
त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?” ते म्हणाले, पहिल्या मुलाने.”येशू त्यांना म्हणाला, मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या हे वाईट लोक आहेत असे तुम्हांला वाटते, पण ते तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील.जीवनाचा खरा रस्ता कोणता हे तुम्हांला दाखवावे म्हणून योहान आला आणि तुम्ही योहानाला मानले नाही. जकातदार व वेश्या यांनी योहानावर विश्वास ठेवला हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि योहानावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या