सामान्यकाळातील १२वा सप्ताह
शुक्रवार ३० जुन २०२३
“प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहा."
✝️
रोमचे पहिले रक्तसाक्षी
- (६४-३१४)
रोमची ख्रिस्तसभा ज्या दोन भक्कम आधारस्तंभावर उभारलेली होती अशा संत पीटर आणि पौल या प्रेषिताचा सण साजरा केल्यानंतर या ख्रिस्तसभेच्या प्रसारासाठी ज्यांनी रक्त सांडले अशा आद्य रक्तसाक्ष्यांची स्मृती साजरी करणे हे साहजिकच आहे.
तसे प्रारंभीच्या ख्रिस्तसभेच्या काळात रोमन साम्राज्य खूप व्यापक स्वरुपात पसरलेले होते त्यामुळे कुठे ना कुठे तरी ख्रिस्ती धर्मियांचा छळ चालूच असायचा. ह्या महत्त्वाच्या घटना ख्रिस्तसभेने आपल्या रक्तरंजित इतिहासात लिहून ठेवलेल्या आहेत.अशा प्रकारे इ. स. ६४ ते ३१४ पर्यंत २५० वर्षे ख्रिस्तसभाछळाच्या भोवऱ्यात सापडलेली होती. परंतु ह्या २५० वर्षांनंतर ख्रिस्तसभेत शांतीचे साम्राज्य प्रस्थापित झाले. इ. स. ३१४ साली कॉन्स्टन्टाईन राजाने आपल्या मिलानच्या जाहिरनाम्याद्वारे ख्रिस्ती धर्म हा रोमन साम्राज्याचा अधिकृत धर्म असल्याचे जाहीर केले. ख्रिस्ती धर्माला राजाश्रय मिळाला.
ख्रिस्तसभा ह्या रक्तसाक्ष्यांचा आज विशेष सोहळा दोन कारणास्तव साजरा करते. पहिले कारण म्हणजे रक्तसाक्षींचे रक्त हे श्रद्धेचे बीज आहे. हे आपल्याला पटावे! जी श्रद्धा आपल्यापर्यंत चालत आलेली आहे ती श्रद्धा जोपासण्यासाठी अनेकांनी आपल्या जीवाची किंमत मोजलेली आहे. त्यामुळे आपल्या श्रद्धेचे मूल्य खूप मोठे आहे. दुसरे कारण म्हणजे श्रद्धेची जोपासना करणे ही काही गुलाबी गालिचावरून केलेली मृदू मुलायम वाटचाल नव्हे. ती तारेवरची कसरत आहे. प्रसंगी आपल्याही श्रद्धेची कसोटी पाहिली जाते. त्यावेळी आपल्याला आपल्या विश्वासाशी एकनिष्ठ राहता यावे म्हणून या रक्तसाक्षींची खास आठवण ख्रिस्तसभा करते.
पहिले वाचन : उत्पत्ती १७: १,९-१०,१५-२२
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये स्थापलेला माझा करार जो तुम्ही पाळावयाचा तो हा की, तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता व्हावी. सारा हिच्या पोटी तुला एक पुत्र होईल.'
अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल आणि सात्त्विकपणे राहा."
देव आब्राहामला आणखी म्हणाला, “आता तू व तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यान्पिढ्या माझा करार पाळावा. माझ्यामध्ये आणि तू व तुझ्या पश्चात तुझी संतती यांच्यामध्ये स्थापलेला माझा करार जो तुम्ही पाळावयाचा तो हा की, तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता व्हावी." मग देवाने आब्राहामला सांगितले, “तुझी बायको साराय हिला ह्यापुढे साराय म्हणावयाचे नाही, तर तिचे नाव सारा (राणी) होईल. मी तिला आशीर्वादित करीन, एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन. मी तिला आशीर्वादित करीन, तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील, तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील.” आब्राहामने उपडे पडून आणि हसून मनातल्या मनात म्हटले, "शंभर वर्षांच्या माणसाला मूल होईल काय ? नव्वद वर्षांच्या सारेला मूल होईल काय ?" आब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल तुझ्यासमोर जगला म्हणजे झाले." मग देव म्हणाला, “नाही, नाही, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव इसहाक ठेव, त्याच्या पश्चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करीन. इश्माएलविषयी म्हणशील तर मी तुझी विनवणी ऐकली आहे. पाहा, मी त्याचे कल्याण करीन, त्याला सफळ आणि बहुगुणित करीन. त्याच्या पोटी बारा सरदार निपजतील, मी त्याचे मोठे राष्ट्र करीन. पण पुढल्या वर्षी याचवेळी तुला सारेच्या पोटी इसहाक होईल, त्याच्याशी मी आपला करार करीन."
मग अब्राहामशी बोलणे संपल्यावर देव त्याला सोडून वर गेला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Genesis 17:1, 9-10, 15-22
When Abram was ninety-nine years old the Lord appeared to Abram and said to him, "I am God Almighty; walk before me, and be blameless." And God said to Abraham, "As for you, you shall keep my covenant, you and your offspring after you throughout their generations. This is my covenant, which you shall keep, between me and you and your offspring after you: "Every male among you shall be circumcised." And God said to Abraham, "As for Sarai your wife, you shall not call her name Sarai, but Sarah shall be her name. I will bless her, and moreover, I will give you a son by her. I will bless her, and she shall become nations; kings of peoples shall come from her." Then Abraham fell on his face and laughed and said to himself, "Shall a child be born to a man who is a hundred years old? Shall Sarah, who is ninety years old, bear a child?" And Abraham said to God, "Oh that Ishmael might live before you!" God said, "No, but Sarah your wife shall bear you a son, and you shall call his name Isaac. I will establish my covenant with him as an everlasting covenant for his offspring after him. As for Ishmael, I have heard you; behold, I have blessed him and will make him fruitful and multiply him greatly. He shall father twelve princes, and I will make him into a great nation. But I will establish my covenant with Isaac, whom Sarah shall bear to you at this time next year." When he had finished talking with him, God went up from Abraham.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १२८ :१-५
प्रतिसाद :देवाला भिऊन वागणाऱ्या मनुष्याला आशीर्वाद मिळेल.
१ )जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो,
जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य!
२) तू आपल्या श्रमाचे फळ खाशील.
तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल,
तुझ्या माजघरात तुझी स्त्री सफळ
द्राक्षवेलीसारखी होईल;
तुझ्या मेजासभोवती तुझी मुले
जैतुनाच्या रोपांसारखी होतील.
३) पाहा, देवाला भिऊन वागणाऱ्या मनुष्याला
असा 'आशीर्वाद मिळेल.
परमेश्वर सियोनेतून तुला आशीर्वाद देवा
आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस
येरुशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो.
Psalm: Psalm 128:1-2, 3, 4-5
R Indeed thus shall be blessed the man who fears the Lord.
Blessed are all who fear the Lord,
and walk in his ways!
By the labour of your hands
you shall eat.
You be blessed and prosper. R.
Your wife like a fruitful vine
in the heart of your house;
your children like shoots of the olive
around your table. R
Indeed thus shall be blessed
the man who fears the Lord.
May the Lord bless you from Sion.
May you see Jerusalem prosper
all the days of your life! R.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो
आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.
आलेलुया!
Acclamation:
Christ took our illnesses and bore our diseases.
शुभवर्तमान मत्तय ८:१-४
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहा."
येशू डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्यामागे चालले आणि पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला आणि त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, “प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहा." तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, “माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो." लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; पण जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरिता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Matthew 8:1-4
When Jesus came down from the mountain, great crowds followed him. And behold, a leper came to him and knelt before him, saying, "Lord, if you will, you can make me clean." And Jesus stretched out his hand and touched him, saying, "I will; be clean." And immediately his leprosy was cleansed. And Jesus said to him, "See that you say nothing to anyone, but go, show yourself to the priest and offer the gift that Moses commanded, for a proof to them."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: येशू डोंगरावरून खाली आला. आता शिकवण्याची वेळ संपली आता सर्वकाही कृतीमध्ये अनुभवणार आहोत, दोवीस वर्षांची ओटी प्रतिक्षा आता संपणार, आब्राहाम आणि सारा हे आता देवाचे वचन पूर्ण होताना पाहतील, आब्राहामाच्या या विश्वासाच्या परिक्षेत स्थीरता व संयम महत्वाचे ठरणार आहे. जे देवावर विश्वास ठेवतात त्यांच्या जीवनात ओठा प्रमाणात आनंद दिसतो, सारादी गर्भधारणा आणि कुष्टरोग्यांना शुद्ध करणे हे विश्वासाचे उत्तम उदाहरण आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आपल्या जीवनात जेव्हा देवाकडून मोठे दान प्राप्त होते तेव्हा आपण आनंदी होतो? की म्हणतो, “आता याचा काय उपयोग ? कारण मला त्यावेळी त्याची गरज होती. आपल्या जीवनात अनुकूल काळ आणणे हे सर्वकाही परमेश्वरावर अवलंबून आहे. आपण मात्र त्यामध्ये धीराने राहून जीवन जगायचे असते. आजच्या दिवशी आपण प्रभूकडे आपल्या इच्छा-आकांक्षा, तसेच जे अंथरुणाला खिळलेले आहेत, जे निसंतान आहेत, दिर्घ आजाराने ग्रस्त आहेत, जे कायमस्वरूपी बेशुद्ध आहेत अशा सर्वांना परमेश्वराची कृपा आशीर्वाद मिळावा ज्यामुळे त्याच्या जीवनात शांती, आनंद व प्रेम अनुभवण्यास त्यांना साहाय्य होईल.
प्रार्थना :हे प्रभू येशू, मी सर्वस्वी तुला शरण आलो आहे. माझी श्रद्धा बळकट कर व तुझ्या इच्छेनुसार करण्यास मला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या