सामान्यकाळातील १वा सप्ताह 

शनिवार १ जुलै २०२३ 

 “जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त होवो !"
✝️


धन्यवादित जुणीपेरो सेरा 


पहिले वाचन :
  
 उत्पत्ती १८: १-१५
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन 

“परमेश्वराला काही असाध्य आहे काय ? मी तुझ्याकडे परत येईन तेव्हा सारेला मुलगा होईल."

आब्राहाम दिवसा भर उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने मम्रेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले. त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले. तो म्हणाला, “हे प्रभू, माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर ये, तुझ्या दासापासून पुढे जाऊ नकोस. थोडे पाणी आणू द्या; तुम्ही आपले पाय धुऊन ह्या झाडाखाली विसावा घ्या. मी थोडी भाकर आणतो, तिचा आपल्या जीवास आधार करा, मग पुढे जा यासाठीच तुमचे या आपल्या दासाकडे येणे झाले असावे." ते म्हणाले, “तू म्हणतोस ते कर.” तेव्हा आब्राहाम त्वरेने डेऱ्यात सारेकडे जाऊन म्हणाला, “तीन मापे सपीठ लवकर घे आणि ते मळून त्याच्या भाकऱ्या कर." आब्राहाम गुरांकडे धावत गेला आणि त्याने एक चांगले कोवळे वासरू निवडून चाकराकडे दिले; त्याने ते त्वरेने शिजवले. नंतर आब्राहामने दही, दूध आणि ते शिजवलेले वासरू ही आणून त्यांच्यापुढे ठेवली आणि ते जेवत असता तो त्याच्याजवळ झाडाखाली उभा राहिला.
मग ते त्याला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?" तो म्हणाला, “ती पाहा डेयात आहे." मग तो म्हणाला "पुढल्या वसंतऋतूत मी तुझ्याकडे खात्रीने परत येईन; तेव्हा पाहा, तुझी बायको सारा हिला मुलगा होईल." त्याच्यामागे डेऱ्याच्या दारातून सारा हे ऐकत होती. आब्राहाम आणि सारा ही वयाने वृद्ध होती आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, “मी म्हातारी झाले आहे आणि माझा पतीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय?" परमेश्वर आब्राहामला म्हणाला, "सारा का हसली? 'मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होईल काय' असे ती का म्हणाली ? परमेश्वराला काही असाध्य आहे काय ? पुढल्या वसंतऋतूत नेमलेल्या समयी मी तुझ्याकडे येई तेव्हा सारेला मुलगा होईल." तेव्हा सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही." कारण ती घाबरली होती. पण तो म्हणाला, “नाही, तू हसलीच.”
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


First Reading :  Genesis 18:1-15

In those days: The Lord appeared to Abraham by the Oaks of Mamre, as he sat at the door of his tent in the heat of the day. He lifted up his eyes and looked, behold, three men were standing in front of him. When he saw them, he ran from the tent door to meet them and bowed himself to the earth and said, "O Lord, if I have found favour in your sight, do not pass by your servant. Let a little water be brought, and wash your feet, and rest yourselves under the tree, while I bring a morsel of bread, that you may refresh yourselves, and after that you may pass on - since have come to your servant." So they said, "Do as you have said." And Abraham went quickly into the tent to Sarah and said, "Quick! Three measures of fine flour! Knead it, and make cakes." And Abraham ran to the herd and took a calf, tender and good, and gave it to a young man, who prepared it quickly. Then he took curds and milk and the calf that he had prepared, and set it before them. And he stood by them under the tree while they ate. They said to him, "Where is Sarah your wife?" And he said, "She is in the tent." The Lord said, "I will surely return to you about this time next year, and Sarah your wife shall have a son." And Sarah was listening at the tent door behind him. Now Abraham and Sarah were old, advanced in years. The way of women had ceased to be with Sarah. So Sarah laughed to herself, saying, "After I am worn out, and my lord is old, shall have pleasure?" The Lord said to Abraham, "Why did Sarah laugh and say, 'Shall I indeed bear a child, now that I am old?' Is anything too hard for the Lord? At the appointed time I will return to you, about this time next year, and Sarah shall have a son." But Sarah denied it, saying, "I did not laugh", for she was afraid. He said, "No, but you did laugh."
This is the word of God 
Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र  लूक १:४६-५०.५३-५५

प्रतिसाद : मी देवाची दया स्मरतो.

१) माझा जीव प्रभूला थोर मानतो 
आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे
 माझा आत्मा उल्हासला आहे.

२) त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे.
पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील.
 कारण जो समर्थ आहे, त्याने माझ्याकरिता 
महत्कृत्ये केली आहेत. त्याचे नाव पवित्र आहे. 

३) जे त्याचे भय धरतात, त्यांच्यावर 
त्याची दया पिढ्यान्पिढ्या असते.
त्यांने भुकेल्यांना उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे. 
आणि धनवानांना रिकामे पाठवून दिले आहे.

४) आपल्या पूर्वजांना त्याने सांगितले 
त्याप्रमाणे अब्राहाम आणि त्याचे संतान
 ह्यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरून 
त्याने आपला सेवक इस्राएल 
ह्याला सहाय्य केले आहे.



Psalm:  Luke 1:46-47, 48-49, 50 and 53, 54-55 

R . The Lord has remembered his mercy.

My soul magnifies the Lord,
and my spirit rejoices in God my Saviour. R

For he has looked on the humble estate of his servant.
 For behold, from now on all generations will call me blessed; 
for he who is mighty has done great things for me, 
and holy is his name. R .

And his mercy is for those who fear him 
from generation to generation.
He has filled the hungry with good things, 
and the rich he has sent away empty. R

 He has helped his servant Israel,
in remembrance of his mercy,
as he spoke to our fathers, 
to Abraham and to his offspring for ever. R

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
देवाचे वचन स्वीकारा, ते माणसाचे वचन म्हणून नव्हे तर देवाचे वचन म्हणून स्वीकारा आणि वास्तविक ते तसे आहेच.
  आलेलुया!

Acclamation: 
 Christ took our illnesses and bore our diseases.


शुभवर्तमान   मत्तय  ८:५-१७
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून पुष्कळजण येतील आणि आब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील."

येशू कफर्णहूम येथे आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला आणि त्याला विनंती करून म्हणाला “प्रभुजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे." येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन." तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभुजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण एक शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला 'जा' म्हटले की तो जातो, दुसऱ्याला 'अमुक करें' म्हटले की तो ते करतो.” हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले आणि आपल्यामागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्राएलात आढळला नाही. मी तुम्हांला सांगतो की, पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून पुष्कळजण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात आब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील, परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील; तेथे रडणे आणि दात खाणे चालेल." मग येशू शताधिपतीला म्हणाला, “जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त होवो !" आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला.

नंतर येशू पेत्रच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली होती असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला आणि तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले; तेव्हा त्याने शब्दानेच ते घालवली आणि सर्व रुग्णाइतांना बरे केले. “त्याने स्वत: आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले," असे जे यशया संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.



Gospel Reading : Matthew 8:5-17

At that time: When Jesus had entered Capernaum, a centurion came forward to him, appealing to him, "Lord, my servant is lying paralysed at home, suffering terribly." And he said to him, "I will come and heal him." But the centurion replied, "Lord, am not. worthy to have you come under my roof, but only say the word, and my servant will be healed. For too am a man under authority, with soldiers under me. And I say to one, 'Go', and he goes, and to another, 'Come', and he comes, and to my servant, 'Do this, and he does it." When Jesus heard this, he marvelled and said to those who followed him, "Truly, tell you, with no one in Israel have I found such faith. I tell you, many will come from east and west and recline at table with Abraham, Isaac, and Jacob in the kingdom of heaven, while the sons of the kingdom will be thrown into the outer darkness. In that place there will be weeping and gnashing of teeth." And to the centurion Jesus said, "Go; let it be done for you as you have believed." And the servant was healed at that very moment. And when Jesus entered Peter's house, he saw his mother-in-law lying sick with a fever. He touched her hand, and the fever left her, and she rose and began to serve him. That evening they brought to him many who were oppressed by demons, and he cast out the spirits with a word and healed all who were sick. This was to fulfill what was spoken by the prophet Isaiah: "He took our illnesses and bore our diseases."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: आजच्या शुभवर्तमानात येशू शताधिपतीच्या दासाला रोगमुक्त करतो. रोमी लष्करसंबंधी अधिकारश्रेणीनुसार शताधिपतीचे पद हा महत्वाचा हुद्दा होता आणि शताधिपती ह्या शब्दाचे शब्दव्युत्पत्तिशास्त्र सूचित करते की, शताधिपती शंभर सैनिकांचे सेनापती व कफर्णहूम शहराच्या संपूर्ण कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. इतके वरिष्ठ सैन्य अधिकारी येशूपुढे येऊन विनयशीलतेने रोगमुक्तीसाठी विनंती करतो, आणि कोणासाठी? स्वतःसाठी ? आप्तइष्टांसाठी ? नाही एका चाकरासाठी! त्याकाळात चाकराला मानवी प्रतिष्ठा नव्हती तर तो एक विक्रीची वस्तू होता. खरेपाहता शताधिपती येशूचे अनुकरण करतो जो विनम्रतेची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे. विनयशीलतेने आपण एकमेकांशी वागतो का ? नम्र हृदयाने आपण प्रभूसमोर जातो का? परंतु आपण प्रार्थना करताना आपले मन गर्वाने फुगून जाते की आपण नम्र "हृदयाच्या गाभ्यातून” लीनतेने देवाशी बोलतो ?” “जो नम्र होतो त्यास उंचाविले जाईल.” नम्रता हा प्रार्थनेचा मूलभूत पाया आहे. (CCC२५५९)

प्रार्थना : हे प्रभू येशू, आमचा विश्वास प्रबळ कर, आमच्यामध्ये इतराविषयी दया व कळवळा निर्माण होऊ दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️