Marathi Bible Reading | 13th Sunday in ordinary Time | 2nd July 2023

 सामान्यकाळातील १३ वा  रविवार 

२ जुलै  २०२३ 

"जो तुम्हांला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो, 
✝️





जो आपला क्रूस उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही

  प्रभू येशूला आपल्या  बाप्तिस्माद्वारे आपण आपला जीवनदाता व मुक्तीदाता म्हणून स्वीकारले आहे. प्रभू येशूच्या शिकवणुकी प्रमाणे जो पर्यंत आपण आचरण करीत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण त्याला स्वीकारलेले नाही. ख्रिस्ताला स्वीकारणे  म्हणजे त्याची वचने व त्याच्या आज्ञांचे पालन करणे. ख्रिस्ताला स्वीकरणे म्हणजे गरजवंताला स्वीकारणे. ख्रिस्ताला स्वीकारणे म्हणजे त्याच्या दुःखसहनात आणि मरणात सहभागी होणे. ख्रिस्ताला स्वीकारणे म्हणजे Iसत्यासाठी सर्व आव्हानांना सामोरे जाणे होय.

ख्रिस्ती इतिहासात अनेक संत महत्त्म्यांनी प्रभू येशूचे तंतोतंत अनुकरण केले. प्रसंगी छळ, संकटे आणि मृत्यु दंडालात सामोरे गेले. त्यांची श्रद्धा तसूभरही ढळली नाही. आपण आज आपल्या जीवनावर चिंतन करु  या 


पहिले वाचन २ राजांच्या ४:८-११.१४-१६
वाचक : राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
 "हा देवाचा पवित्र माणूस आहे, त्याला तेथे विश्रांती घेऊ दे."

एके दिवशी असे झाले की, अलिशा शूनेम येथे गेला, तेथे एक थोर स्त्री राहत होती; तिने त्याला आग्रह करून जेवावयास लावले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेवावयास उतरत असे. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, “हा पुरुष वारंवार ह्या रस्त्याने जातो, हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला दिसते. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची आणि एक समई अशी तिच्यात ठेवू, म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा तो त्या खोलीत उतरत जाईल.
एके दिवशी असे झाले की, तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला आणि तेथे निजला. त्याने गेहजीला विचारले, “हिच्यासाठी काय करावे ?" गेहजी म्हणाला, “तिला काही मूलबाळ नाही, तिचा नवरा वृद्ध आहे." त्याने म्हटले, “तिला बोलाव.” त्याने बोलावल्यावर ती येऊन दारातच उभी राहिली. तो तिला म्हणाला, "वसंतऋतू पुनरपी येईल तेव्हा तू पुत्राला उराशी धरशील.”
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : 2 Kings 4:8-11, 14-16a 

One day Elisha went on to Shunem, where a wealthy woman lived, who urged him to eat some food. So whenever he passed that way, he would turn in there to eat food. And she said to her husband, "Behold now, I know that this is a holy man of God who is continually passing our way. Let us make a small room on the roof with walls and put there for him a bed, a table, a chair, and a lamp, so that whenever he comes to us, he can go in there. One day he came there, and he turned into the chamber and rested there. And he said to Gehazi his servant, "What then is to be done for her?" Gehazi answered, "Well, she has no son, and her husband is old." He said, "Call her." And when he had called her, she stood in the doorway. And he said, "At this season, about this time next year, you shall embrace a son."
This is the word of God 
Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र ८९:२-३, १६-१७,१८-१९
प्रतिसाद :   प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन.

१ परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन,
 मी आपल्या मुखाने पिढ्यान्पिढ्यांना तुझी सत्यता कळवीन.
कारण मी म्हणालो, तुझ्या दयेची उभारणी सदोदित होत राहील; 
स्वर्गातून तुझी सत्यता तूच स्थापली आहेस. 

२ ज्या लोकांना उत्साहशब्दाचा परिचय आहे ते धन्य ! 
हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात 
ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्हास करतात, 
तुझ्या न्यायपरायणतेने त्यांची उन्नती होते.

३ कारण त्याच्या बलाचे वैभव तू आहेस,
 तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील, 
आमची ढाल परमेश्वराच्या मालकीची आहे, 
आमचा राजाही इस्राएलच्या पवित्र प्रभूचा आहे.

Psalm 89:2-3, 16-17, 18-19

R. :  I will sing forever of your mercies, O Lord.

I will sing forever of your mercies, O Lord: 
through all ages my mouth will proclaim your fidelity. 
I have declared your mercy is established forever
your fidelity stands firm as the heavens. R

How blessed the people who know your praise, 
who walk, O Lord, in the light of your face, 
who find their joy every day in your name.
who make your justice their joyful acclaim. R

For you are the glory of their strength: 
by your favour it is that our might is exalted.
 Behold, the Lord is our shield, 
The is the Holy One of Israel, our king. R

दुसरे वाचन  रोम ६ : ३-४,८-११
वाचक :पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
“आपण नवीन प्रकारच्या जीवनात चालावे म्हणून स्नानसंस्काराद्वारे ख्रिस्ताबरोबर पुरले गेलो आहोत.”
आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अजाण आहा काय ? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरलो गेलो ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की, मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही; त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला, तो जगतो तो देवासाठीच जगतो. तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःस पापाला मेलेले खरे, पण देवासाठी जिवंत झालेले, असे माना.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


Second reading : Romans 6:3-4, 8-11

Brethren: Do you not know that all of us who have been baptised into Christ Jesus were baptised into his death? We were buried therefore with him by baptism into death, in order that, just as Christ was raised from the dead by the glory of the Father, we too might valk in newness of life. Now if we have died with Christ, we believe that we will also ive with him. We know that Christ, being raised from the dead, will never die again death no longer has dominion over him. For the death he died he died to sin, once for all, but the life he lives he lives to God. So you also must consider yourselves dead to sin and alive to God in Christ Jesus
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
 हे प्रभो, तुझ्या पत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमचे अंत:करण प्रफुल्लित कर. 

Acclamation: You are a chosen race, a royal priesthood, a holy nation, proclaim the excellencies of him who called you out of darkness into his marvellous light.

शुभवर्तमान  मत्तय  १०:३७:४२

वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"जो आपला क्रूस उचलून घेत नाही तो मला योग्य नाही. "

येशू आपल्या बारा शिष्यांना पुढीलप्रमाणे बोध केला; “जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही, जो माझ्यापेक्षा मुलावर किंवामुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही आणि जो आपला क्रूस उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमावला तो त्याला राखील."
"जो तुम्हांला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो, तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. संदेष्ट्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल, आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो, तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हास नक्की सांगतो.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading : Matthew 10:37-42

At that time: Jesus said to his apostles, "Whoever loves father or mother more than me is not worthy of me, and whoever loves son or daughter more than me is not worthy of me. And whoever does not take his cross and follow me is not worthy of me. Whoever finds his life will lose it, and whoever loses his life for my sake will find it. Whoever receives you receives me, and whoever receives me receives him who sent me. The one who receives a prophet because he is a prophet will receive a prophet's reward, and the one who receives a righteous person because he is a righteous person will receive a righteous person's reward. And whoever gives one of these little ones even a cup of cold water because he is a disciple, truly, I say to you, he will by no means lose his reward.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: स्वागतशील वृत्ती आणि आदरातिथ्य हे सद्गुण इस्राएली, यहुदी समाजात खूप महत्वाचे मानले जात. लोट ह्याने तर आपल्या घरी उतरलेल्या पाहुण्यांचे संरक्षण व्हावे म्हणून त्यांच्यावर हल्ला करू पाहणाऱ्या वासनांध्य पुरुषाला आपल्या उपवर मुली देऊ केल्या. यावरून पाहुण्यांचे स्वागत करणे या समाजात किती महत्त्वाचे मानले जायचे ते दिसून येते.आजची वाचने आपल्याला त्या दृष्टीने तीन गोष्टींवर
चिंतन करायला लावतात. 
१. स्वरूपाचीस्वागतशीलता : आजच्या पहिल्या वाचनात शूनेम
येथील स्त्री अलिशा संदेष्ट्याचे आगतस्वागत करते.त्याला जेवावयास वाढते. इतकेच नव्हे तर तो देवाचा पवित्र माणूस आहे ह्याचे भान ठेवून त्याच्यासाठी एक खोली तयार करते. तिच्यात खाट (विश्रांतीसाठी),
मेज व खुर्ची (शास्त्रवाचन वा लेखन करण्यासाठी)आणि एक समई (उजेडासाठी व प्रार्थना करण्यासाठी) इत्यादिंची तरतूद करते. परमेश्वराने
तिच्या ह्या स्वागतशीलतेचे फळ तिला दिले. तिला बाळाची देणगी मिळाली. 
२. आध्यात्मिक स्वरूपाची स्वागतशीलताः प्रभू येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वर पित्याने अखिल मानवजातीला आध्यात्मिक स्वागतशीलतेचे सुंदर उदाहरण घालून दिलेले आहे.
सर्वांना परमेश्वराच्या राज्यात आपल्यासह पंक्तीसबसविण्यासाठी येशू सुखाचा स्वर्ग सोडतो, ह्यापृथ्वीतलावर एका गरीब कुटुंबात राहतो. त्याच्याकडे आलेल्या गरजू व गरजवंतांना भरभरून मदत करतो. मार्था-मरिया, शिमोन कुष्ठरोगी, शिमोन परुशी, जक्कय, मत्तय (किंवा लेवी) अशा सर्वांचे आदरातिथ्य स्वीकारतो. आता संत पॉल रोमकरांना आध्यात्मिक स्वागतशीलतेसाठी पाचारण करीत आहे. बाप्तिस्मा स्वीकारणाऱ्या हर एक व्यक्तीने ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. मात्र हे एक कर्मकांड नसून त्यासाठी पापाचा पूर्णपणे त्याग करून ख्रिस्ताला आपल्या हृदयाच्या घरातील कोपरान् कोपरा व्यापता यावा अशी आध्यात्मिक स्वागतशीलता त्यांनी धारण करावी असे पौल शिकवितो. 
३. कौटुंबिक व सामाजिक स्वरूपाची स्वागतशीलता : आपल्या प्रेषितांना प्रेषितीय कामगिरीवर पाठविताना येशू त्यांना लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिफळाची पूर्वसूचना देतो. कुटुंबाची आसक्ती असणारे, कामचुकार, आळशी, आत्मकेंद्रित असे लोक येशूच्या विचारसरणीचा स्वीकार करू शकत नाहीत. तर येशूचे शिष्य असलेल्या, संदेष्ट्यासमान असलेल्या नीतिमान व्यक्तीचे स्वागत करणाऱ्या लोकांना नक्कीच प्रतिफळ मिळेल अशी शाश्वती तो त्यांना देतो. 
आत्मपरीक्षण : माझ्या जीवनात वरीलपैकी कोणत्या स्वरूपाची स्वागतशीलता अधिक प्रमाणात आहे ? इतर प्रकारची स्वागतशीलता विकसित करण्यासाठी मला काय काय करता येईल ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला जीवनाचा मुक्तीदाता म्हणून स्वीकारण्यास व सत्य आचरण करण्यास प्रेरणा व बळ दे, आमेन

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या