Marathi Bible Reading | 8th week in ordinary Time| Saturday 3rd June 2023

 सामान्यकाळातील ८वा सप्ताह 

शनिवार ३ जुन २०२३ 

  माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील," 
✝️


युगांडाचे रक्तसाक्षी
चार्ल्स ल्वांगा, जोसेफ कासा आणि त्यांचे सहकारी
(१८८६-१८८७)

अप्पर नीलच्या प्रदेशातील जमातींमध्ये १८८७ सालापासून ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आपले मिशनकार्य सुरू केलेले होते. त्यानंतरच्या पुढच्या वर्षातील इस्टर जागरणविधीच्या वेळी पहिले काही स्नानसंस्कार पार पडले. ह्या नवसंस्कारितांमध्ये पूर्वी इस्लाम धर्मातून प्रॉस्टेस्टंट पंथामध्ये आलेले काही स्त्री पुरुष होते. ह्या वाढत्या कॅथलिक धर्मप्रसाराला रोखून धरण्यासाठी १८८६ साली अरब व प्रॉटेस्टंट पंथातील काहींनी राजा म्वांगा ह्याला चिथावले. त्याने जोसेफ कासा आणि मारूंबा ह्या प्रमुख मिशनऱ्यांची हत्या घडवून आणली.
    आजच्या दिवशी ख्रिस्तसभा युगांडातील प्रारंभीच्या ख्रिस्ती लोकांमध्ये श्रद्धेची जोपासना करणाऱ्या व त्यासाठी क्रूर अशा छळवादाला मिठी मारणाऱ्या १३ ते ३० वर्षे वयातील २२ निग्रो मुले व युवक ह्यांचा सन्मान करते. या २२ जणांपैकी १३ जणांना जिवंत जाळण्यात आले. काहींना ३ जून १८८६ मध्ये ठार करण्यात आले.
        हे २२ आफ्रिकन निग्रो इ. स. १९२० साली प्रथम धन्यवादित म्हणून घोषित करण्यात आले. ह्या २२ जणांव्यतिरिक्त ८० इतर जण ह्या छळामध्ये केले गेले. ह्या सर्व युगांडाच्या रक्तसाक्षींना २२ जून १९६४ साली पोप पॉल सहावे ह्यांनी संतपद बहाल केले. 
चिंतन : “रक्तसाक्ष्यांना साखळदड बांधण्यात आले. तुरुंगात टाकण्यात आले, त्यांना फटके मारण्यात आले, जाळण्यात आले, त्यांना अक्षरशः कांपण्यात आले तरी त्यांची संख्या वाढतच राहिली.” - संत अगस्तीन

पहिले वाचन बेन सिरा   ५१:१२-२०
वाचक : बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन
"जो मला ज्ञान देतो त्याचा मी गौरव गाईन."

यास्तव मी तुला धन्यवाद देईन, तुझे स्तवन करीन आणि प्रभूच्या नावाचा महिमा गाईन. मी तरुण असताना प्रवासात निघण्यापूर्वी मी माझ्या प्रार्थनेत उघडपणे ज्ञान मागितले. मंदिरासमोर उभा राहून ज्ञानासाठी प्रार्थना केली आणि शेवटपर्यंत मी ज्ञानाचा शोध घेतला. ज्ञान माझ्यामध्ये फुलत, फळत पिकलेल्या द्राक्षाप्रमाणे विकसित झाले आणि त्याने माझ्या सामान्यकाळातील आठवा सप्ताह शनिवार

मनाला आनंदित केले; मी सरळ मार्गाने चालत राहिलो आणि बालपणापासून ज्ञानमार्गाने चाललो. मी थोडेसे परिश्रम केले आणि मला ज्ञान प्राप्त झाले तेव्हा मला असे कळून आले की मला खूप समन आलो आहे.

त्यामुळे माझी खूप प्रगती झाली. जो मला ज्ञान देतो त्याचा मी गौरव गाईन. ज्ञानानुसार वागण्याचा मी निश्चय केला आणि सत्कार्यासाठी मी झटत राहिलो मी कधी निराश होणार नाही. ज्ञानप्राप्तीसाठी मी संघर्ष करीत राहिलो, मी कडक आचरण ठेवले; मी स्वर्गाकडे माझे हात उंचावले आणि माझ्या अज्ञानाबद्दल मी रडलो. मी ज्ञानाकडे माझे लक्ष केंद्रित केले आणि माझ्या पवित्र आचरणामुळे ते मला प्राप्त झाले.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १९:८-११

प्रतिसाद : परमेश्वराचे आदेश हृदयाला आनंदित करतात.

१) परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. 
ते मनाचे पुनरुज्जीवन करते. 
परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे,
 तो असमंजास समंजस करतो.

२) परमेश्वराचे आदेश सरळ आहेत, 
ते हृदयाला आनंदित करतात. 
परमेश्वराची आज्ञा चोख आहे, 
ती नेत्रांना प्रकाश देते.

३ )परमेश्वराचे भय शुद्ध आहे, 
ते सर्वकाळ टिकणारे आहे. 
परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत,
 ते सर्वचैव न्याय्य आहेत.

४) ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या 
राशीपेक्षा इष्ट आहेत, 
ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणाऱ्या  
मधापेक्षा गोड आहेत.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

तुझ्या आदेशांचा मार्ग मला समजावून दे,
 म्हणजे मी तुझ्या अलौकिक कृत्यांचे मनन करीन.

आलेलुया!

शुभवर्तमान  मार्क ११:२७-३३

वाचक :    मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता ?”

येशू आणि त्याचे शिष्य पुन्हा येरुशलेमला आले आणि तो मंदिरात फिरत असता मुख्य याजक, शास्त्री आणि वडील त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि त्या करण्याचा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?” येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला उत्तर द्या, म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे ते मी तुम्हाला सांगेन. योहानचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की माणसापासून होता ह्याचे मला उत्तर द्या.” तेव्हा ते आपसात विचार करू लागले: 'स्वर्गापासून होता' असे म्हणावे तर तो म्हणेल की, 'तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही ?' 'माणसापासून होता' असे म्हणावे तर ? त्यांना लोकांची भीती वाटत होती, कारण योहान खरोखरच संदेष्टा होता असे सर्व लोक मानत. तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” येशू त्यांना म्हणाला, “तर मग कोणत्या अधिकाराने मी ह्या गोष्टी करीत आहे ते मीही तुम्हांला सांगत नाही.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन: काही वेळा आपण इतरांसाठी त्यांना पकडण्यासाठी सापळे तयार करतो. इतरांचा नाश व्हावा म्हणून कट रचतो व इतरांना लाजवेल अशी परिस्थिती निर्माण करतो. परंतू जेव्हा कट केलेला साफळा आपल्याच बाजूला पडतो तेव्हा आपण सहज म्हणतो, “आम्हाला काहीच माहीत नाही. " येशूच्या बाबतीत कितीतरी वेळा असे घडले आहे. त्याच्या विरोधकांनी रचलेले कट शेवटी त्यांच्याच जीवनात पडले. तरी सुद्धा येशू खंबीरपणे आलेल्या परिस्थितीला सामोरे गेला. शत्रूला दृशकृत्यांमूळे येशू खचून गेला नाही. तर त्यांनाच बेचात पाहून शहाणपणाचे उत्तर देण्यात व त्यांना प्रतिप्रश्न विचारण्यात येशूचा हातखंड होता. आपल्या सभोवतालच्या वातावरणात गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यावर शहाणपणाचा आश्रय घेणे आवश्यक आहे. जे आपल्यासाठी साफळे तयार करतात त्यांना शहापणाने निर्देष केले पाहिजे. हा संदेश आजच्या दोन्ही वाचनातून आपल्याला शिकायला मिळतो.

प्रार्थना : हे प्रेमळ बापा, तुझ्या प्रीतित वाढण्यास व तेच प्रेम इतरांना देण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

                 

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या