Marathi Bible Reading | 13th week in ordinary Time | Saturday 8th July 2023

 सामान्यकाळातील १३वा सप्ताह 

शनिवार ८  जुलै २०२३

 नवा द्राक्षरस नव्या बुधल्यात घालतात म्हणजे दोन्ही नीट राहतात."


संत मरियम तेरसिया

Born :  26 April 1876 at Trichur, Kerala, India

 Died :  8 June 1926 in Kuzhikattussery, Thissur, Kerala, India of natural causes

 Beatified :  9 April 2000 by Pope John Paul II

• वर्तनसाक्षी 

खिस्तसभा आज संत मरियम तेरसिया हीचा स्मृतीदिन साजरा करीत  आहे. बालपणापासूनच तेरसीयाला देवाच्या प्रेमाची गोडी लागली व तिने स्वत:ला  प्रार्थनामध्ये समर्पित केले. गरीब, आजारी आणि गरजवंतांच्या सेवेसाठी तिने स्वत:चे जीवन ख्रिस्तचरणी समर्पित केले आहे. बिशपांच्या विनंती करुन तिने  फ्रान्सिस्कन क्लॅरेटस् संस्थेची स्थापना केली. तिच्या प्रार्थनेद्वारे संत तेरसीयाने  आध्यात्म्याची उच्च पातळी गाठली होती. संत मरियम तेरेसीयाचा आदर्श समोर ठेवून आपण सेवाकार्य करण्यास प्रेरणा घेऊ या.

 प्रभू येशू शिष्याना द्राक्षरस आणि बुधला ह्याचे उदाहरण देऊन पटवून देत आहे की त्याच्या शिष्यांना उपास करण्याची गरज नाही.
प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्नान संस्कार स्वीकारलेल्या व नवजीवनात प्रवेश| केलेल्या सर्वांना पवित्र आत्म्याची नवजीवनाची कृपा मिळाली आहे. मग प्रभू  येशू खरोखरच आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनला आहे का? आपण  परमेश्वराला जीवनात प्राधान्य दिले आहे का ? प्रभू जीवनात असेल तर उपवास,  प्रायश्चित्त, प्रार्थना, सेवा ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत असतात.

                                    ✝️            

पहिले वाचन :  उत्पत्ती  २७:१-५.१५-२९
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"याकोबने युक्तीने आपल्या भावाचा आशीर्वाद हिरावून घेतला."

इसहाक वृद्ध झाला त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले, तेव्हा त्याने एके दिवशी आपला वडील मुलगा एसाव यास बोलावून म्हटले, "बाळा;" तो म्हणाला, “काय आज्ञा ?" तो त्याला म्हणाला, “पाहा, मी आता म्हातारा झालो आहे आणि मला मृत्यू केव्हा येईल ते ठाऊक नाही. तर आपली शस्त्रे, आपले धनुष्य आणि भाता ही घेऊन रानात जा आणि पारध करून माझ्यासाठी हरणाचे मांस आण आणि माझ्या आवडीचे रुचकर पक्वात्र तयार करून आण; मी ते खाईन आणि मग मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देईन. इसहाक आपला मुलगा एसाव याच्याशी बोलत असता रिबका ऐकत होती. मग एसाव हरणाची पारध करण्यास रानात गेला तेव्हा रिबकेने आपला वडील मुलगा एसाव याची घरात असलेली आपल्या जवळची उंची वस्त्रे घेऊन आपला धाकटा मुलगा याकोब याला घातली. तिने त्याच्या हातांस करडांची कातडी लपेटली आणि आपण तयार केलेले रुचकर पक्वान आणि भाकर ही आपला मुलगा याकोब याच्या हाती दिली.
तो आपल्या बापाकडे जाऊन म्हणाला, "बाबा" तेव्हा तो म्हणाला, “काय आहे? माझ्या बाळा. तू कोण ?” तेव्हा याकोब आपल्या बापाला म्हणाला, "मी एसाव, आपला वडील मुलगा आहे. आपल्या सांगण्याप्रमाणे मी केले आहे; तर उठून बसा आणि हरणांचे मांस आणले आहे एवढे खा आणि आपण मला आशीर्वाद द्यावा" परंतु इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, "माझ्या बाळा, तुला ते इतक्या लवकर कसे मिळाले?" तो म्हणाला, “आपला देव परमेश्वर ह्याने मला ते लवकर मिळू दिले." मग इसहाक याकोबला म्हणाला, “माझ्या बाळा, जरा जवळ ये; तू माझा मुलगा एसावच आहेस कीकाय हे मला चाचपून पाहू दे." तेव्हा याकोब आपला बाप इसहाक याच्यांजवळ गेला. तो त्यास चाचपून म्हणाला, "वाणी तर याकोबची पण हात एसावचे आहेत." त्याचे हात त्याचा भाऊ एसाव याच्या हातांसारखे केसाळ होते म्हणून त्याने त्याला ओळखले नाही आणि त्याला आशीर्वाद दिला. तो त्याला म्हणाला, "तू माझा मुलगा एसावच आहेस काय ?” तो म्हणाला, “होय, मीच तो.” तो म्हणाला, "ते माझ्याकडे आण, मग माझ्या मुलाने म्हणजे तू आणलेले हरणांचे मांस खाऊन मी तुला आशीर्वाद देईन.” तेव्हा याकोबने ते त्याच्याकडे आणले आणि त्याने ते खाल्ले; मग त्याने त्याला द्राक्षरस आणून दिला, तो द्राक्षरस प्याला. मग त्याचा बाप इसहाक त्यास म्हणाला, "माझ्या मुला, जरा जवळ येऊन माझे चुंबन घे." त्याने जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले, तेव्हा त्याने त्याच्या वस्त्रांचा वास घेऊन आशीर्वाद दिला तो असा:
"पाहा, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे
माझ्या मुलाचा सुगंध येत आहे; देव तुला आकाशाचे दंहिवर, पृथ्वीवरील सुपीक जमिनी आणि विपुल धान्य आणि द्राक्षरस देवो. लोक तुझी सेवा करोत. वंश तुला नमोत. तू आपल्या भाऊबंदाचा स्वामी हो,तुझे सहोदर तुला नमोत.तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होवोत, तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावोत.”
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Genesis 27:1-5, 15-29 

 When Isaac was old and his eyes were dim so that he could not see, he called Esau his older son and said to him, "My son". And he answered "Here I am." He said, "Behold, I am old; I do not know the day of my death. Now then, take your weapons, your quiver and your bow, and go out to the field and hunt game for me, and prepare for me delicious food, such as I love, and bring it to me so that! may eat, that my soul may bless you before I die." Now Rebekah was listening when Isaac spoke to his son Esau. So when Esau went to the field to hunt for game and bring it, then Rebekah took the best garments of Esau her older son, which were with her in the house, and put them on Jacob her younger son. And the skins of the young goats she put on his hands and on the smooth part of his neck. And she put the delicious food and the bread, which she had prepared, into the hand of her son Jacob. So he went in to his father and said, "My father." And he said, "Here I am. Who are you, my son?" Jacob said to his father, "I am Esau your firstborn. I have done as you told me; now sit up and eat of my game, that your soul may bless me." But Isaac said to his son, "How is it that you have found it so quickly, my son?" He answered, "Because the Lord your God granted me success." Then Isaac said to Jacob, "Please come near, that I may feel you, my son, to know whether you are really my son Esau or not." So Jacob went near to Isaac his father, who felt him and said, "The voice is Jacob's voice, but the hands are the hands of Esau." And he did not recognise him, because his hands were hairy like his brother Esau's hands. So he blessed him. He said, "Are you really my son Esau?" He answered, "1 am." Then he said, "Bring it near to me, that I may eat of my son's game and bless you." So he brought it near to him, and he ate; and he brought him wine, and he drank. Then his father Isaac said to him, "Come near and kiss me, my son." So he came near and kissed him. And Isaac smelled the smell of his garments and blessed him and said, "See the smell of my son is as the smell of a field that the Lord has blessed! May God give you of the dew of heaven and of the fatness of the earth and plenty of grain and wine. Let peoples serve you, and nations bow down to you. Be lord over your brothers, and may your mother's sons bow down to you. Cursed be everyone who curses you, and blessed be everyone who blesses you!"
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  १२४ : १-६

प्रतिसाद : परमेश्वराचे स्तवन करा, कारण परमेश्वर चांगला आहे.

१ परमेश्वराचे स्तवन करा.
परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा, 
परमेश्वराचे सेवकहो, स्तवन करा,
 परमेश्वराच्या घरात, आमच्या देवाच्या घराच्या
 अंगणात उभे राहणारे तुम्ही त्याचे स्तवन करा.

२ परमेश्वराचे स्तवन करा, कारण परमेश्वर चांगला आहे. 
त्याच्या नावाची स्तोत्रे गा, कारण ते मनोरम आहे. 
कारण परमेश्वराने आपणासाठी याकोबला निवडले आहे. 
आपली वैयक्तिक मालमत्ता होण्यासाठी इस्राएलला 
निवडून घेतले आहे.

३ परमेश्वर थोर आहे,
आमचा प्रभू सर्व देवापेक्षा थोर आहे हे मी जाणतो. 
परमेश्वराला जे काही बरे वाटते. ते तो आकाशात 
आणि पृथ्वीवर, समुद्रात आणि 
सर्व जलाशयात करतो.


Psalm:  135:1b-2, 3-4, 5-6 

R Praise the Lord, for the Lord is good.

Praise the name of the Lord; 
praise him, servants of the Lord, 
who stand in the house of the Lord,
 in the courts of the house of our God. R

Praise the Lord, for the Lord is good. 
Sing a Psalm to his name, 
for this is our delight. 
For the Lord has chosen Jacob for himself, and 
Israel as his treasured possession. R

For I know that the Lord is great, 
that our Lord is high above all gods. 
The Lord does whatever he wills,
 in heaven, and on earth, 
in the seas, and in all the depths. R

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते.
सुवार्तेचे जे वचन तुम्हांला सांगण्यात आले ते हेच होय.
  आलेलुया!

Acclamation: 
 My sheep hear my voice, says the Lord; and I know them, and they follow me.

शुभवर्तमान   मत्तय   :१४-१७
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

  "वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय ?"

योहानचे शिष्य येशूकडे येऊन त्याला म्हणाले, “आम्ही शिष्य आणि परुशी पुष्कळ उपवास करतो पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्याचे कारण काय ?” येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे त्यांना शक्य आहे काय ?" तर असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपवास करतील. कोणी कोऱ्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही, कारण धड करण्याकरिता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते. तसेच कोणी नवा द्राक्षरस जुन्या बुधल्यात घालत नाहीत; घातला तर बुधले फुटून द्राक्षरस सांडतो आणि बुधले बिघडतात; तर नवा द्राक्षरस नव्या बुधल्यात घालतात म्हणजे दोन्ही नीट राहतात."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading : Matthew 9:14-17


At that time: The disciples of John came to Jesus, saying, "Why do we and the Pharisees fast, but your disciples do not fast?" And Jesus said to them, "Can the wedding guests mourn as long as the bridegroom is with them? The days will come when the bridegroom is taken away from them, and then they will fast. No one puts a piece of unshrunk cloth on an old garment, for the patch tears away from the garment, and a worse tear is made. Neither is new wine put into old wineskins. If it is, the skins burst and the wine is spilled and the skins are destroyed. But new wine is put into fresh wineskins, and so both are preserved."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: आजच्या शुभवर्तमानात येशू उपवासाचे खरे महत्त्व शिकवतो. योहान बाप्तिस्ताच्या शिष्यांनी त्याचे वैरागी व तपस्वी जीवन अनुभवले होते. उपवास त्यांच्या तपस्वी जीवनाचा मुख्य घटक होता. येशूचे शिष्य यहुदी धर्म विहित करणारे, उपवास नियम पाळत नसल्याची तक्रार त्यांनी येशू जवळ केली. ह्या संदर्भात येशू संदेष्ट्यांनी परमेश्वरासाठी उपयोग केलेला एका प्रतिमा सृष्टीचा वापर करतो आणि ती प्रतिमा सृष्टी आहे "वर". संदेष्ट्यांनी परमेश्वराला "वर" तर संपूर्ण इस्राएल प्रजेला त्याची “वधू" म्हणून प्रस्तुत केली होती. ही प्रतिमा सृष्टी परमेश्वर व इस्राएल मधील झालेल्या प्रितीवर आधारित कराराला सूचित करते. स्वाभाविकपणे विवाह समारंभात वराचे सानिध्य आनंदाची व उल्हासाची वेळ आहे. परमेश्वर आता मानवाचे देह धारण करून स्वतः मानववंशात एक झाला म्हणून येशूचे सानिध्य आनंद व उल्हासाचे क्षण आहे. आनंद पवित्र आत्म्याचे फळ आहे. येशूच्या सानिध्यात राहून आपण दैवी आनंदाने प्रज्वलीत होतो का ? विविध संस्कार व प्रार्थना जिथे आपण ख्रिस्ताच्या आनंदात सखोलपणे वाढू शकतो आपल्यासाठी नीरसपणाचे क्षण बनतात का? खरा आनंद हा मालमत्ता, संपत्ती, किर्ती, सत्ता किंवा कोणत्याही मानवी कर्तबगारीमध्ये नसतो. सर्व चांगुलपणाचा आणि विशुद्ध प्रेमाचा उगम एकट्या देवाठायी आहे. (CCC १७२३)

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या सहवासाचा परिमळ स्पर्श अनुभवण्यास आम्हाला  कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या