Marathi Bible Reading | 14th Sunday in Ordinary Time |9th July 2023

 सामान्यकाळातील १४वा सप्ताह 

रविवार ९  जुलै २०२३

 अहो कष्टीआणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.


 मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या आणि माझ्यापासून शिका


जीवनात सर्वांनाच स्थिरता, शांती आणि विसावा हवा आहे. मात्र जगातील क्षणभंगूर गोष्टींमध्ये ही स्थिरता, शांती आणि विसावा मिळणार नाही. ह्याची जाणीव प्रभू येशू आपल्याला करुन देत आहे. आज आपल्या जीवनातील सर्व प्रकारची ओझी आणि कष्ट घेऊन आपण प्रभू येशूला आपले सर्वस्व समर्पित करु या. प्रभूला शरण जाऊन त्याच्यासारखे नम्र व प्रेमळ बनण्यासाठी त्याच्या विसाव्यात जाऊ या.

                                    ✝️            

पहिले वाचन :  जखऱ्या ९:९-१०
वाचक : जखऱ्या या पुस्तकातून घेतलेले वाचन
 "पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे."

परमेश्वर असे म्हणतो: “सियोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; येरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी आणि यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. एफ्राइमातले रथ, येरुशलेमातले घोडे मी नष्ट करीन; युद्धधनुष्य तोडून टाकण्यात येईल, तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल; त्याचे अधिपत्य प्रत्येक समुद्रावर आणि फरातनदीपासून तो पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Zechariah 9:9-10

 Thus says the Lord: Rejoice greatly, O daughter of Zion! Shout aloud, O daughter of Jerusalem! Behold, your king is coming to you; righteous and having salvation is he, humble and mounted on a on a colt, the foal of a donkey. I will cut off the chariot from Ephraim and the war horse from Jerusalem; and the bow shall be cut off, and he shall speak peace to the nations; his rule shall be from sea to sea, and from the River to the ends of the earth. donkey

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  १४५:१-२, ८-११,१३कड-१४

प्रतिसाद :  मी सदासर्वकाळ तुझ्या नावाला धन्यवाद देईन.

१ हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन. 
आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाला धन्यवाद देईन. 
मी प्रतिदिवशी तुला धन्यवाद देईन 
आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन.

२ परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे, 
तो मंदक्रोध आणि अतिदयाळू आहे.
 परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे, 
त्याची कृपा त्याने निर्मिलेल्या सर्व कृत्यांवर आहे.

३ हे परमेश्वरा, 
तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात, 
तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. 
'तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात 
आणि तुझा पराक्रम कथन करतात.

४ प्रभू आपल्या वचनाला जागतो, 
त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. 
पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो 
आणि वाकलेल्या सर्वांना उभे करतो.


Psalm: 145:1-2, 8-11, 13cd-14

I will bless your name forever, my king and

I will extol you, my God and king, 
and bless your name forever and ever. 
I will bless you day after day,
and praise your name forever and ever.

The Lord is kind and full of compassion, 
slow to anger, abounding in mercy.
How good is the Lord to all,
compassionate to all his creatures. R

All your works shall thank you, O Lord,
 and all your faithful ones bless you. 
They shall speak of the glory of your reign,
 and declare your mighty deeds. R

The Lord is faithful in all his words,
 and holy in all his deeds.
The Lord supports all who fall,
and raises up all who are bowed down. R


दुसरे वाचन :पॉलचे रोमकरांस पत्र  ८:९.११-१३ 

वाचक: पॉलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
"जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारतील तर जगाल. "
तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वसती करीत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहा. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील.
तर मग बंधुजनहो, आपण ऋणी आहो खरे, तरी देहस्वभावाप्रमाणे जगायला देहस्वभावाचे ऋणी नाही. कारण जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहा, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारतील तर जगाल.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading  :Romans 8:9, 11-13

Brethren: You are not in the flesh but in the Spirit, if in fact the Spirit of God dwells in you. Anyone who does not have the Spirit of Christ does not belong to him. If the Spirit of him who raised Jesus from the dead dwells in you, he who raised Christ Jesus from the dead will also give life to your mortal bodies through his Spirit who dwells in you. So then, brothers, we are debtors, not to the flesh, to live according to the flesh. For if you live according to the flesh you will die, but if by the Spirit you put to death the deeds of the body, will live.
This is the word of God 
Thanks be to God 


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो; कारण ह्या गोष्टी तू बाळकांना प्रकट केल्या. 
  आलेलुया!

Acclamation: 
 Blessed are you, Father, Lord of heaven and earth, that you have revealed to little children the mysteries of the kingdom.

शुभवर्तमान   मत्तय   ११:२५-३०
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "मी मनाचा सौम्य आणि लीन आहे. "

त्यावेळी येशू बोलू लागलाः “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांना प्रगट केल्या. खरेच हे पित्या, हेच तुला योग्य दिसले. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्वकाही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही आणि पुत्रावाचून व ज्या कोणाला त्याला प्रकट करावयाची पुत्राची इच्छा असेल, त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही. अहो कष्टीआणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या आणि माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवाला विसावा मिळेल कारण माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading : Matthew 11:25-30

At that time Jesus declared, "I thank you, Father, Lord of heaven and earth, that you have hidden these things from the wise and understanding and revealed them to little yes, Father, for such was your gracious will. All things have been handed over to me by my Father, and no one knows the Son except the Father, and no one knows the Father except the Son and anyone to whom the Son chooses to reveal him. Come to me, all who labour and are heavy laden, and I will give you rest. Take my yoke upon you, and learn from me, for I am gentle and lowly in heart, and you find rest for your souls. For my yoke is easy, and my burden is light."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: परस्परविरोधी गोष्टी एकत्र आणून त्याद्वारे प्रभूच्या संदेशाचे महत्त्व अधोरेखित करणे ही बायबल अभ्यासाची एक पद्धत आहे. आजची वाचने एकूण तीन परस्परविरोधी गोष्टी एकत्र गुंफताना आढळतात. त्याद्वारे प्रभू येशूचे जीवन, कार्य आणि संदेश प्रकट करण्यात आलेला आहे. 
अ. युद्ध आणि शांती : प्राचीन इस्राएलमध्ये घोडा हे युद्धाचे तर गाढव हे शांतीचे प्रतीक मानले जाई. आजच्या पहिल्या वाचनात (जखऱ्या ९:९-११) मसिहा हा घोड्यावर नव्हे तर गाढवावर आरूढ होऊन येईल असे भाकीत करण्यात आलेले आहे. पुढे ते येशूच्या जेरूसलेम प्रवेशामध्ये पूर्णत्वास गेले. त्यात येशू हा शांतीचा राजपुत्र असेल हे भविष्य दडलेले होते. 
ब. देहस्वभाव आणि आत्म्याची प्रेरणा : आजच्या दुसऱ्या वाचनात (रोम ८:९, ११-१३) संत पौल देहस्वभाव आणिआत्म्याची प्रेरणा ह्यांच्यातील भेद स्पष्ट करतो. देहस्वभावाने मानवाचा विनाश होत असल्याने ख्रिस्ताने हा देहस्वभाव क्रुसावर खिळलेला आहे तर आत्म्याच्या प्रेरणेने जीवन जगल्यास मानवाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होईल अशी शाश्वती संत पॉल आपल्याला देतो. हे सार्वकालिक जीवन सर्वांना लाभावे म्हणून प्रभू येशू जगात अवतरला. 
क. जड ओझे आणि सोयीचे जूंः आजच्या शुभवर्तमानात (मत्तय ११:२५-३०) कष्टी आणि भाराक्रांत जनांना येशू विसावा घेण्यासाठी आपणाकडे बोलावतो. त्यांच्या अवजड ओझ्यांपेक्षा येशूचे जूं सोयीचे आहे कारण एका बाजूला येशूने ते आपल्या खांद्यावर घेतलेले आहे व दुसऱ्या बाजूला खांदा देण्यासाठी तो आपल्याला बोलावीत आहे. असे जूं स्वीकारण्यासाठी आपण लीन व सौम्य मनाचे असणे गरजेचे आहे.

आत्मपरीक्षण : वरीलपैकी कोणकोणत्या परस्परविरोधी गोष्टी माझ्या जीवनात आंतरिक संघर्षाची भावना उत्पन्न करतात ? येशूचे जूं मी खांद्यावर घेण्यास कितपत तयार आहे ?

प्रार्थना :हे प्रभू, तू करुणेचा महासागर आहेस, तुझ्या विसाव्यात येण्यास व तुला अनुसरण्यात आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या