सामान्यकाळातील १४वा सप्ताह
गुरुवार १३ जुलै २०२३
रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठ रोग्यांना शुद्ध करा, भुते काढा. तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या.
संत हेन्री दुसरा
सम्राट, वर्तनसाक्षी (९७३-१०२४)
देवाचे राज्या म्हणजेच प्रेम, शांती, समृद्धी, समेट तसेच शारिरीक मानसिक व आध्यात्मिक आरोग्य होय. प्रभू येशूने दिलेल्या कृपादानांचा योग्य तो उपयोग करुन प्रेषितांनी लोकांमध्ये देवराज्य प्रस्थापित करण्याचे व सुवार्ता प्रसाराचे कार्य केले.
प्रभू येशू आपल्या सर्वांना आज त्याच्या देवराज्याच्या कार्याला हातभार लावण्यासाठी प्राचारण करीत आहे. आपल्या प्रत्येकाला अनेक कृपादाने परमेश्वराने बहाल केलेली आहेत. पवित्र आत्म्याठायी बळकट बनून देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी ख्रिस्तसभेत आज अनेक संधी उपलब्ध आहेत. आपल्या सभोवताली अनेक माणसे व्याधीग्रस्त, भूतग्रस्त आणि चिंताग्रस्त आहेत. आपण त्यांना मदत करण्या व सेवा करण्यास पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. प्रभू येशू सतत आपल्या बरोबर आहे.
पहिले वाचन : उत्पत्ती ४४:१८-२१,२३-२९,४५:१-५
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्यापुढे पाठवले. "
यहुदा योसेफजवळ जाऊन म्हणाला, “स्वामी मला आपल्या कानात एक शब्द सांगण्याची आज्ञा व्हावी, आपला राग आमच्या दासावर न भडको; आपण तर फारोसमान आहा. स्वामींनी आपल्या दासांना विचारले होते की, 'तुम्हास बाप किंवा भाऊ आहे काय ?' तेव्हा आम्ही स्वामींना सांगितले की, 'आमचा बाप म्हातारा आहे आणि त्याला म्हातारपणी झालेले एक मूल आहे; त्याचा भाऊ मरून गेला आहे, त्याच्या आईचा तो तेवढाच राहिला आहे आणि त्याच्या बापाचे त्याच्यावर फार प्रेम आहे.' आपण आपल्या दासांना म्हणाला, 'त्याला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे त्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहीन.' नंतर आपण आपल्या दासांना म्हणाला, 'तुमचा धाकटा भाऊ तुमच्याबरोबर न आला तर माझे तोंड पाहावयास तुम्हांला मिळायचे नाही.' आपला दास आमचा बाप याच्याकडे जाऊन आम्ही पोहचलो तेव्हा स्वामींनी सांगितले ते आम्ही त्याला कळवले. पुढे आमच्या बापाने म्हटले, 'पुन्हा जाऊन आपल्यासाठी काही अन्नसामुग्री विकत घेऊन या.' तेव्हा आम्ही म्हटले, 'आम्हांला जाताच येत नाही. आमचा धाकटा भाऊ आम्हांबरोबर असेल तरच आम्ही जाऊ, कारण तो आमच्याबरोबर नसला तर त्या मनुष्याचे तोंडदेखील आम्हांला पाहावयास मिळावयाचे नाही.' आपला दास आमचा बाप आम्हांला म्हणाला, 'तुम्हांला ठाऊक आहे. की, माझ्या पत्नीला दोन पुत्र झाले; त्यातल्या एकाला मी अंतरलो, तेव्हा मी म्हणालो की, खरोखर त्याला वनपशूने, खाऊन टाकले असावे; कारण त्यानंतर तो माझ्या दृष्टीस पडला नाही. आता तुम्ही यालाही माझ्याजवळून नेले आणि यास काही अपाय झाला तर मला दुःख होऊन हे माझे पिकलेले केस अधोलोकी उतरावयास तुम्ही कारण व्हाल.'
तेव्हा योसेफभोवती लोक उभे होते त्या सर्वांसमोर त्यांना गहिवर आवरेना; त्याने मोठ्याने म्हटले की, सर्व लोकांना बाहेर घालवा. योसेफने आपल्या भावांना ओळख दिली तेव्हा त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते. तो मोठ्यामोठ्याने रडू लागला; ते इजिप्तच्या लोकांनी ऐकले आणि फारोच्या घराण्याच्याही कानी ते गेले. योसेफ आपल्या भावास म्हणाला, “मी योसेफ आहे; माझा बाप अजून जिवंत आहे. काय ?" त्याच्या भावाच्या तोंडून काही उत्तर निघेना, कारण ते सर्व त्याच्यापुढे घाबरले होते.
म्हणून योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “माझ्याजवळ या.” तेव्हा ते जवळ गेले. तो पुन्हा म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ, ज्याला तुम्ही इजिप्तच्या देशात विकून टाकले तो मीच. आता काही दुःख वाटून घेऊ नका, तुम्ही मला या देशात विकून टाकले याबद्दल संताप करून घेऊ नका; कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्यापुढे पाठवले.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Genesis 44:18-21, 23b-29; 45:1-5
In those days: Judah went up to Joseph and said, "Oh, my lord, please let your servant speak a word in my lord's ears, and let not your anger burn against your servant, for you are like Pharaoh himself. My lord asked his servants, saying, Have you a father, or a brother? And we said to my lord, We have a father, an old man, and a young brother, the child of his old age. His brother is dead, and he alone is left of his mother's children, his father loves him. Then you said to your servants, "Bring him down to me, that I may set my eyes on him. Unless your youngest brother comes down with you, you shall not see my face again! "When we went back to your servant, my father, we told him the words of my lord. And when our father said, "Go again, buy us a little food, we said, "We cannot go down. If our youngest brother goes with us, then we will go down. For we cannot see the man's face unless our youngest brother is with us. Then your servant my father said to us, 'You know that my wife bore me two sons. One left me, and said, "Surely he has been torn to pieces," and I have never seen him since. If you take this one also from me, and harm happens to him, you will bring down my grey hairs in evil to Sheol.' Then Joseph could not control himself before all those who stood him. He cried, "Make everyone go out from me." So no one stayed with him when Joseph made himself known to his brothers. And he wept aloud, so that the Egyptians heard it, and the household of Pharaoh heard it. And Joseph said to his brothers, "I am Joseph! Is my father still alive?" But his brothers could not answer him, for they were dismayed at his presence. So Joseph said to his brothers, "Come near to me, please." And they came near. And he said, "I am your brother, Joseph, whom you sold into Egypt. And now do not be distressed or angry with yourselves because you sold me here, for God sent me before you to preserve life.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र : : १०५:१६-२१
प्रतिसाद :परमेश्वराने केलेली अद्दभूत कृत्ये आठवा
१) परमेश्वराने देशावर दुष्काळ आणला; त्यांचा अन्नाचा आधार अगदी तोडून टाकला. त्यांच्यापुढे त्याने एक मनुष्य पाठवला; योसेफ दास म्हणून विकला गेला.
२ )त्यांनी बेड्या घालून त्यांच्या पायांना इजा केली, लोखंड त्याच्या जिव्हारी लागले, त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत, परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखले.
३) राजाने माणसे पाठवून त्याला सोडवले; राष्ट्रांच्या अधिपतीने त्याला मुक्त केले. त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी, आपल्या सर्व संपत्तीवर अधिकारी नेमले.
Psalm 105:16-17, 18-19, 20-21
R Remember the wonders the Lord has done.
But he called down a famine on the land;
he broke their staff of bread..
He had sent a man ahead of them,
Joseph, sold as a slave. R
His feet were down in chains,
his neck was bound with iron,
until what he said came to pass,
and the word of the Lord proved him true. R
Then the king sent orders and released him;
the ruler of the peoples set him free.
He him master of his house
and ruler of all his possessions. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव;
मला सरळ मार्गाने ने.
Acclamation:
The kingdom of God is at hand; repent and believe in the gospel
शुभवर्तमान मत्तय १०:७-१५
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या."
येशूने आपल्या बारा शिष्यांना पुढीलप्रमाणे शिकवले, “जात असताना अशी घोषणा करीत जा की, 'स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.' रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठ रोग्यांना शुद्ध करा, भुते काढा. तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका, वाटेसाठी झोळी, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका; कारण कामकऱ्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. घरात जाताना, तुम्हांला शांती असो! असे म्हणा. ते घर योग्य असेल तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो; ते योग्य नसले तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही आणि तुमची वचने ऐकणार नाही, त्यांच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका. मी तुम्हास नक्की सांगतो. 'न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोरा ह्या प्रदेशांना सोपे जाईल.'
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Matthew 10:7-15
At that time: Jesus said to his apostles, "Proclaim as you go, saying, The kingdom heaven is at hand.' Heal the sick, raise the dead, cleanse lepers, cast out demons. You received without paying give without pay. Acquire no gold or silver or copper f your belts, no bag for your journey, or two tunics or sandals or a staff, for the labourer deserves his food. And whatever town or village you enter, find out who is worthy in it and stay there until you depart. As you enter the house, greet it. And if the house isworthy let your peace come upon it, but if it is not worthy, let your peace return to you. And if anyone will not receive you or listen to your words, shake off the dust from your feet when you leave that house or town. Truly, I say to you, it will be more bearable on the day of judgment for the land of Sodom and Gomorrah than for that town.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
आजच्या शुभवर्तमानात येशू १२ प्रेषितांना प्रेषित कार्याच्या अगोदर काही महत्वपूर्ण सूचना देतो. येशू त्यांना वहाणा व काठीचा त्याग करण्याचा आदेश देतो. त्याकाळात इस्राएलच्या दुर्गम, रानटी व निर्जन भूप्रदेशातून प्रवास करण्यासाठी वहाणा व काठी सोबत घेणे अनिवार्य होते कारण त्या भूप्रदेशात वन्य प्राणी व दरोडेखोरांचा धोका होता. अश्याप्रकारे येशू आपल्या शिष्यांना स्वःरक्षणाच्या मूलभूत साहित्यांचे त्याग करण्यास आवाहन देतो. येशू त्यांना देवी धैर्याने परमेश्वराच्या कृपेवर अवलंबून प्रेषित कार्य करण्याचा आवाहन देतो. परमेश्वरावर पूर्णपणे दिसंबवून दैवी धैर्याने आपण प्रेषित कार्य व इतर कार्य करतो का ? चांगल्याशी एकनिष्ठ राहाणे आणि अडीअडचणींच्या काळात ठाम भूमिका स्वीकारणे ह्या कृतीची, धैर्याची फळे आहेत. धैर्यवान व्यक्तीठायी भक्कम मनोबल आणि विलक्षण सहनशक्ती असते. ह्या सद्गुणांमुळे मनुष्य पापांचा प्रतिकार करू शकतो आणि नैतिक जीवनमार्गातील अडथळ्यांना खंबीरपणे सामोरा जाऊ शकतो. ह्या सद्गुणांमुळे छळवणूक आणि कसोटींना तोंड देणे, भीतीवर (मग ती मृत्यूची भीती का असेना) मात करणे इ. गोष्टी माणसाला शक्य होतात. (CCC१८०८)
प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, शांतीचे, प्रेमाचे व समेटाचे देवराज्य प्रस्थापित करण्यास आम्हाला प्रेरणा व धैर्य दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या