Marathi Bible Reading | 14th week in ordinary Time |Friday 14 th July 2023

 सामान्यकाळातील १४वा सप्ताह 

शुक्रवार १४  जुलै २०२३

बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे. 




संत कॅमिलुस डी लेलीस

- वर्तनसाक्षी (१५५०-१६१४)
: हे प्रभो, मी ह्या जगातील सर्वांत नीच आणि क्षुद्र असा मानव आहे. परंतु केवळ तुझ्या अपार करुणेपोटी तू माझा बचाव कर.- संत कॅमिलुस 

                                    ✝️            

पहिले वाचन : उत्पत्ती  ४६:१७,२८-३०

वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
 “तुला मी पाहिले, आता मला खुशाल मरण येवो."

इस्राएल आपल्या सर्वं मुलासह निघून बैरशेबा येथे आला; तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाला यज्ञ केले. तेव्हा रात्री दृष्टान्तात देव इस्राएलला बोलला, "याकोबा," तो म्हणाला, “काय आज्ञा?" देव म्हणाला, “मी देव, तुझ्या पित्याचा देव आहे; तू इजिप्तला जायला भिऊ नकोस; कारण तेथे तुझे मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुझ्याबरोबर इजिप्तला येईन, तेथून मी तुला खात्रीने परत आणीन आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकील." मग याकोब बैरशेबाहून निघाला आणि त्याला नेण्यासाठी फारोने पाठवलेल्या गाड्यात इस्राएलपुत्रांनी आपला बाप याकोब, आपली मुलेबाळे आणि बायका बसवून नेल्या. आपली गुरेढोरे आणि कनान देशात संपादलेलेधन घेऊन इजिप्त देशात आले; याप्रमाणे याकोब आणि त्याची सर्व संतती इजिप्त देशात आली. त्याने आपल्याबरोबर आपले मुलगे आणि नातू, कन्या आणि नाती वगैरे आपली सर्व संतती इजिप्तमध्ये आणली.
योसेफने गोशेन प्रांताची वाट दाखवावी म्हणून याकोबने यहुदाला आपल्यापुढे त्याच्याकडे पाठवले; याप्रमाणे ते गोशेन प्रांतात आले. योसेफ आपला रथ सिद्ध करून आपला बाप इस्राएल यास भेटायला गोशेन प्रातांत गेला; त्याला भेटून त्याच्या गळ्याला त्याने मिठी मारली आणि त्याच्या मानेवर मान टाकून तो फार वेळ रडला. तेव्हा इस्राएल योसेफला म्हणाला, “तू अजून जिवंत असून तुझे मुख मी पाहिले, आता मला खुशाल मरण येवो.”
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Genesis 46:1-7, 28-30

 In those days: Israel took his journey with all that he had and came to Beersheba, and offered sacrifices to the God of his father Isaac And God spoke to Israel in visions of the night and said, "Jacob, Jacob." And he said, "Here I am." Then he said. "I am God, the God of your father. Do not be afraid to go down to Egypt, for there I will make you into a great nation. I myself will go down with you to Egypt, and I will also bring you up again, and Joseph's hand close your eyes." Then set out from Beersheba. The sons of Israel carried Jacob their father, their little ones, and their wives, in the wagons that Pharaoh had sent to carry him. They also took their livestock and their goods, which they had gained in the land of Canaan, and came into Egypt, Jacob and all his offspring with him, his sons, and his sons' sons with him, his daughters, and his sons' daughters. All his offspring he brought with him into Egypt. He had sent Judah ahead of him to Joseph to show the way before him in Goshen, and they came into the land of Goshen. Then Joseph prepared his chariot and went up to meet Israel his father in Goshen. He presented himself to him and fell on his neck and wept on his neck a good while. Israel said to Joseph, "Now let me die, since have seen your face and know that you are still alive."

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  :३६:३-४,१८-१९, २७-२८,२९-४०

प्रतिसाद : नीतिमानांचे तारण परमेश्वराकडून होते.

१) परमेश्वरावर भाव ठेव आणि सदाचाराने वाग;
 देशात वस्ती करून राहा, सत्याचे अवलंबन कर; 
म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल; 
तो तुझे मनोरथ पूर्ण करील.

२) सात्त्विकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते. 
त्यांचे वतन सर्वकाळ टिकेल ते विपत्काली लज्जित होणार नाहीत; 
ते दुष्काळाच्या दिवसांत तृप्त राहतील.

३) वाइटापासून दूर राहा, बरे ते कर; 
म्हणजे तुझी वस्ती कायमची राहील.
 कारण परमेश्वराला न्याय प्रिय आहे; 
तो आपल्या भक्तांना सोडत नाही.

४) नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते; 
संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे. 
परमेश्वर त्यांचे सहाय्य करतो आणि त्यांना मुक्त करतो;
त्यांना दुर्जनांपासून मुक्त करतो आणि तारतो, 
कारण त्यांनी त्याचा आश्रय धरला आहे.


Psalm 37:3-4, 18-19, 27-28, 39-40

From the Lord comes the salvation of the just.

Trust in the Lord and do good; 
then you will dwell in the land and safely pasture.
Find your delight in the Lord,
who grants your heart's desire, R

The Lord takes note of the days of the blameless;
 their heritage will last forever. 
They shall not be put to shame in evil days;
in time of famine they shall have their fill. R.

Then turn away from evil and do good, 
and you may abide forever,
for indeed, the Lord loves justice, 
and will never forsake his faithful. R

But from the Lord comes the salvation of the just,
their stronghold in time of distress. 
The Lord helps them and rescues them,
rescues and saves them from the wicked: 
because they take refuge in him.R

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
 तुम्ही आपली हृदये आज कठोर करू नका, 
तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.
 आलेलुया!

Acclamation: 
When the Spirit of truth comes, he will guide you into all the truth and bring to your remembrance all that I have said to you.

शुभवर्तमान   मत्तय १०:१६-२३
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे. "

येशूने बारा जणांना पुढीलप्रमाणे शिकवले, पाहा, लांडग्यामध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा. माणसांच्या बाबतीत जपून राहा; कारण ते तुम्हांला न्यायसभेच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हांला फटके मारतील आणि तुम्हांला माझ्यामुळे देशाधिकारी आणि राजे ह्याच्यापुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल, जेव्हा तुम्हांला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हांला सुचवले जाईल; कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे. भाऊ भावाला आणि बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, मुले आईबापांवर उठून त्यांस ठार करतील आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्यात पळून जा; मी तुम्हांला खचित सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाहीत.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading : Matthew 10:16-23

At the time: Jesus said to his disciples, "Behold, am sending you out as sheep in the midst of wolves, so be wise as serpents and innocent as doves. Beware of men, for they will deliver you over to councils and flog you in their synagogues, and you will be dragged before governors and kings for my sake, to bear witness before them and the Gentiles. When they deliver you over, do not be anxious how you are to speak, or what you are to say, for what you are to say will be given to you in that hour. For it is not you who speak, but the Spirit of your Father speaking through you. Brother will deliver brother over to death, and the father his child, and children will rise against parents and have them put to death, and you will be hated by all for my name's sake. But the one who endures to the end will be saved. When they persecute you in one town, flee to the next, for truly, say to you, you will not have gone through all the towns of Israel before the Son of Man comes.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांस त्यांच्या भावी छळवणूकीविषयी सांगतो. सुवार्तिक न्यायसभेचा उल्लेख करतो. न्यायसभा धर्मपरिषद होते. त्याचप्रमाणे देशाधिकारी व राजेंचा ही उल्लेख आहे आणि हे दोन वर्ग गैर यहुदी अथवा विधर्मी शासक वृंद होते. येशूमुळे शिष्यांचे छळ स्वकीय (यहुदी) व त्याचप्रमाणे परकीय (गैरयहूदी) सुद्धा करतील. परंतु असे असतानाहीपरमेश्वर हे सर्व जाणून यहुदी व त्याचप्रमाणे गैरयहुद्यांपुढे एक शक्तीशाली साक्ष बनण्याचे माध्यम म्हणून उपयोग करतो. कदाचित शिष्यांप्रमाणे आपल्याला रक्तसाक्षी होण्याची संधी मिळणार नाही परंतु स्वःत्यागाची भावना जपून व आपल्या उत्तम ख्रिस्ती वर्तनाद्वारे ह्या जगाला आपण शक्तिशाली साक्ष देऊ शकतो. आपण ह्यासाठी तयार आहोत का ? ख्रिस्तसभा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला आपल्या प्रेषितकार्यामध्ये सामावून घेत असते. त्याद्वारे ख्रिस्ती व्यक्ती शुभवर्तमानाचे साक्षीदार आणि त्या शुभवर्तमानाच्या शिकवणुकीचे (कर्तव्याचे) पाईक बनतात. ह्या आदर्शाद्वारेच शब्दांतून आणि कृतीतून ते आपली श्रद्धा इतरांसमोर प्रगट करीत असतात. (CCC२४७२)

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, सुवार्तेची साक्ष धैर्याने सांगण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या