Marathi Bible Reading | 15th week in ordinary Time | Wednesday 19th July 2023

 सामान्यकाळातील १५वा सप्ताह 

बुधवार १९   जुलै २०२३

“हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या; 



संत उलरिक 
- महागुरू, वर्तनसाक्षी

 जर्मनीच्या ऑग्जबर्ग धर्मप्रांताच्या  इ. स. ९२३ साली महागुरुंचा उत्तराधिकारी म्हणून  उलरिक  ह्यांची नेमणूक करण्यात आली.
आपल्या लोकांच्या आणि धर्मगुरूंच्या जीवनाची आध्यात्मिक पातळीउंचावण्यासाठी बिशप उलरिक स्वतः धर्मगुरूंना व लोकांना खाजगीत भेटत, त्यांच्यासाठी तपसाधना, अधिवेशने, परिषदा आणि खुल्या चर्चेचं आयोजन करीत असत. धर्मग्रामातील प्रशासन कसे सुधारता येईल, ख्रिस्तसभेच्या कायद्याचे होणारे उल्लंघन कसे टाळता येईल त्याविषयी चर्चा घडवून आणत. अपराधी व कायदेभंग करणाऱ्यांवर अगदी प्रेमाने कडक कारवाई करीत.
आपल्या ऑग्जबर्ग धर्मप्रांताचे आध्यात्मिक आणि व्यावहारिक जीवनाचे पुनरुज्जीवन करीत असतानाच बिशप उल्टीक ह्यांनी शहराभोवती भक्कम तटबंदी उभारली. अनेक गावे आणि नगरे ह्यांचे पुनर्वसन केले. गरीब आणि निराश्रित ह्यांना त्यांनी सढळ हस्ते मदत केली. राजाला त्याच्या प्रशासनात उदार अंतःकरणाने सहाय्य केले.
.इ. स. ९७३ साली बिशप उल्ीक ह्यांचे देहावसान झाले. त्यानंतर त्यांचे थडगे हे तीर्थयात्रेचे केंद्र बनले. अगदी थोड्याच अवधीत म्हणजे २० वर्षांनी ९९३ साली मोठ्या थाटामाटात बिशप उल्टीक ह्यांना संतपदाचा बहुमान देण्यात आला.
चिंतन : दिव्यातून तेल बाजूला काढले की ज्योत विझलीच म्हणून समजा. आध्यात्मिक जीवनातून प्रार्थना वजा केली की श्रद्धेची वातही हळूहळू मंदावत जाते. - संत उलरिक 

परमेश्वर पित्याला पूर्णपणे जाणण्यासाठी प्रथम आपण ख्रिस्ताला ओळखले पाहिजे. ख्रिस्ताची ओळख व जाणीव, त्याची शिकवणूक, त्याची  |वचने आणि विशेषतः त्याच्या दुःख, मरण व पुनरुत्थानावरील विश्वासाद्वारे होत| असते. खरे पाहता पवित्र मिस्सा बलिदानात सहभागी झाल्यामुळे येशूच्या मरण व पुनरुत्थानात आपण एकरुप झालो आहोत. त्या प्रभू ख्रिस्ताशी आपण जवळिक साधण्याचा व त्याच्याद्वारे दयावंत परमेश्वर पित्याला ओळखण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रभू येशू ख्रिस्त हाच पित्याला ओळखण्याचा आणि  त्याची कृपा अनुभवण्याचा एकमेव मार्ग आहे. म्हणूनच प्रभू येशू स्वतः म्हणतो,  'पुत्रा वाचून पित्याला कोणी ओळखीत नाही. ' 
                                    ✝️            
पहिले वाचन :  निर्गम  ३:१-६, ९-१२

वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"परमेश्वराच्या दूताने एका झुडूपातून अग्निज्वालेत मोशेला दर्शन दिले. "

मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथो याची शेडरेमेंढरे चारीत होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीला देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडूपातून अग्निज्वालेत त्यांला दर्शन दिले; त्याने दृष्टी लावली तो झुडूप जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, “मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे आणि ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो." ते पाहायला मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने पाहिले आणि झुडूपातून देवाने त्याला हाक मारून म्हटले, "मोशे, मोशे!" तो म्हणाला, "काय आज्ञा ?" देवं त्याला म्हणाला, "इकडे जवळ येऊ नकोस; तू आपल्या पायातले जोडे काढ कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे." तो आणखी म्हणाला, "मी तुझ्या पित्याचा देव, आब्राहामचा देव, इसहाकचा देव, याकोबचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले मुख झाकले, कारण देवाकडे पाहायला तो भ्याला.
"पाहा, इस्राएल वंशजांचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे, इजिप्तचे लोक त्याच्यावर कसा जाचजुलूम करत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर आता चल, तू इजिप्त देशातून माझे लोक इस्राएल वंशज यांना बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो." तेव्हा मोशे देवाला म्हणाला,“फारोकडे जाऊन इस्राएली वंशजांना इजिप्तमधून काढून आणणारा असा मी कोण ?" देव म्हणाला, "नक्की मी तुझ्याबरोबर असेन; मी तुला पाठवले याची तुला खूण हीच. तू लोकांना इजिप्तातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल.”
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Exodus 3:1-6, 9-12 

in those days: Moses was keeping the flock of his father-in-law, Jethro,the priest of Midian, and he led his flock to the west side of the wilderness and came to Horeb, the mountain of God. And the angel of the Lord appeared to him an a flame of fire out of the midst of a bush. He looked, and behold, the bush was burning, yet it was not consumed. And Moses said, "I will turn aside to see this great wight, why the bush is not burned." When the Lord saw that he turned aside to see, God called to him out of the bush, "Moses, Moses!" And he said, "Here am." Then he wid. "Do not come near; take your sandals off your feet, for the place on which you are standing is holy ground." And he said, "I am the God of your father, the God of Abraham, the God of Isaac, and the God of Jacob." And Moses hid his face, for he was afraid to look at God. The Lord said, "And now, behold, the cry of the people of Israel has come to me, and I have also seen the oppression with which the Egyptians oppress them. Come, I will send you to Pharaoh that you may bring my people, the children of Israel, out of Egypt." But Moses said to God, "Who am I that I should go to Pharaoh and bring the children of Israel out of Egypt?" He said, "But I will be with you, and this shall be the sign for you, that I have sent you; when you have brought the people out of Egypt, you shall serve God on this mountain."

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  :१०३ :१-६

प्रतिसाद: परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे.

१) हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे, हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद दे. माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.

२) तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो, तो तुझा जीव विनाशगर्तेतून उध्दारतो, तो तुला दया आणि करूणा ह्यांचा मुकूट घालतो.

३) जाचलेल्या सर्वांसाठी परमेश्वर नीतीची आणि न्यायाची कृत्ये करतो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्राएलच्या वंशजांना जाहीर केली.


Palm 103:1-2, 3-4, 6-7
The Lord is compassionate and gracious.

Bless the Lord, O my soul,
and all within me, his holy name. 
Bless the Lord, O my soul, 
and never forget all his benefits. R

It is the Lord who forgives all your sins,
 who heals every one of your ills, 
who redeems your life from the grave,
who crowns you with mercy and compassion. R

The Lord does just deeds, gives full justice to all
who are oppressed.
He made known his ways to Moses,
and his deeds to the children of Israel. R

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
  तुझे नियम मला समजावून दे,
म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन.
 आलेलुया!

Acclamation: 
 Blessed are you, Father, Lord of heaven and earth, that you have revealed to little children the mysteries of the kingdom.

शुभवर्तमान   मत्तय ११:२५-२७
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "ज्ञानी लोकांपासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांस प्रकट केल्या. " येशू बोलू लागला: “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या; खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि . पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही आणि पुत्रावाचून व ज्या कोणाला त्याला प्रकट करावयाची इच्छा असेल, त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading :Matthew 11:25-27
At that time Jesus declared, "I thank you, Father, Lord of heaven and earth, that you have hidden these things from the wise and understanding and revealed them to little children; yes, Father, for such was your gracious will. All things have been handed over to me by my Father, and no one knows the Son except the Father, and no one knows the Father except the Son and anyone to whom the Son chooses to reveal him."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन:आजच्या शुभवर्तमानात येशू जीवश्वकंठश्वपणे आपल्या पित्याकडे प्रार्थना करतो. मत्तयच्या शुभवर्तमानात येशू दोन प्रसंगी सलगीने पित्याकडे प्रार्थना करतो. गेयसेमनी बागेत व वधस्तंभावर येशू जिव्हाळ्याने पित्याचा धावा करतो. यहुदी लोकांसाठी देव म्हणजे सर्वशक्तिमान, सर्वव्यापी व सर्वज्ञानी. ते लोक कधीही परमेश्वराला अब्बा किंवा पिता म्हणून संबोधित करत नसत आणि हे संबोधन यहुदी लोकांच्या दैवी व्याख्येच्या विरोधात होता. येशू परमेश्वराची खरी व्याख्या आपल्या शिष्यांपुढे सादर करतो. परमेश्वर प्रेमळ व दयाळू आहे आणि त्याच्या अनिर्वचनीय प्रीतीची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे येशू आणि येशूच्या पास्का रहस्यामुळे आपण सर्व परमेश्वराची दत्तक मुले आहोत. परमेश्वराला आपण सुद्धा पिता किंवा अब्बा म्हणून संबोधू शकतो. शिशुतुल्य भावनेने आपण परमेश्वरासमोर येतो का? येशू आपणास आपल्या सर्व गरजा पुरविणाऱ्या स्वर्गीय पित्याच्या चांगुलपणात राहण्यासाठी बालकाप्रमाणे होण्यास सांगत आहे. प्रथम त्याच्या राज्याचा आणि नीतिमत्त्वाचा शोध करा म्हणजे ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. (CCC३०५)

प्रार्थना : हे प्रभू येशू, तूच मार्ग, सत्य व जीवन आहेस, परमेश्वरपित्याशी मला एकरुप कर व तुझी सामर्थ्यदायी कृपा बहाल कर, आमेन,


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या