सामान्यकाळातील १५वा सप्ताह
मंगळवार १८ जुलै २०२३
जो तुम्हांला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो
'संत फ्रेडरिक
महागुरू आणि रक्तसाक्षी (८३८)
परमेश्वर दयाळू व कनवाळू आहे. पश्चात्ताप करुन त्याच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगण्याऱ्या प्रत्येक माणसाला प्रभू सार्वकालिक जीवनाचे अभिवचन देत आहे. आज प्रभू येशू करीत असलेल्या आवाहनाचा गंभीरतेने आपण विचार करु या. प्रेमाचे, शांतिचे, परोपकाराचे आणि प्रभूच्या विपुल कृपेचे जीवन जगण्यासाठी पश्चात्ताप करुन स्वच्छ व पवित्र जीवन जगण्याचा निर्धार करु या.
✝️
पहिले वाचन : निर्गम २:१-१५
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
"फारोच्या मुलीने त्याचे नाव मोशे ठेवले, कारण ती म्हणाली, “मी त्याला पाण्यातून बाहेर काढले.” काही दिवसांनी मोशे मोठा झाल्यावर तो आपल्या लोकांकडे गेला. "
लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; ते बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला तीन महिने लपवून ठेवले. पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने लव्हाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर आणि राळ चोपडली; त्या पेटाऱ्यात तिने त्या बाळकाला घालून नदीकाठच्या लव्हाळ्यात नेऊन ठेवले आणि पुढे काय होते ते पाहायला त्याची बहीण दूर उभी राहिली. मग फारोची मुलगी नदीवर स्नान करायला आली; तिच्या दासी नदीच्या कडेने चालल्या असता लव्हाळ्यामध्ये तो पेटारा तिच्या नजरेस पडला; तो आणायला तिने आपल्या एका दासीला सांगितले. तो उघडून पाहता तिच्या दृष्टीस ते बालक पडले. ते बालक रडत होते. तिला त्याचा कळवळा आला आणि ती म्हणाली, “हे कोणातरी इब्याचे बालक आहे." तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली, “आपणाकरिता मुलास दूध पाजायासाठी इब्री स्त्रियांतून एखादी दाई बोलावू काय ?” फारोच्या मुलीने तिला म्हटले, "जा, बोलाव." तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली. फारोच्या मुलीने तिला म्हटले, "या मुलाला घेऊन जा आणि माझ्याकरिता याला दूध पाज, म्हणजे मी तुला वेतन देईन." मग ती स्त्री त्याला घेऊन दूध पाजू लागली. ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली, आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे ठेवले, कारण ती म्हणाली, "मी त्याला पाण्यातून बाहेर काढले." काही दिवसांनी असे झाले की, मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंदांकडे जाऊन त्याचे काबाडकष्ट पाहिले; त्याप्रसंगी आपल्या भाऊबंदांपैकी एका इबऱ्याला कोणी इजिप्तवासी मारीत असलेला त्याला दिसला. तेव्हा त्याने इकडेतिकडे सभोवार नजर फेकली आणि कोणी नाही असे पाहून त्या इजिप्तवासियाला ठार करून त्याला वाळूत लपवले. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर गेला तो दोघा इब्री मनुष्यांना एकमेकांशी मारामारी करताना त्याने पाहिले; तेव्हा ज्याचा अपराध होता त्याला तो म्हणाला, “तू आपल्या सोबत्याला का मारत आहेस?” तो त्याला म्हणाला, “तुला आम्हावर अधिकारी आणि न्यायाधीश कोणी नेमले ? तू त्या इजिप्तवासियाला जिवे मारले तसे मलाही मारायला पाहतोस काय ?" तेव्हा मोशेला भीती वाटली; तो म्हणाला, “खरोखर ती गोष्ट फुटली.” फारोच्या कानी ती गोष्ट गेली तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजले. पण मोशे फारोपुढून पळून मिद्यान देशात जाऊन राहिला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Exodus 2:1-15
In those days: A man from the house of Levi went and took as his wife a Levite woman. The woman conceived and bore a son, and when she saw that he was a fine child, she hid him for three months. When she could hide him no longer, she took for him a basket made of bulrushes and daubed it with bitumen and pitch. She put the child in it and placed it among the reeds by the river bank. And his sister stood at a distance, to know what would be done to him. Now the daughter of Pharaoh came down to bathe at the river, while her young women walked beside the river. She saw the basket among the reeds and sent her servant woman, and she took it. When she opened it, she saw the child, and behold, the baby was crying. She took pity on him and said, "This is one of the Hebrews' children." Then his sister said to Pharaoh's daughter, "Shall I go and call you a nurse from the Hebrew women to nurse the child for you?" And Pharaoh's daughter said to her, "Go." So the girl went and called the child's mother. And Pharaoh's daughter said to her, "Take this child away and nurse him for me, and I will give you your wages. So the woman took the child and nursed him. When the child grew older, she brought him to Pharaoh's daughter, and he became her son. She named him Moses, "Because," she said, "I drew him out of the water." One day, when Moses had grown up, he went out to his people and looked on their burdens, and he saw an Egyptian beating a Hebrew, one of his people. He looked this way and that, and seeing no one, he struck down the Egyptian and hid him in the sand. When he went out the next day, behold, two Hebrews were struggling you together. And he said to the man in the wrong, "Why do strike your companion? He answered, "Who made you a prince and a judge over us? Do you mean to kill me as you killed the Egyptian?" Then Moses was afraid, and thought, "Surely the thing is known. When Pharaoh heard of it, he sought to kill Moses. But Moses fled from Pharaoh, and stayed in the land of Midian.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :६९ :३,१४,३०-३१,३३-३४
प्रतिसाद: हे पाहून दीन हर्ष करतील.
१) मी खोल दलदलीत रुतलो आहे,
तेथे उभा राहायला आधार नाही
मी खोल पाण्यात आलो आहे
आणि लोंढा माझ्यावरून जात आहे.
२) मी तर, हे परमेश्वरा, तुला मान्य होईल.
अशा समयी तुझी प्रार्थना करतो.
हे देवा, तू आपल्या विपुल दयेला अनुसरून
आणि आपण सिद्ध केलेल्या उद्गाराच्या
सत्याला अनुसरून मला उत्तर दे.
३) मी तर दीन आणि दुःखी आहे,
हे देवा, तू सिद्ध केलेले तारण मला उच्चस्थानी नेऊन ठेवील.
गीत गाऊन मी देवाच्या नामाचे स्तवन करीन;
त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन
४) दीन हे पाहून हर्ष करतील;
देवाचा शोध करणाऱ्यांनो,
तुमच्या हृदयात नवजीवन येवो.
कारण परमेश्वर गरजूंचे ऐकतो;
बंदीत पडलेल्या आपल्या लोकांचा तो अव्हेर करत नाही.
Psalm 69:3, 14, 30-31, 33-34
You who are poor, seek God and your heart will revive.
I have sunk into the mud of the deep,
where there is no foothold.
I have entered the waters of the deep,
where the flood overwhelms me. R
But I pray to you, O Lord, for a time of favour.
your In your great mercy, answer me,
O God, with your salvation that never fails. R
As for me in my poverty and pain,
let your salvation, O God, raise me up.
Then I will praise God's name with a song:
I will glorify him with thanksgiving: R
The poor when they see it will be glad, and God-seeking hearts will revive; for the Lord listens to the needy, and does not spurn his own in their chains. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुझे नियम मला समजावून दे,
म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन.
Acclamation:
Today, harden not your hearts, but listen to the voice of the Lord.
शुभवर्तमान मत्तय ११:२०-२४
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"न्यायाच्या दिवशी सोर, सिदोन आणि सदोमास तुमच्यापेक्षा सोपे जाईल.”
ज्या ज्या नगरांमध्ये येशूच्या पराक्रमाची कृत्ये घडली होती. तेथील लोकांनी पश्चात्ताप केला नाही म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला : “हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांमध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर आणि सिदोन ह्यात घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट आणि राख अंगावर घेऊन पश्चात्ताप केला असता. पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर आणि सिदोन ह्यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल. हे कफर्णहूम, तू आकाशापर्यंत चढवला जाशील काय ? नव्हे अधोलोकापर्यंत उतरशील. कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सदोमाला तुझ्यापेक्षा सोपे जाईल.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Matthew 11:20-24
At that time: Jesus began to denounce the cities where most of his mighty works had been done, because they did not repent. "Woe to you, Chorazin! Woe to you, Bethsaida! For if the mighty works done in you had been done in Tyre and Sidon, they would have repented long ago in sackcloth and ashes. But I tell you, it will be more bearable on the day of judgment for Tyre and Sidon than for you. And you, Capernaum, will you be exalted to heaven? You will be brought down to Hades. For if the mighty works done in you had been done in Sodom, it would have remained until this day. But I tell will be more tolerable on the day of judgment for the land of Sodom than for you."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:आजच्या शुभवर्तमानात येशू पश्चात्ताप न करणाऱ्या शहरांवर दोषारोप करतो. शुभवर्तमानात खोराजिना, बेथसैदा व कर्फणहूम अश्या तीन शहरांचा उल्लेख आहे. ही तीन नगरे गालील समुद्राच्या उत्तर दिशेत स्थित होती व काही तास चालून ह्या तिन्ही नगरांचा प्रवास शक्य होता. ही तीन नगरे येशूच्या शुभवार्ता प्रसाराचा केंद्र बिंदू बनली होती. येशूच्या सर्व महान व वैभवशाली कृत्यांची साक्षी बनण्याची संधी ह्या शहरांच्या लोकांना मिळाली होती परंतु त्यांच्या धार्मिक जीवनात त्याचा काही प्रभाव पडला नाही आणि शुभवर्तमानाच्या प्रती त्या लोकांनी बांधिलकी जपली नाही. जुन्या करारात संदेष्टे दांमी व पश्चात्ताप न करणाऱ्या लोकांसाठी तुमची किती दुर्दशा होणार अशा शब्दसमूहाचा उपयोग करत असत आणि येशू सुद्धा उपरोक्त शब्दसमुहाचा उपयोग करतो. येशू स्पष्ट करतो की पश्चात्ताप न करणे म्हणजे नाशाच्या मार्गावर चालणे. पाप स्वीकार संस्कारात येशू स्वतः आपल्याला क्षमा करण्यास उपस्थित असतो. पश्चात्तापी वृत्तीने आपण ह्या संस्कारात वारंवार सामील होतो का ? पश्चात्तापी अंतःकरण, ओठाने सर्व पापांची कबुली देणे आणि पश्चात्तापास योग्य असे प्रायश्चित्त घेण्याची तयारी ह्या सर्व गोष्टी स्वेच्छेने व मोकळ्या मनाने करणे जरूरीचे आहे. (CCC १४५०)
प्रार्थना : प्रभू येशू, अंतःकरणापासून पश्चात्ताप करण्यास व समेटांद्वारे नुतनीकरण करून चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यास प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या