First Reading : Exodus 1:8-14, 22
At that time: There arose a new king over Egypt, who did not know Joseph. And he said to his people, "Behold, the people of Israel are too many and too mighty for us. Come, let us deal shrewdly with them, lest they multiply and, if, war breaks out they join our enemies and fight against us and escape from the land. Therefore they set taskmasters over them to afflict them with heavy burdens. They built for Pharaoh store-cities Pithom and Raamses. But the more they were oppressed, the more they multiplied and the more they spread abroad. And the Egyptians were in dread of the people of Israel. So they ruthlessly made the people of Israel work as slaves and made their lives bitter with hard service, in mortar and brick, and in all kinds of work in the field. In all their work they ruthlessly made them work as slaves. Then Pharaoh commanded all his people, "Every son that is born to the Hebrews you, shall cast into the Nile, but you shall let every daughter live
प्रतिसाद स्तोत्र :१२४:१-८
प्रतिसाद : परमेश्वराचे नाम हाच आमचा आसरा आहे.
१) आता इस्रायलने म्हणावे की,
“जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता,"
"लोक आमच्यावर उठले तेव्हा
जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता,
तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला असता."
२) जलांनी आम्हाला बुडवले असते,
त्यांचा लोंढा आमच्या गळ्याशी आला असता,
खवळलेले लोंढे आमच्या गळ्याशी आले असते.
परमेश्वराचा धन्यवाद होवो;
त्याने आम्हाला त्यांच्या दाढात भक्ष्य म्हणून पडू दिले नाही.
३) आमचा जीव पक्ष्याप्रमाणे पारध्याच्या
पाशातून मुक्त झाला आहे.
पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहो.
आकाश आणि पृथ्वी ह्यांचा निर्माण कर्ता
जो परमेश्वर त्याच्या नावामुळे आम्हांला सहाय्य मिळते.
Psalm 124:1-3, 4-6, 7-8
Our help is in the name of the Lord.
"If the Lord had not been on our side," let Israel say-
If the Lord had not been on our side when people rose against us,
then would they have swallowed us alive when their anger was kindled. R
Then would the waters have engulfed us, the torrent gone over us; over our head would have swept the raging waters." Blest be the Lord who did not give us a prey to their teeth. R
Our life, like a bird, has escaped from the snare of the fowler. Indeed, the snare has been broken, and we have escaped. Our help is in the name of the Lord, who made heaven and earth. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड,
म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील
अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
Acclamation:
Blessed are those who are persecuted for righteousness' sake, for theirs is the kingdom of heaven.
शुभवर्तमान मत्तय १०:३४-११:१
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी शांतता आणण्यास आलो नाही तर तरवार चालवण्यास आलो आहे. "
येशूने आपल्या प्रेषितांना म्हटले, "मी पृथ्वीवर शांतता आणायला आलो आहे असे समजू नका; मी शांतता आणावयास नव्हे तर तरवार चालवायला आलो आहे. कारण मुलगा आणि बाप, मुलगी आणि आई, सून आणि सासू ह्यांच्यात फूट पाडायला मी आलो आहे आणि मनुष्यांच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर आणि आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही आणि जो आपला क्रूस उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही; ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमावला तो त्याला राखील."जो तुम्हांला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. संदेष्ट्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हांला खचित सांगतो.” येशूने आपल्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्याच्या नगरात शिकवायला आणि उपदेश करायला गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
0 टिप्पण्या