Marathi Bible Reading | 15th Sunday in Ordinary Time |16th July 2023

 सामान्यकाळातील १५वा सप्ताह 

रविवार १६  जुलै २०२३

 चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.


 “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हास दिलेले आहे,


आपले अंत: करण जर देवाचे वचन आत्मसात करणारे व त्याप्रमाणे आचरण करुन फलद्रुप होणारे असेल तर आपल्या जीवनात त्याची फळे अनुभवायला मिळतात. चांगुलपणा, ममता, प्रीती, शांती, विश्वासुपणा, सहनशिलता अशी अनेक प्रकारची फळे आपल्या जीवनाला आलेली आपण पाहू शकतो.
आपण आजच्या पेरणाऱ्याच्या दाखल्यावर चिंतन करीत असताना मोकळ्या अंत:करणानेच विश्वासात देवाचे वचन स्वीकारु या. देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवू | या, आणि खरे फलदायी ख्रिस्ती जीवन जगण्याचा कसोशीने प्रयत्न करु या. कारण आपल्याठायी प्रभू येशूने जीवनदायी वचने पेरलेली आहेत. आपापल्या परिने आपण तीसपट, साठपट आणि शंभरपट पीक देण्यासाठी सतत प्रयत्नशील बनण्यासाठी  प्रेरणा व कृपा मागू या.

                                    ✝️            

पहिले वाचन : यशया ५५:१०-११
वाचक :  यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"पाऊस पृथ्वीला सफळ आणि हिरवीगार करतो. "

परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, पाऊस आणि बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ आणि हिरवीगार केल्यावाचून पेरणाऱ्याला बीज, खाणाऱ्याला भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत; त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून आणि ज्या कार्याकरिता मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Isaiah 55:10-11

Thus says the Lord: "As the rain and the snow come down from heaven and do not return there but water the earth, making it bring forth and sprout, giving seed to the sower and bread to the eater, so shall my word be that goes out from my mouth; shall not return to me empty, but it shall accomplish that which I purpose, and shall succeed in the thing for which sent
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  ६५:१० -१४


प्रतिसाद :   काही बी चांगल्या जमिनीत पडले आणि शंभरपट पीक आले.

१ तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजवली आहेस; 
तू तिला फार फलद्रूप करतोस देवाची नदी जलपूर्ण आहे;
 भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस.

२ नांगरलेल्या जमिनीला तू भरपूर पाणी देतोस; 
तिचे उंचवटे सपाट करतोस, 
तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस,
 तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस;

३ तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करतोस 
आणि तुझे मार्ग समृद्धीमय झाले आहेत; 
रानातील कुरणेही समृद्ध होतात.

४ डोंगरांना उल्हासाने वेष्टन पडले आहे,
 कुरणे कळपांनी झाकून गेली आहेत; 
खोरीही धान्याने सुशोभित होऊन गेली आहेत.
 ती मोठ्याने जयजयकार करतात आणि गातात.


Psalm 65:10abcd, 10e-11, 12-13a, 13b-14

The seed that fell into good soil yielded a hundredfold. 

You visit the earth, give it water;
you fill it with riches.
God's ever-flowing river brims 
over to prepare the grain. R

And thus you provide for the earth:
you drench its furrows; you level it, 
soften it with showers you bless its growth.  R

You crown the year with your bounty.
 Abundance flows in your path ways:
in pastures of the desert it flows. R


दुसरे वाचन :पॉलचे रोमकरांस पत्र  ८:१८-२३ 

वाचक: पॉलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
 "सृष्टी देवाच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठतेने करत आहे."

आपल्यासाठी जो गौरव प्रकट होणार आहे, त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. कारण सृष्टी देवाच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठतेने करत आहे; कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करणाऱ्यामुळे सृष्टीही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलाची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते. कारण आपल्याला ठाऊक आहे की, सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे आणि वेदना भोगत आहे; इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपणाला आत्मा हे प्रथमफळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठायी कण्हत आहो.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading  :Romans 8:18-23

Brethren: I consider that the sufferings of this present time are not worth comparing with the glory that is to be revealed to us. For the creation waits with eager longing for the revealing of the sons of God. For the creation was subjected to futility, not willingly, but because of him who subjected it, in hope that the creation itself will be set free from its bondage to corruption and obtain the freedom of the glory of the children of God. For we know that the whole creation has been groaning together in the pains of childbirth until now. And not only the creation, but we ourselves, who have the first fruits of the Spirit groan inwardly as we wait eagerly for adoption as sons, the redemption of our bodies
This is the word of God 
Thanks be to God 


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. 
  आलेलुया!

Acclamation: 
The seed is the word of God, and Christ is the sower. All who come to him will have life for ever.

शुभवर्तमान   मत्तय   १३:१-१३
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"पेरणारा पेरणी करावयास निघाला." 

(येशू घरातून निघून समुद्रकिनाऱ्यावर जाऊन बसला. तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करायला निघाला आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले आणि पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले आणि सूर्य वर आला तेव्हा ते उन्हानेकरपले आणि त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले आणि काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली, काही चांगल्या जमिनीत पडले, मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको.")

मग शिष्य जवळ येऊन येशूला म्हणाले, “आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता ? त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हास दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि त्याला भरपूर होईल.; परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते काढून घेतले जाईल. ह्यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहात असता पाहात नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत आणि त्यांना समजतही नाही. यशयाचा संदेश त्याच्याविषयी पूर्ण होत आहे तो असा की, 'तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणारच नाही आणि पहाल तर खरे, परंतु तुम्हाला दिसणारच नाही. कारण ह्या लोकांचे अंत:करण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत ह्यासाठी त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत आणि धन्य तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हाला नक्की सांगतो की, तुम्ही जे पाहत आहा ते पाहायला पुष्कळ संदेष्टे आणि नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहायला मिळाले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकायला ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकायला मिळाले नाही.आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच अंत:करणात पेरलेले ते हिरावून घेतो; वाटेवर पेरलेला तो हा आहे. खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो आणि ते तात्काळ आनंदाने ग्रहण करतो; परंतु त्यांना मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता आणि द्रव्यांचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading : Matthew 13:1-23

    That same day Jesus went out of the house and sat beside the lake. And great crowds gathered about him, so that he got into a boat and sat down. And the whole crowd stood on the beach. And he told them many things in parables, saying: "A sower went out to sow. And as he sowed, some seeds fell along the path, and the birds came and devoured them. Other seeds fell on rocky ground, where they did not have much soil, and immediately they sprang up, since they had no depth of soil, but when the sun rose they were scorched. And since they had no root, they withered away. Other seeds fell among thoms, and the thorns grew up and choked them. Other seeds fell on good soil and produced grain, some a hundredfold, some sixty, some thirty. He who has ears, let him hear." Then the disciples came and said to him, "Why do you speak to them in parables?" And he answered them, "To you it has been given to know the secrets of the kingdom of heaven, but to them it has not been given. For to the one who has, more will be given, and he will have an abundance, but from the one who has not, even what he has will be taken away. This is why I speak to them in parables, because seeing they do not see, and hearing they do not hear, nor do they understand. Indeed, in their case the prophecy of Isaiah is fulfilled that says: "You will indeed hear but never understand, and you will indeed see but never perceive. For this people's heart has grown dull, and with their ears they can barely hear, and their eyes they have closed, lest they should see with their eyes and hear with their ears and understand with their heart and turn, and I would heal them. But blessed are your eyes, for they see, and your ears, for they hear. For truly, I say to you, many prophets and righteous people longed to see what you see, and did not see it, and to hear what you hear, and did not hear it. Hear then the parable of the sower: when anyone hears the word of the kingdom and does not understand it, the evil one comes and snatches away what has been sown in his heart. This is what was sown along the path. As for what was sown on rocky ground, this is the one who hears the word and immediately receives it with joy, yet he has no root in himself, but endures for a while, and when tribulation or persecution arises on account of the word, immediately he falls away. As for what was sown among thoms, this is the one who hears the word, but the cares of the world and the deceitfulness of riches choke the word, and it proves unfruitful. As for what was sown on good soil, this is the one who hears the word and understands it. He indeed bears fruit and yields, in one case a hundredfold, in another sixty, and in another thirty."

This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन:  "श्रद्धा आणि प्रकटीकरण" हा ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा चिंतन-विषय आहे. श्रद्धा म्हणजे ईश्वरी प्रकटीकरणाला मानवाने दिलेला एक प्रतिसाद अशी श्रद्धेची एक व्याख्या केली जाते. आजची वाचने श्रद्धेच्या तीन पैलूंवर प्रकाशझोत टाकतात. 
अ. श्रद्धा ही परमेश्वराची मुक्त आणि सामर्थ्यशाली देणगी होय : आजच्या पहिल्या वाचनात (यशया ५५:१०-११) यशया संदेष्टा परमेश्वराच्या वचनाचे सामर्थ्य शब्दबद्ध करतो, त्यासाठी तो पावसाची उपमा वापरतो. जसा पाऊस सृष्टीला हिरवळ, खाणाऱ्यास भाकर व पेरणाऱ्यास बी पुरवितो त्याप्रमाणे परमेश्वराचा शब्द जीवनाला प्रसन्नता, शरीराला उत्साह आणि मनाला चैतन्य प्राप्त करून देतो. श्रद्धासुद्धा मानवाचे एकंदरीत जीवन समृद्ध करते. ती देवाची देणगी असते. 
ब. श्रद्धा हा ईश्वरी प्रकटीकरणाला दिलेला मानवी प्रतिसाद असतो: आजच्या दुसऱ्या वाचनात (रोम ८:१८-२३) सृष्टी देवपुत्राची प्रतीक्षा करीत कशी कण्हत व वेदना भोगत आहे त्याचे वर्णन संत पॉल करतो. ह्या कणण्यात व वेदना भोगण्यात ईश्वरी प्रकटीकरणाला प्रतिसाद देताना सहन करावे लागणारे दुःख सूचित करण्यात आलेले आहे. मानवी प्रतिसाद हा नेहमीच सुखद असेल असे नाही. ह्या अर्थाने श्रद्धा हा गुलाबी पायघड्यांवरून केलेली सुखद वाटचाल नव्हे तर साक्षात धगधगत्या निखाऱ्यांवरून केलेली खडतर वाटचाल असते. 
क. मानवी प्रतिसादावर ईश्वरी देणगीचे फळ अवलंबून असते: आजच्या शुभवर्तमानामध्ये (मत्तय १३:१-२३) येशू ; पेरणाऱ्याचा दाखला देताना चार प्रकारच्या जमिनीचाउल्लेख करतो. प्रेमळ परमेश्वर हा सतत पेरत राहतो. तरीही जमीन जशी असेल तसे फळ येत राहते. हृदयाची जमीन सुपीक असेल तर ईश्वरी प्रकटीकरणाला श्रद्धेचे विपुल पीक येते. अशी श्रद्धा दुःख, संकटाच्या काळात माणसाला मोठा आधार देते.

आत्मपरीक्षण : परमेश्वराच्या प्रकटीकरणाला मी कशाप्रकारे प्रतिसाद देतो ? माझी श्रद्धा दृढ आहे की कमकुवत आहे हे मी कशावरून समजावे ?

प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या अनमोल वचनाचा साठा आम्हामध्ये व्हावा व त्याप्रमाणे परिवर्तीत आणि खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या