सामान्यकाळातील १६वा सप्ताह 

शुक्रवार २८जुलै २०२३

 "जो मनुष्य वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो. "

 

 संत सिस्टर अल्फोन्सा

 कुमारिका (१९१०-१९४६)

केरळातल्या कुदानाळूर नावाच्या गावात १९ ऑगस्ट १९१० साली जोसेफ व मेरी ह्यांच्या संसारवेलीवर आन्ना नावाचे चौथे अपत्य उमलले, आईच्या मृत्यूनंतर तिच्या मावशीने आन्नाचे पालन पोषण केले. तिच्या बालपणी तिने वाचलेली लिझोची संत तेरेजा हिची कहाणी वाचून आपण प्रार्थना आणि प्रायश्चित्त ह्या माध्यमातून संत व्हावे असे तिला वाटू लागले.

आन्ना हिला कॉन्व्हेंटमध्ये जायचे होते, परंतु तिच्या मावशीने तिचे आधीच लग्न ठरविलेले होते. आपली सोयरिक मोडणे आता केवळ अशक्य आहे असे दिसताच तिने आपले सौंदर्य नष्ट करण्यासाठी मोठ्या अग्नी ज्वालेमध्ये आपला पाय घातला. परंतु सुदैवाने तो घसरला आणि ती स्वतः त्या ज्वालेत पडली व मोठ्या प्रमाणात भाजली. मात्र थोड्याशा औषधोपचारानंतर ती बरी झाली. त्यानंतर तिच्या मावशीने तिला व्रतस्थ जीवनात प्रवेश करण्यास परवनागी दिली.

या महत्त्वाच्या जीवनासाठी आपली तयारी करण्यासाठी ती भारानांगानाम येथील कॉन्व्हेंटमध्ये नवशिष्य म्हणून इ. स. १९२८ साली दाखल झाली. तिथे वैराग्याची वस्त्रे पांघरल्यानंतर सिस्टर अल्फोन्सा ह्यांच्या जीवनात तीन प्रसंग येऊन गेले.

इ. स. १९३५ साली कॉन्व्हेंटमध्ये प्रशिक्षण घेत असतानाच तिला एका असाध्य रोगाने पछाडले. तीन महिने ती ह्या आजाराशी झुंज देत होती. त्यावेळी तिने धन्यवादित कुरियाकोस एलायस चावरा (सण ३ जानेवारी) ह्यांचा नोव्हेना केला आणि ती ठणठणीत बरी झाली.

दुसऱ्या एका प्रसंगात एका संध्याकाळी एक चोर त्यांच्या कॉन्व्हेंटमध्ये शिरलेला पाहून तिने इतका धसका घेतला की, ती बेशुद्ध होऊन पडली. शुद्धीवर आल्यानंतर तिला तामिळ भाषेची देणगी मिळाल्याचे दिसून आले. त्याआधी तिने तामिळ ही भाषा कधी वाचली, लिहिली की बोलली नव्हती. आता ह्या नवीन दानामुळे ती तामिळी लोकांमध्ये प्रसिद्ध झाली. बरेच लोक तिच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागले. तिला दूरदृष्टीची विलक्षण देणगी देखील लाभलेली होती.

तिसऱ्या एका घटनेत इ. स. १९४५ साली तिला येशूच्या दुःख सहनाशी एकरूप होण्याची संधी मिळाली. सुरूवाती-सुरूवातीला हे दुःखसहन केवळ शुक्रवारी ३ तासासाठी होई. पुढे ते कधीही होऊ लागले. परंतु त्यातून बाहेर आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर थकल्याची कुठलीही खूण दिसत नसे. उलट आगळाच ताजेतवानेपणा तिच्या मुखवट्यावर विलसत असे.

हे दु:खसहन प्रसंग मर्यादित व्हावे अशी प्रार्थना तू का करीत नाहीस? असा प्रश्न विचारणाऱ्या सिस्टरांना तिने दिलेले उत्तर सामान्य माणसाला अंतर्मुख करणारे असेच आहे. ती म्हणाली मी केवळ हेच दुःखसहन नव्हे तर कोणतेही दुःख सहन करण्यास तयार आहे, आजचे आधुनिक जग केवळ सुखासीनतेच्या सागरात पार डुंबलेले आहे. नाशाच्या मार्गावर असणाऱ्या जगासाठी म्हणा किंवा धर्मगुरू व धर्मभगिनींच्या उदासीन वृत्तीबद्दल म्हणा प्रभूला मला जितक्या यातना दयावयाच्या आहेत तितक्या सोसण्यास माझी पूर्ण तयारी आहे.

२८ जुलै रोजी सिस्टर अल्फोन्सा मरण पावल्या. पुढे इ. स. १९८६ सालच्या फेब्रुवारी महिन्यात जेव्हा पोप जॉन पॉल दुसरे आपल्या भारत भेटीवर आले तेव्हा कोट्टायाम (केरळ) येथे त्यांना धन्यवादित  ही पदवी पोपमहाशयांनी बहाल केली. आणि Pope Benedict XVI approved Blessed Alphonsa for canonization on June 1, 2007. The fifty-five-year process of her canonization was completed just over a year later on October 12, 2008, when she was officially named a saint. St. Alphonsa was the second person of Indian origin to be canonized a saint and the first Indian woman to be elevated to the status of sainthood.

चिंतन : मी स्वत:ला सर्वस्वी येशूचरणी वाहिलेले आहे. माझ्याशी वागताना कृपया येशूला प्रसन्न करण्याचा आपण सर्वजण एकत्र प्रयत्न करू या.केवळ देवाच्या प्रेमाखातर दुःखसहन करण्यास आनंद मानणे हीच माझी एकमेव इच्छा आहे. संत  सि. अल्फोन्सा


पहिले वाचन :   निर्गम २०:१-१७
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन

"मोशेद्वारे नियमशास्त्र प्रकट करण्यात आले. "

 देव हे सर्व शब्द बोलला: “ज्याने तुला इजिप्त देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे. “माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत.”
" आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील आणि पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस. त्यांच्या पाया पडू नकोस, किंवा त्यांची सेवा करू नकोस; कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान् देव आहे; जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो आणि जे माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो."
“तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नकोस, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही.
“शब्बाथ दिवसाची आठवन ठेवून तो पवित्रपणे पाळ. सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नकोस; तू तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे आणि तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरी ह्यांनीही करू नये; कारण सहा दिवसांत • परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले आणि सातव्या दिवशी विसावा घेतला; म्हणून • परमेश्वराने शब्बाथ दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला." आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील."
“खून करू नकोस. व्यभिचार करू नकोस. चोरी करू नकोस. आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देऊ नकोस."
"आपल्या शेजाऱ्यांच्या घराचा लोभ धरू नकोस, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस, आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नकोस."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Exodus 20:1-17

In those days: God spoke all these words, saying, "I am the Lord your God, who brought you out of the land of Egypt, out of the house of slavery. You shall have no other gods before me. You shall not make for yourself a carved image, or any likeness of anything that is in heaven above, or that is in the earth beneath, or that is in the water under the earth. You shall not bow to them or serve them, for I the Lord your God am a jealous God, visiting the iniquity of the fathers on the children to the third and the fourth generation of those who hate me, but showing steadfast love to thousands of those who love me and keep my commandments. You shall not take the name of the Lord your God in vain, for the Lord will not hold him guiltless who takes his name in vain. Remember the Sabbath day, to keep it holy. Six days you shall labour, and do all your work, but the seventh day is a Sabbath to the Lord your God. On it you shall not do any work, you, or your son, or your daughter, your male servant, or your female servant, or your livestock, or the sojourner who is within your gates. For in six days the Lord made heaven and earth, the sea, and all that is in them, and rested on the seventh day. Therefore the Lord blessed the Sabbath day and made it holy. Honour your father and your mother, that your days may be long in the land that the Lord your God is giving you. You shall not murder. You shall not commit adultery. You shall not steal. You shall not bear false witness against your neighbour. You shall not covet your neighbour's house; you shall not covet your neighbour's wife, or his male servant, or his female servant, or his ox, or his donkey, or anything that is your neighbour's."


This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र :१८ : ९-११
प्रतिसाद : प्रभो, सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.

१) परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे,
ते मनाचे पुनरुज्जीवन करते. 
परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे,
 तो साध्याभोळ्यांना शहाणपण देतो.

२) परमेश्वराचे नियम सरळ आहेत, 
ते हृदयाला आनंदित करतात. 
परमेश्वराची आज्ञा चोख आहे, 
ती नेत्रांना प्रकाश देते.

३) परमेश्वराचे भय शुद्ध आहे, 
ते सर्वकाळ टिकणारे आहे. 
परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत,
 ते सर्वथैव न्याय्य आहेत.

४ )ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या 
राशीपेक्षा इष्ट आहेत; 
ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणाऱ्या 
मधापेक्षा गोड आहेत.


 Psalm 19:8, 9, 10, 11

Lord, you have the words of eternal life.

The law of the Lord is perfect; 
it revives the soul. 
The decrees of the Lord are steadfast;
they give wisdom to the simple. R

The precepts of the Lord are right; 
they gladden the heart. 
The command of the Lord is clear;
it gives light to the eyes. R 

The fear of the Lord is pure,
abiding forever.
The judgments of the Lord are true;
 they are, all of them, just. R

They are more to be desired than gold,
 than quantities of gold.
And sweeter are they than honey,
 than honey flowing from the comb. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल 
 आलेलुया!

Acclamation: 
 Blessed are those who, hearing the word, hold it fast in an honest and good heart, and bear fruit with patience.

शुभवर्तमान   मत्तय १३:१८-२३
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "जो मनुष्य वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो. "

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा दुष्ट येऊन त्याच्या अंत:करणात पेरलेले ते हिरावून घेतो; वाटेवर पेरलेला तो हा आहे. खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो आणि ते तात्काळ आनंदाने ग्रहण करतो; परंतु त्याला मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता आणि द्रव्यांचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading :Matthew 13:18-23

At that time: Jesus said to his disciples, "Hear then the parable of the sower: When anyone hears the word of the kingdom and does not understand it, the evil one comes and snatches away what has been sown in his heart. This is what was sown along the path. As for what was sown on rocky ground, this is the one who hears the word and immediately receives it with joy, yet he has no root in himself, but endures for a while, and when tribulation or persecution arises on account of the word, immediately be falls away. As for what was sown among thorns, this is the one who hears the word, but the cares of the world and the deceitfulness of riches choke the word, and it proves unfruitful. As for what was sown on good soil, this is the one who hears the word and understands it. He indeed bears fruit and yields, in one case a hundredfold, in another sixty, and in another thirty."

This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: आजच्या शुभवर्तमानात येशू दाखल्याचे महत्व विशद करतो. दाखला हा साहित्याचा प्रकार आहे, रुपक आहे आणि त्याचा अर्थ समजणे महत्वाचे आहे. दाखला एक विस्तृत अर्थलंकार किंवा उपमा आहे. ज्याचा विस्तार बहुतेक संक्षिप्त शैक्षणिक कथे •मध्ये होते. प्राचीन यहुदी लोकांसाठी दाखला एक गुप्त कथा होती. ज्याचा प्रमुख उद्देश होता विचार उत्तेजित करणे. जुन्या करारात दाखला परमेश्वराचे न्यायनिर्णयाच्या संप्रेषणासाठी उपयोग केला जात असे. येशूसुद्धा सुवार्ताप्रचारासाठी सर्वसामान्य व प्रचलित साहित्यिक उपकरणाचा उपयोग करतो. समकालीन युगात तंत्रविज्ञानाचा भडिमारामुळे सुवार्ताप्रसारासाठी अनेक माध्यम उपलब्ध आहे. हे। माध्यम विशेष करून युवकांमध्ये आता सर्वसामान्य व प्रचलित आहे. आपण ह्या माध्यमाचा उपयोग सृजनशीलतेने करतो का? ह्या माध्यमांना प्रोत्साहीत करतो का? समाजाचे संस्कृती संवर्धन, जडणघडण आणि प्रशिक्षण ह्यामध्ये प्रसारमाध्यमाची आधुनिक साधने महत्त्वाची भूमिका बजावतात. तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळे बातम्या प्रसारणीची विविध, तंत्रे बातम्या प्रसाराची व्यापकता आणि प्रसारमाध्यमातील विविध साधने ह्यामध्ये कमालीची वाढ झालेली आहे. (CCC२४९३)

प्रार्थना :  हे प्रभू येशू, आमचे सर्वस्व आम्ही तुला समर्पित करतो. तुझ्या वचनात आम्ही सतत वृद्धिगंत व्हावे म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️