सामान्यकाळातील १६वा सप्ताह
गुरुवार २७ जुलै २०२३
“स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.
संत इनोसेंट पहिले
परमगुरू, वर्तनसाक्षी ( ४१७)
प्रभू येशू ख्रिस्ताने देवराज्याची शिकवण सोप्या भाषेत साध्या गोष्टींच्या व दाखल्यांच्या स्वरुपात दिली. अनेकदा शिष्यांना ती कळली नाही आणि आपल्याला सुद्धा बऱ्याच वेळा कळत नाही. अंत:करणाच्या कठोरपणामुळे देवाचे वचन ग्रहण करता येत नाही. देवाचे वचन ग्रहण करण्यास व | त्याची रहस्यमय कृपाअनुभवण्यास अंतःकरण पूर्वग्रहदुषित नसावे, आपली उपासना व भक्ती केवळ कर्मकांडापूरती मर्यादित नसावी आणि आपली श्रद्धापोकळ नसावी. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत कारण प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला देवराज्याची शिकवण दिली आहे व दैवी रहस्यांचे प्रकटीकरण केलेले आहे.आपली श्रद्धा दृढव्हावी, आपल्याला देवाच्या वचनाचा उलगडा व्हावा आणि आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणून आपण देवाच्या वचनावर जाणीवपूर्वक चिंतन करू या.
पहिले वाचन : निर्गम १९:१-२,९-११,१६-२०
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
“सर्व लोकांदेखत परमेश्वर सिनाय पर्वतावर उतरेल."
इस्राएल लोकांना इजिप्त देशातून निघून तीन महिने झाले त्याच दिवशी ते सिनायच्या रानात येऊन पोहोचले. रफीदीम येथून कूच करीत ते सिनायच्या रानात आले आणि त्या रानात त्यांनी डेरे दिले; तेथे पर्वतासमोर इस्राएल लोकांनी तळ दिला.
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो ते ह्या हेतूने की, मी तुझ्याशी बोलत असताना लोकांनी ऐकावे आणि तुझ्यावरही नेहमी विश्वास ठेवावा.”
नंतर मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले. परमेश्वर मोशेला म्हणाला, "तू लोकांकडे जा आणि त्यांना आज आणि उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावेत. तिसरा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण तिसऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सिनाय पर्वतावर उतरला.”
तिसरा दिवस उजाडताच गडगडाट झाला आणि विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग जमले आणि शिंगाचा फार मोठ्याने नाद होऊ लागला, तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले. मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी छावणीतून बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. सर्व सिनाय पर्वतावर धूर पसरला कारण परमेश्वर अग्नीतून त्यांच्यावर उतरला; भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला आणि सर्व पर्वत थरथरू लागला. शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला, तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला. परमेश्वराने मिनाय पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला पर्वताच्या शिखरावर बोलावले, तेव्हा तो वर गेला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Exodus 19:1-2, 9-11, 16-20b
On the third new moon after the people of Israel had gone out of the land of Egypt, on that day they came into the wilderness of Sinai. They set 27 THU out from Rephidim and came into the wilderness of Sinai, and they encamped in the wilderness. There Israel encamped before the mountain. And the Lord said to Moses, "Behold, I am coming to you in a thick cloud, that the people may hear when I speak with you, and may also believe you for ever." When Moses told the words of the people to the Lord, the Lord said to Moses, "Go to the people and consecrate them today and tomorrow, and let them wash their garments and be ready for the third day. For on the third day the Lord will come down on Mount Sinai in the sight of all the people. On the morning of the third day there were thunders and lightnings and a thick cloud on the mountain and a very loud trumpet blast, so that all the people in the camp trembled. Then Moses brought the people out of the camp to meet God, and they took their stand at the foot of the mountain. Now Mount Sinai was wrapped in smoke because the Lord had descended on it in fire. The smoke of it went up like the smoke of a kiln, and the whole mountain trembled greatly. And as the sound of the trumpet grew louder and louder, Moses spoke, and God answered him in thunder. The Lord came down on Mount Sinai, to the top of the mountain. And the Lord called Moses to the top of the mountain, and Moses went up.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :दानिएल ३:५२,५३,५४,५५,५६
प्रतिसाद : प्रभो, तुझा गौरव असो.
१ आमच्या पूर्वजांच्या प्रभू परमेश्वरा, तू धन्यवादित असो.
तुला गौरव आणि धन्यवाद सदासर्वकाळ असो.
तुझे गौरवमय पवित्र नाम धन्य असो.
तुला गौरव आणि धन्यवाद सदासर्वकाळ असो.
२ तुझ्या पवित्र मंदिरात तू धन्य आहेस.
तुला गौरव आणि धन्यवाद सदासर्वकाळ असो.
३ तुझ्या राजासनावर तू धन्य आहेस.
तुला गौरव आणि धन्यवाद सदासर्वकाळ असो.
४ तुला गौरव असो, कारण तू नेहमी अंतर्याम पाहतोस तुला गौरव
आणि धन्यवाद सदासर्वकाळ असो.
५ स्वर्गदरबारात तू सुवंदित असो
तुला गौरव आणि धन्यवाद सदासर्वकाळ असो.
Daniel 3:52, 53, 55, 54, 56
You are to be praised and highly exalted forever!
Blessed are you, O Lord, God of our ancestors,
and to be praised and highly exalted forever;
and blessed is your glorious, holy name.
and to be highly praised and highly exalted forever. R
Blessed are you in the shrine of your holy glory
and to be extolled and highly glorified forever. R
Blessed are you upon the throne of your kingdom
and to be extolled and highly exalted forever. R
Blessed are you, who sits upon cherubim
and looks upon the deeps, and to be praised
and highly exalted forever.
Blessed are you in the firmament of heaven
and to be sung and glorified forever. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे येरुशलेम, प्रभूचे गुणगान गा!
तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो.
Acclamation:
Blessed are you, Father, Lord of heaven and earth, that you have revealed to little children the mysteries of the kingdom.
शुभवर्तमान मत्तय १३ : १०-१७
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही."
शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, “आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता ?” त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि त्याला भरपूर होईल; परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल तेदेखील काढून घेतले जाईल. ह्यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्यानी बोलतो, कारण ते पाहात असता पाहात नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत आणि त्यांना समजतही नाही. यशयाचा संदेश त्याच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा -
'तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणारच नाही आणि पहाल तर खरे, परंतु तुम्हाला दिसणारच नाही. कारण ह्या लोकांचे अंत:करण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. ह्यासाठी त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानानी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये.'
पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आणि धन्य तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हास सत्य सांगतो की, तुम्ही जे पाहत आहा ते पाहायला पुष्कळ संदेष्टे आणि नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहायला मिळाले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकायला ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकायला मिळाले नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Matthew 13:10-17
At time: The disciples came and said to Jesus, "Why do you speak to them in parables?" And he answered them, "To you it has given to know secrets of the kingdom of heaven, but to them it has not been given. For to the one who has, more will be given, and he will have an abundance, but from the one who has not, even what he not see, and hearing they do not hear, nor do they understand. Indeed, in their case the has will be taken away. This is why I speak to them in parables, because seeing they do prophecy of Isaiah is fulfilled that says: You will indeed hear but never understand, and you will indeed see but never perceive.' For this people's heart has grown dull, and with their ears they can barely hear, and their eyes they have closed, lest they should see with their eyes and hear with their ears and understand with their heart and turn, and I would heal them." But blessed are your eyes, for they see, and your ears, for they hear. For truly say to you, many prophets and righteous people longed to see what you see, and did not see it, and to hear what you hear, and did not hear it.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आजच्या शुभवर्तमानात येशू दाखल्याचे महत्व विशद करतो. दाखला हा साहित्याचा प्रकार आहे, रुपक आहे आणि त्याचा अर्थ समजणे महत्वाचे आहे. दाखला एक विस्तृत अर्थलंकार किंवा उपमा आहे. ज्याचा विस्तार बहुतेक संक्षिप्त शैक्षणिक कथे •मध्ये होते. प्राचीन यहुदी लोकांसाठी दाखला एक गुप्त कथा होती. ज्याचा प्रमुख उद्देश होता विचार उत्तेजित करणे. जुन्या करारात दाखला परमेश्वराचे न्यायनिर्णयाच्या संप्रेषणासाठी उपयोग केला जात असे. येशूसुद्धा सुवार्ताप्रचारासाठी सर्वसामान्य व प्रचलित साहित्यिक उपकरणाचा उपयोग करतो. समकालीन युगात तंत्रविज्ञानाचा भडिमारामुळे सुवार्ताप्रसारासाठी अनेक माध्यम उपलब्ध आहे. हे। माध्यम विशेष करून युवकांमध्ये आता सर्वसामान्य व प्रचलित आहे. आपण ह्या माध्यमाचा उपयोग सृजनशीलतेने करतो का? ह्या माध्यमांना प्रोत्साहीत करतो का? समाजाचे संस्कृती संवर्धन, जडणघडण आणि प्रशिक्षण ह्यामध्ये प्रसारमाध्यमाची आधुनिक साधने महत्त्वाची भूमिका बजावतात. तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळे बातम्या प्रसारणीची विविध, तंत्रे बातम्या प्रसाराची व्यापकता आणि प्रसारमाध्यमातील विविध साधने ह्यामध्ये कमालीची वाढ झालेली आहे. (CCC२४९३)
प्रार्थना : हे प्रभू, परमेश्वरा, आम्ही सर्वदा आमच्या आई-वडिलांचा सन्मान करावा आणि त्यांना आदराने वागवावे म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या