Marathi Bible Reading | 16th week in ordinary Time | Wednesday 26th July 2023

 सामान्यकाळातील १६वा सप्ताह 

बुधवार २६  जुलै २०२३

काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट, तर कोठे तीसपट, असे पीक आले.

 संत जोकिम आणि आन्ना

पवित्र मरियेचे मातापिता (पहिले शतक)

नव्या करारातील शुभवर्तमानांमध्ये धन्य कुमारी पवित्र मरियेचे मातापिता कोण होते ह्याचा उल्लेख आलेला नाही. मात्र दुसऱ्या शतकापासून चालत आलेल्या एका परंपरेनुसार पवित्र मरियेच्या आईचे नाव आन्ना (कृपा) असे होते आणि वडिलांचे नाव जोकिम (देव तयारी करतो) असे होते. मरिया हे या दांपत्याला त्यांच्या म्हातारपणी झालेले अपत्य होते आणि ते त्यांच्या प्रार्थनेचे फळ होते असे मानले जाते. कारण दोघेही वयातीत असून निःसंतान होती. संत आन्ना ही येशूची 'आजी' होती, हे सत्य पौर्वात्य ख्रिस्तसभेत चौथ्या शतकात आणि पाश्चिमात्य ख्रिस्तसभेत आठव्या शतकात लोकांच्या भक्तीचा विषय बनले आणि चौदाव्या शतकात तर ते संपूर्ण जगभरच्या भक्तीमध्ये सामावले गेले. इ. स. १५४८ साली विश्वव्यापी ख्रिस्तसभेत त्यांचा सण समाविष्ट करण्यात आला. प्रसूतीवेदना सहन करणाऱ्या स्त्रियांची ती आश्रयदाती संत म्हटली जाते.

जोकिम हे पवित्र मरियेचे पिता अत्यंत धार्मिक होते. एका प्राचीन दंतकथेनुसार ते मूळचे गालिली येथील होते. तेथून ते येरुशलेम येथे आले आणि तिथेच मरण पावले. त्यांच्या राहत्या घराशेजारीच त्यांना पुरण्यात आले. पुढे हेल्लेना या राणीने (सण १८ ऑगस्ट) त्यांच्या थडग्यावर संत जोकीम व आन्ना ह्यांच्या स्मरणार्थ एक चर्च बांधले. तिथून त्यांची भक्ती फोफावत गेली.

 ख्रिस्तसभा आज धन्य कुमारी मरीयेचे आई-वडिल, संत आत्रा व संत ज्योकिम ह्यांचा सण साजरा करीत आहे. परमेश्वराच्या वचनावर आणि त्याने दिलेल्या दहा आज्ञांवर चिंतन करीत असताना आपण आपल्या जीवनावर चिंतन करु या. आई-वडिल ह्या नात्याने आपण आपल्या मुलांना देवप्रीति आणि परस्परप्रीतिची आज्ञा पाळावयास प्रोत्साहन देत आहोत का? संत ज्योकिम आणि संत आना ह्यांनी पवित्र व धन्य कुमारी मरियेला देवप्रीतिच्या महान आज्ञेमध्ये घडविले. आपण आज त्यांचा आदर्श आपल्या कुटुंबात आचरणात आणतो का ? प्रीतिच्या आज्ञांचे पालन कुटुंबातच शिकविले जाते व पाळले जाते.

ज्या कुटुंबात देवाचा शब्द आचरणात आणला जातो व जे कुटुंब एकत्र प्रार्थना करुन देवप्रीति आणि परस्परप्रीतिची आज्ञा आचरणात आणतात तेच खरे ख्रिस्ती कुटुंब होय.

पहिले वाचन :   निर्गम १६:१-५,९-१५
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी आकाशातून अन्नवृष्टी करीन."
एलीम येथून कूच करून इस्राएल लोकांचा सर्व समुदाय इजिप्त देशातून निघाल्यावर दुसऱ्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम आणि सिनाय ह्यांच्यामधल्या सीन रानात येऊन पोहोचला. त्या रानात इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे आणि अहरोन ह्यांच्यासबंधांने कुरकुर केली. इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “आम्ही इजिप्त देशात मांसाच्या भांड्यांभोवती बसून भरपूर जेवत होतो, तेव्हा आम्हांला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर चालले असते; पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मरावे म्हणून तुम्ही आम्हांला ह्या रानात आणले आहे."
तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, "पाहा, मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन आणि लोकांनी बाहेर जाऊन एकएका दिवसाला पुरेल इतके जमा करावे, ह्यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही ह्याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन. सहाव्या दिवशी जे काही ते जमा करून शिजवतील ते ते इतर दिवशी जमा करतील त्याच्या दुप्पट असावे.”
मोशे अहरोनला म्हणाला, “इस्राएल लोकांच्या सर्व मंडळींना सांग की, 'तुम्ही परमेश्वरासमोर या, कारण त्याने तुमची कुरकुर ऐकली आहे.' " अहरोन इस्त्राएलच्या सर्व मंडळीशी बोलत असता त्यांनी रानाकडे नजर फिरवली, तो ढगात परमेश्वराचे तेज त्यांना दिसले. परमेश्वर मोशेला म्हणाला, "इस्राएल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे; त्यांना सांग की, "संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकरी खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल."
संध्याकाळी असे झाले की, लावे पक्षी येऊन सर्व छावणीवर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती दव पडले. हे पडलेले दंव सुकून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवल्यांसारखे हिमकणाएवढे बारीक कण पसरलेले नजरेस पडले. इस्राएल लोक हे पाहून एकमेकांना म्हणाले, "हे काय ?" कारण हे काय होते ते त्यांना माहीत नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, “परमेश्वराने तुम्हाला खायला दिले आहे ते हेच."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Exodus 16:1-5, 9-15

The people of Israel set out from Elim, and all the congregation of the people of Israel came to the wilderness of Sin, which is between Elim and Sinai, on the fifteenth day of the second month after they had departed from the land of Egypt. And the whole congregation of the people of Israel grumbled against Moses and Aaron in the wilderness, and the people of Israel said to them, "Would that we had died by the hand of the Lord in the land of Egypt, when sat the meat pots and ate bread to the full, for you have brought us out into this wilderness to kill this whole assembly with hunger." Then the Lord said to Moses, "Behold, I am about to rain bread from heaven for you, and the people shall go out and gather a day's portion every day, that I may test them, whether they will walk in my law or not. On the sixth day, when they prepare what they bring in, it will be twice as much as they gather daily." Then Moses said to Aaron, "Say to the whole congregation of the people of Israel, 'Come near before the Lord, for he has heard your grumbling" And as soon as Aaron spoke to the whole congregation of the people of Israel, they looked towards the wilderness, and behold, the glory of the Lord appeared in the cloud. And the Lord said to Moses, "I have heard the grumbling of the people of Israel. Say to them, 'At twilight you shall eat meat, and in the morning you shall be filled with bread. Then you shall know that I am the Lord your God." In the evening quail came up and covered the camp, and in the morning dew lay around the camp. And when the dew had gone up, there was on the face of the wilderness a fine, flake-like thing, fine as frost on the ground. When the people of Israel saw it, they said to one another, "What is it?" For they did not know what it was. And Moses said to them, "It is the bread that the Lord has given you to eat."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र : ७८ : १८-१९,२३-२८ 
प्रतिसाद :  परमेश्वराने त्यांना स्वर्गातले धान्य दिले.

१)  त्यांनी आपली इच्छा तृप्त करण्यासाठी 
अन्न मागून आपल्या मनात देवाची परीक्षा पाहिली. 
ते देवाविरूद्ध बोलले. ते म्हणाले,
“रानात भोजनाची सिद्धता करायला देव समर्थ आहे काय ?"

२)  तरी त्याने वरती आभाळाला आज्ञा केली 
आणि आकाशदारे उघडली. 
खाण्याकरिता त्याने त्यांच्यावर मान्नाचा वर्षाव केला 
आणि त्यांना स्वर्गातले धान्य दिले.

३)  दिव्यदूतांची भाकर मानवांनी खाल्ली.
पुरून उरेल इतके अन्न त्याने त्यांना दिले.
 त्याने पूर्वेचा वारा आकाशात वाहविला 
आणि आपल्या सामर्थ्याने  'दक्षिणेचा वारा आणला.

४)  त्याने त्यांच्यावर धुळीसारखा मांसाचा 
आणि समुद्राच्या वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला. 
त्याने त्यांच्या छावणीमध्ये, 
त्यांच्या वस्तीभोवती ते पाडले.


Psalm  78:18-19, 23-24, 25-26, 27-28

R. The Lord gave them bread from heaven.

 In their heart they put God to the test
by demanding the food they craved. 
They spoke against God and said: 
"Can God spread a table
in the wilderness? R

Yet he commanded the clouds above, 
and opened the gates of heaven. 
He down manna to eat,
 and gave them bread from heaven. R

Man ate the bread of angels. 
He sent them abundance of food;
the east wind he stirred up
in the heavens,
 the south wind he directed by his might.

He rained flesh upon them like dust, 
winged fowl like the sands of the sea.
 He let it fall in the midst of their camp,
and all around their tents. R 

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
प्रभू आपल्या वचनाला जागतो,
त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते.
 आलेलुया!

Acclamation: 
 The seed is the word of God, Christ is the sower; all who come to him will live forever.

शुभवर्तमान   मत्तय १३ : १-९
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"त्याचे शतपटीने पीक आले. "
येशू घरातून निघून समुद्रकिनाऱ्याशी जाऊन बसला. तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करायला निघाला आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले आणि पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले आणि त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले आणि काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट, तर कोठे तीसपट, असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading :Matthew 13:1-9

That same day Jesus went out of the house and sat beside the lake. And great crowds gathered about him, so that he got into a boat and sat down. And the whole crowd stood on the beach. And he told them many things in parables, saying: "A sower went out to sow. And as he sowed, some seeds fell along the path, and the birds came and devoured them. Other seeds fell on rocky ground, where they did not have much soil, and immediately they sprang up, since they had no depth of soil, but when the sun rose they were scorched. And since they had no root, they withered away. Other seeds fell among thorns, and the thorns grew up and choked them. Other seeds fell on good soil and produced grain, some a hundredfold, some sixty, some thirty. He who has ears, let him hear."

This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: आजच्या शुभवर्तमानात येशू बी पेरणाऱ्याच्या दाखल्याद्वारे प्रभूशब्दाचे महत्त्व समजावून सांगतो. जुना करारात परमेश्वराची उपमा बी पेरणाऱ्यांशी करण्यात आलेली आहे. बी परमेश्वराचा शब्द आहे जो परमेश्वराचे कार्य पूर्ण करतो. नवा करारात सुद्धा समान प्रकारची उपमाचाउपयोग करण्यात आलेला आहे आणि ह्या दाखल्याच्या माध्यमातून येशू देवशब्दाच्या परिणामकारक उर्जेचे वर्णन करतो. आपल्या जीवनात देवशब्दाला महत्त्वपूर्ण स्थान आहे का ? जीवनात जेव्हा संकटे येतात आपण प्रभूशब्दाच्या अक्षय ऊर्जा संचयातून आध्यात्मिक शक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो का? देवशब्दाची शक्ती आणि प्रेरणा हेच ख्रिस्तसभेचे चैतन्य आणि आधार आहे. ख्रिस्तसभेच्या पुढील पिढ्यांसाठी ती श्रद्धेची खाण आहे, आत्म्याचे अन्न आहे आणि आध्यात्मिक जीवनाचा शुद्ध आणि अखंड झरा आहे, म्हणून ख्रिस्ती भाविकांसाठी पवित्रशास्त्र खुले केले जावे. (CCC १३१)

प्रार्थना :  हे प्रभू, परमेश्वरा, आम्ही सर्वदा आमच्या आई-वडिलांचा सन्मान करावा आणि त्यांना आदराने वागवावे म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या