Marathi Bible Reading | 17th Sunday in Ordinary Time |30th July 2023

 सामान्यकाळातील १७वा सप्ताह 

रविवार ३०  जुलै २०२३

 स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे,



आजच्या शुभवर्तनात प्रभू येशू, ठेव, मोती व जाळे ह्यांचा दृष्टांत देत  असताना स्वर्गाच्या राज्याचा शोध आपण कशा प्रकारे करायला हवा, याबद्दल  चिंतन करायला सांगत आहे. आपल्या प्रत्येकाला देवप्रीतिचे शस्त्र घेवून प्रभू  येशू देवराज्याची सुवार्ता पसरविणयासाठी पाचारण करित आहे. आपण त्या  पाचारणास पात्र ठरावेत म्हणून आपल्या अंतःकरणात वास करणाऱ्या देवप्रीतिचा शोध घेवून देवाला आपले सर्वस्व समर्पण करु या. आपण सर्वजण स्वर्गराज्याचे सहभागीदार बनावेत म्हणून प्रभू येशूच्या वचनावर चिंतन करुन  त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी प्रेरणा घेवू या.

                                    ✝️            

पहिले वाचन : १ राजा ३:५.७-१२
वाचक : राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन ३:५.७-१२

"तू न्याय करण्याची विवेकबुद्धी मागितलीस."

गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलमोनला दर्शन दिले. देवाने त्याला म्हटले, "तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन." शलमोनने म्हटले, "आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला माझा बाप दावीद याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे; चालचलणूक कशी ठेवावी हे मला कळत नाही. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे; त्या लोकांचा एवढा मोठा समुदाय आहे की, ते असंख्य आणि अगणित आहेत. तेव्हा आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे म्हणजे मला बऱ्यावाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करायला कोण समर्थ आहे ?"
शलमोनने हा वर मागितला, म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला. देव त्याला म्हणाला, "तू असला वर मागितलास. दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूचा नाश यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेकबुद्धी मागितलीस. म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो; मी तुला बुद्धीमान आणि विवेकी चित्त देतो. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही आणि पुढे होणार नाही."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :1 Kings 3:5, 7-12

In those days: At Gibeon the Lord appeared to Solomon in a dream
 by night, and God said, "Ask what I shall give you." And Solomon said, O Lord my God, you have made your servant king in place of David my father, although I am but a little child. do not know how to go out or come in. And your servant is in the midst of your people whom you have chosen, a great people, too many to be numbered or counted for multitude. Give your servant therefore an understanding mind to govern your people, that I may discern between good and evil, for who is able to govern this your great people?" It pleased the Lord that Solomon had asked this. And God said to him, "Because you have asked this, and have not asked for yourself long life or riches or the life of your enemies, but have asked for yourself understanding to discem what is right, behold, I now do according to your word. Behold, I give you a wise and discerning mind, so that none like you has been before you and none like you shall arise after you. 
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  ११९:५७.७२,७६-७७, १२७-१२८,१२९-१३०
प्रतिसाद :   तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे !
१ परमेश्वर माझा वाटा आहे, 
तुझी वचने पाळण्याचा मी निश्चय केला आहे. 
सोन्यारुप्याच्या लक्ष्यावधी नाण्यांपेक्षा 
तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे.

२ तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार
 तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे. 
माझ्यावर करुणा कर म्हणजे मी जगेन. 
कारण तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे. 

३ ह्यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, 
बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो. 
ह्यामुळे सर्व बाबींसंबंधाने तुझे सर्व आदेश 
यथायोग्य आहेत असे मी मानतो. 
आणि प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करतो.

४ तुझे निर्बंध आश्चर्यकारक आहेत,
म्हणून मी ते पाळतो. 
तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; 
त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते.


Psalm  119:57 and 72, 76-77, 127-128, 129-130

R. O Lord, how I love your law.

I have said, "O Lord, my portion
is to obey your words." 
The law from your mouth means more to me
 than large quantities of silver and gold. R

Let your merciful love console me
by your promise to your servant. 
Show me compassion, that I may live,
for your law is my delight. R 

That is why I love your commands
more than finest gold, why I rule my life by your precepts,
and hate false ways. R 

Your decrees are wonderful indeed;
therefore my soul obeys them. 
The unfolding of your word gives light, 
and understanding to the simple. R


दुसरे वाचन :पॉलचे रोमकरांस पत्र  ८:२८-३०

वाचक: पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
"देवाने आपणाला आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून योजिले आहे."
आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्यांच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयींचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना अगोदरच नेमून ठेवले; ह्यात हेतू हा की, तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने अगोदर नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading  :Romans 8:28-30

Brethren: We know that for those who love God all things work together for good, for those who are called according to his purpose. For those whom he foreknew he also predestined to be conformed to the image of his Son, in order that he might be the firstborn among many brothers. And those whom he predestined he also called, and those whom he called he also justified, and those whom he justified he also glorified. 
This is the word of God 
Thanks be to God 


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे;
माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. 
  आलेलुया!

Acclamation: 
Blessed are you, Father, Lord of heaven and earth,
 that you have revealed little children the mysteries of the kingdom. 

शुभवर्तमान   मत्तय   १३:४४-५२
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"तो आपले सर्वस्व विकतो आणि शेत विकतयेशूने लोकसमुदायांला म्हटले, (“स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे, ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो.”

“आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे; त्याला एक अति मौल्यवान मोती आढळले; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले.)"

“आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे; ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्यावर ओढले आणि बसून जे चांगले ते भाड्यांत जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे आणि दात खाणे चालेल.”

“तुम्हांला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय ?" ते त्याला म्हणाले, “होय.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading : Matthew 13:44-52

At that time: Jesus said to the crowds, "The kingdom of heaven is like treasure hidden in a field, which a man found and covered up. Then in his joy he goes and sells all that he has and buys that field. Again, the kingdom of heaven is like a merchant in search of fine pearls, who, on finding one pearl of great value, went and sold all that he had and bought it. Again, the kingdom of heaven is like a net that was thrown into the sea and gathered fish of every kind. When it was full, men drew it ashore and sat down and sorted the good into containers but threw away the bad. So it will be at the end of the age. The angels will come out and separate the evil from the righteous and throw them into the fiery furnace. In that place there will be weeping and gnashing of teeth. Have you understood all these things? "They said to him, "Yes." And he said to them, "Therefore every scribe who has been trained for the kingdom of heaven is like a master of a house, who brings out of his treasure what is new and what is old

This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन:  मनुष्य आपल्या जीवनामध्ये कसल्या ना कसल्या तरी खजिन्याच्या शोधात असतो. योग्य खजिना योग्य वेळी त्याला गवसला तर त्याचे जीवन समृद्ध व सुसंपन्न बनू शकते. जीवनात माणसाने कोणत्या प्रकारच्या खजिन्याची आस धरावी त्याविषयी आजची वाचने आपल्याला मार्गदर्शन करताना आढळतात. 
अ. विवेकबुद्धीचे वरदान : प्राचीन इस्राएलचे राजे दीर्घायुष्य, धनसंपदा आणि शत्रूंवरील विजय अशा स्वरूपाची वरदाने। परमेश्वराजवळ मागत. परंतु आजच्या पहिल्या वाचनात (१ राजे ३:५, ७-१२) सॉलोमन राजा देवाकडे विवेकबुद्धीचे वरदान मागतो. स्वतःच्या स्वार्थी हेतूंपेक्षा सर्वांचे सार्वजनिक हित नजरेसमोर ठेवल्याने सॉलोमन राजाच्या ज्ञानाची ख्याती सर्वत्र पसरली. यहुदी ज्ञानसाहित्याचा जनक म्हणून नावारूपाला आला. 
ब. परमेश्वराविषयीची ओढ : दुसऱ्या वाचनात (रोम ८:२८-३०) संत पॉल रोमकरांस कळवितो की, परमेश्वरावर प्रेम करणाऱ्यांना त्याच्या सुसंकल्पाप्रमाणे सर्व गोष्टी हितकारक होतात. देवविषयक ओढ बाळगण्याने त्यांना देवाची योजना प्रकट होते, देवाच्या हाकेला ते मोकळ्या मनाने होकार देतात, ते नीतिमान जीवन जगतात आणि परमेश्वराकडून त्याचा गौरव होतो. 
क. देवराज्य प्रस्थापित करण्याची तळमळ : शुभवर्तमानात (मत्तय १३:४४-५२) एकूण चार दाखले देण्यात आलेले आहेत. माणसाने मौल्यवान अशा गोष्टींच्या शोधात असावे, ह्या गोष्टींची पुरती पारख करावी, त्यासाठी आवश्यक ती किंमत मोजायला तयार असावे, चांगल्या गोष्टींचा संचय व संरक्षण करावे, वाईट गोष्टी जीवनातून वजा करीत राहावे आणि नव्या-जुन्या गोष्टींचे भांडार भरून ठेवावे. अशांतून देवराज्य प्रस्थापित करण्याची त्याचीतळमळ दिसून येऊ शकेल.

आत्मपरीक्षण : माझ्या जीवनात मला योग्य असा खजिना सापडला आहे का ? त्यासाठी मी कोणती किंमत मोजायला तयार आहे ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या प्रीतिने माझे जीवन भरुन टाक. तुझ्या इच्छेप्रमाणे  जीवन जगण्यास मला कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या