Marathi Bible Reading | 17th week in ordinary Time | Monday 31st July 2023

 सामान्यकाळातील १७वा सप्ताह 

सोमवार ३१ जुलै २०२३


"त्या मोहरीच्या दाण्याचे असे झाड होते की, आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यांत वस्ती करतात. "

लोयोलाचे संत इग्नेशिअसचा सण  :

वर्तनसाक्षी (१४९१-१५५६)  

उत्तर स्पेनमधील लोयोला येथल्या राजघराण्यात इनिगो ह्याचा जन्म झाला. पाम्पलोना येथल्या युद्धात जखमी झाल्यानंतर आपल्या बिछान्यात विश्रांती घेत असताना त्याने ख्रिस्ताचे चरित्र आणि संतांची जीवनचरित्रे ह्यांचे वाचन केले. त्यावरून आपले जीवन किती पोकळ आणि अर्थहीन आहे ह्याची जाणीव इग्नेशिअस ह्यांना झाली. त्याने स्वतःशी प्रश्न केला, “जर ही सगळी माणसे संतपदाला जाऊन पोहोचू शकत असतील तर मी का नाही?”

आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर इग्नातीने मानरेसा येथील एकांतवासात एक वर्ष घालविले. देवाची आपल्याबाबत काय इच्छा आहे ते त्याने शोधण्याचा मनापासून प्रयत्न केला. त्यानंतर त्याने पवित्र भूमीची तीर्थयात्रा केली. बार्सेलोना येथील प्रशिक्षण केंद्रात त्याने लॅटीन भाषेचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा त्याचे वय ३३ वर्षे एवढे होते. त्यापुढील ११ वर्षे इग्नाती ह्याने तत्वज्ञान आणि ईशज्ञान या विषयांचा अभ्यास करण्यात खर्ची घातली.

पॅरीस शहरातील विश्वविद्यालयात इ. स. १५३५ साली त्याने पदवी संपादन केली. त्यावेळी आत्मक्लेश, गरिबी आणि आध्यात्मिक साधना या गुणांनी सजविलेल्या जीवनपद्धतीने त्यांनी ६ तरुणांना आपणाकडे आकर्षून घेतले. त्यातील दोघे पुढे संतपदाला पोहोचले. एक होते संत पीटर फेबर आणि दुसरे संत फ्रान्सिस झेवियर (सण ३ डिसेंबर).

ह्या सात जणांनी पोप पॉल दुसरे ह्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगण्याचे ठरविले, ख्रिस्तसभेच्या शत्रूंशी मुकाबला करण्यासाठी ह्या जगाच्या आकर्षणात अडकून पडलेल्या भाविकांना शाश्वत सुखाची ओळख करून देण्यासाठी ह्या सात जणांच्या समुहातून परमेश्वर एका नवीन सोसायटीची योजना हळूहळू आपणासमोर साकार करीत आहे ह्याची जाणीव पोपमहाशयांना झाली.

इ. स. १५४० साली पोपमहाशयांनी “द सोसायटी ऑफ जिझस" जेसुईट्स किंवा येशूसंघ, ह्या धार्मिक व्रतस्थांच्या संस्थेला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर इग्नाती लोयोलाकर ह्यांना या संस्थेचे पहिले जनरल म्हणून निवडण्यात आले. त्यांनी लगेच आपल्या संस्थेची आचारसंहिता तयार केली. त्यात कोणत्याही एका विशिष्ट पेहरावाचा समावेश करण्याचे त्यांनी टाळले. दैनंदिन भक्तीच्या प्रार्थना आपल्या आचारसंहितेतून वगळली. त्याऐवजी आपल्या धर्मगुरूंनी आत्मपरीक्षण- चिंतन- ध्यान-साधना करावी, प्रवचने दयावीत, कुमसार ऐकावे, शाळा कॉलेजांतून मुलामुलींना शिक्षण दयावे, यासाठी तपसाधना आयोजित करावी ह्यावर त्यांनी भर दिला.

लवकरच ही संस्था झपाट्याने फोफावत गेली. येशूसंघीय धर्मगुरू इटालीच्या रस्त्यारस्त्यांतून साध्यासोप्या भाषेत प्रभूची सुवार्ता घोषवू लागले. आजारी व गरीब ह्यांची सेवा करू लागले. लोकांना वारंवार संस्कार स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करू लागले. युरोपातील इतर देशांतही त्यांच्या कार्याचा प्रभाव पडला. आफ्रिका, अमेरिका, भारत व जपान इत्यादी देशात येशूसंघीय धर्मगुरूंचे कार्य व संख्या भराभर वाढत गेली.१६ वर्षांनंतर ३१ जुलै १५५६ रोजी जेव्हा इग्नेशिअस लोयोलाकर मरण पावले तेव्हा येशू संघीयामध्ये १,००० धर्मगुरू आणि जगभर संस्थाच्या १०० शाखा इत्यादींचे कार्य सुरू होते. पोप ग्रेगरी पंधरावे ह्यांनी येशूसंघाचे कार्य पाहून इ. स. १६६२ साली इग्नेशियस ह्यांना संतपद बहाल केले.

चिंतन : जितकी परिस्थिती निराशाजनक भासेल तितकी अधिक आशा व भरवसा आपण परमेश्वरावर दाखवला पाहिजे. जेव्हा मानवी श्रम व सहाय्य कमी पडते तेव्हा ईश्वरी कृपा कार्यरत होते. - लोयोलाचे संत इग्नेशिअस


✝️             

पहिले वाचन : निर्गम  ३२: १५-२४, ३०-३४
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"ह्या लोकांनी पाप केले आहे; ह्यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनवले. "
मोशे मागे फिरून आपल्या हाती साक्षपटाच्या त्या पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला; ह्या पाट्यांवर पुढल्या आणि मागल्या अशा दोन्ही बाजूस लिहिले होते. ह्या पाट्या देवाने केलेल्या होत्या आणि त्यांच्यावर खोदलेला लेख देवाने लिहिलेला होता. यहोशवाने लोकांचा गलबला ऐकला तेव्हा तो मोशेला म्हणाला, “छावणीत लढाईचा आवाज ऐकू येत आहे." तो म्हणाला, "हा आवाज येत आहे तो विजयोत्सवाचा नव्हे, अथवा पराभवाचाही नव्हे, तर गाण्याचाच आवाज मला ऐकू येत आहे." मोशे छावणीजवळ येऊन पोहोचल्यावर ते वासरू आणि तो नाच-तमाशा त्याने पाहिला. तेव्हा त्याचा राग भडकला आणि त्याने आपल्या हातातल्या पाट्या पर्वताच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या. तसेच त्यांनी बनवलेले ते वासरू घेऊन त्याने अग्नीत टाकले आणि कुटून त्याचा चुरा केला; तो त्याने पाण्यावर टाकला आणि ते पाणी त्याने इस्राएल लोकांना प्यायला लावले.
तेव्हा मोशे अहरोनला म्हणाला, "तू ह्या लोकांवर एवढा पापभार लादला असे ह्यांनी तुझे काय केले होते ?” अहरोन म्हणाला, "माझ्या स्वामीचा कोप माझ्यावर न भडको; ह्या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे, हे आपणाला ठाऊकच आहे. त्यांनी मला सांगितले की, 'आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव; कारण आम्हांला इजिप्त देशातून बाहेर आणणारा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले आहे ते आम्हांला कळत नाही.' मी त्यांना सांगितले, त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याकडील सोने ..मला दिले; ते मी अग्नीत टाकले तो त्यातून हे वासरू निघाले.दुसऱ्या दिवशी मोशे लोकांना म्हणाला, “तुम्ही हे घोर पापकृत्य केले आहे, तरी मी आता परमेश्वराकडे वर चढून जातो; कदाचित तुमच्या पापाचे प्रायश्चित्त मला करता येईल.” मोशे परमेश्वराकडे जाऊन म्हणाला, "हाय ! हाय ! ह्या लोकांनी घोर पापकृत्य केले आहे; ह्यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनवले. तरी आता तू त्यांच्या पापांची क्षमा करशील तर, न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक.” परमेश्वर मोशेला म्हणाला, "ज्या कोणी माझ्याविरूद्ध पाप केले आहे त्यालाच मी आपल्या पुस्तकातून काढून टाकीन. आता तू जा, स्थळाविषयी मी तुला सांगितले आहे तिकडे त्यांना घेऊन जा. पाहा, माझा दूत तुझ्यापुढे चालेल. तरी ज्या दिवशी मी झडती घेईन त्यादिवशी त्यांच्या पापाबद्दल त्यांचा समाचार घेईन.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Exodus 32:15-24, 30-34 

In those days: Moses turned and went down from the mountain with the two tablets of the testimony in his hand, tablets that were written on both sides; on the front and on the back they were written. The tablets were the work of God, and the writing was the writing of God, engraved on the tablets. When Joshua heard the noise of the people as they shouted, he said to Moses, "There is a noise of war in the camp." But he said, "It is not the sound of shouting for victory, or the sound of the cry of defeat, but the sound of singing that I hear." And as soon as he came near the camp and saw the calf and the dancing, Moses' anger burned hot, and he threw the tablets out of his hands and broke them at the foot of the mountain. He took the calf that they had made and burned it with fire and ground it to powder and scattered it on the water and made the people of Israel drink it. And Moses said to Aaron, "What did this people do to you that you have brought such a great sin upon them?" And Aaron said, "Let not the anger of my lord burn hot. You know the people, that they are set on evil. For they said to me, 'Make us gods who shall go before us. As for this Moses, the man who brought us up out of the land of Egypt, we do not know what has become of him. So I said to them, "Let any who have gold take it off." So they gave it to me, and threw it into the fire, and out came this calf." The next day Moses said to the people, "You have sinned a great sin. And now I will go up to the Lord; perhaps I can make atonement for your sin." So Moses returned to the Lord and said, "Alas, this people has sinned a great sin. They have made for themselves gods of gold. But now, if you will forgive their sin-but if not, please blot me out of your book that you have written." But the Lord said to Moses, "Whoever has sinned against me, I will blot out of my book. But now go, lead the people to the place about which I have spoken to you; behold, my angel shall go before you. Nevertheless, in the day when I visit, I will visit their sin upon them."

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र :१०६:१९-२३

प्रतिसाद : परमेश्वराचे उपकारस्मरण करा कारण तो चांगला आहे.

१) त्यांनी होरेब येथे वासराची मूर्ती केली, 
ओतीव मूर्तीची पूजा केली; 
त्यांनी आपले ऐश्वर्य जो परमेश्वर 
त्याच्याऐवजी गवत खाणाऱ्या बैलाची प्रतिमा स्वीकारली.

२) ते आपल्या उद्धारक देवाला विसरले, 
त्याने इजिप्त देशात महत्कृत्ये, 
हामाच्या देशात अद्भुत कृत्ये,
 तांबड्या समुद्राजवळ भयानक कृत्ये, केली होती.

३) तेव्हा तो म्हणाला,
"ह्यांचा नायनाट केला पाहिजे;
पण त्याचा क्रोध शांत करावा आणि 
त्याने त्यांचा नाश करू नये,
शीतल म्हणून त्याचा निवडलेला
 मोशे त्याला आडवा आला.


 Psalm 106:19-20, 21-22, 23

R    O give thanks to the Lord for he is good. 

They fashioned a calf at Horeb, 
and worshiped an image of metal;
they exchanged their glory 
for the image of a bull that eats grass. R

They forgot the God who was their saviour, 
who had done such great things in Egypt,
such wonders in the land of Ham, 
such marvels at the Red Sea. R

For this he said he would destroy them, 
but Moses, the man he had chosen, 
stood in the breach before him,
to turn back his anger from destruction. R 

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
जे वचन ऐकून शुद्ध नि प्रामाणिक अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात, ते धन्य होत.
 आलेलुया!

Acclamation: 
Of his own will he brought us forth by the word of truth,
 that we should be a kind of first fruits of his creatures


शुभवर्तमान   मत्तय १३ : ३१-३५
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "त्या मोहरीच्या दाण्याचे असे झाड होते की, आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यांत वस्ती करतात. "

येशूने लोकसमुदायांपुढे एक दाखला मांडला तो असा की, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला; तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे तरी वाढल्यावर इतर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की, आकाशातील पांखरे येऊन त्याच्या फांद्यांत वस्ती करतात. "
त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, त्याच्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.”
ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही. ह्यासाठी की, संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असे की, "मी आपले तोंड उघडून दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading :Matthew 13:31-35

At that time: Jesus put another parable before them, saying, "The kingdom of heaven is like a grain of mustard seed that a man took and sowed in his field. It is the smallest of all seeds, but when it has grown it is larger than all the garden plants and becomes a tree, so that the birds of the air come and make nests in its branches."He told them another parable. The kingdom of heaven is like leaven that a woman took and hid in three measures of flour, till it was all leavened." All these things Jesus said to the crowds in parables; indeed, he said nothing to them without a parable. This was to fulfil what was spoken by the prophet: "I will open my mouth in parables; will utter what has been hidden since the foundation of the world.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
आजच्या शुभवर्तमानात येशू स्वर्गाच्या विस्ताराविषयी वर्णन करतो. यहज्केल संदेष्टा असे भाकीत करतो की, ज्याप्रमाणे एक मोठा देवदार वृक्ष सर्व पक्ष्यांना आश्रय देतो. त्याचप्रमाणे इस्राएल सर्व राष्ट्रांना एकत्रित करेल. आज येशू यहज्केल संदेष्ट्याच्या भविष्यवाणीला उद्धृत करतो व मोहरीच्या झाडाचा दाखला स्पष्ट करतो. स्वर्गाचे राज्याची सुरूवात लहान असूनही ते राज्य एका महान वृक्षाप्रमाणे सर्व राष्ट्रांना एकत्रित करण्याचे कार्य करतील. अशाप्रकारे संदेष्ट्यांनी भाकीत केल्याप्रमाणे इस्राएल भाषा, संस्कृती व भौगोलिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन सर्व राष्ट्रांसाठी हाती घेतलेले प्रेषित कार्य पूर्ण करेल. आपण आपल्या धर्मग्रामात व गावपरिवारात वैविध्याने नटलेल्या ख्रिस्ती समाजाला एकत्रित करण्याचे कार्य करतो की, विभाजीत करण्याचा ? ईश्वर प्रजेच्या ऐक्यात विविध लोकांचे आणि संस्कृतीचे ऐक्य निदर्शनास येते. ख्रिस्तसभेच्या सभासदांमध्ये विविध देणग्या आहेत. विविध सेवाकार्य, विविध परिस्थिती आणि जीवनमार्ग, ख्रिस्तसभेत एकोप्यात योग्य स्थान राखूनही अनेक स्थानिक ख्रिस्तसभा आपआपल्या स्थानिक परंपरा व संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करतात. ही विविधतेची अपूर्णता ख्रिस्तसभेच्या ऐक्याच्या विरोधात नाही. तरीही पाप व त्याच्या परिणामाचे ओझे ऐक्याला नेहमीच धोकादायक आहे. (CCC ८१४)

प्रार्थना :   प्रभू येशू, तुझ्या राज्याचे बीज आमच्या जीवनात अंकूरीत व्हावे  त्याला पवित्र आत्म्याची फळे यावीत म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या