सामान्यकाळातील १७वा सप्ताह
गुरुवार ३ ऑगस्ट २०२३
इस्राएल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहताना त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत; .
संत वॉल्थेऊफ
वर्तनसाक्षी ( ११६०)
एखाद्या गोष्टीचा सार्वकालिक जीवनासाठी मला काय लाभ होणार असा प्रश्न आपण सतत आपल्या मनाला विचारला पाहिजे. संत वॉल्थेऊफ
प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना देवराज्याचे वतन बहाल करण्यास बोलावित आहे. आपण त्याची वाणी ऐकू या. प्रभूला प्रतिसाद देऊन खरे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी कृपा मागू या.
✝️
पहिले वाचन : निर्गम ४०:१६-२१.३४-३८
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
"दर्शनमंडपावर मेघाने छाया केली आणि निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. "
परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने केले. दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस निवासमंडपाची उभारणी झाली. मोशेने निवासमंडप उभा केला, त्याने त्याच्या उथळ्या बसवून फळ्या लावल्या, अडसर लावले आणि त्याचे खांब उभे केले आणि त्याने निवासमंडपावरून तंबू ताणला आणि तंबूचे आच्छादन त्याच्यावर घातले; परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने केले. त्याने साक्षपट घेऊन कोशात ठेवला आणि कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले; त्याने तो कोश निवासमंडपात नेला आणि अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे झाले.
मग दर्शनमंडपावर मेघाने छाया केली आणि निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. दर्शनमंडपावर मेघ राहिला आणि परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आत प्रवेश करता येईना. इस्राएल लोकांच्या एकंदर प्रवासात निवासमंडपावरील मेघ वर जाई तेव्हा ते कूच करीत आणि तो मेघ तेथून वर गेला नाही तर ते कूच करीत नसत; तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत. परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे..
हे असे एकंदर प्रवासात सर्व इस्राएल घराण्याच्या दृष्टीस पडत असे .
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Exodus 40:16-21,34-38
In those days: Moses did according to all that the Lord commanded him, the first month in the second year, on the first day of the month, the tabernacle was erected. Moses erected the tabernacle. He laid its bases, and set up its frames, and put in its poles, and raised up its pillars. And he spread the tent over the tabernacle and put the covering of the tent over it, as the Lord had commanded Moses. He took the testimony and put it into the ark, and put the poles on the ark and set the mercy seat above on the ark. And he brought the ark into the tabernacle and set up the veil of the screen, and screened the ark of the testimony, as the Lord had commanded Moses. Then the cloud covered the tent of meeting, and the glory of the Lord filled the tabernacle. And Moses was not able to enter the tent of meeting because the cloud settled on it, and the glory of the Lord filled the tabernacle. Throughout all their journeys, whenever the cloud was taken up from over the tabernacle, the people of Israel would set out. But if the cloud was not taken up, then they did not set out till the day that it was taken up. For the cloud of the Lord was on the tabernacle by day, and fire was in it by night, in the sight of all the house of Israel throughout all their journeys.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ८४: ३, ४, ५-६ अ८अ. ११
प्रतिसाद : हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत.
१ माझ्या जिवाला परमेश्वराच्या सान्निध्याची ओढ
लागली असून तो त्यासाठी झुरत आहे.
माझे हृदय आणि आत्मा आनंदित होऊन देवाला,
जिवंत देवाला पुकारत आहेत.
२ हे सेनाधीश परमेश्वरा,
माझ्या राजा, माझ्या देवा,
तुझ्या वेदीजवळ चिमणीला घरटे करायला
आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोट
बांधायला स्थळ मिळाले आहे.
३ तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता !
ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील.
तूच ज्यांची शक्ती आहेस ते सुखी आहेत,
ते सदोदित वाढत्या शक्तीसह वाटचाल करत आहेत.
४ खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस
हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे.
दुष्टपणाच्या तंबूत राहण्यापेक्षा
माझ्या देवाच्या घराचा द्वारपाल होणे मला इष्ट वाटते.
Psalm 84:3, 4, 5-6a, and 8a, 11
How lovely is your dwelling place, O Lord of hosts.
My soul is longing and yearning
for the courts of the Lord.
My heart and my flesh cry out
to the living God. R
Even the sparrow finds a home,
and the swallow a nest for herself
in which she sets her young, at your altars,
O Lord of hosts, my king and my God. R
Blessed are they who dwell in your house,
forever singing your praise.
Blessed the people whose strength is in you,
they walk with ever-growing strength. R
One day within your courts
is better than a thousand elsewhere.
The threshold of the house of God
I prefer to the dwellings of the wicked. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो,
माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात;
मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
आलेलुया!
Acclamation:
Open our hearts, O Lord, that we may pay attention to the words of your Son.
शुभवर्तमान मत्तय१३ : ४७-५३
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
त्यांनी चांगले मासे भांड्यात जमा केले, व वाईट फेकून दिले.
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे मासे एकत्र सापडतात त्यासारखे आहे; ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्यावर ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, व वाइट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे आणि दात खाणे चालेल."
“तुम्हांला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय ?” ते त्याला म्हणाले, “होय.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे.”
नंतर हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Matthew 13:47-53
At that Jesus said to the crowds, "Again, the kingdom of heaven is like a net that was thrown into the sea and gathered fish of every kind. When it was full, men drew it ashore and sat down and sorted the good into containers but threw away the bad. So it will be at the end of the age. The angels will come out and separate the evil from the righteous and throw them into the fiery furnace. In that place there will be weeping and gnashing of teeth. "Have you understood all these things! They said to him, "Yes." And he said to them, "Therefore every scribe who has been trained for the kingdom of heaven is like a master of a house, who brings out of his treasure what is new and what is old." And when Jesus had finished these parables, he went away from there.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
मोशेने तयार केलेल्या मंडपात मेघाने छाया केली व तो मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. इस्राएलच्या एकंदर प्रवासात परमेश्वर त्यांच्याबरोबर होता. आज देखिल पवित्र मिस्सामध्ये ख्रिस्तशरीराच्या रूपाने व बायबल शब्दाद्वारे तो आपल्याबरोबर चालत आहे. आपल्या ह्या धाकधुकीच्या जीवनात व धावपळीच्या जगात येशूख्रिस्त सतत आपल्याबरोबर आहे. मात्र ते अनुभवण्यासाठी आपण वेळ काढायला पाहिजे. आपल्याला अनेक काळजीने ग्रासलेले आहे त्यातून वेळ काढून पवित्र मिस्सामध्ये सहभागी झाल्यास बायबल वाचनाद्वारे देवाचा शब्द ऐकल्यास येशू ख्रिस्ताच्या अस्तित्वाचा आपणांस अनुभव नक्की येईल. मात्र त्यासाठी खऱ्या श्रद्धेने व तन्मयतेने पवित्र मिस्साबलिदानात सहभागी झाले पाहिजे. कारण धर्मगुरूंच्या उच्चाराने प्रत्यक्ष प्रभू येशूखिस्त स्वतः वेदीवर उपस्थित असतो. त्यामुळे जसे आपण एवाद्या नेत्याला, हिरोला किंवा क्रिकेटपट्टूला प्रत्यक्ष पहाण्यासाठी आसुसलेलो असतो तिच उत्कंठा किंबहुना त्याहून अधिक आपल्यामध्ये मिस्सामध्ये सहभागी झाल्यावर यावयास पाहिजे. मग ख्रिस्तशरीराचा स्वीकार करून त्याला आपल्या हृदयात घेऊन ख्रिस्तासारखे व्हावयास पाहिजे. कारण जे अन्न आपण खातो त्याप्रमाणे आपण बनत असतो. तेव्हा मिस्सानंतर जेव्हा आपण आपल्या घरी, शेजारी, कार्यालयात, व्यवसायाच्या जागी जातो तेव्हा आपल्यामध्ये ख्रिस्त दिसला पाहिजे तरच आपण अभिमानाने स्वतःला ख्रिस्ती बोलू शकू. तेव्हा आज आपण स्वतःला प्रश्न विचारू या की मी ख्रिस्तशरीराचा स्वीकार केल्यावर बायबल ऐकल्यावर किंवा वाचल्यावर देवाच्या वचनाप्रमाणे चालतो का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, आम्हाला तुझ्या राज्यात प्रवेश मिळविण्यास पात्र बनव,आमेन.
.सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या