सामान्यकाळातील १७वा सप्ताह
बुधवार २ ऑगस्ट २०२३
इस्राएल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहताना त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत; .
St. Eusebius of Vercelli / St. Peter Julian Eymard
Born in La Mure d'Isere in southeastern France, Peter Julian's faith journey drew him from being a priest in the Diocese of Grenoble (1834) to joining the Marists (1839) to founding the Congregation of the Blessed Sacrament (1856). In addition to those changes, Peter Julian coped with poverty, his father's initial opposition to Peter's vocation, serious illness, a Jansenistic striving for inner perfection and the difficulties of getting diocesan and later papal approval for his new religious community.
प्रभू येशूने आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक आणि संरक्षक असा पवित्र आत्मा दिलेला आहे. पवित्र आत्माच्या सामर्थ्याने आपण प्रभू येशू बरोबर सहभागित अनुभवू शकतो. जीवनातील प्रत्येक दिवस हा प्रभू परमेश्वराने आपल्याला दिलेली एक मौल्यवान ठेव आहे. आपण प्रभू येशू आपला तारणारा ह्याचा अगदी अंत:करणापासून शोध घेऊ या.
✝️
पहिले वाचन : निर्गम ३४:२९-३५
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
"जेव्हा लोकांनी मोशेला पाहिले तेव्हा ते त्याच्याजवळ जाण्यास भ्याले."
मोशे सिनाय पर्वतावरून उतरला आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या घेऊन पर्वतावरून उतरून येत असता, परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत त्याचे त्याला भान नव्हते, मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनने आणि सर्व इस्राएल लोकांनी पाहिले, तेव्हा ते त्याच्याजवळ जाण्यास भ्याले. मग मोशेने अहरोन आणि मंडळीचे प्रमुख ह्यांना बोलावले; तेव्हा अहरोन आणि मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले आणि तो त्यांच्याशी संभाषण करू लागला. नंतर सर्व इस्राएल लोक जवळ आले आणि जे काही सिनाय पर्वतावर परमेश्वराने त्याला सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले. मोशेने त्यांच्याशी बोलणे संपल्यावर आपल्या तोंडावर आच्छादन घातले; पण मोशे परमेश्वराशी संभाषण करावयाला त्याच्यासमोर आत जाई तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या तोंडावरचे आच्छादन काढत असे आणि बाहेर येऊन जी काही आज्ञा त्याला होई, ती तो इस्राएल लोकांना सांगत असे. इस्राएल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहताना त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत; परमेश्वराशी संभाषण करावयास मोशे आत जाईपर्यंत तो आपल्या तोंडावर आच्छादन घालीत असे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Exodus 34:29-35
When Moses came down from Mount Sinai, with the two tablets of the testimony in his hand as he came down from the mountain, Moses did not know that the skin of his face shone because he had been talking with God. Aaron and all the people of Israel saw Moses, and behold, the skin of his face shone, and they were afraid to come near him. But Moses called to them, and Aaron and all the leaders of the congregation returned to him, and Moses talked with them. Afterwards all the people of Israel came near, and he commanded them all that the Lord had spoken with him in Mount Sinai. And when Moses had finished speaking with them, he put a veil over his face. Whenever Moses went in before the Lord to speak with him, he would remove the veil, until he came out. And when he came out and told the people of Israel what he was commanded, the people of Israel would see the face of Moses, that the skin of Moses face was shining. And Moses would put the veil over his face again, until he went in to speak with him.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ९९:५-७,९
प्रतिसाद : हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू पवित्र आहेस.
१) परमेश्वराची, आमच्या देवाची, थोरवी गा
आणि त्याच्या पदासनापुढे नमन करा.पवित्र तोच आहे.
२) त्याच्या याजकांपैकी मोशे आणि अहरोन
आणि त्याच्या नामाचा धावा करणाऱ्यांपैकी शमुवेल,
ह्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
३) मेघस्तंभातून तो त्यांच्याशी बोलला;
त्याचे निर्बंध आणि त्याने लावून दिलेले नियम त्यांनी पाळले.
४) परमेश्वर, आपला देव ह्याची थोरवी गा
आणि त्याच्या पवित्र डोंगरापाशी नमन करा;
कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.
Psalm 99:5, 6, 7,9
R You are holy, O Lord our God.
Exalt the Lord our God;
bow down before his footstool.
Holy is he! R
Among his priests were Aaron and Moses;
among those who invoked his name was Samuel,
They cried out to the Lord and he answered. R
To them he spoke in the pillar of cloud.
They obeyed his decrees and the statutes
which he had given them. R
Exalt the Lord our God;
bow down before his holy mountain,
for the Lord our God is holy. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, तुझी वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत. सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.
आलेलुया!
Acclamation:
I have called you friends, says the Lord;
for all that I have heard from my Father
I have made known to you.
शुभवर्तमान मत्तय१३ : ४४-४६
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तो आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे, ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो.
"आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोण्या व्यापाऱ्यासारखे आहे; त्याला एक अति मौल्यवान मोती आढळले; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Matthew 13:44-46
At that time: Jesus said to the crowds, "The kingdom of heaven is like treasure hidden in a field, which a man found and covered up. Then in his joy he goes and sells all that he has and buys that field. Again, the kingdom of heaven is like a merchant in search of fine pearls, who, on finding one pearl of great value, went and sold all that he had and bought it."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
येशूख्रिस्त स्वर्गराज्याचा दाखला देताना निसर्गातील दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. एक म्हणजे शेतात लपविलेले धन व दुसरी गोष्ट म्हणजे मौल्यवान मोती. दोन्ही गोष्टींवरून कळते कीस्वर्गाचे राज्य अगदी सहजासहजी मिळेल असे कुणीही समजू नये. ज्याप्रमाणे शेतात लपविलेले धन मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात | त्याचप्रमाणे स्वर्गाचे राज्य मिळविण्यासाठी खूप कठीण जीवन जगावे लागते. ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा अनेक कठीण प्रसंगाना तोंड द्यावे लागते. ज्यांना स्वर्गाच्या राज्याची किंमत कळलेली आहे ते लोक आपल्या जीवनातील अनेक सुखाचा किंवा डामडौलाचा धिक्कार करतात. ह्या जगात अशा अनेक नश्वर पण चैन विलासाच्या गोष्टी आहेत त्या सर्वांचा त्याग करण्यास ते लोक तयार होतात कारण त्यांना सार्वकालिक जीवनाची किंमत कळलेली आहे. ह्या जगातील चैन विलासाच्या गोष्टींचा त्याग करून ते स्वर्गीय जीवन मिळविण्यासाठी ख्रिस्ताच्या वचनानुसार आपले जीवन जगतात. तेव्हा आता आपले आत्मपरीक्षण करूया की मी सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी धडपडतो का ? स्वर्गराज्याचा खजिना मिळविण्यासाठी मी ह्या जगातील भौतिक व ह्या क्षणभंगूर गोष्टीचा त्याग करायला तयार आहे का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, माझ्या जीवनातील अति मौल्यवान ठेवा म्हणजे तू स्वतःच आहेस. मी माझे सर्वस्व तुला समर्पित करतो. मला तुझी कृपा दे,
आमेन.
.सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या