Marathi Bible Reading | 19th week in ordinary Time | Friday 18th August 2023

 सामान्यकाळातील १९वा सप्ताह 

शुक्रवार १८ ऑगस्ट २०२३

ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले ते माणसाने तोडू नये.


संत हेलेना

सम्राज्ञी (--- २५०-३३०)

कॉन्स्टॅन्टाईन द ग्रेट ह्या सम्राटची माता हेलेना ही पूर्वी बिथानिया येथल्या उतारशाळेची प्रमुख होती. अत्यंत नम्र वृत्तीची असलेल्या या स्त्रीच्या जीवनात आर्मी ऑफिसर असलेला कॉन्स्टॅन्शिअस हा अधिकारी आला आणि तिचे जीवन पूर्णपणे बदलून गेले.

मात्र वीस वर्षानंतर कॉन्स्टॅन्शिअस ह्याने राज्यपदावर असताना तिला घटस्फोट दिला आणि केवळ राजकीय कारणास्तव तिला टाकून दिले. परंतु पुढे कॉन्स्टॅन्टाईन द ग्रेट हा तिचा मुलगा जेव्हा वडिलांच्या जागेवर आला तेव्हा तो आपल्या आईशी एकनिष्ठ राहिला आणि त्याने तिला मोठ्या सन्मानाची वागणूक दिली.

इ. स. ३१३ साली कॉन्स्टॅन्टाईन राजाने मॅक्सेन्शिअसवर विजय मिळविला आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्याच्याबरोबर राजमाता हेलेना हिने देखील ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. तिची नम्र आणि सौजन्यशील आणि तितकीच अधिकारवाणीने युक्त असलेली प्रतिमा ख्रिस्ती श्रद्धा पसरविण्यास सहाय्यभूत ठरली.

आपल्या ऐश्वर्याचा व दानशूरवृत्तीचा वापर करून राणी हेलेना हिने युरोपभर अनेक ख्रिस्तमंदिरांची उभारणी केली, शेवटी वयाच्या ७५ व्या वर्षी तिने पवित्र नगरी जेरूसलेमची यात्रा सुरू केली. तिथे गेल्यावर येरूशलेमनजीक 'स्वर्गारोहणाचा पर्वत म्हटलेल्या ठिकाणी आणि बेथलेहेम गोठ्याच्या गुहेजवळ अशी दोन चर्चेस बांधली. '

रोममध्ये तिने आपल्या राजमहालाचे रूपांतर एका भव्य ख्रिस्तमंदिरात केले. आजही त्या मंदिरात ख्रिस्ताला ज्या क्रुसावर ठार मारण्यात आले तो क्रूस व पिलाताचा लेख ठेवण्यात आलेला आहे. संत हेलेना ही सुई व खिळे तयार करणाऱ्यांची आश्रयदाती संत मानली गेलेली आहे.

पुरुष आणि स्त्री विवाह संस्काराने एकमेकांशी व देवाशी करार करतात व देवाचा आशीर्वाद त्यांना मिळतो. म्हणूनच प्रभू आठवण करुन देत आहे की, 'देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.' ऐक्य, अखंडत्व आणि मुलांना जन्म देणे व त्या मुलांचे श्रद्धासंवर्धन करणे हे विवाहाचे प्रमुख घटक आहेत. सहभागिता व परस्पर प्रेमावर कौटुंबिक जीवन उभारलेले आहे. म्हणूनच ख्रिस्तसभा सुद्धा वैवाहिक जीवनाचे ऐक्य अबाधित राहण्यासाठी घटस्फोट निषिद्ध ठरवते.

देवनिर्मितीचा वारसा चालू ठेवून पती-पत्नी दोघांनी देवमीतीच्या धाग्यातून परस्पर प्रीतीचे जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील असावे. सध्याच्या परिस्थितीत अनेक विवाहित दांपत्ये शांतीने, प्रेमाने व समेटाने जीवन न जगता वेगळे होऊ इच्छित आहेत. चला सर्वांसाठी आज आपण विशेष प्रार्थना करुया..
✝️             

पहिले वाचन :यहोशवा २४ :१-१३

वाचक :यहोशवा या पुस्तकातून घेतलेले वाचन

"तुमचा पिता आब्राहाम ह्याला नदीच्या पलीकडून मी आणले. मी तुम्हांला इजिप्त देशातून काढून आणले. मी तुम्हांला देशात आणले."

यहोशवाने इस्राएलच्या सर्व वंशांना शखेम येथे जमवले आणि इस्त्रायलचे वडीलजन, प्रमुख, न्यायाधीश आणि अमंलदार ह्यांना बोलावणे पाठवले आणि ते देवासमोर हजर झाले. तेव्हा यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, प्राचीन काळी तुमचे पूर्वज आब्राहाम आणि नाहोर ह्यांचा बाप तेरह फरात महानदीपलीकडे राहात आणि अन्य देवांची सेवा करीत. तुमचा पिता आब्राहाम ह्याला नदीच्या पलीकडून मी आणले, कनान देशभर फिरवले, त्याचा वंश बहुगुणित केला आणि त्याला इसहाक दिला. मग मी इसहाकला याकोब आणि एसाव दिले आणि एसावला सेईर डोंगर वतन करून दिला, याकोब आपल्या मुलाबाळांसह इजिप्त देशात गेला. नंतर मी मोशे आणि अहरोन ह्यांना पाठवून इजिप्त देशात जी कृत्ये केली त्या कृत्यांनी त्या देशाला पीडले. नंतर मी तुम्हाला बाहेर आणले. मी तुमच्या पूर्वजांना इजिप्त देशातून काढून आणले, मग तुम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहोचला आणि इजिप्तच्या लोकांनी रथ आणि स्वार ह्यासह तांबड्या समुद्रापर्यंत तुमच्या पूर्वजांचा पाठलाग केला. त्यांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने तुमच्या आणि इजिप्त वासियांच्या मध्ये अंधार पाडला आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना गडप केले; इजिप्त देशात मी जे काही केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले. नंतर तुम्ही पुष्कळ दिवस रानात राहिला. मग मी तुम्हाला यार्देनच्या पूर्वेस राहणाऱ्या अमोरी लोकांच्या देशात आणले; ते तुमच्याशी लढले. मी त्यांना तुमच्या हाती दिले आणि तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला, तुमच्याकरिता मी त्यांचा संहार केला. नंतर मवाबचा राजा बालाक बिन सिप्पोर ह्याने इस्राएलशी युद्ध केले; तुम्हांला शाप देण्यासाठी त्याने बौरचा मुलगा बलाम ह्याला बोलावून घेतले; पण मी बलामचे ऐकायला तयार नव्हतो, म्हणून त्याने तुम्हांला उलट आशीर्वाद दिला; अशाप्रकारे मी तुम्हांला त्याच्या हातातून सोडवले. तुम्ही यार्देन नदी उतरून यरिहोत आला तेव्हा यरिहोच्या नागरिकांनी आणि अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, निर्गाशी, हिव्वी आणि यबूसी ह्यांनी तुमच्याशी लढाई केली आणि मी त्यांना तुमच्या हाती दिले. मी तुमच्या आघाडीला गांधीलमाशा पाठविल्या आणि त्यांनी अमोऱ्यांचे दोन राजे तुमच्यापुढून हाकून दिले. मग जी जमीन तुम्ही कसली नाही, ती मी तुम्हांला दिली, जी नगरे तुम्ही बांधली नाहीत त्यात तुम्ही राहात आहा आणि जे द्राक्षांचे मळे आणि जैतुनांचे बाग तुम्ही लावले नाहीत त्यांचे उत्पन्न तुम्ही खात आहा."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Joshua 3:7-10a, 11, 13-17
Joshua 24:1-13

18 FRI

In those days: Joshua gathered all the tribes of Israel to Shechem and summoned the elders, the heads, the judges, and the officers of Israel. And they presented themselves before God. And Joshua said to all the people, "Thus the Lord, the God of Israel, 'Long ago, your fathers lived beyond the Euphrates, Terah, the father of Abraham and of Nahor; and they served other gods. Then I took says your father Abraham from beyond the River and led him through all the land of Canaan, and made his offspring many. I gave him Isaac. And to Isaac I gave Jacob and Esau. And I gave Esau the hill country of Seir to possess, but Jacob and his children went down to Egypt. And sent Moses and Aaron, and plagued Egypt with what did in the midst of it, and afterwards brought you out. "Then brought your fathers out of Egypt, and you came to the sea. And the Egyptians pursued your fathers with chariots and horsemen to the Red Sea. And when they cried to the Lord, he put darkness between you and the Egyptians and made the sea come upon them and cover them; and your eyes saw what did in Egypt. And you lived in the wilderness a long time. Then brought you to the land of the Amorites, who lived on the other side of the Jordan. They fought with you, and I gave them into your hand, and you took possession of their land, and I destroyed them before you. Then Balak the son of Zippor, king of Moab, arose and fought against Israel. And he sent and invited Balaam the son of Beor to curse you, but I would not listen to Balaam. Indeed, he blessed you. So I delivered you out of his hand. And you went over the Jordan and came to Jericho, and the leaders of Jericho fought against you, and also the Amorites, the Perizzites, the Canaanites, the Hittites, the Girgashites, the Hivites, and the Jebusites. And I gave them into your hand. And I sent the hornet before you, which drove them out before you, the two kings of the Amorites; it was not by your sword or by your bow. I gave you a land on which you had not laboured and cities that you had not built, and you dwell in them. You eat the fruit of vineyards and olive orchards that you did not plant."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र   १३६:१-३,१६-१८,२१,२२,२४

प्रतिसाद :  परमेश्वराची दया सनातन आहे.

१) परमेश्वराचे स्तवन करा, 
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, 
कारण तो चांगला आहे, 
कारण त्याची दया सनातन आहे.

२) देवाधिदेवाचे उपकारस्मरण करा, 
कारण त्याची दया सनातन आहे 
प्रभूचे उपकारस्मरण करा. 
कारण त्याची दया सनातन आहे.

३ )ज्याने आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे, 
कारण त्याची दया सनातन आहे. 
ज्याने मोठमोठे राजे मारून टाकले त्याने, 
कारण त्याची दया सनातन आहे.

४) ज्याने प्रतापी राजे ठार केले त्याचे, 
कारण त्याची दया सनातन आहे. 
ज्याने त्यांचा देश वतन करून दिला त्याचे, 
कारण त्याची दया सनातन आहे.

५) ज्याने आपला सेवक इस्राएल ह्याला 
तो वतन करून दिला त्याचे, 
कारण त्याची दया सनातन आहे.
 ज्याने आम्हांला आमच्या शत्रूपासून सोडवले त्याचे, 
कारण त्याची दया सनातन आहे.

Psalm 136:1-3, 16-18, 21-22 and 24 

For his mercy endures forever.

O give thanks to the Lord, for he is good, 
for his mercy endures forever. 
Give thanks to the God of gods, 
for his mercy endures forever.

Give thanks to the Lord of lords, 
for his mercy endures forever. R

Through the desert his people he led, 
for his mercy endures forever. 
Nations in their greatness he struck,

for his mercy endures forever. 
Kings in their splendour he slew, 
for his mercy endures forever. R

He gave their land as a heritage, 
for his mercy endures forever;
a heritage for Israel, his servant, 
for his mercy endures forever. R


जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आहे.
मनातील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक आहे
 आलेलुया!

Acclamation: 
Accept the word of God, not as the word of men, but as what it really is, the word of God.

शुभवर्तमान   मत्तय १९:३-१२
वाचक :मतयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुमच्या अंत:करणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला आपल्या बायका टाकू दिल्या, तरी सुरुवातीपासून असे नव्हते. "

परुशी येशूकडे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले, “कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय ?" त्याने उत्तर दिले, “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी निर्माण केली आणि म्हटले, ह्याकरिता पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. ह्यामुळे ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले ते माणसाने तोडू नये. ते त्याला म्हणाले, मग सूटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेने का दिली ?" तो त्यांना म्हणाला, "तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला आपल्या बायका टाकू दिल्या, तरी सुरुवातीपासून असे नव्हते. मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या • कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो."

शिष्य त्याला म्हणाले, "बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे." तो त्यांना म्हणाला, “सर्वजण हे वचन स्वीकारू शकत नाहीत. पण ज्यांना हे दान दिले आहे, तेच स्वीकारू शकतात. कारण आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहेत, माणसांनी केलेले असेही नपुंसक आहेत आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणाला नपुंसक करून घेतले असेही नपुंसक आहेत. ज्याला हे स्वीकारता येते त्याने स्वीकारावे."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading :Matthew 19:3-12

At that time: Pharisees came up to Jesus and tested him by asking, "Is it lawful to divorce one's wife for any cause?" He answered, "Have you not read that he who created them from the beginning made them male and female, and said, Therefore a man shall leave his father and his mother and hold fast to his wife, and the two shall become one flesh? So they are no longer two but one flesh. What therefore God has joined together, let not man separate." They said to him, "Why then did Moses command one to give a certificate of divorce and to send her away?" He said to them, "Because of your hardness of heart Moses allowed you to divorce your wives, but from the beginning it was not so. And I say to you: whoever divorces his wife, except for sexual immorality, and marries another, commits adultery." The disciples said to him, "If such is the case of a man with his wife, it is better not to marry? But he said to them, "Not everyone can receive this saying, but only those to whom it is given. For there are eunuchs who have been so from birth, and there are eunuchs who have been made eunuchs by men, and there are eunuchs who have made themselves eunuchs for the sake of the kingdom of heaven. Let the one who is able to receive this receive it."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
आजच्या शुभवर्तमानात येशूख्रिस्त विवाहाच्या पावित्र्याविषयी सांगत आहे व जे देवाने जोडलेले आहे ते माणसाने तोडू नये हे ठासून सांगितलेले आहे. त्याचे कारण पती-पत्नीला एकत्र जोडणारा परमेश्वरच आहे. त्यामुळे ख्रिस्ती धर्म घटस्फोटाला मान्यता देत नाही. मात्र काही विवाहामध्ये त्रुटी असल्यामुळे ख्रिस्तसभा विवाह रद्द करते कारण मुळातच तो विवाह झालेला नसतो. मात्र जिथे विवाह योग्यप्रकारे झालेला असेल व त्याच्यात काही त्रुटी नसेल तर तो विवाह रद्द केला जात नाही. जी पती-पत्नी वैवाहिक जीवनात ख्रिस्तावर पूर्णपणे श्रद्धा ठेवतात व देवाच्या आज्ञा पाळतात त्यांच्या मनात विभक्त होण्याचा विचारयेणारच नाही. ह्या जगात परिपूर्ण असा / अशी कुणी नाही. त्यामुळे काही कमतरतेमुळे पती-पत्नींनी एकमेकांपासून वेगळे होणे चुकीचे आहे कारण ती देवाच्या योजनेनुसार एकत्र आलेली असतात. तसेच आणखी एक विवाहाविषयी शब्द वापरलेला आहे तो म्हणजे विवाहानंतर ती दोघे वेगळी नसून एकदेह आहेत. एकदेह याचा अर्थ असा की पत्नीला काही त्रास असेल तर त्याचे दुखणे पतीला लागायला पाहिजे. जर त्या दोघांचे एकमेकांवर खरोखर प्रेम असेल तर ते अगदी शक्य आहे. शेवटी लग्नाच्या दिवशी चर्चमध्ये पती-पत्नी हे कुठल्याही प्रसंगात मरेपर्यंत एकनिष्ठ राहाण्याचे एकमेकांना वचन देत असतात, ह्याची जाणिव देखील प्रत्येक पती-पत्नीने ठेवायला पाहिजे. कारण ते वचन आपण प्रत्यक्ष परमेश्वरासमोर देत असतो त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ते पाळायलाच पाहिजे.

प्रार्थना :  हे प्रभू परमेश्वरा, पती-पत्नी मधील प्रेम, विश्वास, निष्ठा व ऐक्य अबाधित राहावे म्हणून त्यांना आशीर्वादित कर, आमेन


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या