सामान्यकाळातील २७ वा रविवार
८ ऑक्टोबर २०२३
शेवटी माझ्या मुलाचा तरी ते मान राखतील
मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील ?
✝️
पहिले वाचन : यशया ५:१-७
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन ५:१-७
"सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्त्राएलचे घराणे होय."
मी आपल्या वल्लभाप्रीत्यर्थ गाणे गाईन, आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षमळ्याचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक माथ्यावर होता. तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले आणि तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षवेलीची लागवड केली, त्यात एक बुरुज बांधला आणि द्राक्षकुंड खोदले, मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली, पण त्याने रानद्राक्षे दिली. तर आता येरुशलेमकरांनो, आणि यहुदातील लोकांनो, माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा न्याय करा बरे! माझ्या द्राक्षमळ्यात मी केले नाही असे अधिक काय करावयाचे राहिले ? तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रानद्राक्षे का दिली? आता मी आपल्या द्राक्षमळ्याचे काय करणार ते तुम्हांला सांगतो: मी त्याचे कुंपण काढून टाकीन म्हणजे तो मळा जनावरे खाऊन टाकतील, मी त्याचे आवार मोडीन म्हणजे तो तुडवला जाईल. मी तो उद्ध्वस्त करीन, त्याची कोणी छाटणी करणार नाही आणि कुदळणार नाही, त्यात काटेसराटे उगवतील, त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघांना करीन. कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएलचे घराणे, त्यातील त्याची आवडती लागवड म्हणजे यहुदाचे लोक, त्याने न्याय्यत्वाची अपेक्षा केली तर त्याला रक्तपात आढळला, त्याने धार्मिकतेची अपेक्षा केली तो त्याला आक्रोश आढळून आला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Isaiah 5:1-7
T Let me sing for my beloved my love song concerning his vineyard My beloved had a vineyard on a very fertile hill. He dug it and cleared it of stones, and planted it with choice vines; he built a watchtower in the midst of it, and hewed out a wine vat in it; and he looked for it to yield grapes, but it yielded wild grapes. And now, O inhabitants of Jerusalem and men of Judah, judge between me and my vineyard. What more was there to do for my vineyard, that I have not done in it? When I looked for it to yield grapes, why did it yield wild grapes? And now I will tell you what I will do to my vineyard. I will remove its hedge, and it shall be devoured; I will break down its wall, and it shall be trampled down. I will make it a waste; it shall not be pruned or hoed, and briers and thorns shall grow up; I will also command the clouds that they rain no rain upon it For the vineyard of the Lord of hosts is the house of Israel, and the men of Judah are his pleasant planting; and he looked for justice, but behold, bloodshed, for righteousness, but behold, an outcry.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ७९: ९, १२-१६,१९-२०
प्रतिसाद : परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएलचे घराणे होय.
१ इजिप्त देशातून तू द्राक्षवेल काढून आणला
आणि राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लावला.
त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि
आपले फाटे त्या नदीपर्यंत लांबवले.
२ त्याची कुंपणे तू का मोडलीस ?
त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याची द्राक्षे तोडतात.
रानडुकरे त्याची नासधूस करतात,
जीवजंतू त्यावर आपला निर्वाह करतात.
३ हे सेनाधीश देवा, तू मागे फिर असे आम्ही तुला विनवितो,
जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले,
जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली तिचे संगोपन कर.
स्वर्गातून दृष्टी लावून पाहा आणि ह्या द्राक्षवेलाचे संगोपन कर.
४ म्हणजे आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही,
आमच्या जिवात जीव आण म्हणजे आम्ही
तुझ्या नावाचा धावा करू.
हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हांला परत आण,
तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे
आम्हांला मुक्ती लाभेल.
Psalm 80:9 and 12-16 and 19-20
The vineyard of the Lord of hosts is the house of Israel.
You brought a vine out of Egypt:
you drove out the nations and planted it.
It stretched out its branches to the sea;
to the River it stretched out its shoots. R
Then why have you broken down its walls?
It is plucked by all who pass by the way.
It is ravaged by the boar of the forest,
devoured by the beasts of the field.R
God of hosts, turn again, we implore:
look down from heaven and see.
Visit this vine and protect it,
the vine your right hand has planted,
the son of man you have claimed for yourself. R
And we shall never forsake you again;
give us life that we may call upon your name.
O Lord God of hosts, bring us back;
let your face shine forth, and we shall be saved. R
दुसरे वाचन फिलिप्पीकरांस पत्र ४:६-६
वाचक : पौलचे फिलिप्पैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील."
कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्यांच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंत:करणे आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.
बंधूनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले आणि माझे जे ऐकले, पाहिले ते आचरित राहा, म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद
Second Reading :Philippians 4:6-9
Brethren: Do not be anxious about anything, but in everything by prayer and supplication with thanksgiving let your requests be made known to God. And the peace of God. which surpasses all understanding, will guard your hearts and your minds in Christ Jesus. Finally, brothers, whatever is true, whatever is honourable, whatever is just, whatever is pure, whatever is lovely, whatever is commendable, if there is any excellence, if there is anything worthy of praise, think about these things. What you have learned and received and heard and seen in me-practise these things, and the God of peace will be with you.
This is the word of God
Thanks be to God
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!
Acclamation:
I chose you and appointed you that you should go and bear fruit and that your fruit should abide, says the Lord.
शुभवर्तमान मत्तय २१:३३-४३
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"द्राक्षमळ्याचा धनी दुसऱ्या माळ्याकडे आपला द्राक्षमळा खंडाने देईल."
येशू प्रमुख याजक आणि लोकांतील श्रेष्ठ ह्यांना म्हणाला, “आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणीएक गृहस्थ होता, त्याने द्राक्षमळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्षरसासाठी कुंड खणले आणि मळा बांधला आणि तो मळा माळ्यांना खंडाने देऊन आपण परदेशी गेला. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना माळ्याकडे पाठवले. तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला मार दिला, कोणाला जिवे मारले आणि कोणाला धोंडमार केला. त्याने पुन्हा पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले, त्यांच्याशीही ते तसेच वागले. शेवटी माझ्या मुलाचा तरी ते मान राखतील असे म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले. परंतु माळी मुलाला पाहून आपसांत म्हणाले, हा वारस आहे, चला, आपण ह्याला जिवे मारू आणि ह्याचे वतन घेऊ. तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून जिवे मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील ? ते त्याला म्हणाले, तो त्या दुष्टांचे हाल हाल करून त्यांचा नाश करील आणि जे माळी त्याला हंगामी फळ देतील अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा खंडाने देईल.
येशू त्यांना म्हणाला, जो दगड, बांधणाऱ्यांनी नापंसत केला तोच कोनशिला झाला.
हे परमेश्वराकडून झाले आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य तुम्हांपासून काढून घेतले जाईल आणि जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Matthew 21:33-43
At that time: Jesus said to the chief priest and elders of the people, "Hear another parable. There was a master of a house who planted a vineyard and put a fence round it and dug a wine press in it and built a tower and leased it to tenants, and went into another country. When the season for fruit drew near, he sent his servants to the tenants to get his fruit. And the tenants took his servants and beat one, killed another, and stoned another. Again he sent other servants, more than at first. And they did the same to them. Finally he sent his son to them, saying, 'They will respect my son. But when the tenants saw the son, they said to themselves, 'This is the heir, Come, let us kill him and have his inheritance. And they took him and threw him out of the vineyard and killed him. When therefore the owner of the vineyard comes, what will he do to those tenants?" They said to him, "He will put those wretches to a miserable death and let out the vineyard to other tenants who will give him the fruits in their seasons." Jesus said to them, "Have you never read in the Scriptures: The stone that the builders rejected has become the cornerstone; this was the Lord's doing, and it is marvellous in our eyes?? Therefore tell you, the kingdom of God will be taken away from you and given to a people producing its fruits.""
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: बायबल अभ्यासाच्या ज्या विविध पद्धती आहेत त्यांच्यामध्ये पात्र अभ्यास पद्धत आहे. या पद्धतीनुसार एखाद्या उताऱ्यात किती पात्रे आहेत, ती एकमेकांशी कशी वागतात, त्यात मी कुठे आहे, माझ्यासाठी व माझ्या लोकांसाठी त्यात कोणता संदेश दडलेला आहे. अशा प्रश्नांची उत्तरे शोधली जातात. ही पद्धत वापरून आता आपण आजच्या वाचनांवर मनन- चिंतन करूया.
आजच्या शुभवर्तमानातील पात्रे : आजच्या शुभवर्तमानात येशू, श्रोते, द्राक्षमळ्याचा धनी, दुष्ट माळी, धन्याने पाठविलेले दास, धन्याचा पुत्र, चांगले माळी अशी एकूण सात पात्रे आहेत. द्राक्षमळा ही जुन्या करारातील इस्राएली जनता व नव्या करारातील ख्रिस्तसभा होय. परमेश्वर धनी, दुष्ट माळी हे स्वार्थी धार्मिक सेवकनेते, धन्याने पाठविलेले दास हे संदेष्टे व प्रेषित, येशू हा धन्याचा पुत्र आणि चांगले माळी हे लोकांचे निष्ठवंत धार्मिक नेते होत.
२. मुख्य पात्र - परमेश्वर : आजच्या पहिल्या वाचनात सांगितल्याप्रमाणे परमेश्वराने इस्राएली प्रजारूपी द्राक्षमळा लावला. त्याला चांगल्या गोड द्राक्षांची अपेक्षा होती. मात्र तिथे रानद्राक्षे आली. त्यामुळे त्याने तो द्राक्षमळा उध्वस्त करण्याचा निर्णय घेतला. शुभवर्तमानात मात्र ह्याच परमेश्वराचे दोन स्वभावविशेष दिसून येतात. हा परमेश्वर प्रेमाने आपल्या दासांना (संदेष्ट्यांना) लोकांकडे पाठवित राहतो. आपला पुत्र पाठविण्यापर्यंत त्याच्या प्रेमाची मजल जाते. मात्र दुष्टांच्या दुष्टाईने कळस गाठला तेव्हा परमेश्वर कठोर न्यायाधिशाचे रूप धारण करतो आणि त्यांचा नाश करतो.
३. चांगले माळी - ख्रिस्ती श्रद्धावंत : आजही ख्रिस्तसभेच्या रूपाने परमेश्वराचा द्राक्षणळा कार्यरत आहे. आपण प्रत्येकजण चांगल्या माळ्याप्रमाणे हंगामी देवाला फळ द्यावे अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. त्या फळांमध्ये प्रार्थना, विनंती, आभारप्रदर्शन, शांती, सद्विचार, सद्गुण, सत्य, आदर, स्तुती, चांगुलपणा आणि चांगल्या धार्मिक व्यक्तींचे मार्गदर्शन व त्यांचे अनुकरण ह्या गोष्टींचा समावेश होतो असे आजचे दुसरे वाचन आपल्याला शिकविते.
आत्मपरीक्षण : येशूच्या दाखल्यामधील कोणत्या पात्रात माझ्या जीवनाचे प्रतिबिंब पडल्याचे मला दिसून येते ? परमेश्वराची कोणती स्वभाववैशिष्ट्ये मला अनुभवायला मिळालेली आहेत ? माझ्या जीवनाला कोणती चांगली फळे व कोणती वाईट फळे लागलेली आहेत
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या शांतीचा दूत बनवू तुझी साक्ष जगाला देण्यास आम्हाला | प्रेरणा व धैर्य दे, आमेन..
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या