Marathi Bible Reading | 28th Sunday in ordinary Time| 15 October 2023

 सामान्यकाळातील २८ वा रविवार 

१५ ऑक्टोबर   २०२३

लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते,



 The wedding feast is ready, but those invited were not worthy.
 
 प्रभू येशू लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत सांगून परमेश्वराची महान उदारता स्पष्ट करीत आहे. ह्या मेजवानीसाठी सर्वांना आमंत्रण देण्यात आले होते, मात्र थोडकेच तयारीनीशी मेजवानीच्या मंडपात पोहोचले. बऱ्याच जणांनी आमंत्रणाकडे दुर्लक्ष केले तर काहीजणांनी योग्यप्रकारे तयारी केली नाही. म्हणूनच प्रभू येशू म्हणत आहे, 'बोलविलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडकेच आहेत.' परमेश्वर सर्वांना त्याच्या स्वर्गीय भोजनात सहभागी होण्यासाठी बोलवित असतो. स्वर्गीय भोजनात व देवाच्या राज्यात प्रवेश| सर्वांसाठी आहे मात्र आपण प्रभूच्य वचनाप्रमाणे आचरण करणारे आणि आज्ञा  पाळणारे बनायला हवे. सर्वांना सर्वकाही पुरविणारा व काळजी वाहणारा  परमेश्वर आज जीवनाचे दान देण्यासाठी आपल्याला बोलवित आहे.
त्याच्या स्वर्गीय मेजवानीत सहभागी होण्यासाठी आपण योग्य ती तयारी करु या.
✝️             

पहिले वाचन : यशया  २५:६-१०
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"परमेश्वर मिष्टान्नाची मेजवानी करत आहे, प्रभू परमेश्वर सर्वाच्या चेहऱ्यांवरील अश्रू पुसतो.”

सेनाधीश परमेश्वर ह्या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करत आहे. उत्कृष्ट मिष्टान्नाची आणि राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करत आहे. सर्व लोकांना झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांना आच्छादून टाकणारे आच्छादन, तो या डोंगरावरून उडवून देत आहे. तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो, प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यांवरील अश्रू पुसतो, तो अखिल पृथ्वीवरील आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे.

त्या समयी ते म्हणतील, “पाहा, हा आमचा देव! याची आम्ही आशा धरून राहिलो, तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे, याची आम्ही आशा धरून राहिलो, त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हासित आणि हर्षित होऊ." परमेश्वराचा हात ह्या डोंगरावर राहील.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Isaiah 25:6-10a

On this mountain the Lord of hosts will make for all peoples a feast of rich food, a feast of well-aged wine, of rich food full of marrow, of aged wine well refined. And he will swallow up on this mountain the covering that is cast over all peoples, the veil that is spread over all nations. He will swallow up death for ever, and the Lord God will wipe away tears from all faces, and the reproach of his people he will take away from all the earth, for the Lord has spoken. It will be said on that day, "Behold, this is our God; we have waited for him, that he might save us. This is the Lord; we have waited for him; let us be glad and rejoice in his salvation." For the hand of the Lord will rest on this mountain.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र 
प्रतिसाद : २३:१-३अ, ३ब - ४, ५, ६

प्रतिसाद स्तोत्र

प्रतिसाद : परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.

१ परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, 
मला काही उणे पडणार नाही. 
तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. 
तो मला संथ पाण्यावर नेतो, 
तो माझा जीव ताजातवाना करतो.

२ तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवतो, 
मृत्यूच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी 
कसल्याही अरिष्टाला भिणार नाही.
 कारण तू माझ्याबरोबर आहेस, 
तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात.

३ तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस
 तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस, 
माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.

४ खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस 
मला कल्याण आणि दया ही लाभतील 
आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.


Psalm 23:1-3a, 3b-4, 5, 6

R. In the Lord's own house shall I dwell for length of days unending. 

The Lord is my shepherd;
there is nothing I shall want.
Fresh and green are the pastures
where he gives me repose.
Near restful waters he leads me; 
he revives my soul. R

He guides me along the right path, 
for the sake of his name.
Though should walk in the valley of the shadow of death, 
no evil would fear, for you are with me.
Your crook and your staff will give me comfort.  R

You have prepared a table before me
in the sight of my foes.
My head you have anointed with oil;
my cup is overflowing. R 

Surely goodness and mercy shall follow me 
all the days of my life.
In the Lord's own house shall I dwell
for length of days unending. R


दुसरे वाचन  फिलिप्पीकरांस पत्र ४:१२-१४,१९-२० 
वाचक : पौलचे फिलिप्पैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन

"मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे."

दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते, प्रत्येक प्रसंगी अन्नतृप्त असणे आणि क्षुधित असणे, संपन्न असणे आणि विपन्न असणे, ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करायला शक्तिमान आहे, तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला हे ठीक केले. माझा देव आपल्या गौरवी संपत्तीतून तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील. आपला देवपिता ह्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद

Second Reading  :Philippians 4:12-14, 19-20

Brethren: I know how to be brought low, and I know how to abound. In any and every circumstance, I have learned the secret of facing plenty and hunger, abundance and need. I can do all things through him who strengthens me. Yet it was kind of you to share my trouble. And my God will supply every need of yours according to his riches in glory in Christ Jesus. To our God and Father be glory for ever and ever. Amen.

This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
 प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. 
  आलेलुया!

Acclamation: 
May the Father of our Lord Jesus Christ enlighten the eyes of our hearts that we may know what is the hope to which he has called us.

शुभवर्तमान मत्तय २२:१-१४
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  
 
"जितके तुम्हांला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीस बोलवा. "

*येश पुन्हा प्रमुख याजक आणि यहुदी लोकांचे पुढारी यांना दाखले देऊन बोलू लागला : “स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे, त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीला ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठवले. परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले आणि त्यांना म्हटले, की, आमंत्रितांना असे सांगा, पाहा, मी जेवण तयार केले आहे, माझे बैल आणि पुष्ट पशू कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीला चला. तरी हे मनावर न घेता ते कोणी आपल्या शेतावर, कोणी आपल्या कामधंद्यावर गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून अपमान केला आणि त्यांना जिवे मारले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या अत्याचारी लोकांचा नाश केला आणि त्यांचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासांना म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते, म्हणून तुम्ही चव्हाट्यांवर जाऊन जितके तुम्हांला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरेवाईट असे जितके त्यांना आढळले, त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मंडप जेवणाऱ्यांनी भरून गेला.
"मग राजा पाहुण्यांना पाहायला आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे तू कसा शिरलास?” त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, “ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाणे चालेल. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडे आहेत."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading : Matthew 22:1-14

At that time: Again Jesus spoke to chief priests and elders of the people, in parables, saying, "The kingdom of heaven may be compared to a king who gave a wedding feast for his son, and sent his servants to call those who were invited to the wedding feast, but they would not come. Again he sent other servants, saying, 'Tell those who are invited,“See, I have prepared my dinner, my oxen and my fat calves have been slaughtered, and everything is ready. Come to the wedding feast. But they paid no attention and went off, one to his farm, another to his business, while the rest seized his servants, treated them shamefully, and killed them. The king was angry, and he sent his troops and destroyed those murderers and burned their city. Then he said to his servants, The wedding feast is ready, but those invited were not worthy. Go therefore to the main roads and invite to the wedding feast as many as you find. And those servants went out into the roads and gathered all whom they found, both bad and good. So the wedding hall was filled with guests. But when the king came in to look at the guests, he saw there a man who had no wedding garment. And he said to him, 'Friend, how did you get in here without a wedding garment?' And he was speechless. Then the king said to the attendants, 'Bind him hand and foot and cast him into the outer darkness. In that place there will be weeping and gnashing of teeth. For many are called, but few are chosen."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन:  बायबल अभ्यासाच्या पद्धतीमध्ये “शब्दप्रतिमा” अभ्यास पद्धतीचा समावेश होतो. ज्ञानाकडून अज्ञानाकडे असा हा प्रवास असतो. म्हणजेच लोकांना परिचित असलेली एखादी प्रतिमा घेतली जाते. तिच्या आधारे लोकांना ठाऊक नसलेले एखादे रहस्य स्पष्ट करून सांगितले जाते. येशूच्या दाखल्यांमध्ये मौल्यवान मोती, ठेव, जाळे, दिवा, बी, मोहरीचा दाणा, निंदण, मेंढरे, मीठ, प्रकाश, मेंढपाळ, द्राक्षवेल अशा शब्दप्रतिमाचा वापर करण्यात आल्याचे दिसून येते. आजच्या वाचनामध्ये “मेजवानी” ही शब्दप्रतिमा वापरण्यात आलेली आहे.
१. देवराज्य - लग्नाची मेजवानी : आजच्या शुभववर्तमानामध्ये प्रभू येशू लग्नाच्या मेजवानीचा 
दाखला देत आहे. पहिल्या वाचनात सांगितल्याप्रमाणे ही मेजवानी देणारा राजा दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द परमेश्वर आहे. ही मेजवानी सर्व राष्ट्रांसाठी असून त्यात उत्कृष्ट मिष्टान्ने, बैल, पुष्ट पशू व राखून ठेवलेल्या द्राक्षारसाचा समावेश आहे. आनंदोत्सव हा ह्या मेजवानीचा गाभा असल्यामुळे अप्रतिष्ठा व अश्रू ह्यांना ह्या ठिकाणी जागा नाही असे संदेष्टा सुचवितो. 
२. आमंत्रित - दोन प्रकारचे पाहुणे : मेजवानीसाठी ज्यांना आमंत्रण देण्यात आलेले होते त्यांच्यात दोन प्रकारचे पाहुणे आढळतात : आमंत्रण नाकारणारे व आमंत्रण स्वीकारणारे. आमंत्रण नाकारणाऱ्यांमध्ये सबबी देणारे, इतर गोष्टींना अधिक महत्व देणारे आणि आक्रमक व अहंकारी ह्यांचा समावेश होतो. तर आमंत्रण स्वीकारणाऱ्यांमध्ये तयारीनिशी येणारे व तयारीविना येणारे (लग्नाचा पोषाख न घातलेला माणूस शिस्त न पाळणारे) असे दोन प्रकारचे पाहुणे आढळतात. पुष्कळांना त्या मेजवानीचा आस्वाद घेता आला नाही, कारण मेजवानीसाठी लागणारी उचित मनोवृत्ती त्यांनी धारण केलेली नव्हती. 
३. प्रतिसाद - मेजवानीसाठी उचित मनोवृत्ती : आजच्या दुसऱ्या वाचनात अशा मेजवानीसाठी म्हणजे देवराज्यातील उल्हास व हर्ष अनुभवण्यासाठी आवश्यक असलेली
मनोवृत्ती नमूद करण्यात आलेली आहे. त्यात सर्व स्थितीत समाधानी व तृप्त असणे, देवाच्या सामर्थ्यांवर विसंबून राहणे, संकटात इतरांना सोबत करणे, त्यांची मदत घेणे, परमेश्वर सर्वकाही पुरवील अशी दृढ श्रद्धा बाळगणे ह्या गोष्टींचा समावेश होतो.

आत्मपरीक्षण : देवराज्याविषयी माझ्या मनात कोणती प्रतिमा आहे ? मी देवराज्यातील आनंदाचा आस्वाद कुठे कुठे व कसा घेतो? या मेजवानीत सहभागी होण्याच्या मार्गात कोणकोणते अडथळे आहेत ?


प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी जीवनदायी वचने, तुझ्या प्रेमळ आज्ञा आणि तू देत असलेली स्वर्गीय मेजवानी स्वीकारण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या