सामान्यकाळातील ३० वा रविवार
२९ ऑक्टोबर २०२३
तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण मनाने प्रीती कर.
You shall love your neighbour as yourself.
आज प्रभू येशू ख्रिस्ताने परुश्यांना अगदी स्पष्ट करुन दिले की, आपली शेजाऱ्यावर प्रीति असेल तरच आपण देवावर प्रीति करतो. तसेच देवावर प्रीति असणारा माणूसच शेजाऱ्यावर प्रीति करतो. देवप्रीति आणि परस्पर प्रीतिच्या आज्ञा परस्परात गुंफलेल्या आहेत. देवावर प्रीति करणारा माणूस शेजाऱ्याचा द्वेष करुन त्यावर अन्याय करु शकत नाही, अन्यथा तो खोटे बोलतो. आज आपण प्रीतिच्या ह्या आज्ञांवर चिंतन करीत असताना देवावर पूर्ण प्रीति असणे म्हणजे काय हे आपल्याला समजले आहे का ह्यावर विचार करु या. आपण सर्व जण त्या प्रेमळ पित्याचीच लेकरे आहोत. तर मग आपण देवावर, स्वत: वर आणि शेजाऱ्यावर प्रीति करण्यास प्रेरणा व कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करु या.
✝️
पहिले वाचन : निर्गम २२:२१-२७
वाचक :निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन २२:२१-२७
"जर तुम्ही विधवा आणि अनाथ यांचा छळ केला तर माझा राग तुमच्यावर भडकेल.”
प्रभू म्हणतो, कोणा उपऱ्याला छळू नकोस किंवा त्याच्यावर जुलूम करू नकोस, कारण इजिप्त देशात तुम्हीही उपरे होता. कोणा विधवेला किंवा अनाथाना छळू नका, तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे छळले आणि त्यांनी माझ्याकडे गाऱ्हाणे केले तर मी त्यांचे गाऱ्हाणे अवश्य ऐकेन आणि मग माझा राग भडकून मी तरवारीने तुमचा संहार करीन, तुमच्या स्त्रिया विधवा होतील आणि तुमची मुले अनाथ होतील.
तुझ्याजवळ राहणाऱ्या माझ्या लोकांपैकी कोणी कंगाल असला आणि तू त्याला पैसे उसने दिले तर तू त्याच्याशी सावकाराप्रमाणे वागू नको आणि त्याच्यापासून व्याज घेऊ नको. तू आपल्या शेजाऱ्याचे पांघरूण गहाण ठेवून घेतले तर सूर्यास्त होण्यापूर्वी त्याचे त्याला परत दे, कारण त्याचे ते एकच पांघरूण असून त्याचे अंग झाकण्यास तेवढेच असणार, ते घेतले तर तो काय पांघरूण निजेल ? अशा वेळी त्याने माझ्याकडे गाऱ्हाणे केले तर मी त्याचे ऐकेन, कारण मी करुणामय आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Exodus 22:21-27
Thus says the Lord: "You shall not wrong a sojourner or oppress him, for you were sojourners in the land of Egypt. You shall not mistreat any widow or fatherless child. If you do mistreat them, and they cry out to me, I will surely hear their cry, and my wrath will burn, and I will kill you with the sword, and your wives shall become widows and your children fatherless. "If you lend money to any of my people with you who is poor, you shall not be like a moneylender to him, and you shall not exact interest from him. If ever you take your neighbour's cloak in pledge, you shall return it to him before the sun goes down, for that is his only covering and it is his cloak for his body; in what else shall he sleep? And if he cries to me, I will hear, for I am compassionate.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १७:२-४, ४७-५१ अब
प्रतिसाद : हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.
१ हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो,
परमेश्वरा माझा दुर्ग, माझा गड, माझा मुक्तिदाता -
माझा देव, माझा खडक आहे, त्याचा मी आश्रय घेतो.
तो माझे कवच, माझे तारणदुर्ग, माझा उंच बुरुज आहे.
स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो,
तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो.
२. परमेश्वर जिवंत आहे, त्या माझ्या मुक्तिदात्या
दुर्गाला धन्यवाद असो.
तो आपल्या राजाला मोठाले विजय देतो
आणि आपल्या अभिषिक्ताला वात्सल्य दाखवतो.
Psalm 18:2-3a, 3bc-4, 47 and 51ab
R. I love you, Lord, my strength.
I love you, Lord, my strength;
O Lord, my rock, my fortress, my saviour.R
My God, my rock where take refuge;
my shield, my saving strength, my stronghold.
I cry out, "Praised be the Lord!"
and see, I am saved from my foes. R
The Lord lives, and blest be my Rock!
May the God of my salvation be exalted.
The Lord gives great victories to his king
and shows merciful love for his anointed. R
दुसरे वाचन थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र १:५-१०
वाचक : पौलचे थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"जिवंत आणि सत्य देवाची सेवा करण्यासाठी आणि त्याचा पुत्र येशू ह्याची वाट पाहण्यासाठी, तुम्ही मूर्तिपूजेपासून देवाकडे वळला.' "
तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हांला ठाऊक आहे. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे आणि प्रभूचे अनुकरण करणारे झाला, अशा प्रकारे मासेदोनिया आणि अखया ह्यातील सर्व विश्वास ठेवणारे ह्यांना आदर्श झाला. मासेदोनिया आणि अखया ह्यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे, इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे. ह्यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगायची आवश्यकता नाही. कारण तुम्हांमध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत आणि सत्य देवाची सेवा करण्यासाठी आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यासाठी तुम्ही मूर्तिपूजेपासून देवाकडे कसे वळला, हे ते आपण होऊन आम्हांविषयी सांगतात, त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यातून उठवले आणि तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणारा आहे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद
Second Reading :1 Thessalonians 1:5c-10
Brethren: You know what kind of men we proved to be among you for your sake. And you became imitators of us and of the Lord, for you received the word in much affliction, with the joy of the Holy Spirit, so that you became an example to all the believers in Macedonia and in Achaia. For not only has the word of the Lord sounded forth from you in Macedonia and Achaia, but your faith in God has gone forth everywhere, so that we need not say anything. For they themselves report concerning us the kind of reception we had among you, and how you turned to God from idols to serve the living and true God, and to wait for his Son from heaven, whom he raised from the dead, Jesus who delivers us from the wrath to come.
This is the word of God
Thanks be to God
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
शब्द देहधारी झाला आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.
आलेलुया!
Acclamation:
If anyone loves me, he will keep my word, says the Lord; and my Father will love him, and we will come to him.
शुभवर्तमान मत्तय २२:३४-४०
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने प्रीती कर आणि आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखी प्रीती कर."
येशूने सदुक्यांना निरुत्तर केले असे ऐकून परूशी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती
आज्ञा मोठी आहे ? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी आणि पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, तू आपल्या शेजाऱ्यांवर स्वतः सारखी प्रीती कर. ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Matthew 22:34-40
At that time: When the Pharisees heard that Jesus had silenced the Sadducees, they gathered together. And one of them, a lawyer, asked him a question to test him. "Teacher, which is the great commandment in the Law?" And he said to him, "You shall love the Lord your God with all your heart and with all your soul and with all your mind. This is the great and first commandment. And a second is like it: You shall love your neighbour as yourself. On these two commandments depend all the Law and the Prophets."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: शेजारप्रीतीविना देवप्रीती हे जसे पोकळ कर्मकांड ठरू शकते त्याचप्रमाणे देव प्रीतीविना शेजारप्रीती ही आत्मकेंद्रित, स्वार्थी व अहंकारयुक्त अशी दिखाऊ कृती ठरू शकते. आजची वाचने आपल्याला देवप्रीती व शेजारप्रीती ह्यांच्यात सांगड घालण्यास शिकवीत आहेत. संत बर्नड ह्यांनी देवप्रीती हा पाया, शेजारप्रीती हा कळस तर सुदृढ स्व-प्रीती हा मध्य आहे असे म्हटले आहे. श्रद्धेच्या ह्या पैलूचे एकूण चार टप्पे ते वर्णन करतात.
१. आत्मकेंद्रित जीवनशैली (Only I, me, my) : ह्या अवस्थेतील श्रद्धावंत केवळ स्वतःचाच विचार करतो. देवाकडून मला काहीतरी मिळेल, शेजाऱ्याकडून माझी स्तुतिप्रशंसा होईल या हेतूने माणूस देव, धर्म, प्रार्थना, उपवास, तीर्थयात्रा अशा धार्मिक गोष्टी करीत असतो. आपल्याला काही मिळणार नसेल तर काय फायदा अशी ह्या लोकांची विचारधारा असते. त्यामुळे थोडासा जरी छळ झाला तरी हे लोक श्रद्धा पायदळी तुडवितात.
२. आत्मकेंद्रित देवप्रीती (I and Jesus) : या अवस्थेत “स्व” ला प्रथम स्थान असतेच. परंतु आता त्याच्याबरोबर देवालाही प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मनुष्य जशी स्वतःवर तशीच देवावर प्रीती करतो. देवाकरिता काही प्रमाणात छळ सहन करायला तो तयार असतो. कारण त्यातही त्याचे हित दडलेले असते. मात्र इथे आत्मकेंद्रितपणा व देवप्रीती ह्यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो.
३. देवकेंद्रित आत्मप्रीती (Jesus and I) : ह्या अवस्थेत भक्ताची अजून प्रगती झालेली असते. आत्मप्रीती असते परंतु ती देव केंद्रित असते. देवासाठी मनुष्य स्वतःवर प्रेम करतो, स्वतःची काळजी घेतो. देवाचा अपमान होणार नाही ना ह्याचे भान ठेवून वागत असतो.
४. देव केंद्रित जीवनशैली (Only Jesus) :
आता सर्वकाही केवळ देवासाठी करायचे असा विचार माणूस करू लागतो. देव, धर्म, स्वयंशिस्त, शेजाऱ्यांची सेवा, समाजकार्य, छळ, त्याग, श्रद्धाबांधणी यामागे कुठलाही स्वार्थी हेतू नसतो. केवळ देवाला प्रसन्न करणे एवढा एकच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून जीवन जगणे सुरू होते. इथे देवप्रीती, शेजारप्रीती व आत्मप्रीती ह्यांच्यात सुंदर सांगड घातली जाते.
आत्मपरीक्षण : वरीलपैकी कोणत्या अवस्थेत मी जीवन जगत आहे? आत्मकेंद्रित जीवनशैलीकडून देवकेंद्रित जीवनशैलीकडे मला कशाप्रकारे वाटचाल करता येईल ?
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या प्रेमळ करुणेचा स्पर्श सर्वांना व्हावा व तुझी प्रीतिची आज्ञा पाळण्यास आम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
.jpg)
0 टिप्पण्या