सामान्यकाळातील २८वा सप्ताह
गुरुवार १९ ऑक्टोबर २०२३
पण तुम्ही स्वतः आत गेला नाही आणि जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला.
You did not enter yourselves, and you hindered those who were entering.
✝️
क्रूसभक्त संत पॉल
वर्तनसाक्षी (१६९४-१७७५)
इटलीतील लोम्बार्डी येथे राजघराण्यात एका श्रीमंत व्यापाराच्या घरी पॉल फ्रान्सिस दानिएल ह्याचा जन्म झाला. सोळा भावंडांमध्ये तो सर्वात मोठा होता. अतिपवित्र साक्रामेंतासमोर तासन्तास प्रार्थना व मनन-चिंतन करण्याची आवड असलेल्या पॉलला वयाच्या २६ व्या वर्षी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिले. त्यामध्ये त्याने आपल्या दुःखसहनाच्या सन्मानार्थ एक व्रतस्थ जीवन जगणाऱ्यांची संस्था स्थापन करण्याची इच्छा प्रकट केली.इ. स. १७२० साली त्याने आपल्या संघासाठी एक नियमावली तयार केली आणि ती आपल्या बिशपांना दाखविली. बिशपांनी त्याला अनवाणी प्रवास करणाऱ्या क्रूसभक्त आणि येशूच्या दु:खसहनाशी एकरूप होऊ इच्छिणाऱ्या धर्मगुरूंचा झगा प्रदान केला. सात वर्षानंतर त्याला प्रत्यक्ष धर्मगुरुपदाची दीक्षा देण्यात आली. ऑर्वेटेलो नजिकच्या माऊंट आर्जेंटारिओ येथे एका मठामध्ये त्याने सांघिक जीवन जगायला सुरुवात केली. त्याला बरेच अनुयायी मिळाले. फा. पॉलना संघाचे एकदाचे सुपिरिअर जनरल निवडण्यात आले आणि तेही मरणापर्यंत.
ह्या नवीन संघामध्ये कार्यूसिअन संघाची विरक्ती आणि येशुसंघाची क्रियाशील सेवावृत्ती ह्यांचा संगम झाला होता.. दुःखसहनाशी एकरुप होऊ इच्छिणारे पॅशनिस्ट फादर्स खरोखरच धार्मिक आणि आध्यात्मिक वृत्तीचे होते. येशूच्या दुःखसहनावर ते तासन्तास मननचिंतन करीत आणि त्याद्वारे हरवलेल्या आत्म्यांना ख्रिस्ताकडे आणीत.
संत पॉलच्या कार्यावर देव प्रसन्न झाला आणि त्याच्या हातून अनेक चमत्कार घडू लागले. पाषाणहृदयी आणि परिवर्तनाची कुठलीही आशा नसलेल्या पाप्यांमध्ये बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य संत पॉलला मिळाले होते. ५० वर्षे त्याने खास इंग्लंडच्या परिवर्तनासाठी प्रार्थना केली आणि तशा परिवर्तनाची शाश्वती येशूने त्याला साक्षात्काराकरवी दिली. खरं पाहता कार्डिनल न्यूमन ह्यांनी कॅथलिक चर्चमध्ये प्रवेश केला.
संत पॉल १८ ऑक्टोबर १७७५ रोजी रोम शहरात मरण पावले.
पहिले वाचन : रोमकरांस ३:२१-३०
वाचक : पौलचे रोमकरांस यातून घेतलेले वाचन
"मनुष्य नियमशास्त्रातील कर्माने नव्हे तर विश्वासाने नीतिमान ठरतो."
नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमान ते प्रकट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची आणि संदेष्ट्यांची साक्ष आहे. हे देवाचे नीतिमत्त्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, त्यात भेदभाव नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते देणगीदाखल नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, ह्यासाठी की, पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्त्व व्यक्त करावे, म्हणजे आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे.
तर मग फुशारकी मारणे कोठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने. कारण नियमशास्त्रातील कर्माने नव्हे तर मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण मानतो. देव केवळ यहूद्यांचा आहे का? तो परराष्ट्रीयांचा नव्हे का? हो, तो परराष्ट्रीयांचा देखील आहे, कारण देव एकच आहे.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Romans 3:21-30
Brethren: The righteousness of God has been manifested apart from the OUT law, although the Law and the Prophets bear witness to it-the righteousness of God through faith in Jesus Christ for all who believe. For there is no distinction: for all have sinned and fall short of the glory of God, and are justified by his grace as a gift, through the redemption that is in Christ Jesus, whom God put forward as a propitiation by his blood, to be received by faith. This was to show God's righteousness, because in his divine forbearance he had passed over former sins. It was to show his righteousness at the present time, so that he might be just and the justifier of the one who has faith in Jesus. Then what becomes of our boasting? It is excluded. By what kind of law? By a law of works? No, but by the law of faith. For we hold that one is justified by faith apart from works of the law. Or is God the God of Jews only? Is he not the God of Gentiles also? Yes, of Gentiles also, since God is one-who will justify the circumcised by faith and the uncircumcised through faith.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १३०: १-२,४-६
प्रतिसाद : परमेश्वराच्या ठायी दया आहे.
१) हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करत आहे.
हे प्रभो, माझी वाणी ऐक,
माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत.
२) हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील,
तर हे प्रभो, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?
तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे.
३) मी परमेश्वराची अपेक्षा करतो,
मी त्यांच्या वचनाची आशा धरतो.
पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यांपेक्षा
मी प्रभूची अधिक वाट पाहतो.
Psalm 130:1-2, 3-4, 5-6ab
For with the Lord there is mercy, in him is plentiful redemption.
Out of the depths cry to you, O Lord;
Lord, hear my voice!
O let your ears be attentive
to the sound of my pleadings. R
If you, O Lord, should mark iniquities,
Lord, who could stand?
But with you is found forgiveness,
that you may be revered. R.
I long for you, O Lord,
my soul longs for his word.
My soul hopes in the Lord
more than watchmen for daybreak. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे येरुशलेम, प्रभूचे गुणगान गा! तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो
आलेलुया!
Acclamation:
I am the way, and the truth, and the life, says the Lord; no one comes to the Father except through me.
शुभवर्तमान लूक ११:४७-५४
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"हाबेलच्या रक्तापासून तर जखऱ्याच्या रक्तापर्यंतच्या प्रत्येक संदेष्ट्यांच्या रक्ताबद्दल ह्या पिढीला हिशेब द्यावा लागेल."
येशू शास्त्र्यांना म्हणाला, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जिवे मारले! तुम्ही साक्षीदार आहा आणि आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यांना जिवे मारले आणि तुम्ही त्यांची थडगी बांधता. ह्या कारणास्तव देवाच्या ज्ञानानेही म्हटले, मी त्यांच्याकडे संदेष्टे आणि प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यातील काहीना ते जिवे मारतील आणि काहींना छळतील, ह्यासाठी की, जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्ट्यांचे रक्त म्हणजे हाबेलच्या रक्तापासून वेदी आणि पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्या जखऱ्याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडले गेले त्याचा हिशेब ह्या पिढीकडून घेतला जावा. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जाईलच. तुम्हां शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, पण तुम्ही स्वतः आत गेला नाही आणि जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला.
तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री आणि परुशी त्याच्या अंगावर त्वेषाने येऊन त्याने पुष्कळशा गोष्टींविषयी बोलावे म्हणून त्यावर प्रश्नांचा भडीमार करू लागले आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात धरावे म्हणून ते टपून राहिले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Luke 11:47-54
At that time: Jesus said, "Woe to you! For you build the tombs of the prophets whom your fathers killed. So you are witnesses and you consent to the deeds of your fathers, for they killed them, and you build their tombs. Therefore also the Wisdom of God said, 1 will send them prophets and apostles, some of whom they will kill and persecute', so that the blood of all the prophets, shed from the foundation of the world, may be charged against this generation, from the blood of Abel to the blood of Zechariah, who perished between the altar and the sanctuary. Yes, I tell you, it will be required of this generation. Woe to you lawyers! For you have taken away the key of knowledge. You did not enter yourselves, and you hindered those who were entering." As he went away from there, the scribes and the Pharisees began to press him hard and to provoke him to speak about many things, lying in wait for him, to catch him in something he might say.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
प्रभू म्हणतो, “तुमची केवढी दुर्दशा होणार!” वाईट कृत्ये जमेस धरून देणाऱ्या माझ्या लेकरांनो तुमची केवढी दुर्दशा होणार ! पूर्वजाच्या माता-पित्याच्या, मित्र-मैत्रिणीच्या, ज्याने आपल्या स्वभावाने, वागणूकीने, कृत्याने निष्पाप लोकांना धरून दिले आहे त्या तुमची केवढी दुर्दशा होणार ! येथे परमेश्वर आपल्या लेकरांना जागृत करतो की, आपल्या कृत्यावर, शब्दावर, वर्तनावर नियंत्रण ठेवा. नाहीतर या परूशी व शास्त्राप्रमाणे तुमची दुर्दशा होणार. त्याने माझ्याकडून मिळालेली ज्ञानाची किल्ली स्वतःकडे दाबून ठेवली व मनुष्य आपल्या सत्कर्माद्वारे तारण प्राप्त करतो. त्यांनी स्वतः येशूवर विश्वास ठेवला नाही व इतरांनाही विश्वासठेवण्यापासून रोखले. त्यासर्वांची केवढी दुर्दशा होणार. येशूच्या ह्या सत्य व उघडपणे बोलण्यावरून शास्त्री व परुशी संतापले व ते त्याला धरून देण्याची संधी शोधू लागले.
प्रार्थना : हे प्रभू येशू, विश्वासात वाढत जाऊन खरे नीतिमान, भक्तीमान व आध्यात्माने भरलेले परोपकारी ख्रिस्ती जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या