सामान्यकाळातील ३०वा सप्ताह
मंगळवार ३१ ऑक्टोबर २०२३
मग तो वाढून त्याचे झाड झाले आणि आकाशातील पाखरे त्याच्या फाद्यांत राहू लागले ?
it grew and became a tree, and the birds of the air made nests in its branches."
✝️
संत अल्फोन्सस रॉड्रीग्ज
वर्तनसाक्षी (१५३१-१६१७)
दक्षिण स्पेनमध्ये रेशीम कापडाचा एक व्यापारी राहत होता. एकाएकी त्याची बायको आणि मुले मरण पावली. त्याबरोबर त्याने मोठ्या उल्हासाने प्रार्थनामय जीवन सुरू केले. असह्य शारीरिक कष्ट आणि तपश्चर्या ह्यांद्वारे त्याने पावित्र्याचा अंगिकार केला आणि वयाच्या ३९ व्या वर्षी माजोकी बेटावरील येशूसंघियांमध्ये त्याने व्रतस्थ बंधू म्हणून दीक्षा घेतली. तेथे त्याने माऊंट सायन कॉलेज व सेमिनरीचा द्वारपाल म्हणून ३५ वर्षे नम्रपणे कार्य केले.
औपचारिकारित्या शिक्षण झालेले नसले तरी धर्मगुरूंकडे येणाऱ्या लोकांत एक ब्रदर म्हणून त्याने मोलाचे मार्गदर्शन व सल्ला देण्याचे काम केले. ख्रिस्ती धर्मतत्त्वांविषयी त्याला अगाध ज्ञान होते. पवित्र मरियेवरील बालसदृश मनोवृत्तीमुळे आणि आत्यंतिक शक्तीमुळे त्याने निष्कलंक गर्भसंभवाचा प्रार्थनापाठ लिहिला व त्याच्या प्रती सर्वत्र वाटून टाकल्या. प्रार्थनापाठ अल्पावधीत लोकप्रिय झाला.
द्वारपाल म्हणून कार्य करीत असताना तो स्वत:शी म्हणे, 'दरवाज्यावर बेल वाजली आणि कोणी आले तर तो ख्रिस्तच समजायचा' आणि मग मोठ्या प्रसन्न हसतमुख चेहऱ्याने तो त्यांचे स्वागत करीत म्हणे, “प्रभुजी, या मी आपली काय सेवा करू?"
✝️
पहिले वाचन :रोम ८:१८-२५
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"सृष्टी, देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे."
आपल्यासाठी जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. कारण सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करण्याऱ्यामुळे. तरीपण सृष्टी देखील स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते. आपल्याला ठाऊक आहे की, सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे आणि वेदना भोग आहे, इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपणाला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठायी कण्हत आहो. कारण आपण आशा धरून तारण पावलो. जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील? पण अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करीत असतो.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Romans 8:18-25
Brethren: I consider that the sufferings of this present time are not worth comparing with the glory that is to be revealed to us. For the creation waits with eager longing for the revealing of the sons of God. For the creation was subjected to futility, not willingly, but because of him who subjected it, in hope that the creation itself will be set free from its bondage to corruption and obtain the freedom of the glory of the children of God. For we know that the whole creation has been groaning together in the pains of childbirth until now. And not only the creation, but we ourselves, who have the first fruits of the Spirit, groan inwardly as we wait eagerly for adoption as sons, the redemption of our bodies. For in this hope we were saved. Now hope that is seen is not hope. For who hopes for what he sees? But if we hope for what we do not see, we wait for it with patience.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १२६: १-६
प्रतिसाद : परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.
१) सियोनातून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा
परमेश्वराने परत आणले तेव्हा आम्ही स्वप्नात आहो
असे आम्हाला वाटले.
तेव्हा आमचे मुख हास्याने आमची
जीभ जयघोषाने भरली.
२) अन्य राष्ट्रांतील लोक म्हणू लागले की,
“परमेश्वराने ह्यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.
"परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.
त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे.
३) हे परमेश्वरा, नेगेब येथील ओढ्याप्रमाणे
आम्हाला बंदिवासातून परत आण.
जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हषीने कापणी करतील.
जे पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतात
ते खात्रीने आनंद करत आपल्या पेंढ्या घेऊन येतील.
salm 126:1-2ab, 2cd-3, 4-5, 6
What great deeds the Lord worked for us!
When the Lord brought back the exiles of Sion,
we thought we were dreaming.
Then was our mouth filled with laughter;
on our tongues, songs of joy. R
Then the nations themselves said,
"What great deeds the Lord worked for them!"
What great deeds the Lord worked for us!
Indeed, we were glad. R
Bring back our exiles, O Lord,
as streams in the south.
Those who are sowing in tears
will sing when they reap. R
They go out, they go out, full of tears, mise
bearing seed for the sowing;
they come back,
they come back with a song,
bearing their sheaves. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे, तू आम्हाला सत्यात समर्पित कर.
आलेलुया!
Acclamation:
Blessed are you, Father, Lord of heaven and earth, that you have revealed to little children the mysteries of the kingdom.
शुभवर्तमान लूक १३:१८-२१
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तो दाणा वाढून त्याचे झाड झाले.
येशू म्हणाला, "देवाचे राज्य कशासारखे आहे? मी त्याला कशाची उपमा देऊ? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात पेरला, मग तो वाढून त्याचे झाड झाले आणि आकाशातील पाखरे त्याच्या फाद्यांत राहू लागले ?
तो आणखी म्हणाला, “मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ ? ते खमिरासारखे आहे, ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Luke 13:18-21
At that time: Jesus said, "What is the kingdom of God like? And to what shall I compare it? It is like a grain of mustard seed that a man took and sowed in his garden, and it grew and became a tree, and the birds of the air made nests in its branches." And again he said, "To what shall I compare the kingdom of God? It is like leaven that a woman took and hid in three measures of flour, until it was all leavened."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:आजच्या शुभवर्तमानात प्रभू “देव राज्याला” मोहरीच्या दाण्याची उपमा देतो. येशूने सुवार्ता संदेश सांगण्याचा आरंभ केला तेव्हा फारच थोड्यांनी तो ऐकून त्यावर विश्वास ठेवला. बहुतेक लोकांनी येशूला झिडकारले, त्याची चेष्टा केली आणि त्याला ठार मारले. त्याचे शिष्य त्याला सोडून पळून गेले. पण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या छोट्याशा बी पासून समर्थ मंडळीची वाढ झाली व ती जगातील प्रत्येक देशात पसरली. “देवाचे राज्य असे आहे. " आजच्या पहिल्या वाचनात संत पौला आपल्याठायीप्रगट होणाऱ्या गौरवाविषयी सांगत आहे. पौला एवढा छळ क्वचितच लोकांनी सहन केला असेल. मात्र भावी काळात प्रकट होणाऱ्या गौरवाच्या तुलनेत त्याने सहज केलेली दुःखे जमेस धरण्याजोगी मुळीच नव्हती. कोणत्याही कार्याला नव्याने सुरवात केल्यानंतर आपल्याला फार कष्ट करावे लागतात. त्यामागे मेहनत असते, अगदी शुन्यापासून सुरूवात करावी लागते. मात्र आपल्याठायी प्रगट होणारा गौरव त्यामध्ये असतो. म्हणून मनावर संयम ठेवून मोलाची अपेक्षा न करता लहान गोष्टींपासून सुरवात करावी.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुझी वचने आमच्या जीवनाला पोषक व पवित्र बनविण्यास समर्थ आहेत. आम्हाला तुझ्या वचनात वाढण्यास कृपा दे, आमेन
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या