Marathi Bible Reading |Wednesday 15th November 2023| 32nd week in ordinary Time |

 सामान्यकाळातील ३२वा सप्ताह 

बुधवार १५ नोव्हेंबर  २०२३

 "दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊजण कोठे आहेत?
"Were not ten cleansed? Where are the nine?
  ✝️ 

 संत आल्बर्ट महान
• महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१२०६-१२८०)
चिंतनः जितको तुमची श्रद्धा मजबूत आणि प्रार्थना आग्रहाची असेल तितक्या अधिक प्रमाणात तुम्ही देवाकडे जे काही मागाल ते देव तुम्हांला देईल.- संत आल्बर्ट महान

                                                ✝️

पहिले वाचन : ज्ञानग्रंथ  ६:१-११
वाचक :ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन

"राजांनो, ज्ञान काय ते जाणून घेण्यासाठी ऐका."

अहो, राजाधिराजांनो, ऐका आणि ध्यानात घ्या. दिगंतापर्यंत पृथ्वीचा न्याय करणाऱ्या न्यायाधीशांनो, लक्षात घ्या. असंख्य प्रजेवर राज्य करणाऱ्यांनो, तसेच अनेक राष्ट्रांचा अभिमान बाळगणाऱ्यांनो, कान देऊन ऐका. कारण प्रभूकडून तुम्हांला सत्ता मिळाली आहे. परात्पराकडून तुम्हांला वर्चस्व लाभले आहे. तोच तुमच्या कार्याचा हिशेब घेईल. तोच तुमच्या योजनांची चौकशी करील. त्याच्या राज्याचे सेवक असून तुम्ही योग्य रीतीने राज्य केले नाही, कायदे पाळले नाहीत, देवाच्या हेतूप्रमाणे तुम्ही चालला नाहीत, तर तो तुमच्यावर भयंकर रीतीने आणि त्वरीत चाल करील. कारण उच्चाधिकारावर असणाऱ्यांना कठीण कसोटीला तोंड द्यावे लागते. कारण सामान्य माणसाना दयेने क्षमादान मिळू शकेल, पण सत्ताधाऱ्यांची अत्यंत कडक परीक्षा घेतली जाईल. कारण सर्वांचा स्वामी प्रभू कोणाचे भय बाळगणार नाही, मोठ्यांना तो वेगळी वागणूक देणार नाही.मोठे आणि लहान त्यानेच निर्माण केले. तो साऱ्यांचा सारखाच विचार करील. मात्र अधिकाऱ्यांची कसून तपासणी होईल. जुलमी सत्ताधीशांनो, राजाधिराजांनो, म्हणून आपण जा, ज्ञान आत्मसात करा. तुमच्या हातून अपराध घडू नये म्हणून मी हे शब्द बोलत आहे. पावित्र्याने पवित्र गोष्टी पाळणारे पवित्र केले जातील. या गोष्टी आत्मसात करणाऱ्यांचे रक्षण होईल. म्हणून माझ्या शब्दांचीच तुम्ही अपेक्षा करा, त्यांचा ध्यास घ्या आणि तुम्हांला शिक्षण लाभेल.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Wisdom 6:1-11
Listen, O kings, and understand; learn, O judges of the ends of the earth Give ear, you that rule over multitudes and boast of many nations. For your dominion was given you from the Lord, and your sovereignty from the Most High, who will search out your works and enquire into your plans. Because as servants of his kingdom you did not rule rightly or keep the law or walk according to the purpose of God, he will come upon you terribly and swiftly, because severe judgment falls on those in high places. For the lowliest may be pardoned in mercy, but the mighty will be mightily tested. For the Lord of all will not stand in awe of anyone or show deference to greatness; because he himself made both small and great, and he takes thought for all alike. But a strict enquiry is in store for the mighty. To you then, O monarchs, my words are directed that you may learn wisdom and not transgress. For they will be made holy who observe holy things in holiness, and those who have been taught them will find a defence. Therefore set your desire on my words; long for them, and you will be instructed.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ८२:३-४,६-७

प्रतिसाद :हे देवा, ऊठ, पृथ्वीचा न्याय कर. 
१) गरीब आणि अनाथ ह्यांचा न्याय कर,
 दीन आणि कंगाल ह्यांची दाद घ्या 
गरीब आणि गरजवंत ह्यांना मुक्त करा, 
दुर्जनांच्या हातातून त्यांना सोडवा.

२) मी म्हणालो, "तुम्ही देव आहा." 
तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहा. 
तरी मानवाप्रमाणे तुम्ही मराल, 
एखाद्या सरदाराप्रमाणे तुम्ही पडाल.



Psalm 82:3-4, 6-7

Arise, O God: judge the earth!

Do justice for the weak and the orphan; 
give justice to the poor and afflicted. 
Rescue the weak and the needy; 
set them free from the hand of the wicked." R

I have said to you, "You are gods,
 and all of you, sons of the Most High. 
And yet, like men you shall die;
 you shall fall, like any of the princes." R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
 माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर,
तू आपल्या सत्पथाने मला चालव.
 आलेलुया!

Acclamation: 
   Give thanks in all circumstances; for this is the will of God in Christ Jesus for you.


शुभवर्तमान लुक १७:११-१९
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ह्या परक्यावाचून देवाचा गौरव करायला परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय ?"

येशू येरुशलेमकडे चालला असता शोमरोन आणि गालील ह्यामधील एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्याला भेटायला आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, "अहो येशू, गुरुजी, आम्हांवर दया करा, " त्याने त्यांच्याकडे पाहून म्हटले, "तुम्ही जाऊन स्वतःला याजकांना दाखवा." मग ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरे झालो आहो, असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णीत परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला. हा तर शोमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, "दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊजण कोठे आहेत? ह्या परक्यावाचून देवाचा गौरव करण्यास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? “आणि येशूने त्याला म्हटले," ऊठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे."
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 17:11-19

On the way to Jerusalem Jesus was passing along between Samaria and Galilee. And as he entered a village, he was met by ten lepers, who stood at a distance and lifted up their voices, saying, "Jesus, Master, have mercy on us." When he saw them he said to them, "Go and show yourselves to the priests. And as they went they were cleansed. Then one of them, when he saw that he was healed, turned back, praising God with a loud voice; and he fell on his face at Jesus' feet, giving him thanks. Now he was a Samaritan. Then Jesus answered, "Were not ten cleansed? Where are the nine? Was no one found to return and give praise to God except this foreigner?" And he said to him, "Rise and go your way; your faith has made you well."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: परमेश्वराच्या अनंत उपकारांबद्दल आभार मानायला आपण विसरतो. परमेश्वराचे उपकार आपण गृहीत धरतो. या जगामध्ये ७.८ अब्ज लोक आहेत. तुम्हाला जाणून घ्यायचे आहे या ७.८ अब्ज लोकांमध्ये तुम्ही किती भाग्यवान आहात ? समजा या ७.८ अब्ज लोकांना शंभरमध्ये बदलले. आता जगामध्ये १०० लोकांपैकी २३ लोकांकडे राहण्यासाठी घर नाही. १०० लोकांपैकी १६ लोकांना दोन्ही वेळचे जेवण मिळत नाही. १०० पैकी ४८ लोकांचा रोजचा खर्च फक्त रुपये १५० एवढा आहे. १०० पैकी १३ लोकांकडे प्यायचे स्वच्छ पाणी नाही. १०० पैकी १७ लोकांना लिहिता-वाचता सुद्धा येतनाही. याचा अर्थ जर तुमच्याकडे स्वतःचे घर असेल, दोन वेळचे जेवण मिळत असेल, फोन असेल, इंटरनेट असेल आणि जर तुम्हाला कॉलेजपर्यंत शिक्षण घ्यायची संधी असेल तर तुम्ही या जगामधील त्या ७ लोकांमधले आहात. म्हणजे तुम्ही किती भाग्यशाली आहात. म्हणून सदा परमेश्वराचे आभारी राहा.

प्रार्थना:हे प्रभू येशू, सर्वदा तुझे आभार मानून तुला गौरविण्यासाठी मला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या