आगमनकाळातील तिसरा सप्ताह
शुक्रवार २२ डिसेंबर २०२३.
ने अधिपतींना राजासनावरून ओढून काढले आहे आणि दीनांना उंचावले आहे
he has put down the mighty from their thrones, and exalted those of low degree;
✝️
संत फ्रान्सिस्का कॅब्रिनी
कुमारीका (१८५०-१९१७)
चिंतन : काट्यांवरून चालताना ते बोचतात ह्याची जाणीवही ठेवू देऊ नका आणि प्रेम करताना अपमानाला आनंदाने सामोरे जाण्यास विसरू नका.संत फ्रान्सिस्का कॅब्रिनी
. पवित्र मरियेला दीनांचा कळवळा होता, सामाजातीलदुर्बलांची तळमळ पाहून तिने गरिबांना तिच्या देवावरील श्रद्धेद्वारे आशेचा किरण दाखवला आहे. मारिया आज गरिबांना तसेच धनवानांनासुद्धा ईश्वरभक्तीमध्ये लीन व नम्र होण्यासाठी आवाहन करीत आहे.पवित्र मरियेने तिच्यासाठी परमेश्वराने केलेल्या महान कृत्यांबद्धल देवाला धन्यवाद दिले. तिला देवपुत्राची माता बनण्याचा सन्मान मिळाला त्याबद्दल तिने प्रभूला धन्यवाद दिलेच परंतु भविष्यात येणाऱ्या सर्व व्यथा, वेदना व दुःखे ह्यांची जाणीव असतांना देखिल मरियेने परमेश्वराचे स्तवन गीत गायीले. ! | मरियेने प्रभूची स्तुती करीत असतांनाच परमेश्वराच्या सामर्थ्याबद्धल, त्याच्या! न्यायीपणाबद्धल व गरिबांवरील करुणेबद्धल प्रकटिकरण केले.
आज पवित्र मारिया परमेश्वराचे आभारस्तवन करीत आहे कारण, दीनांचे अश्रु पुसण्यासाठी, रंजल्यागांजलेल्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांच्या| सुखदुःखात सामील होण्यासाठी त्यांच्या अडचणीत त्यांना मदतीचा हात | देण्यासाठी, धीर व आधार देण्यासाठी परमेश्वराने तिची निवड केली
पहिले वाचन १शमुवेल १:२४-२८
वाचक : शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन.
"शमुवेलच्या जन्माबद्दलचा हन्ना आभार मानते."
शमुवेलचे दूध तुटल्यानंतर हन्नाने त्याला बरोबर घेतले आणि तीन वर्षांचा एक गोन्हऱ्हा, एक एफाभर सपीठ आणि द्राक्षरसाचा एक बुधला घेऊन ती शिलोस, परमेश्वराच्या मंदिरात आपल्या छोट्या बाळासह आली. त्यांनी गोऱ्हा बळी दिला आणि बाळाला एलीकडे आणले. मग हत्रा त्याला म्हणाली, “महाराज अगदी तुमच्या गळ्याशपथ सांगते. येथे तुमच्याजवळ उभी राहून परमेश्वराची याचना करणारी स्त्री, ती मीच. महाराज, ह्या बाळासाठी मी याचना केली होती. मी मागितले होते ते परमेश्वराने मला दिले आहे. म्हणूनच मीदेखील ते परमेश्वराला देत आहे. त्याचे सारे आयुष्य परमेश्वराला वाहते." मग त्यांनी तेथे परमेश्वराची उपासना केली.
First Reading :1 Samuel 1 :24-28
In those days Hannah took Samuel up with her, along with a three-year-old bull, an ephah of flour, and a skin of wine; and she brought him to the house of the LORD at Shiloh; and the child was young. Then they slew the bull, and they brought the child to Eli. And she said, "Oh, my lord! As you live, my lord, I am the woman who was standing here in your presence, praying to the LORD. For this child I prayed; and the LORD has granted me my petition which I made to him. Therefore I have lent him to the LORD; as long as he lives, he is lent to the LORD." And they worshiped the LORD there.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :१शमु. २:१,४-८
प्रतिसाद : माझे मन आनंदाने बहरले आहे.
१) माझे मन आनंदाने बहरले आहे
परमेश्वराने माझे नाक वर केले आहे
माझे मुख शत्रूंचा धिक्कार करत आहे,
तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे.
२)धनुर्धारी वीरांची मती कुंठित झाली आहे.
धडपडणाऱ्यांनी सामर्थ्ययुक्त होऊन कंबरा बांधल्या आहेत,
जे पोटभर खात होते ते भाकरीच्या तुकड्यासाठी मोलमजुरी करत आहेत.
जे भुकेले असत ते तृप्त झाले आहेत.
वंध्येने सातांना जन्म दिला आहे.
पण बहुपुत्रवती झुरणीस लागली आहे.
३) परमेश्वर प्राणहरण करतो. तोच जीवदानही देतो. तो अधोलोकी पाठवतो आणि वरही आणतो. परमेश्वर निर्धन करतो तसाच साधनही करतो. तो खाली ओढतो तसाच वरही उचलतो.
४) तो दलितांना धुळीतून उठवतो गरिबांना उकिरड्यावरून उचलतो. त्यांना अधिपतीच्या पंक्तीला बसवतो. त्यांना मानाच्या स्थानावर बसवतो पृथ्वीच्या आधारस्तंभ परमेश्वराचे आहेत.
त्याच्यावर त्याने जग उभारले आहे.
Psalm : 1 Samuel 2: 1,4-8
"My heart exults in the LORD; my strength is exalted in the LORD. My mouth derides my enemies, because I rejoice in thy salvation.
The bows of the mighty are broken,
but the feeble gird on strength.
Those who were full have hired
themselves out for bread,
but those who were hungry have ceased to hunger.
The barren has borne seven,
but she who has many children is forlorn.
The LORD kills and brings to life;
he brings down to Sheol and raises up.
The LORD makes poor and makes rich;
he brings low, he also exalts.
He raises up the poor from the dust;
he lifts the needy from the ash heap,
to make them sit with princes
and inherit a seat of honor.
For the pillars of the earth are the LORD'S,
and on them he has set the world
आलेलुया, आलेलुया!
तू सर्व राजांचा राजा आणि देवमंदिराच्या कोनशिलेचा दगड आहेस. तूच पृथ्वीवरील मातीपासून मनुष्याला बनवले आहेस. त्यालाच आता येऊन वाचवण्याची कृपा कर
Acclamation:
O King of all nations and keystone of the Church: come and save man whom you formed from the dust !
.
शुभवर्तमान लूक१:४६-५६
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“सर्व समर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत."
मरिया म्हणाली : “माझा जीव प्रभूला धन्यवाद देतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. कारण त्याने आपल्या दासीचा गरीब अवस्थेकडे पाहिले आहे. पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. कारण सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत. त्याचे नाव पवित्र आहे.जे त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यान्पिढ्या असते. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची दाणादाण केली आहे. त्याने अधिपतींना राजासनावरून ओढून काढले आहे आणि दीनांना उंचावले आहे.त्याने भुकेल्यांना उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धनवानांना रिकामे लावू दिले आहे. आपल्या पूर्वजांना त्याने सांगितले त्याप्रमाणे आब्राहाम आणि त्याचे संतान ह्यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्त्रायल ह्याला साहाय्य केले आहे."
नंतर मरिया सुमारे तीन महिने अलिशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Luke 1:46-56
And Mary said, "My soul magnifies the Lord,and my spirit rejoices in God my Savior, for he has regarded the low estate of his handmaiden. For behold, henceforth all generations will call me blessed; for he who is mighty has done great things for me, and holy is his name. And his mercy is on those who fear him from generation to generation. He has shown strength with his arm, he has scattered the proud in the imagination of their hearts, he has put down the mighty from their thrones, and exalted those of low degree; he has filled the hungry with good things, and the rich he has sent empty away. He has helped his servant Israel, in remembrance of his mercy, as he spoke to our fathers, to Abraham and to his posterity for ever." And Mary remained with her about three months, and returned to her home
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आपल्या भक्तीला कृतीची जोड मिळाल्याने आपल्या प्रार्थनेचे सामर्थ्य वाढते याचं सुंदर उदाहरण म्हणजे पवित्र मरिया तीन महिने आपली मावस बहीण अलिशिबा हिच्या घरी असताना पवित्र मरियेने भक्ती आणि कृती ह्यांच्यात सुंदर सांगड घातली. अलिशिबेच्या भेटीने आनंदी झालेली मरिया, "पावन पावन नाम प्रभूचे केले मजला धन्य किती." या स्तोत्राने आपली परमेश्वरावरील निष्ठा व्यक्त करते. मरियेच्या या स्तोत्रामधून आपल्याला आजूबाजूच्या घडामोडीची किती जाण आहे हे ती सूचित करते. भय धरणारे (धार्मिक), अधिपती (राजकीय), भुकेलेले (सामाजिक), गर्विष्ठ (भावनिक) अशांचा उल्लेख करून मसिहा जो येणार आहे हे ती सूचित करीत आहे. हे तिचं स्तोत्र एका बाजूला जे दीन आहेत त्यांना उंचावणारे व दृष्ट आहेत त्यांच्यासाठी आव्हान असणार आहे असं ती सूचित करते.
प्रार्थना:हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या गौरवासाठी व इतरांच्या भल्यासाठी आम्ही आमच्या हातांचा उपयोग करावा यासाठी आम्हास प्रेरणा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या