Marathi Bible Reading | Friday 29th December 2023 |

ख्रिस्त जन्मोत्सव - नाताळ सप्ताह 

शुक्रवार २९ डिसेंबर २०२३

  ✝️ 

“हे प्रभो, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे.
"Lord, now you are letting your servant depart in peace, according to your word; for my eyes have seen your salvation
संत थॉमस बेकेट, 
रक्तसाक्षी

✝️   
.
ख्रिस्तसभा आज रक्तसाक्षी संत थॉमस बेकेट ह्यांचा सन्मान करीत  आहे. इंग्लडचा राजा हेन्री दुसरा ह्यांच्या दरबारातील महत्वाची व्यक्ती थॉमस बेकेट ह्यांना कैंटरबरीचे आर्चबिशप म्हणून राजाने नेमणूक केली होती. मात्र ख्रिस्तसभेच्या हिताच्या योजनांच्या विरोधात राजा असल्यामुळे थॉमस बेकेट ह्यांनी राजाला विरोध केला. ख्रिस्ती मुल्ये आणि ख्रिस्ताची शिकवण सत्याने देणाऱ्या थॉमस बेकेट ह्यांचा राजा हेन्री दुसरा ह्यांनी मृत्यु घडवून आणला. येशूच्या  नावासाठी आणि ख्रिस्तसभेच्या कार्यासाठी संत थॉमस बेकेट ह्यांनी आपला प्राण अर्पण केला. ज्यांनी ख्रिस्ताचा प्रकाश अनुभवला आहे ते आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्ताची साक्ष जगाला देत असतात. ख्रिस्ताच्या प्रकाशात आपण आपले जीवन उज्ज्वल बनवू या.

“येशूच्या नावासाठी आणि ख्रिस्तसभेच्या कोणत्याही कामासाठी मी मरायला तयार आहे." -संत थॉमस बेकेट


पहिले वाचन १योहान २:३-११
वाचक :योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"जो आपल्या बंधूवर प्रीती करतो तो प्रकाशात राहतो."
आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणांस कळून येते की, आपण त्याला ओळखतो. मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही तो लबाड आहे. त्याच्या ठायी सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्या ठायी आहे आपण त्याच्याठायी होत. मी त्याच्याठायी राहतो, असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वत: ही चालले पाहिजे.
प्रियजनहो, मी तुम्हांसाठी नवी आज्ञा लिहीत नाही, परंतु जी आज्ञा तुम्हांला प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच जुनी आज्ञा लिहितो. जे वचन तुम्ही ऐकले ते, ती जुनी आज्ञा होय. तरी पण एक प्रकारे मी तुम्हांसाठी नवी आज्ञा लिहितो. ती त्याच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशीच आहे. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आता प्रकाशत आहे. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या ठायी अडथळा नसतो. पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो, तो कोठे चालला आहे हे त्याचे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :1 John 2:3-11

Beloved: By this we know that we have come to know Jesus Christ, if we keep his commandments, Whoever says "I know him" but does not keep his commandments is a liar, and the truth is not in him, but whoever keeps his word, in him truly the love of God is perfected. By this we may know that we are in him: whoever says he abides in him ought to walk in the same way in which he walked. Beloved, I am writing you no new commandment, but an old commandment that you had from the beginning. old commandment is the word that you have heard. At the same time, it is a new commandment that I am writing to you, which is true in him and in you, because the darkness is passing away and the true light is already shining. Whoever says he is in the light and hates his brother is still in darkness. Whoever loves his brother abides in the light, and in him there is no cause for stumbling. But whoever hates his brother is in the darkness and walks in the darkness, and does not know where he is going, because the darkness has blinded his eyes.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ९६:१-३,५-६
प्रतिसाद :आकाश हर्ष करो. पृथ्वी उल्हासो.

१) एखादे नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा. 
पृथ्वीवर समस्त जनहो, प्रभूचे गुणगान करा.
 प्रभूचे गुणगान करा.
त्याच्या नामाला धन्यवाद द्या.

२) त्याने केलेल्या उध्दाराची दिवसेंदिवस घोषणा करा. 
देशोदेशी त्याचा महिमा प्रकट करा. 
साऱ्या मानवजातीला त्याची अलौकिक कृत्ये जाहीर करा.

३)प्रभूने तर नभोमंडल निर्माण केले, 
शाही वैभवाने व तेजाने ते, मंडित आहे. 
त्याच्या गाभाऱ्यात सामर्थ्य आणि सौंदर्य वसते.



Psalm  96:1-2a, 2b-3, 5b-6

Let the heavens rejoice and earth be glad.

O sing a new song to the Lord; 
sing to the Lord, all the earth. 
O sing to the Lord; bless his name. R 

Proclaim his salvation day by day.
Tell among the nations his glory,
and his wonders among all the peoples.

It was the Lord who made the heavens.
In his presence are majesty and splendour, 
strength and honour in his holy place.

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
शब्द देह झाला आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली, 
परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला
त्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास 
ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.
  आलेलुया!

Acclamation: 
 A light for revelation to the Gentiles and for glory to your people Israel.

शुभवर्तमान  लूक :२२-३५
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“परराष्ट्रीयांच्या प्रबोधनासाठी प्रकाश."

मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर योसेफ व मरिया हे येशूबाळाला वर येरुशलेम येथे घेऊन आले. त्याचे प्रभूला समर्पण करावे, म्हणजे 'प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा' असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा पारव्याची दोन पिल्ले ह्यांचा यज्ञ करावा म्हणून ते घेऊन आले.

तेव्हा पाहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य येरुशलेममध्ये होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्राएलच्या सांत्वनाची वाट पाहात होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले, तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाला धन्यवाद देत म्हटले :

“हे प्रभो, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे.. ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे. "

त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई ह्यास आश्चर्य वाटले. शिमोनने त्याला आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले,“पाहा, इस्राएलात अनेकांचे पडणे व पुन: उठणे होण्यासाठी ह्याला नेमले आहे, ह्यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे. आणखी तुझ्या स्वतःच्याही हृदयातून तरवार भोसकून जाईल."

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 2:22-35: 

When the time came for their purification according to the Law of Moses, the parents of Jesus brought him up to Jerusalem to present him to the Lord (as it is written in the Law of the Lord, "Every male who first opens the womb shall be called holy to the Lord") and to offer a sacrifice according to what is said in the Law of the Lord, "a pair of turtle-doves, or two young pigeons". Now there was a man in Jerusalem, whose name was Simeon, and this man was righteous and devout, waiting for the consolation of Israel, and the Holy Spirit was upon him. And it had been revealed to him by the Holy Spirit that he would not see death before he had seen the Lord's Christ. And he came in the Spirit into the temple, and when the parents brought in the child Jesus, to do for him according to the custom of the Law, he took him up in his arms and blessed God and said, "Lord, now you are letting your servant depart in peace, according to your word; for my eyes have seen your salvation that you have prepared in the presence of all peoples, a light for revelation to the Gentiles, and for glory to your people Israel." And his father and his mother marvelled at what was said about him. And Simeon blessed them and said to Mary his mother, "Behold, this child is appointed for the fall and rising of many in Israel, and for a sign that is opposed (and a sword will pierce through your own soul also), so that thoughts from many hearts may be revealed."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: ख्रिस्ती जीवन दुःख व सुख, आनंद व वैभव ह्यांचे अनोखे मिश्रण आहे. आजच्या शुभवर्तमानात येशूचे मंदिरात समर्पण हा वृत्तांत आपल्याला ऐकायला मिळतो. या वृत्तांतात आपल्याला तीन धर्मनिष्ठ ख्रिस्ती स्वभावाच्या माणसाची भेट घडते. १)धर्मनिष्ठावंत व्यक्तींना धार्मिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात खूप आनंद असतोः मरिया व योसेफ हे साधे गरीब जोडपे होते परंतु ते श्रद्धाळू यहुदी होते. त्यांनी आपली धार्मिक जबाबदारी अगदी विश्वासूपणे पूर्ण केली. जेव्हा आपण श्रद्धावान असतो तेव्हा धार्मिक कर्तव्ये आपल्याला ओझे वाटत नाही. 
२)एका श्रद्धावान व्यक्तीचे नेतृत्व पवित्र आत्म्याने केले आहे: शिमोन हा एक धार्मिक विधीचे नेतृत्व करणारा माणूस होता. मरिया व योसेफाने जेव्हा येशूला मंदिरात आणले तेव्हा आत्म्याने शिमोनाला मंदिरात तो अनुभव प्राप्त झाला. ३) एक श्रद्धावान व्यक्ती जगात साक्षीदार बनतेः शिमोनाने भविष्यवाणी दिली. त्याद्वारे त्याने सूचित केले की येशू इस्रायलचे वैभव आणि परराष्ट्रीयांसाठी प्रकाश आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, आमच्या जीवनातील सर्व प्रकारचा अंधार दूर कर. तुझ्या  प्रकाशाचे साक्षीदार बनण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या