Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Octave of Christmas | 4th Thursday 2024

हे नवीन वर्ष आपल्या सर्वाना प्रभूच्या  सहवासात 

सुखाचे व  भरभराटीचे जावो  . 

प्रभूजन्मानंतरचा नववा दिवस  

गुरुवार  दि. ४ जानेवारी  २०२४

  ✝️ 

“मसिहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हाला सापडला आहे."  
: We have found the Messias, which is, being interpreted, the Christ.

✝️ 



संत एलिझाबेथ ॲन बॅले

व्रतस्थ (१७७४-१८२१)

 ✝️

  
न्यूयॉर्क शहरातील एका सुप्रसिद्ध प्रॉटेस्टंट कुटुंबात २८ ऑगस्ट १७७४ रोजी एलिझाबेथ ॲन बॅले सेतन हिचा जन्म झाला. तिचे वडील एक विख्यात 'डॉक्टर होते आणि किंग्ज कॉलेजमध्ये शरीरशास्त्राचे प्राध्यापक होते. तर तिची आई कॅथरीन बॅले एपिस्कोपेलियन पंथाच्या प्रमुखाची कन्या होती.

एलिझाबेथ यौवनावस्थेत असताना तिची आई मरण पावली आणि तिच्या वडिलांनी तिला लहानाचे मोठे केले. त्यांनी तिला उत्तम शिक्षण दिले आणि चांगले शिष्टाचारही शिकविले. बालपणापासूनच तिला गरीब आणि आजाऱ्यांविषयी विशेष कळकळ वाटत असे. ती त्यांना इतक्या हळूवारपणे हाताळीत असे की ते तिला प्रेमाने "प्रॉटेस्टंट सिस्टर ऑफ चॅरिटी" ह्या नावाने संबोधित. लहानपणीच तिने केलेल्या लिखाणावरून तिची आध्यात्मिक प्रवृत्ती आणि धार्मिकता दिसून येते.

किशोरावस्थेतच तिच्या एपिस्कोपेलियन पंथाशी काहीही सोयरसुतक नसलेल्या प्रथा परंपरा ती इमाने इतबारे पाळीत होती. ती गळ्यात क्रूस घाली. रोज आपल्या सद्सद्विवेकबुद्धीची झडती घेई आणि बायबल व्यतिरिक्त 'ख्रिस्तानुवर्तन' ह्या पुस्तकाची पारामणे करी.

 ४ मार्च १८०५ रोजी तिने कॅथोलिक ख्रिस्तसभेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तिच्या प्रॉटेस्टंट नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने तिला वाळीत टाकले. तिला जीवनावश्यक वस्तूंपासूनही त्यांनी वंचित ठेवले. हा सर्व विरोध सहन करून ती कॅनडा येथे गेली. तेथील बाल्टीमोरच्या सप्लीशियन संस्थेच्या प्रमुखांनी तिला बोलावणे केले होते. ह्या संस्थेचे सुपिरिअर फादर ड बॉर्ग ह्यांनी संत मेरी सेमिनरी नजीक मुलींसाठी एक शाळा सुरू केली.

ह्या शाळेची जबाबदारी तिने स्वीकारली आणि लवकरच बऱ्याच स्त्रिया तिला मदत करण्यासाठी पुढे सरसावल्या. पुढे पुष्कळशा विद्यार्थिनींनी तिच्या शाळेत प्रवेश घेतला. कित्येक विद्यार्थिनींनी ह्या शाळेचे रूपांतर कॉन्व्हेन्टमध्ये करावे अशी मागणी तिच्याजवळ केली. त्यामुळे बाल्टीमोरच्या बिशपांनी तिच्याकडे एक आचारसंहिता दिली व सिस्टर होऊ इच्छिणाऱ्या मुलींना प्रवेश देण्याची परवानगीसुद्धा दिली. त्यांनी तिच्याकडून धार्मिकतेची शपथ घेवविली. तिच्या संस्थेसाठी विशिष्ट रंगाची वस्त्रे सुचविली आणि पहिल्या कम्युनिटीची सुपिरिअर म्हणून तिची नेमणूक करण्यात आली.

इ. स. १८०९ साली ती मेरीलॅण्ड जवळच्या एमीट्सबर्ग नामक खेड्यात गेली. तिथे तिने संत विन्सेंट डी पॉलच्या आचारसंहितेवर आधारित सिस्टर्स ऑफ चॅरिटी ही संस्था स्थापन केली. अमेरिकन परोकियल शाळा पद्धतीचा पाया तिने घातला, शिक्षकांना घडविले, पाठ्यपुस्तकेही तयार केली, अनेक आध्यात्मिक शोधनिबंध लिहिले. गरीब व आजारी लोकांना मदत केली, अनेकांना कॅथलिक ख्रिस्तसभेची शिकवण दिली. फिलाडेल्फिया व न्यूयॉर्क ह्या ठिकाणी तिने अनाथालये सुरू केली..

एवढ्या सर्व परिश्रमामुळे थकून भागून गेलेल्या एलिझाबेथने म्हणजेच मदर सेटनने ४ जाने. १८२१ रोजी महानिद्रा घेतली. १४ सप्टेंबर १९७५ रोजी पोप पॉल सहावे ह्यांनी तिला संतपदाचा किताब प्रदान केला. तिच्या संतीकरणाच्या दिवशी व्हॅटिकनने ते वर्ष स्त्रियांचे पवित्र वर्ष किंवा 'महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. कारण युवती, माता, विधवा आणि व्रतस्थ अशा स्त्रीत्वाच्या सर्व अवस्था तिने पार केल्या होत्या.

चिंतन : अंतोनिओ फिलिची ह्यांनी एलिझाबेथविषयी पुढील उद्गार काढले आहेत: "गरीब पातक्यांविषयी तिच्या मनात एक आगळीच कणव आणि ममता भरलेली होती. कोणत्याही व्यक्तीविषयी वाईट उद्गार काढणे तिला आवडत नसे. अशावेळी ती मौन धारण करणे पसंत करीत असे.”

 

पहिले वाचन १ योहान ३:७-१०
वाचक : योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 

"जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही."

मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये. जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.
जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही. कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. त्याच्याने पाप करवत नाही कारण तो देवापासून जन्मलेला आहे ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही व जो आपल्या बधूंवर प्रीती करीत नाही तोही देवाचा नाही.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading First John 3: 7-10

Little children, let no man deceive you. He that doth justice is just, even as he is just. He that committeth sin is of the devil: for the devil sinneth from the beginning. For this purpose, the Son of God appeared, that he might destroy the works of the devil. Whosoever is born of God, committeth not sin: for his seed abideth in him, and he can not sin, because he is born of God. In this the children of God are manifest, and the children of the devil. Whosoever is not just, is not of God, nor he that loveth not his brother.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद ९८:१-३,६

प्रतिसाद : :१,७-८,९

प्रतिसाद :   पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.

१)न वीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा, 
कारण त्याने अलौकिक कृत्ये केली आहेत. 
त्याने आपल्या हाताने व पवित्र बाहुबलाने 
विजय संपादन केला आहे.

२) सागर व त्यातले प्राणी, तसेच जग व 
त्यात राहणारे सगळे गर्जना करोत. 
नद्या टाळ्या वाजवोत. पर्वत जमून प्रभूसमोर 
आनंदाने गावोत, कारण 
तो पृथ्वीवर राज्य करायला आला आहे.

३ )तो जगाचा यथायोग्य न्याय करील. राष्ट्रांना न्यायाने वागवील.

Psalm:Psalms 98: 1, 7-8, 9

R. (3cd) All the ends of the earth have seen the saving power of God.

1 Sing ye to the Lord anew canticle: because he hath done wonderful things. His right hand hath wrought for him salvation, and his arm is holy.

R. All the ends of the earth have seen the saving power of God.

7 Let the sea be moved and the fulness thereof: the world and they that dwell therein.

8 The rivers shall clap their hands, the mountains shall rejoice together

R. All the ends of the earth have seen the saving power of God.

9 At the presence of the Lord: because he cometh to judge the earth. He shall judge the world with justice, and the people with equity.

R. All the ends of the earth have seen the saving power of God.

 जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
राष्ट्रांनो, या, प्रभूला नमन करा.
आमच्यावर पवित्र दिवस उजाडला आहे, 
कारण आज जगावर महातेज पसरले आहे.
  आलेलुया!

Acclamation: 

R. Alleluia, alleluia.

In the past God spoke to our ancestors through the prophets: in these last days, he has spoken to us through the Son.

R. Alleluia, alleluia.


शुभवर्तमान  योहान १:३५-४२
वाचक :   योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. "

योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, “हे पाहा, देवाचे कोकरू!” त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागोमाग निघाले. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, “तुम्ही काय शोधता ?” ते त्याला म्हणाले, "रब्बी" (म्हणजे गुरुजी), "आपण कोठे राहता ?" तो त्यांना म्हणाला, “या म्हणजे पाहाल.” मग त्यांनी जाऊन तो कोठे राहात आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे दहावा तास होता. योहानचे म्हणणे ऐकून त्याच्यामागे जे दोघेजण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्रचा भाऊ अंद्रिया हा होता. त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “मसिहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हाला सापडला आहे." त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानचा मुलगा शिमोन आहेस. तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील.”

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel ReadingJohn 1: 35-42

The next day again John stood, and two of his disciples.And beholding Jesus walking, he saith: Behold the Lamb of God. And the two disciples heard him speak, and they followed Jesus. And Jesus turning, and seeing them following him, saith to them: What seek you? Who said to him, Rabbi, (which is to say, being interpreted, Master,) where dwellest thou? He saith to them: Come and see. They came, and saw where he abode, and they stayed with him that day: now it was about the tenth hour. And Andrew, the brother of Simon Peter, was one of the two who had heard of John, and followed him. He findeth first his brother Simon, and saith to him: We have found the Messias, which is, being interpreted, the Christ. And he brought him to Jesus. And Jesus looking upon him, said: Thou art Simon the son of Jona: thou shalt be called Cephas, which is interpreted Peter.  

This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: प्रभू येशूने त्याच्या मागे आलेल्या शिष्यांना जीवनातील सर्वांत मूलभूत प्रश्न विचारला, "तुम्ही काय शोधता?" प्रत्येक माणूस जीवनात काहीतरी शोधत असतो. आपणास कुणाची तरी ओढ लागलेली असते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून ह्या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर आपल्या आत्म्याला परमेश्वराची ओढ लागली आहे हे आपणास दिसून येईल. प्रत्येक जीव परमेश्वराचा शोध घेत आहे. केवळ परमेश्वर जो जीवनाचा पिता आणि दाता आहे तो ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. प्रभू येशू आपणा सर्वांना त्याच्याजवळ त्याच्या प्रेमाचा, त्याच्या अस्तित्वाचा अनुभव घेण्यासाठी बोलावत आहे. "या आणि पाहा" परमेश्वर किती चांगला आहे. आपण आपल्या परमेश्वराला वैयक्तिकरीत्या ओळखावे अशी त्याची इच्छा आहे. परमेश्वराला आपल्यामध्ये "खडका" सारखा मजबूत विश्वास हवा आहे. ज्या शिष्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला ते धन्य. प्रभू परमेश्वर आपणांसदेखील शिष्यांप्रमाणे त्याच्यावर मनापासून विश्वास ठेवण्यास बोलावत आहे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, आमच्या तारणदात्या प्रभू, तुझ्या सुवार्तेची साक्ष देण्यास मला तुझी प्रेरणा व कृपा दे, आमेन.

✝️