Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Monday 24th June 2024 | 12 week in ordinary Time

सामान्य काळातील बारावा  आठवडा

 सोमवार  २४ जून २०२४

 "हा बाळक होणार तरी कोण ?" कारण प्रभू त्याच्याबरोबर होता.

"What then will this child be?" For the hand of the Lord was with him. 




संत योहान बाप्तिस्ता महान संदेष्टा
 त्याचा जन्मोत्सव  

ख्रिस्तसभा आज संत योहान बाप्तिस्ता जो प्रभूचा मार्ग तयार करणारा  महान संदेष्टा झाला त्याचा जन्मोत्सव साजरा करीत आहे. योहान आपली आई  अलीशिबा हिच्या उदरात असतानाच मरियामातेद्वारे प्रभूच्या पावन स्पर्शाने पवित्र आत्म्यात परिपूर्ण झाला होता. त्याची आई अलीशिबा व बाप जखऱ्या वयातीत होते व त्यांना मूलबाळ होणे अशक्य होते. मात्र देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत.  देवाच्या तारण कार्याच्या योजनेतील महत्त्वाचा संदेश देणारा योहान पवित्र आत्म्याठायी बलवान व सामर्थ्यशाली बनला. त्याने लोकांना पश्चात्तापाचा व पाण्याचा बाप्तिस्मा दिला. तारणाऱ्याचे स्वागत करण्यासाठी त्याने लोकांची पूर्व तयारी केली.
याकोबाच्या वंशाचा उद्धार व्हावा व इस्त्राएलच्या लोकांना परत आणावे म्हणूनच योहान बाप्तिस्ताचा जन्म झाला होता.
जखऱ्या व अलीशिबा हे वृद्ध जोडपे म्हणजे जे अपत्यहीन आहेत  त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे. त्यांच्या मध्यस्थीने आपण अपत्य नसलेल्या सर्व जोडप्यांसाठी प्रार्थना करु या. योहान बाप्तिस्ताप्रमाणे लोकांना येशूची ओळख करून देण्यासाठी आपण धैर्याने साक्ष देऊ या.
 
  
पहिले वाचन :  यशया ४९ :१-६
वाचक : यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो."
द्वीपांनो, माझे ऐका, दूरदूरच्या राष्ट्रांनो, कान द्या. मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले, मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले. त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारीसारखे केले, त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवले, त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भात्यात गुप्त ठेवले. तो मला म्हणाला, "तू माझा सेवक आहेस, मला शोभा आणणारा तू इस्राएल आहेस." मी तर म्हणालो होतो की, "मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच आणि निरर्थक वेचले. तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे, माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे."
मी याकोबाला त्याच्याकडे परत आणावे, त्याच्याजवळ इस्राएल एकत्र जमवावे म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाशयात घडवले, ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला आणि जो माझा देव माझे सामर्थ्य झाला, तो परमेश्वर म्हणतो: “याकोबाच्या वंशाचा उध्दार करावा, इस्राएलच्या रक्षिलेल्या लोकांना परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे यात काही मोठेसे नाही, तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो.”
प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Isaiah 49:1-6

Listen to me O coastlands, and give attention, you peoples from afar. The Lord called me from the womb, from the body of my mother he named my name. He made my mouth like a sharp sword; in the shadow of his hand he hid me; he made me a polished arrow; in his quiver he hid me away. And he said to me, "You are my servant, Israel, in whom I will be glorified." But I said, "I have laboured in vain; I have spent my strength for nothing and vanity; yet surely my right is with the Lord, and my recompense with my God." And now the Lord says, he who formed me from the womb to be his servant, to bring Jacob back to him; and that Israel might be gathered to him - for I am honoured in the eyes of the Lord, and my God has become my strength - he says: "It is too light a thing that you should be my servant to raise up the tribes of Jacob and to bring back the preserved of Israel; I will make you as a light for the nations, that my salvation may reach to the end of the earth."

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र १३९:१-३,१३-१५
प्रतिसाद :   अद्भुत रीतीने माझी घडण झाली होती

१.) हे परमेश्वरा, तू मला पारखतोस. तू मला ओळखतोस, 
माझे बसणे आणि माझे उठणे तू जाणतोस,
 तू दुरून माझे मनोगत समजतोस.
तू माझे चालणे आणि माझे निजणे बारकाईने पाहतासे, 
माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे.

२. )तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस, 
तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस.
 भयप्रद आणि अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे. 
म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो. 

३.) तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव
 पूर्णपणे जाणून आहे, 
मी गुप्त स्थळी निर्माण होत असता 
आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण 
प्रकारे माझी घडण होत असता 
माझी आकृती तुला गुप्त नव्हती.



Psalm 139:1-3, 13-14, 15

I thank you who wonderfully made me. O Lord, you search me and you know me. You yourself know my resting and my rising; you discern my thoughts from afar. You mark when I walk or lie down; you know all my ways through and through. R

For it was you who formed my inmost being, knit me together in my mother's womb. I thank you who wonderfully made me; how wonderful are your works, which my soul knows well! R

My frame was not hidden from you, when I was being fashioned in secret and moulded in the depths of the earth. R




दुसरे वाचन   प्रेषितांची कृत्ये  १३ : २२-२६
वाचक :प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"ख्रिस्ताच्या प्रकट होण्यापूर्वी योहानाने घोषणा केली होती."

पौल म्हणाला, "देवाने आपल्या पूर्वजांना राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की, 'इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिध्दीस नेईल.' ह्या मनुष्याच्या वंशजातून देवाने वचनानुरूप इस्राएलसाठी येशू हा तारणारा उदयास आणला. त्याच्या प्रकट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चात्तापाच्या स्नानसंस्काराची सर्व इस्त्राएल लोकांमध्ये घोषणा केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करत असता म्हणाला, 'मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते? मी तो नव्हे. तर पाहा, ज्याच्या पायातील वहाणा सोडण्यास मी योग्य नाही असा कोणी माझ्यामागून येत आहे.'
"अहो बंधुजनहो, आब्राहामाच्या वंशातील पुत्रांनो आणि तुम्हांपैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे.”
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading : Acts 13:22-26

In those days: Paul said, "God raised up David to be their king, of whom he testified and said, 'I have found in David the son of Jesse a man after my heart, who will do all my will.' Of this man's offspring God has brought to Israel a Saviour, Jesus, as he promised. Before his coming, John had proclaimed a baptism of repentance to all the people of Israel. And as John was finishing his course, he said, 'What do you suppose that I am? I am not he. No, but behold, after me one is coming, the sandals of whose feet I am not worthy to untie. "Brothers, sons of the family of Abraham, and those among you who fear God, to us has been sent the message of this salvation."

This is the word of God 
Thanks be to God 


जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
हे बाळका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिध्द करण्याकरिता तू त्याच्यापुढे चालशील.
 आलेलुया!

Acclamation: 
 You, child, will be called the prophet of the Most High; for you will go before the Lord to prepare his ways.

शुभवर्तमान लूक  १:५७-६६,८०
वाचक :   लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"ह्याचे नाव योहान आहे."

अलीशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी आणि नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले. मग आठव्या दिवशी असे झाले की, ते बाळकाची सुंता करण्यास आले. त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या ठेवणार होते. परंतु त्याच्या आईने म्हटले, "ते नको, ह्याचे नाव योहान ठेवायचे आहे.” ते तिला म्हणाले, "ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही." मग ह्याचे नाव काय ठेवायचे आहे, असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्याने पाटी मागवून "ह्याचे नाव योहान आहे, " असे लिहिले. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाला धन्यवाद देत बोलू लागला. ह्यावरून त्यांच्यासभोवती राहणाऱ्या सर्वांना भय वाटले आणि यहूदीयाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले. ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंतःकरणांत ठेवून म्हटले, "हा बाळक होणार तरी कोण ?" कारण प्रभू त्याच्याबरोबर होता.
तो बाळक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला आणि इस्राएलला प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला.

लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading Luke 1:57-66, 80

Now the time came for Elizabeth to give birth, and she bore a son. And her neighbours and relatives heard that the Lord had shown great mercy to her, and they rejoiced with her. And on the eighth day they came to circumcise the child. And they would have called him Zechariah after his father, but his mother answered, "No; he shall be
called John." And they said to her, "None of your relatives is called by this name." And they made signs to his father, enquiring what he wanted him to be called. And he asked for a writing tablet and wrote, "His name is John." And they all wondered. And immediately his mouth was opened and his tongue loosed, and he spoke, blessing God. And fear came on all their neighbours. And all these things were talked about through all the hill country of Judea, and all who heard them laid them up in their hearts, saying, "What then will this child be?" For the hand of the Lord was with him. And the child grew and became strong in spirit, and he was in the wilderness until the day of his public appearance to Israel.
 This is the Gospel of the Lord  
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनजॉन द बाप्तिसचा जन्म लोकांना ख्रिस्ताच्या स्वागतासाठी तयार करण्याच्या उद्देशाने झाला होता. मुक्ती देणाऱ्याचा जन्म इतरांपेक्षा वेगळा आहे. त्याचे आईवडील वयाने मोठे होते आणि आई वांझ होती. म्हणजे त्याचा जन्म मानवी शक्यतेच्या मर्यादेपलीकडे होता. पण देवाला अशक्य असे काहीच नाही. जॉन द बाप्तिसचा जन्म हा दैवी कृपेचा होता. जकारियाची प्रार्थना ऐकली गेली. या मुलाचा जन्म, इस्राएलाच्या संदेष्टाच्या पंक्तीत ख्रिस्ताच्या आगमनाची त्वरीत तयारी होती. जर जकारिया हा देवदूताचा संदेश खरा असल्याचे चिन्ह असेल तर मूकपणा, बोलणाऱ्या देवाच्या उपस्थितीत मानवी वास्तविकता शांत राहून नम्रतेने आणि विश्वासाने ऐकली पाहिजे. एकदा वचन पूर्ण झाले आणि देवदूताने सांगितल्याप्रमाणे मुलाचे नाव ठेवले जाते. जकारिया स्तुतीच्या स्तोत्रातून बाहेर पडतो.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, जखऱ्या, अलीशिबा आणि योहान ह्यांचा आदर्श जीवनातून प्रकट करता यावा म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

✝️