सामान्य काळातील बारावा
रविवार २३ जून २०२४
"तुम्ही इतके भित्रे कसे ? तुम्हाला विश्वास कसा नाही ?""Why are you so afraid? Have you still no faith?"
Thanks be to God
त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "आपण पलीकडे जाऊ या." मग लोकसमुदायाला सोडल्यावर, येशू मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले आणि लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की, तो पाण्याने भरू लागला. येशू तर मचव्याच्या मागील बाजूस उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, "गुरुजी आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय ?" तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, “उगा राहा, शांत हो.” मग वारा पडला आणि अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, "तुम्ही इतके भित्रे कसे ? तुम्हाला विश्वास कसा नाही ?" तेव्हा ते अतिशय घाबरले आणि एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा आणि समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात.”
0 टिप्पण्या