Marathi Bible Reading | Saturday 22nd June 2024 | 11 week in ordinary Time

सामान्य काळातील अकरावा  आठवडा

 शनिवार २२ जून २०२४

"ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला. ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.""Therefore do not be anxious about tomorrow, for tomorrow will be anxious for itself. 



 संत जॉन फिशर व संत थॉमस मूर
- कार्डिनल बिशप आणि रक्तसाक्षी

'आय डाय टुडे, यू डाय टुमारो' 'माझ्या ह्या भूमिकेमुळे मला आज मरावे लागले तरी हरकत नाही परंतु एक दिवस तुम्हालाही मरण येणार आहे आणि देवासमोर उभे राहायचे आहे हे विसरु नका.'
५ जुलै १५३५ साली त्यांनी आपली मान कोतवालाच्या समोर शिरच्छेदासाठी पुढे केली.
सर थॉमस मोर हे त्यांच्या काळातील अभिजात साहित्याचे निर्मातेही होते.

चिंतन : मी माझ्या सद्सद्विवेक बुद्धीविरुद्ध जाईन अशा कोणत्याही गोष्टीला आतापर्यंत देवाच्या दयेमुळे संमती दिलेली नाही. हे मी दैवी सामर्थ्यच समजतो. मला ही विवेकबुद्धी देणाऱ्या देवाला मी धन्यवाद देतो.. - संत थॉमस मोर         
✝️
    
पहिले वाचन : २ इतिहासा २४:१७-२५
वाचक : इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन

“परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात तुम्ही जखऱ्याला ठार केले. " 
यहोयाद मरण पावल्यानंतर यहुदाच्या सरदारांनी राजाकडे जाऊन त्याला मुजरा केला आणि राजाने त्यांचे म्हणणे ऐकले. मग ते आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या मंदिराचा त्याग करून अशेरा मूर्ती आणि इतर मूर्ती यांची उपासना करू लागले. या त्यांच्या अपरांधामुळे परमेश्वराचा क्रोध यहुदावर आणि येरुशलेमवर भडकला, तरी त्यांना आपणाकडे परत आणावे म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्टे पाठविले; त्यांनी त्यांचा निषेध केला पण ते काही ऐकेनात. मग परमेश्वराचा आत्मा यहोयाद याजकाचा पुत्र जखऱ्या याच्या ठायी आला. त्याने उंच जागी उभे राहून लोकांना म्हटले, “देव म्हणतो, 'तुम्ही परमेश्वराची आज्ञा का उल्लंघिता? अशाने तुम्हाला यश येणार नाही. तुम्ही परमेश्वराला सोडले म्हणून त्यानेही तुम्हाला सोडले आहे. " पण त्यांनी त्याच्याविरुद्ध कट करून राजाज्ञेने मंदिराच्या अंगणात त्यास दगडमार केला. याप्रमाणे त्याचा बाप यहोयाद याने केलेले उपकार योवाश राजा स्मरला नाही, पण त्याने त्याच्या पुत्रांना वधले. त्याच्या मृत्यूसमयी तो म्हणाला, “परमेश्वरा, हे अवलोकन करून याचे उराने फेड."
नवे वर्ष लागताच अराम्यांच्या सेनेने यांवाशवर स्वारी यहुदा आणि येरुशलेम यांच्यावर चालून येऊन त्यांनी त्या लोकांपैकी जे सरदार होते त्यांचा नायनाट केला आणि त्याचे सर्व धन लुटून दिमिष्काच्या राजाकडे पाठवून दिले. अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी परमेश्वराने त्यांच्या हाती एक फार मोठे सैन्य लागू दिले, कारण त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा त्याग केला होता. याप्रकारे त्यांनी योवाशला शासन केले.
ते त्याला मोठाल्या जखमांनी घायाळ करून निघून गेले, तेव्हा त्याच्या सेवकांनी गहोयाद याजकाच्या पुत्राच्या खुनाकरिता त्याच्याशी फितुरी करून तो बिछान्यावर पडला असताना त्याच्यावर प्रहार करून त्याला ठार केले. त्यांनी त्याला दावीदपुरात मूठमाती दिली, राजांच्या कबरस्थानात दिली नाही.
प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :2 Chronicles 24:17-25

After the death of Jehoiada the princes of Judah came and paid homage to the king. Then the king listened to them. And they abandoned the house of the Lord, the God of their fathers, and served the Asherim and the idols. And wrath came upon Judah and Jerusalem for this guilt of theirs. Yet he sent prophets among them to bring them back to the Lord. These testified against them, but they would not pay attention. Then the Spirit of God clothed Zechariah the son of Jehoiada the priest, and he stood above the people, and said to them, "Thus says God, Why do you break the commandments of the Lord, so that you cannot prosper? Because you have forsaken the Lord, he has forsaken you." But they conspired against him, and by command of the king they stoned him with stones in the court of the house of the Lord. Thus Joash the king did not remember the kindness that Jehoiada, Zechariah's father, had shown him, but killed his son. And when he was dying, he said, "May the Lord see and avenge!" At the end of the year the army of the Syrians came up against Joash. They came to Judah and Jerusalem and destroyed all the princes of the people from among the people and sent all their spoil to the king of Damascus. Though the army of the Syrians had come with few men, the Lord delivered into their hand a very great army, because Judah had forsaken the Lord, the God of their fathers. Thus they executed judgment on Joash. When they had departed from him, leaving him severely wounded, his servants conspired against him because of the blood of the son of Jehoiada the priest, and killed him on his bed. So he died, and they buried him in the city of David, but they did not bury him in the tombs of the kings.
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ८९:४-५, २९-३०, ३१ - ३३,३४
प्रतिसाद :  मी त्याच्यावर नेहमी दया करीन.

१) "मी आपल्या निवडलेल्या पुरुषाशी करार केला आहे, 
मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे;
 मी तुझ्या संततीची परंपरा सर्वकाळ चालवीन, 
तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापीन."

२) "मी आपली दया त्याच्यावर सर्वकाळ कायम ठेवीन. 
त्याच्याशी केलेला माझा करार अढळ राहील,
 त्यांची संतती सर्वकाळ राहील आणि 
त्याचे राजासन स्वर्गाच्या दिवसाप्रमाणे 
अक्षय राहील असे करीन."

३) "जर त्याच्या वंशजांनी माझे नियमशास्त्र सोडले, 
माझ्या निर्णयाप्रमाणे ते चालले नाहीत, 
जर माझे नियम त्यांनी मोडले, 
माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत; 
तर मी त्याच्या अपराधांचे शासन दंडाने करीन. 
त्याच्या अनीतीचा शासन फटक्यांनी करीन."

४) “तरी त्याच्यावरील माझी दया मी दूर करण्यासाठी 
मी आपल्या सत्य वचनाचा भंग करणार नाही,"



Psalm 89:4-5, 29-30, 31-32, 33-34

I will keep my faithful love for him always. 
"With my chosen one I have made a covenant; 
I have sworn to David my servant: 
I will establish your descendants forever, 
and set up your throne through all ages."

"I will keep my faithful love for him always; 
with him my covenant shall last. 
I will establish his descendants forever, 
and his throne as lasting as the days of heaven." R

"If his descendants forsake my law
and refuse to walk as I decree,
and if ever they violate my statutes,
failing to keep my commands." R

"Then I will punish their offences with the rod;
then I will scourge them on account of their guilt.
But I will never take back my mercy;
my fidelity will never fail." R

जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊ.
 आलेलुया!

Acclamation: 
 Though Jesus Christ was rich, yet for your sake he became poor, so that youby his poverty might become rich.

शुभवर्तमान मत्तय ६:२४-३४
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
“उद्याची चिंता करू नका."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल आणि दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. 
“ह्यांस्तव मी तुम्हाला सांगतो की, आपल्या जीवनाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करीत  बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही? आकाशातील पाखरांकडे निरखून पाहा, ती पेरणी करीत नाही, कापणी करीत नाहीत की कोठारात साठवीत नाहीत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयाला देतो, तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहा की नाही ? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढविण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता ? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत आणि सूत कातीत नाहीत तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या वैभवात त्यातल्या एकासारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे आणि उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो तुम्हांला विशेष पोषाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेषकरून तुम्हांला पोषाख घालणार नाही काय? ह्यास्तव 'काय खावे,' 'काय प्यावे,' 'काय पांघरावे,' असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील.
"ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला. ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे."

लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading Matthew 6:24-34

At that time: Jesus said to his disciples, "No one can serve two masters, for either he will hate the one and love the other, or he will be devoted to the one anddespise the other. You cannot serve God and money." "Therefore I tell you, do not be anxious about your life, what you will eat or what you will drink, nor about your body, what you will put on. Is not life more than food, and the body more than clothing? Look at the birds of the air: they neither sow nor reap nor gather into barns, and yet your heavenly Father feeds them. Are you not of more value than they? And which of you by being anxious can add a single hour to his span of life? And why are you anxious about clothing? Consider the lilies of the field, how they grow: they neither toil nor spin, yet I tell you, even Solomon in all his glory was not arrayed like one of these. But if God so clothes the grass of the field, which today is alive and tomorrow is thrown into the oven, will he not much more clothe you, O you of little faith? Therefore do not be anxious, saying, "What shall we eat?' or 'What shall we drink?' or 'What shall we wear?" For the Gentiles seek after all these things, and your heavenly Father knows that you need them all. But seek first the kingdom of God and his righteousness, and all these things will be added to you. "Therefore do not be anxious about tomorrow, for tomorrow will be anxious for itself. Sufficient for the day is its own trouble.

 This is the Gospel of the Lord  
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनअवाजवी चिंता आणि काळजी हे आपल्या अनेक समस्यांचे मूळ कारण आहे असे दिसते, शारीरिक, आध्यात्मिक आणि मानसिक देशाची लालच आपल्या हृदयाला कमकुवत बनवत असते. हृदय हे आपल्या प्रेमाने क्षमेने व करुणेने भरले असायला पाहिजे. ह्या ऐवजी आपले हृदय राग, मत्सर, हेवा आणि अनैतिक हेतूने भरलेले आहे. या कारणांमुळे आपण सुख, शांती व आनंद हरवून बसतो. म्हणून आपले हृदय देवाच्या प्रेमाने भरलेले असले पाहिजे. त्याद्वारे आपण आपल्या कुटुंबियांवर,शेजाऱ्यांवर, शत्रूवर प्रेम करू शकतो व अशाप्रकारे सुखी, आनंदी, समाधानी जीवन जगू शकतो.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुझी वचने आत्मसात करून तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास व तुझ्या आज्ञा पाळण्यास आम्हाला कृपा दे, आमेन

✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या