सामान्य काळातील बारावा आठवडा
मंगळवार २५ जून २०२४
"अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आणि मार्ग पसरट आहे Enter by the narrow gate, since the road that leads to destruction is wide and spacious, and many take it;
जीवनातील मौल्यवान सुवर्ण नियम सांगितला आहे. हा सुवर्ण नियम स्वतःच्या आचरणावर चिंतन करायला लावित असतानाच परस्पर संबंधाविषयी आपल्याला जागृत करतो. प्रभू म्हणतो, 'लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.' जीवनाचा हा सुवर्ण नियम आपल्याला अंतर्मुख बनून चिंतन करायला भाग पाडतो. प्रत्येकाला वाटते की इतरांनी माझ्याशी प्रेमाने, सामंजस्याने, शांतीने व संयमाने वागावे. त्याचप्रमाणे इतरांनी माझी सुख दुःखे, अडचणी व समस्या समजून घ्याव्यात. इतरांनी माझ्यावर दया करावी. इतरांनी मला मदत करावी. आपल्याला इतरांकडून चांगल्या वागणुकीची जशी अपेक्षा आहे तसेच आपण सुद्धा त्यांच्याबरोबर चांगुलपणाने वागणे गरजेचे आहे. अशा वागण्याने सर्वांचे जीवन सुरळीत, सुसह्य आणि शांतीपूर्ण बनू शकते. आज खरोखरच ह्या सुवर्ण नियमावर शक्य होईल तेवढे चिंतन करुन त्याप्रमाणे इतरांबरोबर वागण्याचा प्रयत्न करु या.
पहिले वाचन : २ राजां १९:९,११.१४-२१.३१-३६
वाचक : राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन "मी स्वतः करिता आणि दावीदकरिता या नगराचे सरंक्षण करीन."
सन्हेरिबने पुन्हा हिज्कीयाला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, "तुम्ही यहुदाचा राजा हिज्कीया याच्याकडे जाऊन सांगा : 'ज्या तुझ्या देवावर तू भिस्त ठेवतोस तो, असिरियाच्या राजाच्या हाती येरुशलेम लागणार नाही, असे बोलून तुला न फसवो.' असिरियाच्या राजांनी सर्व देशांचे काय केले ते पाहा, त्याचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेच. तर मग तू सुटशील काय ?"
हिज्कीयाने जासुदांच्या हातून हे पत्र घेऊन वाचले. त्यानंतर हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेवले. मग हिज्कीयाने परमेश्वराची प्रार्थना केली की, "हे परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, करुबारूढ असलेल्या देवा, तूच एकमेव पृथ्वीवरील सर्व राजांचा देव आहेस, तूच आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली. हे परमेश्वरा, कान लावून ऐक. हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पाहा आणि सन्हेरिबने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठीजो निरोप पाठवला आहे त्याचे शब्द ऐक. हे परमेश्वरा, खरोखर असिरियाच्या राजांनी सर्व राष्ट्र आणि त्यांच्या जमिनी ओसाड केल्या आहेत. त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत. कारण ते देव नव्हते, ते मनुष्यांच्या हातांनी घडलेले काष्ठ आणि पाषाण होते म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला. आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्यांच्या हातातून आम्हाला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्र म्हणतील की, तूच एकमेव परमेश्वर देव आहेस.
तेव्हा आमोजचा पुत्र यशया याने हिज्कीयाला पाठवून सांगितले की, "परमेश्वर इस्राएलचा देव असे म्हणतो : असिरियाचा राजा सन्हेरीब यासंबंधाने तू माझी प्रार्थना केली ती मी ऐकली आहे. तर त्याच्याविषयी परमेश्वर जे वचन बोलला आहे ते हे : येरुशलेमेतून अवशिष्ट निघेल आणि सियोन डोंगरातून बचावलेले निघतील. परमेश्वराची आस्था हे सिद्धीस नेईल.
"ह्याकरिता असिरियाच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की तो या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही; तो ढाल घेऊन त्याच्याशी सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा लावणार नाही. ज्या वाटेने जो आला त्या वाटेने तो परत जाईल; त्यांचा ह्या नगरात प्रवेश होणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. मी स्वतः करिता आणि माझा सेवक दावीद ह्याच्याकरिता या नगराचा उद्धार करण्यासाठी त्याचे संरक्षण करीन."त्या रात्री परमेश्वराच्या देवदूताने जाऊन असिरियाच्या गोटातले एक लक्ष पंचाऐशी हजार लोक मारले. पहाटेस लोक उठून पाहतात तो सर्व प्रेतेच प्रेते ! सन्हेरीब तळ उठवून माघारी चालता झाला आणि निनवेस जाऊन राहिला.
प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :2 Kings 19:9b-11, 14-21, 31-35a, 36
Sennacherib, King of Assyria, sent messengers to Hezekiah, saying, Tell Hezekiah king of Judah this, "Do not let your God on whom you are relying deceive you with the promise: Jerusalem will not fall into the king of Assyria's clutches. You have learnt by now what the kings of Assyria have done to all the other countries, devoting them to destruction. Are you likely to be saved?"' Hezekiah took the letter from the messengers' hands and read it; he then went up to the Temple of Yahweh and spread it out before Yahweh. Hezekiah said this prayer in the presence of Yahweh, 'Yahweh Sabaoth, God of Israel, enthroned on the winged creatures, you alone are God of all the kingdoms of the world, you made heaven and earth. Give ear, Yahweh, and listen; open your eyes, Yahweh, and see! Hear the words of Sennacherib, who has sent to insult the living God. It is true, Yahweh, that the kings of Assyria have destroyed the nations, they have thrown their gods on the fire, for these were not gods but human artefacts-wood and stone-and hence they have destroyed them. But now, Yahweh our God, save us from his clutches, I beg you, and let all the kingdoms of the world know that you alone are God, Yahweh.' Isaiah son of Amoz then sent the following message to Hezekiah, 'Yahweh, God of Israel, says this, "I have heard the prayer which you have addressed to me about Sennacherib king of Assyria." Here is the pronouncement which Yahweh has made about him: "She despises you, she scorns you, the virgin daughter of Zion; she tosses her head at you, the daughter of Jerusalem! A remnant will issue from Jerusalem, and survivors from Mount Zion. Yahweh Sabaoth's jealous love will accomplish this."............................
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ४७:२-३अ, ३ब-४,१०-११
प्रतिसाद : परमेश्वर आपले नगर सर्वकाळ स्थिर राखतो.
१ परमेश्वर थोर आहे, आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र डोगरावर, तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे; उच्चतेमुळे सुंदर आणि सर्व पृथ्वीचा आनंद आहे.
२ उत्तम सीमेवरील सियोन पर्वत, राजाधिराजाचे नगर ! देव त्याच्या प्रासादांमध्ये आश्रयदुर्ग असा प्रकट झाला आहे.
३ हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन करतो.
हे देवा, जसे तुझे नाव, तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे.
Psalm 48:2-3ab, 3cd-4, 10-11
R. God upholds his city for ever.
Great is the LORD and wholly to be praised
in the city of our God.
His holy mountain, fairest of heights,
is the joy of all the earth.
R. God upholds his city for ever.
Mount Zion, “the recesses of the North,”
is the city of the great King.
God is with her castles;
renowned is he as a stronghold.
R. God upholds his city for ever.
O God, we ponder your mercy
within your temple.
As your name, O God, so also your praise
reaches to the ends of the earth.
Of justice your right hand is full.
R. God upholds his city for ever.
R. God upholds his city for ever.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे, तू आम्हाला सत्यात समर्पित कर.
आलेलुया!
Acclamation:
You, child, will be called the prophet of the Most High; for you will go before the Lord to prepare his ways.
शुभवर्तमान मत्तय ७:६.१२-१४
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"लोकांनी जसे तुमच्यापाशी वागावे अशी तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले,"जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोत्ये डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर डुकरे ती मोत्ये कदाचित आपल्या पायांखाली तुडवतील आणि उलटून तुम्हांला फाडतील."
लोकांनी जसे तुमच्याशी वागावे अशी तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्याच्याशी वागा, कारण नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ हेच होत. "अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आणि मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणरे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आणि मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो असे ते थोडके आहेत."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading: Matthew 7:6, 12-14
Jesus said to his disciples: 'Do not give dogs what is holy; and do not throw your pearls in front of pigs, or they may trample them and then turn on you and tear you to pieces. So always treat others as you would like them to treat you; that is the Law and the Prophets. Enter by the narrow gate, since the road that leads to destruction is wide and spacious, and many take it; but it is a narrow gate and a hard road that leads to life, and only a few find it.'
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: जर तुम्हाला सोपे किंवा अवघड यापैकी एक निवडायचे असेल तर अवघड निवडा, कारण ते शेवटी तुम्हाला खऱ्या आनंदाकडे घेऊन जाईल. मॉर्डन तंत्रज्ञान आणि फास्ट फूडच्या युगात संत इग्नेशियस लोयोलाचा सल्ला माणूस सोपा मार्ग निवडत आहे आणिकामे पूर्ण करण्याचा झटपट मार्ग निवडत आहे. या गोष्टी फार काळ टिकत नाही आणि कोणतेही कठोर परिश्रम नसल्यामुळे ते त्याचे मूल्य गमावतात. येशूने एक अरूंद मार्ग प्रस्थापित केला आहे. जो केवळ काही लोक पायदळी तुडवतात. परंतु शेवटी घेऊन जातात. कठोर परिश्रम करून आणि कठीण काम पूर्ण केल्याने शाश्वत समाधान मिळते. सहज आणि आरामात मिळणाऱ्या आनंदाशी त्याची तुलना होऊ शकत नाही मी कोणत्या क्षेत्रात रूंद मार्ग स्वीकारत आहे ? मला विनाशाकडे नेत आहे का?
प्रार्थना : हे प्रभू येशू, जीवनातील परस्पर संबंधाचे गुपित जाणून त्याप्रमाणे
आचरण करण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या