सामान्य काळातील बारावा आठवडा
बुधवार २६ जून २०२४
“खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात,Beware of false prophets, who come to you in the clothing of sheep, but inwardly they are ravening wolves.
संत आन्थेल्म
• महागुरू, वर्तनसाक्षी (१९०५-११७८)
✝️
प्रभू म्हणतो 'काटेरी झाडावरून द्राक्षे व रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय ?' त्याचप्रमाणे वरवरून भक्तीमान वाटणारी, धार्मिकतेच्या गोष्टी सांगणारी व नीतिमत्तेविषयी शिकवण देणारी सर्वच माणसे चांगली असतातच असे नाही. आपण चांगल्या व खऱ्या नीतिमान आणि धार्मिक माणसांना ओळखायला शिकले पाहिजे. चांगल्या माणसांच्या जीवनात देवाला प्रथम प्राधान्य असते. अशा चांगल्या माणसांच्या जीवनरूपी झाडाला चांगलीच फळे येतात.
पहिले वाचन : २ राजे२२ : ८-१३,२३:१-३
वाचक : राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“नियमशास्त्राच्या ग्रंथातली वचने राजाने लोकांना ऐकू येतील अशी वाचून दाखवली, मग त्याने परमेश्वरासमोर करार केला. "
मुख्य याजक हिल्किय याने शाफान चिटणीस याला सांगितले की, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे." हिल्कियाने तो ग्रंथ शाफानला दिला आणि त्याने तो वाचला. शाफान चिटणिसाने योशीया राजाकडे परत येऊन त्याना असे कळवले की, “आपल्या सेवकांला मंदिरात जो पैसा मिळाला तो सर्व त्यांनी थैल्यांत भरून परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणाऱ्या कामगारांच्या हवाली केला आहे." शाफान चिटणिसाने योशीया राजाला आणखी असे सांगितले की, "हिल्किया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे." शाफानने तो राजाला वाचून दाखवला.
त्या नियमशास्त्राच्या ग्रंथातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली. मग त्याने हिल्किया याजक, शाफानचा पुत्र अहीकाम, मिखायचा पुत्र अखबोर, शाफान चिटणीस आणि राजसेवक असाया यांस आज्ञा केली की, “हा जो ग्रंथ सापडला आहे त्यातील मजकुरासंबंधाने तुम्ही जाऊन माझ्यातर्फे, प्रजेच्यातर्फे आणि सर्व यहुदाच्यातर्फे परमेश्वराला विचारा; आमच्या पूर्वजांनी या ग्रंथातील वचने ऐकली नाहीत आणि आमच्यासाठी जे यात लिहिले आहे ते पाळले नाही म्हणून परमेश्वराचा आम्हांवर मोठा क्रोध भडकला आहे."
मग राजाने यहुदातील आणि येरुशलेमतील सर्व वडीलजनांना बोलावणे पाठवून जमा केले. यहुदा येथील सर्व लोक, सर्व येरुशलेमातले रहिवाशी, याजक, संदेष्टे, सर्व आबालवृद्ध यांना बरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकांना ऐकू येतील अशी वाचून दाखवली. मग राजाने पीठावर उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की, मी परमेश्वराचे अनुसरण करीन आणि त्याच्या आज्ञा, निर्बंध आणि नियम जिवेभावे पाळीन, या ग्रंथात लिहिलेली सर्व वचने पाळीन; तेव्हा सर्व लोकांनी तो करार मान्य केला.
And Helcias the high
priest said to Saphan the scribe: I have found the book of the law in the house
of the Lord: and Helcias gave the book to Saphan, and he read it. And
Saphan the scribe came to the king, and brought him word again concerning that
which he had commanded, and said: Thy servants have gathered together the money
that was found in the house of the Lord, and they have given it to be
distributed to the workmen, by the overseers of the works of the temple of the
Lord.And Saphan
the scribe told the king, saying: Helcias the priest hath delivered to me a
book. And when Saphan had read it before the king, And the king had heard
the words of the law of the Lord, he rent his garments. And he commanded
Helcias the priest, and Ahicam the son of Saphan, and Achobor the son of Micha,
and Saphan the scribe, and Asaia the king’s servant, saying: Go and
consult the Lord for me, and for the people, and for all Juda, concerning the
words of this book which is found: for the great wrath of the Lord is kindled
against us, because our fathers have not hearkened to the words of this book,
to do all that is written for us. And they brought the king word again what she
had said. And he sent: and all the ancients of Juda and Jerusalem were
assembled to him.2 And the king went up to
the temple of the Lord, and all the men of Juda, and all the inhabitants of
Jerusalem with him, the priests and the prophets, and all the people both
little and great: and in the hearing of them all he read all the words of the
book of the covenant, which was found in the house of the Lord.3 And the king stood upon the step: and made a covenant with
the Lord, to walk after the Lord, and to keep his commandments, and his
testimonies and his ceremonies, with all their heart, and with all their soul,
and to perform the words of this covenant, which were written in that book: and
the people agreed to the covenant.
This is the word of God
प्रतिसाद स्तोत्र स्तोत्र ११९:३३-३७,४०
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचे मार्ग मला दाखव.
१) हे परमेश्वरा,तू आपल्या नियमांचे मार्ग मला दाखव,
म्हणजे ते मी शेवटपर्यंत धरुन राहीन.
तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि
ते मनापासून पाळावयास मला शिकव.
२) तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालव.
त्यातच मला आनंद आहे.
माझ्या मनाचा कल अन्याय्य लोभाकडे नको.
तर तुझ्या निर्बंधांकडे असू दे.
३) निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळव.
तुझ्या मार्गात मला नवजीवन दे.
पाहा, मला तुझ्या आदेशांचा ध्यास लागून राहिला आहे, तू आपल्या न्याय्यत्वाने मला नवजीवन दे.
R. (33a) Teach me the way
of your decrees, O Lord.
33 Set before me for a law
the way of thy justifications, O Lord:
and I will always seek after it.
R. Teach me the way of your
decrees, O Lord.
34 Give me understanding,
and I will search thy law;
and I will keep it with my whole heart.
R. Teach me the way of your
decrees, O Lord.
36 Incline my heart into
thy testimonies
and not to covetousness.
R. Teach me the way of your
decrees, O Lord.
37 Turn away my eyes that
they may not behold vanity:
quicken me in thy way.
R. Teach me the way of your
decrees, O Lord.
40 Behold I have longed
after thy precepts:
quicken me in thy justice.
R. Teach me the way of your
decrees, O Lord.
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो,
तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमची अंतःकरणे प्रफुल्लित कर..
आलेलुया!
Acclamation:
Remain in me, as I remain in you, says the Lord; whoever remains in me
will bear much fruit.
शुभवर्तमान मत्तय ७:१५-२०
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.”
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतर्यामी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय? त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. ह्यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
15 Beware of false
prophets, who come to you in the clothing of sheep, but inwardly they are
ravening wolves. By their fruits you
shall know them. Do men gather grapes of thorns, or figs of thistles?7 Even so every good tree
bringeth forth good fruit, and the evil tree bringeth forth evil fruit. A good tree cannot bring
forth evil fruit, neither can an evil tree bring forth good fruit. Every tree that bringeth
not forth good fruit, shall be cut down, and shall be cast into the fire. Wherefore by their
fruits you shall know them.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: ख्रिस्ती समुदाय हा चांगल्या आणि वाईटाचा बनलेला आहे. म्हणून विवेकबुद्धीचा सिद्धांत लागू करण्यासाठी योहान त्याच्या पहिल्या पत्रात म्हणतो, “प्रत्येक आत्मा हे ओळखत नाही की येशू देहात आला आहे. तो देवापासून नाही.” खऱ्या संदेष्टात शब्द आणि कृती यांच्यात मतभेद नसतात. एखाद्या व्यक्तीने केलेल्या कामावरून आपण त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखतो. येथे एक प्रकाश आहे. जो खऱ्या संदेष्टाला खोट्यापासून वेगळे करतो. अस्सल संदेष्टा सहज ओळखता येतो. ते काय म्हणतात आणि काय करतात ते अगदी जुळतात. खोटा संदेष्टा विषारी फळ देणाऱ्या सुंदर झाडासारखा असतो. देवालाआपल्याकडून जे हवे आहे ते ओठाच्या सेवेप्रमाणे नसून हृदयाची निष्ठा हवी आहे. चांगला माणूस फक्त बोलत नाही तर चांगल्या गोष्टी करतो.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, चांगले व योग्य त्याचा स्वीकार करण्यासाठी आम्हाला शहाणपण व विवेकबुद्धी दे, आमेन.
0 टिप्पण्या