सामान्य काळातील बारावा आठवडा
गुरुवार २७ जून २०२४
"ह्यास्तव जो प्रत्येकजण ही माझी वचने ऐकून त्याप्रमणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल.
"Everyone then who hears these words of mine and does them will be like a wise man who built his house on the rock.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू सूज्ञ आणि मूर्ख मनुष्यांविषयी स्पष्टीकरण करतांना खडकावर पाया घातलेले घर व वाळूवर बांधलेले घर ह्यांचा दाखला देत आहे. श्रद्धेच्या खडकावर उभारलेले जीवन कायम टिकणारे असते. आपले जीवन डळमळीत नसावे, आपल्या विश्वासात शंका नसावी.
तसेच आपण निराश न होता धैर्याने व चिकाटीने आपल्या जीवनाचा मार्ग क्रमावा| म्हणून प्रभू आपल्याला त्याचा सुज्ञपणा बहाल करीत आहे.जीवनातील संकटे, दुःखे, मोह, प्रलोभने अपयश अशा सर्व परिस्थितीत आपला सर्वांचा टिकाव लागावा म्हणून प्रभू येशूची वचने आत्मसात करून त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी प्रेरणा मागू या.
पहिले वाचन : २ राजे २४:८-१७
वाचक : राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"बाबेलच्या राजाने यहोयाखीन यास आणि देशातील सर्व अमीरवर्गास कैद करून बाबेल येथे नेले."यहोयाखीन राज्य करू लागला तेव्हा तो अठरा वर्षांचा होता. त्याने येरुशलेमात तीन महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नेहूष्टा असे होते. ती यरुशलेमच्या एलनाथानची कन्या होती. त्याने आपल्या बापाच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
त्याच्या कारकीर्दीत बाबेलचा राजा नबुखनेस्सर याच्या सेवकांनी येरुशलेमवर स्वारी करून नगराला वेढा दिला. बाबेलचा राजा नबुखनेस्सर याच्या सेवकांनी नगराला वेढा घातला असता तो स्वतः तेथे आला; तेव्हा यहुदाचा राजा यहोयाखीन आपली आई, सेवक, सरदार आणि खोजे यांना बरोबर घेऊन बाबेलच्या राजाकडे गेला. बाबेलच्या राजाने कारकिर्दीच्या आठव्या वर्षी त्याला पकडले. मग त्याने परमेश्वराच्या मंदिरात आणि राजवाड्यात ठेवलेले सारे धन लुटून नेले. शलमोन राजाने जी सोन्याची पात्रे करून परमेश्वराच्या मंदिरात ठेवली होती ती सर्व फोडून त्यांचे त्याने तुकडे केले; तसे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते. त्याने अवघे येरुशलेम म्हणजे सर्व सरदार, सर्व पराक्रमी वीर मिळून एकंदर दहा हजार लोक आणि सर्व कारागीर आणि लोहार यांना कैद करुन नेले; देशात अगदी कंगाल लोकांखेरीज कोणी राहिले नाहीत. त्याने यहोयाखीनला बाबेल येथे नेले. राजाची आई, राजाच्या स्त्रिया, खोजे आणि देशातील मोठमोठे लोक यांना त्याने कैद करून बाबेल येथे नेले, एकंदर सात हजार धट्टेकट्टे लोक आणि एक हजार कारागीर आणि लोहार बाबेलच्या राजाने कैद करून बाबेल येथे नेले, हे सारे युद्धास लायक आणि बळकट होते. बाबेलच्या राजाने त्याच्याजागी त्याचा चुलता मत्तन्या यास राजा केले, त्याने त्याचे नाव बदलून सिदकिया असे ठेवले.
प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading ::2 Kings 24:8-17
Jehoiachin was eighteen years old when he became king, and he reigned for three months in Jerusalem. His mother's name was Nehushta the daughter of Elnathan of Jerusalem. And he did what was evil in the sight of the Lord, according to all that his father had done. At that time the servants of Nebuchadnezzar king of Babylon came up to Jerusalem, and the city was besieged. And Nebuchadnezzar king of Babylon came to the city while his servants were besieging it, and Jehoiachin the king of Judah gave himself up to the king of Babylon, himself and his mother and his servants and his officials and his palace officials. The king of Babylon took him prisoner in the eighth year of his reign and carried off all the treasures of the house of the Lord and the treasures of the king's house, and cut in pieces all the vessels of gold in the temple of the Lord, which Solomon king of Israel had made, as the Lord had foretold. He carried away all Jerusalem and all the officials and all the mighty men of valour, ten thousand captives, and all the craftsmen and the smiths. None remained, except the poorest people of the land. And he carried away Jehoiachin to Babylon. The king's mother, the king's wives, his officials, and the chief men of the land he took into captivity from Jerusalem to Babylon. And the king of Babylon brought captive to Babylon all the men of valour, seven thousand, and the craftsmen and the metal workers, one thousand, all of them strong and fit for war. And the king of Babylon made Mattaniah, Jehoiachin's uncle, king in his place, and changed his name to Zedekiah.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ७९:१-२,३-५,८,९
प्रतिसाद : हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या गौरवासाठी आम्हाला साहाय्य कर.
१ हे देवा, तुझ्या वतनात परराष्ट्र शिरली आहेत;
त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे.
त्यांनी यरुशलेमचे ढिगार केले आहेत.
त्यांनी आकाशातल्या पाखरांना तुझ्या सेवकांची प्रेते
आणि पृथ्वीवरील पशूना तुझ्या भक्तांचे मांस खायला दिले आहे.
२ त्यानी येरुशलेमभोवती त्यांचे रक्त पाण्यासारखे वाहविले;
त्यांस पुरावयाला कोणी राहिले नाही.
आम्ही आमच्या शेजाऱ्यांना निंदास्पद
आणि आमच्या सभोवतालच्या लोकांना तुच्छ
आणि हास्यास्पद झालो आहोत.
हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार ?
तू सर्वकाळ कोपायमान राहणार काय ?
तुझा रोष अग्नीसारखा भडकत राहणार काय ?
३ आमच्याविरुद्ध आमच्या पूर्वजांची दुष्कर्म आठवू नकोस.
तुझी करुणा आमच्यावर सत्वर होवो,
कारण आम्ही फार दुर्दशेत पडलो आहोत.
४ हे आमच्या उद्धारक देवा,
तू आपल्या नावाच्या गौरवासाठी आम्हांला साहाय्य कर.
आपल्या नावाकरिता आम्हांला सोडव
आणि आमची पापे धुऊन टाक.
Psalm 79:1-2, 3-5, 8, 9
R. For the sake of the glory of your name,
free us O Lord. O God, the nations have invaded
your heritage; they have profaned your holy temple.
They have made Jerusalem a heap of ruins.
They have handed over the bodies of
your servants as food to feed the birds of heaven,
and the flesh of your faithful to the beasts of the earth. R
They have poured out their blood
like water round Jerusalem;
no one is left to bury the dead.
We have become the taunt of our neighbours,
the mockery and scorn of those around us.
How long, O Lord? Will you be angry forever?
Will your jealous anger burn like fire? R
Do not remember against us
the guilt of former times.
Let your compassion hasten to meet us;
for we have been brought very low. R
Help us, O God our saviour,
for the sake of the glory of your name.
Free us and forgive us our sins,
because of your name. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले.
आलेलुया!
Acclamation:
If anyone loves me, he will keep my word, says the Lord; and my Father will love him, and we will come to him.
शुभवर्तमान मत्तय ७:२१-२८
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"खडकावर बांधलेले घर आणि वाळूवर बांधलेले घर."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "मला 'प्रभुजी, प्रभुजी' असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल.” त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, 'प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला,तुझ्या नावाने भुते घालवली आणि तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय ?' तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, 'मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा.'
"ह्यास्तव जो प्रत्येकजण ही माझी वचने ऐकून त्याप्रमणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले; मग वारा सुटला, पाऊस पडला, पूर आला, आणि त्या घराला लागला; तरी ते पडले नाही; कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले; मग वारा सुटला पाऊस पडला, पूर आला, आणि त्या घराला लागला, तेव्हा ते पडले; अगदी कोसळून गेले."
येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाला; कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading: Matthew 7:21-29
At that time: Jesus said to his disciples, "Not everyone who says to me, 'Lord, Lord', will enter the kingdom of heaven, but the one who does the will of my Father who is in heaven. On that day many will say to me, 'Lord, Lord, did we not prophesy in your name, and cast out demons in your name, and do many mighty works in your name?' And then will I declare to them, 'I never knew you; depart from me, you workers of lawlessness. "Everyone then who hears these words of mine and does them will be like a wise man who built his house on the rock. And the rain fell, and the floods came, and the winds blew and beat on that house, but it did not fall, because it had been founded on the rock. And everyone who hears these words of mine and does not do them will be like a foolish man who built his house on the sand. And the rain fell, and the floods came, and the winds blew and beat against that house, and it fell, and great was the fall of it." And when Jesus finished these sayings, the crowds were astonished at his teaching, for he was teaching them as one who had authority, and not as their scribes.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: येशूने "उत्कृष्ट कृत्ये" करणाऱ्या प्रत्येक परूशांपासून सुवार्तेचे वर्तन स्पष्टपणे वेगळे केले आहे. आता तो मस्ती असल्याचा आव आणणाऱ्यांची आणि खोट्या चमत्काराच्या पोकळ शब्द प्रयोगाची निंदा करतात. न्यायाच्या वेळी, फक्त निकष शब्द वापराला जाईल. देवाचे जग खडकावर न बांधलेले घर एखाद्या वादळाच्या धडकेने कोसळते. त्यामुळे दृढ विश्वासाने न बांधलेले जीवन संकटे येतात. तेव्हा कोसळते. खडकासारखी सुसंगत असणे म्हणजे येशूचे वचन आचरणात आणणे. चाचणिच्या वेळी सुरक्षितेचे इतर सर्व स्तोत्र अयशस्वी होतील. केवळ विश्वासाची आज्ञा पालन टिकेल. येशू खात्री देतो. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर विश्वास ठेवा. माझ्यावरही विश्वास ठेवा. जर तुम्ही माझ्याकडे राहिलात आणि माझे शब्द तुम्हांमध्ये राहिले तर तुम्हांला खूप फळ मिळेल.
प्रार्थना : हे प्रभू, तुझी वचने माझ्या जीवनासाठी पोषक अन्न आहे. माझी श्रद्धा
बळकट करण्यास मला कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या