सामान्य काळातील बारावा आठवडा
शुक्रवार २८ जून २०२४
"माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो."
'I am willing. Be cleansed.'
संत आयरेनिअस
- महागुरू रक्तसाक्षी आणि धर्मपाल (१३०-२००)
आपण जेव्हा सामुदायिक प्रार्थनेसाठी एकत्र जमतो तेव्हा आपण एकाच ख्रिस्तशरीराचे अवयव म्हणून एकत्र येत असतो. -संत आयरेनिअस✝️
आजच्या शुभवर्तमानातील कुष्ठरोगी मोठ्या श्रद्धेने प्रभू येशूकडे आला. त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, 'प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करवयास आपण समर्थ आहां. कुष्ठरोगी सुद्धा श्रद्धेचा एक मोठा आदर्श आहे, तो स्वतः धैर्याने येशूजवळ आला. त्याने अतिनम्र बनून प्रभू समोर लोटांगण घातले, म्हणजेच तो प्रभूला शरण गेला. त्यानंतर त्याने प्रार्थनेत विनंती केली की, 'आपली इच्छा असली तर' म्हणजेच त्याने सर्वस्वी प्रभूवर भरवसा ठेवून त्याच्या इच्छेची प्रतिक्षा केली. अर्थात प्रभूच्या इच्छेप्रमाणे तो कुष्ठरोगी शुद्ध झाला.
आजच्या वचनांवर चिंतन करीत असतांना जाणवते की, श्रद्धा म्हणजे देवाठायी नम्रता, श्रद्धा म्हणजे देवासमोर शरणागती, श्रद्धेत प्रभूच्या इच्छेला संमत्ती द्यायची असते. श्रद्धा म्हणजे एखादी गोष्टी आपल्या जीवनात घडेलच ! अशा प्रकारे प्रभू वरील आपला भरवसा. आपली देवावरील श्रद्धा आपण कशा प्रकारे व्यक्त करतो त्यावर परिक्षणपूर्वक चिंतन करु या.
पहिले वाचन : २ राजे २५:१-१२
वाचक : राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"यहुदाला त्याच्या देशातून कैद करून नेण्यात आले."
सिकीयाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यातील दशमीस बाबेलचा राजा नबुखनेस्सर आपली सर्व सेना घेऊन येरुशलेमवर चढाई करून आला. त्याने त्याच्यासमोर तळ देऊन सभोवार मेढकोट उभारले. सिदकिया राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षांपर्यंत नगरास वेढा पडला होता. चवथ्या महिन्याच्या नवमीपासून नगरात एवढी महागाई झाली की, देशातील लोकांना काही खावयास मिळेना. मग नगराच्या तटाला एक खिंडार पाडण्यात आले. दोन्ही तटांच्यामध्ये जी वाट राजाच्या बागेपाशी होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले. नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता. इकडे राजाने अराबाचा रस्ता धरला. तेव्हा खास्दी सेनेने राजाचा पाठलाग करून त्याला यरिहोच्या मैदानात गाठले आणि त्याच्या सर्व सैन्याची दाणादाण केली. राजाला पकडून ते रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे घेऊन गेले. त्यांनी त्याची शिक्षा ठरवली. त्यांनी सिदकियाच्या पुत्रांचा त्याच्या डोळ्यांदेखत वध केला आणि सिदकियाचे डोळे फोडून त्याला बेड्यांनी जखडून बाबेलास नेले.
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी पाचव्या महिन्याच्या सप्तमीस नबुजरदान यरुशलेमास आला. हा बाबेलच्या राजाचा सेवक असून गारद्यांचा नायक होता. त्याने परमेश्वराचे मंदिर आणि राजवाडा ही जाळून टाकली, तशीच येरुशलेमातली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली. गारद्याच्या सरदारांबरोबर असलेल्या खास्द्यांच्या सर्व सैन्याने येरुशलेम भोवतालचे सर्व तट पाडून टाकले. शहरात शिल्लक राहिलेले लोक, बाबेलच्या राजाकडे फितूर होऊन गेलेले लोक आणि उरलेले साधारण लोक गारद्यांचा नायक नबुजरदान याने कैद करून नेले. देशातले जे लोक अतिशय कंगाल होते त्यांना गारद्यांच्या सरदाराने द्राक्षांच्या मळ्यांची आणि शेतांची मशागत करण्यास राखून ठेवले.
the ninth year of his reign, in the tenth month, on the tenth day of the month, Nebuchadnezzar king of Babylon advanced on Jerusalem with his entire army; he pitched camp in front of the city and threw up earthworks round it. The city lay under siege till the eleventh year of King Zedekiah. In the fourth month, on the ninth day of the month, when famine was raging in the city and there was no food for the populace, a breach was made in the city wall. The king then made his escape under cover of dark, with all the fighting men, by way of the gate between the two walls, which is near the king's garden - the Chaldaeans had surrounded the city - and made his way towards the Arabah. The Chaldaean troops pursued the king and caught up with him in the Plains of Jericho, where all his troops deserted. The Chaldaeans captured the king and took him to the king of Babylon at Riblah, who passed sentence on him. He had Zedekiah's sons slaughtered before his eyes, then put out Zedekiah's eyes and, loading him with chains, carried him off to Babylon. In the fifth month, on the seventh day of the month it was in the nineteenth year of Nebuchadnezzar king of Babylon - Nebuzaradan commander of the guard, a member of the king of Babylon's staff, entered Jerusalem. He burned down the Temple of Yahweh, the royal palace and all the houses in Jerusalem. The Chaldaean troops who accompanied the commander of the guard demolished the walls surrounding Jerusalem. Nebuzaradan commander of the guard deported the remainder of the population left in the city, the deserters who had gone over to the king of Babylon, and the rest of the common people. But the commander of the guard left some of the poor country people behind as vineyard workers and ploughmen.
This is the word of God
प्रतिसाद स्तोत्र स्तोत्र १३७:१-२,३,४-५,६
प्रतिसाद : मी जर तुझी आठवण ठेवली नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.
१ बाबेलच्या नद्यांजवळ आम्ही बसलो;
हो, तेथे आम्हाला सियोनची आठवण झाली;
तेव्हा आम्ही रडलो.
तेथील वाळुंजावर आम्ही आपल्या वीणा टांगून ठेवल्या.
२ कारण तेथे आमचा पाडाव करणाऱ्यांनी
आम्हाला गाणी गावयाला सांगितले;
आमचा छळ करणाऱ्यांनी आम्हाला
त्यांची करमणूक करावयास सागितले,
ते म्हणाले, "आम्हाला सियोनचे एखादे गाणे गाऊन दाखवा."
३ आम्ही परक्या स्थळी परमेश्वराचे गाणे कसे गावे ?
हे यरुशलेम, जर मी तुला विसरलो
तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.
४जर मी तुझी आठवण ठेवली नाही,
जर मी येरुशलेमला माझ्या आनंदाच्या
मुख्य विषयाहून अधिक मानले नाही,
तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.
Psalm 137:1-2, 3, 4-5, 6
O let my tongue cleave to my mouth if I remember you not!
By the rivers of Babylon we sat and wept
when we remembered Zion.
There on the poplars we hung our harps,
for there our captors asked us for songs,
our tormentors demanded songs of joy;
they said, “Sing us one of the songs of Zion!”
How can we sing the songs of the LORD
while in a foreign land?
If I forget you, Jerusalem,
may my right hand forget its skill.
May my tongue cling to the roof of my mouth
if I do not remember you,
if I do not consider Jerusalem my highest joy
आलेलुया, आलेलुया!
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंतःकरण प्रकाशित करो, म्हणजे त्यामुळे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही तुम्ही ओळखून घ्यावी
आलेलुया!
Acclamation:
Remain in me, as I remain in you, says the Lord; whoever remains in me
will bear much fruit.
शुभवर्तमान मत्तय ८:१-४
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहा."
येशू डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्यामागे चालले आणि पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला आणि त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, "प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहा." तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, "माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो." लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग येशूने त्याला म्हटले, "पाहा, हे कोणाला सांगू नकोस; पण जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरिता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Matthew 8:1-4
After Jesus had come down from the mountain large crowds followed him. Suddenly a man with a virulent skin-disease came up and bowed low in front of him, saying, 'Lord, if you are willing, you can cleanse me.' Jesus stretched out his hand and touched him saying, 'I am willing. Be cleansed.' And his skin-disease was cleansed at once. Then Jesus said to him, 'Mind you tell no one, but go and show yourself to the priest and make the offering prescribed by Moses, as evidence to them.'
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: देवाच्या मुलांना त्याच्या दैवी स्पर्शाची आवश्यकता आहे. आपल्या निर्मात्याशी आणि आई वडिलांशी असलेल्या बंधनांचा पुरावा आहे. येशूचे अकल्पनीय आम्हांला वाचवल्यामुळे, पापामुळे अस्पर्श झाला. तेव्हा - तो मरण पावला आणि आम्हांला खंडणी दिली. त्यांनी आपल्या ऐहिक जीवनात अस्पृश्यांना स्पर्श केला. येशूने कुष्ठ व्यक्तीला स्पर्श केला. जो समाजातून बहिष्कृत होता. कुष्ठरोग्याचा विश्वास होता. येशू त्याला बरे करू शकतो आणि नम्रपणे त्याला बरे होण्यासाठी आवाहन केले की, आणखी बोलले. शब्दापेक्षा अधिक वत्कृत्व येशूने देवाचे प्रेम आणि दया व्यक्त केली. त्याने त्या माणसाला स्पर्श करून केवळ शारीरिकच नाही तर आध्यात्मिक दृष्ट्याही शुद्ध केले. त्याचप्रमाणे अब्राहाम आणि सारा यांना देवाने बरे केले व त्यांना एक मूल ही दिले. देवाचा स्पर्श आपल्याला बदलू शकतो आणि आपल्याला संपूर्ण बनवू शकते.
प्रार्थना : हे प्रभू येशू, मी सर्वस्वी तुला शरण आलो आहे. माझी श्रद्धा बळकट कर व तुझ्या इच्छेनुसार करण्यास मला कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या