सामान्य काळातील बारावा आठवडा
शनिवार २९ जून २०२४
शिमोन पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.”
Simon Peter replied, "You are the Christ, the Son of the living God."
संत पीटर व संत पौल
प्रेषित व रक्तसाक्षी (६७)
संत पीटर
पेत्र येशूचा अत्यंत जवळचा शिष्य होता. डोंगरावरील येशूच्या रुपांतरसमयी (गौरवाच्या वेळी) गेथशेमाने बागेत (दुःखाच्या समयी) आणि याईरच्या कन्येला मरणातून जिवंत करताना (आनंदाच्या घटनेसमयी) येशू पेत्रला हटकून आपल्याबरोबर घेऊन गेला. रात्रभर कष्ट करूनही काहीही मासे न पकडणाऱ्या पेत्रला येशू आज्ञा करतो आणि जाळी फाटू लागेपर्यंत त्यांना मासळी मिळते. पुनरुत्थानाचा पहिला साक्षीदार म्हणून योहानबरोबर आपल्याला पेत्रसुद्धा शुभवर्तमानात भेटतो.
प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात अध्याय २ मध्ये आपण पेन्टेकॉस्ट म्हणजे पवित्र आत्म्याच्या आगमनाचा वृत्तांत वाचतो. त्यानंतर पेत्रने तीन प्रवचने दिली (प्रे. कृ. २, ४, १०) त्यामुळे प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत तीन हजाराहून अधिक लोकांनी बाप्तिस्मा घेतला. ज्युदासची रिकामी जागा भरून काढण्यासाठी घेतल्या गेलेल्या निवडणुकीचे नेतृत्व पेत्रने केले. यहुदी लोकांना आणि परराष्ट्रीयांना त्यानेच प्रथम ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. येशूच्या नावाने पहिले चमत्कार पेत्रने करून दाखविले (प्रे. कृ.३).
इ. स. ४९-५० साली येरुशलेम येथे भरलेल्या पहिल्या ख्रिस्ती धर्मपरिषदेत निर्णायक महत्त्वाचे भाषण पेत्रने केले. पेत्रने लिहिलेली दोन पत्रदेखील त्याचे ख्रिस्तसभेतील प्रमुखपद अगदी स्पष्ट करून सांगतात.
पुढे निरो राजाच्या अमदानीत व्हॅटिकन हिलेच्या बागेमध्ये पेत्र अथवा पीटर ह्यांना क्रूसावर उलटे टांगवून ठार मारण्यात आले. ते वर्ष होते इ. स. ६७ !
संत पौल
प्रेषित व रक्तसाक्षी (६७)
देऊळमाता दरवर्षी २५ जानेवारी रोजी संत पौलचे परिवर्तन हा सण साजरा करीत असते. (अधिक माहिती : २५ जानेवारी) रोममध्ये पीटर आणि पौल या महान प्रेषितांना एकाच दिवशी रक्तसाक्षीत्वाचे मरण आले अशी प्राचीन ख्रिस्तसभेची पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे. २९ जून २५८ रोजी त्यांच्या शरीरांचे अवशेष छळवाद्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी गुप्तपणे (संत) सेबेस्टीयनच्या गुहेमध्ये नेण्यात आले म्हणून हा दिवस त्यांच्या सणाचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आलेला आहे.
शुभवर्तमानकार योहान ह्यांच्यानंतर प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत असलेला सर्वात विद्वान प्रेषित म्हणून पौलकडे आदराने पाहिले जाते. ग्रीक आणि यहुदी संस्कृतींशी परिचित असलेल्या पौलला देवाने परराष्ट्रीयांना ख्रिस्ती धर्माची शुभवार्ता सांगण्यासाठी निवडलेले होते आणि हे कार्य त्याने अत्यंत कर्तव्यदक्षतेने पार पाडले..
दमास्कसच्या वाटेवर भेटलेल्या ख्रिस्तासाठी त्याने अनेक हालअपेष्टा सहन केल्या आणि कधी पायी तर कधी समुद्रमार्गे प्रवास करून त्याने ठिकठिकाणी ख्रिस्तमंडळ्या स्थापन केल्या. त्याने लिहिलेली १३ पत्रे गेली दोन हजार वर्षे अखिल जगभरच्या ख्रिस्तसभेला अत्यंत प्रभावीपणे मार्गदर्शन करीत आहेत. ती पत्रे पुढीलप्रमाणे :
१) प्राचीन पत्रे (२) १+२ थेस्सलोनीका.
२) प्रमुख पत्रे : रोम, १+२ करिंथ, गलती.
३) तुरूंगातील पत्रे : इफिस, फिलिप्पी, फिलोमोन, कलस्से. ४) पाळकीय पत्रे : १+२ तीमथी, तीत.
पौलने केवळ आपल्या प्रबळ इच्छा शक्तीच्या आणि विद्धत्तेच्या बळावर ख्रिस्ताचे तत्वज्ञान जगाला देऊ केले असते तर तो इतका प्रभावी झाला नसता परंतु प्रभू येशूवरील नितांत प्रेमाविषयी आणि त्याच्या 'रहस्यमय शरीर' असलेल्या ख्रिस्तसभेवरील आत्यंतिक प्रेमापायी त्याच्यामध्ये हळूवारपणा आणि संवेदनक्षमता विकसित झालेली आढळते. देवाने त्याला अलौकिक साक्षात्काराची देखील प्रचिती दिलेली होती.
निरो राजाच्या छळाच्या समयी त्याला अटक करण्यात आली आणि इ. स. ६७ साली रोम शहराच्या प्रवेशद्वारापाशी त्याचा तरवारीने शिरच्छेद करण्यात आला.
✝️
पहिले वाचन : प्रषितांची कृत्ये १२:१-११
वाचक : प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन १२:१-११ “आता मला खरोखर कळले की, प्रभूने हेरोदाच्या तावडीतून मला सोडवले आहे."
हेरोद राजाने मंडळीतल्या काहीजणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानचा भाऊ याकोब ह्याला त्याने तरवारीने जिवे मारले. ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही अटक करण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला अटक केल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती.
हेरोद त्याला बाहेर आणणार होता त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोघा शिपायांमध्ये झोपला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते. तेव्हा पाहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला, त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, "लवकर ऊठ.” तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, "कपडे कर आणि पायात वहाणा घाल,” त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, “तू आपला अंगरखा घालून माझ्यामागे ये." तो निघून त्याच्यामागे गेला, तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे की काय हे त्याला कळेना, आपण दृष्टान्त पाहत आहो असेच त्याला वाटले. नंतर पहिला आणि दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर, तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले, तोच देवदूत त्याला सोडून गेला.
मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, "आता मला खरोखर कळले की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदच्या तावडीतून आणि यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.
प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Acts 12:1-11
In those days: Herod the king laid violent hands on some who
belonged to the church. He killed James the brother of John with the sword, and when he saw that it pleased the Jews, he proceeded to arrest Peter also. This was during the days of Unleavened Bread. And when he had seized him, he put him in prison, delivering him over to four squads of soldiers to guard him, intending after the Passover to bring him out to the people, AUL, So Peter was kept in prison, but earnest prayer for him was made to God by the church. Now when Herod was about to bring him out, on that very night, Peter was sleeping between two soldiers, bound with two chains, and sentries before the door were guarding the prison. And behold, an angel of the Lord stood next to him, and a light shone in the cell. He struck Peter on the side and woke him, saying, "Get up quickly." And the chains fell off his hands. And the angel said to him, "Dress yourself and put on your sandals." And he did so. And he said to him, "Wrap your cloak round you and follow me." And he went out and followed him. He did not know that what was being done by the angel was real, but thought he was seeing a vision. When they had passed the first and the second guard, they came to the iron-gate leading into the city. It opened for them of its own accord, and they went out and went along one street, and immediately the angel left him. When Peter came to himself, he said, "Now I am sure that the Lord has sent his angel and rescued me from the hand of Herod and from all that the Jewish people were expecting."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ३४:२-९
प्रतिसाद : परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो.
१.) परमेश्वराला मी सर्वदा धन्यवाद देईन,
माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल,
माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील.
दीनजन हे ऐकून हर्ष करतील.
२.) तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा.
आपण सर्व मिळून त्याच्या नामाची महती वर्णूया.
मी परमेश्वराला शरण गेलो आणि
त्याने माझा स्वीकार केला,
त्याने माझ्या सर्व भयापासून मला मुक्त केले.
३. )ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले,
त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत.
ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला
आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले.
४)परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांभोवती
छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो.
परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा.
जो त्याच्यावर भाव ठेवतो तो धन्य !
Psalm 34:2-3, 4-5, 6-7, 8-9
R. From all my terrors, the Lord set me free.
I will bless the Lord at all times;
praise of him is always in my mouth.
In the Lord my soul shall make its boast;
the humble shall hear and be glad. R
Glorify the Lord with me;
together let us praise his name.
I sought the Lord, and he answered me;
from all my terrors he set me free.
Look toward him and be radiant;
let your faces not be abashed.
This lowly one called; the Lord heard,
and rescued him from all his distress. R.
The angel of the Lord is encamped
around those who fear him, to rescue them.
Taste and see that the Lord is good.
Blessed the man who seeks refuge in him. R
दुसरे वाचन २ तिमथी ४:६-८, १७-१८
वाचक : पौलचे तिमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे."
आता माझे बलिदान होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुध्द ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे. तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल.
तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले. प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील आणि आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
2 Timothy 4:6-8, 17-18
Beloved: I am already being poured out as a drink offering, and the time of my departure has come. I have fought the good fight, I have finished the race, I have kept the faith.Henceforth there is laid up for me the crown of righteousness, which the Lord, the righteous judge, will award to me on that day, and not only to me but also to all who
have loved his appearing. But the Lord stood by me and strengthened me, so through me the message might be fully proclaimed and all the Gentiles might hear it. So I was rescued from the lion's mouth. The Lord will rescue me from every evil deed and bring me safely into his heavenly kingdom. To him be the glory for ever and ever. Amen.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर
मी आपली मंडळी रचीन आणि
तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे
काहीच चालणार नाही.
आलेलुया!
Acclamation:
You are Peter, and on this rock I will build my church, and the gates of hell shall not prevail against it.
शुभवर्तमान मत्तय १६:१३-१९
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तू पेत्र आहेस आणि मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन.'
फिलिप्पैच्या कैसरीयाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, "मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात ?” ते म्हणाले, “कोणी स्नानसंस्कार करणारा योहान, कोणी एलिया, कोणी यिर्मया, किंवा संदष्ट्यातील कोणी एक, असे म्हणतात.” तो त्यांना म्हणाला, "पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?" शिमोन पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.” येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, धन्य तुझी ! कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईलं आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Matthew 16:13-19
At that time: When Jesus came into the district of Caesarea Philippi, he asked his disciples, "Who do people say that the Son of Man is?" And they said, "Some say John the Baptist, others say Elijah, and others Jeremiah or one of the prophets." He said to them, "But who do you say that I am?" Simon Peter replied, "You are the Christ, the Son of the living God." And Jesus answered him, "Blessed are you, Simon Bar-Jonah! For flesh and blood has not revealed this to you, but my Father who is in heaven. And I tell you, you are Peter, and on this rock I will build my church, and the gates of hell shall not prevail against it. I will give you the keys of the kingdom of heaven, and whatever you bind on earth shall be bound in heaven, and whatever you loose on earth shall be loosed in heaven."
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आज चर्चचे स्तंभ असलेल्या संत पेत्र व संत पॉल ह्यांचा सण साजरा करीत आहे. वेषितांच्या महाविद्यालयाचे प्रमुख आणि ख्रिस्ताचे पहिले प्रमुख प्रतिनिधी पिटर आणि विदेशी लोकांचा पॉल दोघांनी आपले प्रेम सिद्ध केले आणि त्यांचा प्रभू ख्रिस्ताची निष्ठा. आपला जीव देऊन स्वतःला पूर्णपणे मूर्तिपूजकांना समर्पित करण्यासाठी पीटर हिब्रू कायदेशीरपणा नाकारताना आपण पाहतो. प्रभूच्या दूताने येऊन त्याला हेरोदाच्या हातातून काढून घेतले. जे त्याचे भय धरतात त्याचा परमेश्वर खरोखर निषेध करतो. पौलने एका खेळाडूच्या रागाने ख्रिस्ताला साक्ष दिली आहे. आणि आता तो परमेश्वराकडून त्यांच्या प्रतिफळाची अपेक्षा करतो. त्याला त्यांच्या मित्रांनी सोडले आहे. परंतु तरीही त्याच्यात आत्मविश्वास आणि धैर्य आहे. प्रत्येक प्रसंगी ख्रिस्ताबद्दल बोलणे त्याला जसे जगले तसे मरायचे आहे. तो फक्त येशू ख्रिस्ताच्या प्रेमात पडण्याची वाट पाहत आहे. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाची वेळ आली आहे. तो स्वर्गीय राज्यात त्याच्या प्रवेशाचाही क्षण आहे. जिथे एक अविनाशी मुकुट त्याची वाट पाहत आहे. शिमोनाचे नाव खडकामध्ये बदलून (पीटर) येशू सुचित करतो की तो मजबूत पाया आहे. विश्वासणाऱ्यांच्या समुदायाच्या ऐक्यांचे या पायावर बांधलेला देवळाला वाईट आणि मृत्यूच्या शक्तींना घाबरण्याची गरज नाही. जो विश्वासूंना आतल्या नाशात ओढून नेण्याचा प्रयत्न करतात. देवाच्या शहराला त्याचे दरवाजे आहेत. ज्यातून केवळ पात्र लोकच प्रवेश करतात. या दरवाजाच्या चाव्या पीटरच्या ताब्यात आहेत. ज्याच्याकडे निंदा करण्याची किंवा मनाई करण्याची आणि परवानगी देण्याचे अधिकार आहे. संपूर्ण चर्चवर पीटरचे अधिकार क्षेत्र आहे. त्याचे कर्तव्य विश्वाचे हमीदार असणे, चर्च एकत्र करणे आणि ते ऐक्य राखणे हे आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, संत पेत्रासारखी श्रद्धा व संत पौलासारखा सुवार्ता प्रसाराचा उत्साह आम्हांला लाभावा म्हणून आम्हांस कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या