Marathi Bible Reading | 33rd week in ordinary Time | Monday 17th November 2025

सामान्यकाळातील ३३ वा सप्ताह 

सोमवार  दि. १७ नोव्हेंबर २०२५

"तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
"Recover your sight: Your faith has made you well."
  ✝️ 

हंगेरीची संत एलिझाबेथ

विधवा (१२०७-१२३१)

हंगेरीचा राजा अॅन्ड्रयू दुसरा ह्याची मुलगी एलिझाबेथ ही संत हेडविग (सण १६ ऑक्टो.) हिची पुतणी होती. वयाच्या चौथ्या वर्षी धुरिंजियन राजमहालात शिक्षण घेण्यासाठी तिला वॉट्र्सबर्ग येथे आणण्यात आले. त्यावेळी हे ठिकाण जर्मनीतील अतिशय सुसंस्कृत आणि ऐश्वर्यसंपन्न म्हणून प्रसिद्धीस आलेले होते. तिथेच ती ११ वर्षीय लुईस नावाच्या कुमाराशी वाग्दत्त झाली.

बालपणापासून पावित्र्यात वाढत असलेल्या एलिझाबेथने आपले भक्तिमय जीवन पुढे सुरू ठेवले. ह्या जीवनाचे प्रतीक म्हणजे तिने सोन्या- मोत्याचे दागिने वापरण्यास नकार दिला. ती म्हणत असे की, माझ्या प्रभूला तर काट्यांचा मुकूट प्रदान करण्यात आलेला ह ता मग मी सोन्या-चांदीचे दागिने कशी काय वापरू ?

संत एलिझाबेथ हिचे आध्यात्मिक मार्गदर्शक मार्बर्गचे फा. कोनार्ड म्हणतात, जेव्हा मी तिला विचारले की, तुझ्या मालमत्तेचे व संपत्तीचे मी काय करावे? तेव्हा तिने उत्तर दिले की, जे माझं आहे ते सर्व गोरगरिबांच्या मालकीचे आहे. तिने सर्व काही गोरगरीब व दीनदलितांना वाटून टाकण्यासाठी माझ्या स्वाधीन केले. ज्या कपड्यात आपल्याला पुरण्यात यावे अशी तिची इच्छा होती असा एक जुना फाटका अंगरखा मात्र तिने स्वत:कडेच ठेवला
पहिले वाचन :मक्काबी  १: १०-१५,४१-४३,५४-५७,६२,६४
वाचक :मक्काबीच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"इस्त्राएलांवर भयंकर कोप भडकला होता." 

त्याच्या वंशात एक कुलांकर निपजला आणि तो म्हणजे राजा अंतिओखसचा पुत्र अंतिओखस एपिफनेस हा होय. हा रोममध्ये ओलीस होता. ग्रीक शकाच्या एकशे सदतिसाव्या वर्षी तो गादीवर आला.
त्याच काळी इस्राएल वंशात अराजकता माजवणारी माणसे उद्भवली, त्यांनी इतर लोकांना चिथवले. ते म्हणाले, "चला, आपण आपल्या भोवती विधर्मी लोकांशी करार करू. त्यांच्यापासून दूर राहिल्यानेच तर आपणांवर अनेक आपत्ती कोसळल्या आहेत. ही सूचना लोकांना आवडली. त्यांच्यातील काही उत्सुकतेने राजाकडे गेले. राजाने विधर्मी लोकांचे रितीरिवाज पाळण्याची अनुमती दिली. त्यांनी त्या विधर्मियांच्या मतांनुसार येरुशलेमात एक व्यायामशाळा बांधली, आपल्या सुंतेची खूण बुजवली, पवित्र करार झुगारून दिला, विधर्मियात मिसळले आणि वाईट मार्गाचा अवलंब केला.
मग राजाने आपल्या साऱ्या राज्याकरिता आज्ञापत्रक काढले. सगळ्यानी एक व्हावे, आपल्या जुन्या चालीरीती सोडून द्याव्यात. सगळ्या विधर्मियांनी त्या आज्ञापत्रकांचा स्वीकार केला आणि बऱ्याच इस्राएली लोकांनी त्यांचा धर्म आनंदाने स्वीकारला, त्या दैवतांना बळी दिले आणि शब्बाथाचे पावित्र्य भंग केले.
ग्रीक शकाच्या एकशे पंचेचाळीसाव्या वर्षी किस्लेव महिन्याच्या पंधराव्या तारखेला त्यांनी होमार्पणाच्या वेदीवर धृणित चिन्हाची प्रतिष्ठापना केली. यहुदा देशातील शहरात त्यांनी उंच देवस्थाने बांधली. घराच्या दरवाजात आणि रस्त्यावर धूप जाळला. धर्मशास्त्राचे जे ग्रंथपट सापडले ते त्यांनी फाडून जाळून टाकले. ज्यांच्या जवळ कराराचा ग्रंथ आढळला, त्यांना किंवा धर्मशास्त्राचा पालन करणारा जो कोणी सापडला त्याला राजाच्या हुकूमावरून मृत्यूदंड भोगावा लागे.
परंतु पुष्कळ इस्राएली लोक खंबीर राहिले आणि आपण अशुद्ध अन्न खाणार नाही असा त्यांनी दृढ निश्चय केला होता. अन्न खाऊन भ्रष्ट होण्याऐवजी किंवा पवित्र कराराला काळिमा लावण्याऐवजी त्यांनी मरण पत्करले आणि खरोखरच ते त्याप्रमाणे मेले. इस्राएलांवर भयंकर कोप भडकला होता.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

Maccabees 1:10-15, 41-43, 54-57, 62-64: In those days: There came forth a sinful root, Antiochus Epiphanes son of King Antiochus; he had been a hostage in Rome. He began to reign in the one hundred thirty-seventh of the kingdom of the Greeks. In those days lawless men came forth from Israel and misled many, saying, "Let us go and make a covenant with the Gentiles round about us, for since we separated from them many evils have come upon us." This proposal pleased them, and some of the people eagerly went to the king. He authorised them to observe the ordinances of the Gentiles. So they built a gymnasium in Jerusalem, according to Gentile custom, and removed the marks of circumcision and abandoned the holy covenant. They joined with the Gentiles and sold themselves to do evil. Then the king wrote to his whole kingdom that all should be one people and that each should give up his customs. All the Gentiles accepted the command of the king. Many even from Israel gladly adopted his religion; they sacrificed to idols and profaned the Sabbath. Now on the fifteenth day of Chislev, in the one hundred forty-fifth yesar, they erected a altar of whole burnt offering. They also built altars in desolating sacrilege upon the the surrounding cities of Judah and burned incense at the doors of the houses and in the streets. The books of the law that they found they tore to pieces and burned with fire. Where the book of the covenant was found in the possession of anyone or if anyone adhered to the law, the decree of the king condemned him to death. But many in Israel stood firm and were resolved in their hearts not to eat unclean food. They chose to die rather than to be defiled by food or to profane the holy covenant; and they did die. And very great wrath came upon Israel.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ११९:५३,६१,१३४,१५०,१५५,१५८

प्रतिसाद : प्रभो, मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या इच्छेनुसार वागेन.

१) दुर्जन तुझ्या नियमशास्त्राचा त्याग करतात,
 म्हणून मला फार संताप येतो. 
दुर्जनांच्या पाशांनी मला वेष्टिले, 
तरी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.

२) मनुष्याच्या जुलुमापासून मला मुक्त कर, 
म्हणजे मी तुझे नियम पाळीन. 
दुष्कर्म योजणारे माझ्याजवळ आले आहेत.
 ते तुझ्या नियमशास्त्रापासून दूर आहेत.

३) तारण दुर्जनांपासून दूर आहे, 
कारण ते तुझ्या नियमांचा आश्रय घेत नाहीत.
विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे. 
कारण ते तुझे वचन पाळत नाहीत.



Psalm 119:53, 61, 134, 150, 155, 158 
R Give me life, O Lord, and I will keep your commands.

 I am seized with indignation at the 
wicked who forsake your law. R

Though the nets of the wicked ensnare me,
 your law I did not forget. R 

Redeem me from man's oppression, 
and I will keep your precepts. R

Those who pursue me with malice draw near; 
they are far from your law.R

Salvation is far from the wicked, 
who are heedless of your statutes. R

I look at the faithless with disgust;
 they have not kept your word. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
 आलेलुया!

Acclamation: 
 I am the light of the world, says the Lord; whoever follows me will have the light of life.


शुभवर्तमान लुक १८:३५-४३
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे ? प्रभो, मला पुन्हा दृष्टी यावी."

येशू यरीहोजवळ आला तेव्हा एक आंधळा भीक मागत वाटेवर बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, "हे काय आहे?” त्यांनी त्याला सांगितले, “येशू नाझरेथकर जवळून जात आहे." तेव्हा तो ओरडून म्हणाला, “अहो येशू, दावीदच्या पुत्रा, माझ्यावर दया करा!” तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले, तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दावीदच्या पुत्रा, माझ्यावर दया करा!" तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, "मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे ?" तो म्हणाला, "प्रभो, मला पुन्हा दृष्टी यावी." येशू त्याला म्हणाला, "तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णीत त्याच्यामागे चालू लागला. तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 18:35-43: 

It happened that, as Jesus drew near to Jericho, a blind man was sitting by the roadside begging. And hearing a crowd going by, he enquired what this meant. They told him, "Jesus of Nazareth is passing by." And he cried out, "Jesus, Son of David, Have mercy on me!" And those who were in front rebuked him, him to be silent. But he cried all the more, "Son of David, have mercy on me!" And Jesus stopped and commanded him to be brought to him. And when he came near, he asked him, "What do you want me to do for you?" He said, "Lord, let me recover my sight." And Jesus said to him, "Recover your sight: Your faith has made you well." And immediately he recovered his sight and followed him, glorifying God. And all the people, when they saw it, gave praise to God.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:  
हंगेरीची एलिझाबेथ ही अॅण्ड्रयू द्वितीय यांची सुकन्या. ती चर्चमध्ये आपला राजकन्येचा मुकूट घालत नसे. "प्रभू येशू कंटक किरीट वहातोय. मग मी माझा सुवर्णमंडित मुकूट कसा बरे घालू?” असे ती म्हणे. १४ वर्षाची असताना तिचा लुईसशी विवाह झाला. तिला तीन मुले होती. पावित्र्यासाठी ती प्रार्थना करी व अंगावर दोरखंडाचा मार वाही. तिने तृतीय फ्रान्सस्किन संस्थेत प्रवेश घेतला होता. तिने पूरग्रस्तांची व गोरगरिबांची सेवा केली. आपले दागिने व डावरी विकून दलितांची सेवा केली. प्रभू येशू व मरियेने तिला दर्शने दिली.

आजच्या शुभवर्तमानात उपेक्षित अंधाची याचना प्रभू येशूने ऐकली व त्याला दृष्टिदान दिले. सेंट एलिझाबेथला गरीब व पदलितात ख्रिस्त सापडला. आपणास दीनांत देव दिसावा म्हणून प्रार्थना करू या.

प्रार्थना :
 हे प्रभू येशू, तुझ्यावरील श्रद्धेत दृढ होण्यास व तुझी सुवार्ता । पसरविण्यास नवीन दृष्टी दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या