Marathi Bible Reading | Octave of Christmas | 6th Saturday 2024

हे नवीन वर्ष आपल्या सर्वाना प्रभूच्या  सहवासात 

सुखाचे व  भरभराटीचे जावो  . 

प्रभूजन्मानंतरचा नववा दिवस  

शनिवार दि. ६ जानेवारी  २०२४

  ✝️ 

 “तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे." 
Thou art my beloved Son; in thee I am well pleased.

✝️ 




 संत आंद्रे बसेट 
 वर्तनसाक्षी (१८४५-१९३७)

 ✝️

पहिले वाचन १ योहान५:५-१३
वाचक : योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 

"आत्मा, पाणी व रक्त."

येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे ? जो पाण्याच्याद्वारे व रक्ताच्याद्वारे आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त पाण्याने केवळ नव्हे तर पाण्याने व रक्तानेही आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे. साक्ष देणारे तिघे आहेत. आत्मा, पाणी व रक्त ह्या तिघांची साक्ष एकच आहे. आपण माणसाची साक्ष स्वीकारतो, पण तिच्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे. जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली तीच ही त्याची साक्ष आहे. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठायीच साक्ष आहे. ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड ठरविले आहे कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. ती साक्ष हीच आहे, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे.ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही.

देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांला सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी हे तुम्हांला लिहिले आहे.


हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :First John 5: 5-13

 Who is he that overcometh the world, but he that believeth that Jesus is the Son of God? This is he that came by water and blood, Jesus Christ: not by water only, but by water and blood. And it is the Spirit which testifieth, that Christ is the truth. And there are three who give testimony in heaven, the Father, the Word, and the Holy Ghost. And these three are one. And there are three that give testimony on earth: the spirit, and the water, and the blood: and these three are one. If we receive the testimony of men, the testimony of God is greater. For this is the testimony of God, which is greater, because he hath testified of his Son. He that believeth in the Son of God, hath the testimony of God in himself. He that believeth not the Son, maketh him a liar: because he believeth not in the testimony which God hath testified of his Son. And this is the testimony, that God hath given to us eternal life. And this life is in his Son. He that hath the Son, hath life. He that hath not the Son, hath not life. These things I write to you, that you may know that you have eternal life, you who believe in the name of the Son of God.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र  १४७:१२-१३,१४-१५,१९-२०
प्रतिसाद :  हे येरुशलेमा, प्रभूचे गुणगान कर !

१ हे येरुशलेमा, प्रभूचे गुणगान कर ! 
हे सियोन, तुझ्या देवाचे स्तवन कर ! 
तुझ्या वेशींचे अडसर त्याने मजबूत राखले आहेत. 
तुझ्यातल्या नागरिकांना आशीर्वाद दिला आहे.

२ तुझ्या सीमेवर तो शांतता राखतो, 
तुला सकस गहू पुरवतो, तो पृथ्वीवर हुकूम सोडतो. 
त्याचा शब्द वेगाने धावत येतो.

३ आपला संदेश त्याने याकोबला, 
आपले नियम व संकेत इस्राएलला जाहीर केले. 
कुठल्याही राष्ट्रासाठी त्याने असे केले नाही. 
त्याचे संकेत त्यांना माहीत नाहीत.

Psalm: Psalms 147: 12-13, 14-15, 19-20

R. (12a) Praise the Lord, Jerusalem.orR. Alleluia.

12 Praise the Lord, O Jerusalem: praise thy God, O Sion.13 Because he hath strengthened the bolts of thy gates, he hath blessed thy children within thee.

R. Praise the Lord, Jerusalem.orR. Alleluia.

14 Who hath placed peace in thy borders: and filleth thee with the fat of corn.

15 Who sendeth forth his speech to the earth: his word runneth swiftly.

R. Praise the Lord, Jerusalem.orR. Alleluia.

Who declareth his word to Jacob: his justices and his judgments to Israel. He hath not done in like manner to every nation: and his judgments he hath not made manifest to them. Alleluia.

R. Praise the Lord, Jerusalem.orR. Alleluia.

 जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
आम्हांमध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे 
आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.
  आलेलुया!

Acclamation: 

R. Alleluia, alleluia.

The heavens were opened and the voice of the Father thundered: This is my beloved Son. Listen to him.


शुभवर्तमान  मार्क १:७-११

वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "तू माझा प्रिय पुत्र आहेस. तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. "

योहान बाप्तिस्ता घोषणा करून म्हणत असे, माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्यामागून येत आहे. त्याच्या पायतणांचा बंद लवून सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे, तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे.

त्या दिवसांत असे झाले की, येशू गालिलातील नाझरेथहून आला आणि लगेच पाण्यातून वर येताना, आकाश दुभंगले आहे, असे त्याला दिसले. तेव्हा आकाशातून अशी वाणी ऐकू आली की, “तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:Mark 1: 7-11

John the Baptist preached, saying: There cometh after me one mightier than I, the latchet of whose shoes I am not worthy to stoop down and loose. I have baptized you with water; but he shall baptize you with the Holy Ghost. And it came to pass, in those days, Jesus came from Nazareth of Galilee, and was baptized by John in the Jordan. And forthwith coming up out of the water, he saw the heavens opened, and the Spirit as a dove descending, and remaining on him.  And there came a voice from heaven: Thou art my beloved Son; in thee I am well pleased.

This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: योहान बाप्तिस्ता लोकांना बाप्तिस्मा देत असताना प्रभू येशूच्या उच्च गौरवाची साक्ष देतो. "माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्यामागून येत आहे, त्याच्या पायतणाचा बंद लवून सोडण्याची देखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे." प्रभू येशू परमेश्वर असून योहानकडून बाप्तिस्मा स्वीकारतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्यामध्ये आपणास त्याच्या क्रुसावरील रक्तरंजित मृत्यूच्या "बाप्तिस्म्या"ची पूर्वकल्पना दिसते. प्रभू येशूचा बाप्तिस्मा परमेश्वराचा दुःखी सेवक म्हणून त्याच्या मिशनचा स्वीकार आणि सुरुवात होती. प्रभू येशूच्या बाप्तिस्म्यावेळी पवित्र आत्मा त्याच्यावर उतरतो आणि परमेश्वर पिता स्वतः आपल्या पुत्राविषयी साक्ष देतो, "तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे." प्रभू येशूच्या स्पर्शाने आणि पवित्र आत्म्याच्या येण्याने बाप्तिस्म्याचे पाणी पवित्र झाले, जे एका नवीन निर्मितीची सुरुवात दर्शविते. आपल्या बाप्तिस्म्यामध्ये आपण परमेश्वराची लेकरे बनतो आणि प्रभू येशूप्रमाणे आपण आपले जीवन पित्याच्या इच्छेला समर्पित करतो. परमेश्वरावर विश्वास ठेवण्यामध्ये आणि त्याला शरण जाण्यामध्येच जीवनाचा खरा आनंद आहे.

प्रार्थना हे प्रभू येशू, तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श व कृपा आम्हाला दे आणि आमचे जीवन परिवर्तन कर, आमेन.

✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या