सामान्यकाळातील दुसरा रविवार
रविवार दि. १४ जानेवारी २०२४
✝️
वाचक : शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
देवाचा दीप अजून मालवला नव्हता आणि शमुवेल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोश होता तेथे झोपला होता. तेव्हा परमेश्वराने शमुवेलला हाक मारली, "शमुवेल! शमुवेल!" तो म्हणाला, "काय आज्ञा?" मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, "काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली ?" पण एली म्हणाला, "मी नाही हाक मारली, परत जाऊन झोप." त्यावरून तो परत जाऊन झोपला. पुन्हा परमेश्वराने "शमुवेल!" अशी हाक मारली. तेव्हा शमुवेल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, "काय आज्ञा? मला तुम्ही हाक मारली. ?" पण तो म्हणाला, "मुला, मी तुला हाक मारली नाही, परत जाऊन झोप." अद्यापि शमुवेलला परमेश्वराची ओळख झाली नव्हती आणि परमेश्वराचा आदेश त्याला झाला नव्हता. परमेश्वराने शमुवेलला तिसऱ्यांदा हाक मारली. तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, "काय आज्ञा ? तुम्ही मला हाक मारली." परमेश्वर त्या बालकास हाक मारीत आहे असे एली आता समजला. तेव्हा एली शमुवेलला म्हणाला, "जाऊन झोप आणि त्याने पुन्हा हाक मारली तर म्हण, “हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे." मग शमुवेल जाऊन आपल्या जागी झोपला. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे, "शमुवेल! शमुवेल! अशी त्याने हाक मारली. तेव्हा शमुवेल म्हणाला, "बोल, तुझा दास ऐकत आहे." शमुवेल वाढत गेला, परमेश्वर त्याच्याबरोबर असे आणि त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही.
प्रतिसाद : हे परमेश्वरा, हा बघ मी आलो! मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे.
१) मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले.
२) यज्ञपशू आणि अन्ना्र्पण ह्यात तुला संतोष नाही, तू माझे कान उघडले आहेत. होम आणि पापांबद्दल, तू अर्पण मागत नाहीस. ह्यावरून मी म्हणालो, "पाहा, मी आलो आहे.'
३) ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.
४) महामंडळात मी नीतिमत्वाचे सुवृत्त सांगितले. हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही हे तू जाणतोस.
Psalms 40: 2, 4ab, 7-8a, 8b-9, 10
R. (8a and 9a) Here am I, Lord; I come to do your will.
2 With expectation I have waited for the Lord, and he was
attentive to me.
4ab And he put a new canticle into my mouth,
a song to our God.
R. Here am I, Lord; I come to do your will.
7 Sacrifice and oblation thou didst not desire; but thou
hast pierced ears for me. Burnt offering and sin offering thou didst not
require:
8a Then said I, Behold I come.
R. Here am I, Lord; I come to do your will.
8b In the head of the book it is written of me
9 That I should do thy will: O my God, I have desired it,
and thy law in the midst of my heart.
R. Here am I, Lord; I come to do your will.
10 I have declared thy justice in a great church, lo, I will
not restrain my lips: O Lord, thou knowest it.
R. Here am I, Lord; I come to do your will.
दुसरे वाचन
१करिंथ ६:१३-१५.१७-२०
पौलचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
शरीर जारकर्मासाठी नाही, तर ते प्रभूसाठी आहे आणि त्या शरीरासाठी प्रभू आहे. देवाने प्रभूला उठवले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवील. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हांला ठाऊक नाही काय ? जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहेत. जारकर्माच्या प्रंसगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते. परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो. तुमचे शरीर, तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हांला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वत:चे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलले आहा. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचा गौरव करा.
Second Reading:
First Corinthians 6: 13c-15a, 17-20
The body is not for fornication, but for the Lord, and the Lord for the body. Now God hath both raised up the Lord, and will raise us up also by his power. Know you not that your bodies are the members of Christ? But he who is joined to the Lord, is one spirit. Fly fornication. Every sin that a man doth, is without the body; but he that committeth fornication, sinneth against his own body. Or know you not, that your members are the temple of the Holy Ghost, who is in you, whom you have from God; and you are not your own? For you are bought with a great price. Glorify and bear God in your body.
हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो;
कारण केवळ बाळकांना तू स्वर्गराज्याची रहस्ये प्रकट केली.
R. Alleluia, alleluia.
17b We have found the Messiah: Jesus Christ, who brings us truth and grace.
R. Alleluia, alleluia.
वाचक : योहानलिखितपवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, “हे पाहा, देवाचे कोकरू !" त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले आणि ते येशुच्या मागोमाग निघाले. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्यामागे येताना पाहून म्हणाला, "तुम्ही काय शोधता?" ते त्याला म्हणाले "रब्बी "(म्हणजे गुरुजी), "आपण कोठे राहता ?" तो त्यांना म्हणाला, "या म्हणजे पाहाल," मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले आणि त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे दहावा तास होता. योहानचे म्हणणे ऐकून त्याच्यामागे ते दोघेजण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्रचा भाऊ आंद्रेया हा होता. त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, "मसिहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हांला सापडला आहे."त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानचा मुलगा शिमोन आहेस. तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील."
✝️
0 टिप्पण्या