Marathi Bible Reading |Monday 12th February 2024 | 6th Week in Ordinary Time

 सामान्यकाळातील ६वा  सप्ताह

सोमवार  दि १२ फेब्रुवारी  २०२४

  ✝️ 

ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही."
no sign will be given to this generation."



संत गौडेन्शिअस
महागुरू, वर्तनसाक्षी (३६०-४२७)

✝️
देवाचे वचन व देवाची दया महान आहे. येशूला ओळखण्यासाठी त्याचे सामर्थ्य जाणण्यासाठी व त्याच्या योजना समजण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची कृपा आवश्यक आहे.

विश्वासाने आपले सर्वस्व प्रभूचरणी समर्पित करु या. आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करण्यास व प्रकाशाची देणगी मिळण्यास पात्र ठरावेत म्हणून प्रार्थना करु या.

  
पहिले वाचनयाकोब १:१-११
वाचक :याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन

“तुमच्या विश्वासाची परीक्षा झाल्याने धीर उत्पन्न होतो; त्यामुळे तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त होवो.”
बारा वंशांतील पांगलेल्या लोकांना, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब ह्याचा सलाम.
माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची परीक्षा झाल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, त्यामुळे तुम्ही कशातही उणे न पडता तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त होवो.
जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणाला दोष न लावता सर्वांना उदारपणाने देणग्या देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या आणि उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे.. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये.
दीन स्थितीतील बंधूने आपल्या उच्च स्थितीविषयी अभिमान बाळगावा आणि धनवानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा, कारण तो गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. सूर्य तीव्र तेजाने उगवला आणि त्याने गवत कोमेजविले, मग त्याचे फूल गळाले आणि त्याच्या रूपाची शोभा गेली. ह्याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगाच्या भरात कोमेजून जाईल.
 
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading James 1:1-11

James, a servant of God and of the Lord Jesus Christ, to the twelve tribes in the Dispersion: Greetings. Count it all joy, my brothers, when you meet trials, of various kinds, for you know that the testing of your faith produces steadfastness. And let steadfastness have its full effect, that you may be perfect and complete, lacking in nothing. If any of you lacks wisdom, let him ask God, who gives generously to all without reproach, and it will be given him. But let him ask in faith, with no doubting, for the one who doubts is like a wave of the sea that is driven and tossed by the wind. For that person must not suppose that he will receive anything from the Lord; he is a double-minded man, unstable in all his ways. Let the lowly brother boast in his exaltation, and the rich in his humiliation, because like a flower of the grass he will pass away. For the sun rises with its scorching heat and withers the grass; its flower falls, and its beauty perishes. So also will the rich man fade away in the midst of his pursuits.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र  ११९:६७-६८,७१-७२,७५-७६

प्रतिसाद :  प्रभो, माझ्यावर करुणा कर म्हणजे मी जगेन.

१)मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, 
पण आता मी तुझे वचन पाळत आहे. 
तू चांगला आहेस, तू चांगले करतोस; 
तुझे नियम मला शिकव.

२) मी पीडित झाल्यामुळे माझे बरे 
झाले कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. 
सोन्यारुप्याच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या 
तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे.

३) हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत 
आणि सत्यतेने तू मला पिडले आहे हे मी जाणतो. 
तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार 
तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे.

Psalm Psalm 119:67, 68, 71, 72, 75, 76 
R Show me compassion, that I may live. 

Before I was humbled,
I strayed, but now I keep your word. R 

You are good, and you do what is good; 
teach me your statutes. R

It was good for me to be humbled, 
that I might learn your statutes. R 

The law from your mouth means more to me 
than large quantities of silver and gold. R 

O Lord, I know that your decrees are right; 
though I am humbled, you are just. R

Let your merciful love console me 
by your promise to your servant. R 


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे, 
तू आम्हाला सत्यात समर्पित कर.
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.

I am the way, and the truth, and the life, says the Lord; no one comes to the Father except through me.

Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   मार्क ८:११-१३

वाचक :मार्कलिखितपवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

परुशी येऊन येशूशी वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागितले. तेव्हा तो आपल्या अंतःकरणात विव्हळ होऊन म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हास खचित सांगतो की ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही." नंतर तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून पलीकडे गेला.

प्रभूचे हे शुभवर्तमान 

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Mark 8:11-13

At that time: The Pharisees came and began to argue with Jesus, seeking from him a sign from heaven to test him. And he sighed deeply in his spirit and said, "Why does this generation seek a sign? Truly, I say to you, no sign will be given to this generation." And he left them, got into the boat again, and went to the other side.
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनशास्त्री आणि परूशी लोकांची अंतःकरणे प्रभू येशूचे प्रकटीकरण स्वीकारण्यास कठीण झाली होती. त्यांनी प्रभूच्या प्रकाशात येण्यापेक्षा अंधारातच राहाणे पसंत केले. प्रभू येशूला पित्याने पाठवले आहे आणि तो खरा मसीहा आहे ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता, म्हणून प्रभू येशूला चुकीचा सिद्ध करण्यासाठी ते त्याच्याबरोबर वाद घालतात आणि त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याच्याजवळ आकाशांतून चिन्ह मागतात. त्यांनी चिन्ह मागितले, परमेश्वराच्या गौरवासाठी नाही तर प्रभू येशूची परीक्षा पाहण्यासाठी. ह्या कृतीमध्ये त्यांच्या अंतःकरणाचा कठीणपणा आणि प्रभू येशूविषयी असलेला मत्सर दिसून येतो. परूशी लोकांच्या कपटी धोरणामुळे प्रभू येशू आत्म्यात विव्हळला आणि त्याने चिन्ह देण्यास स्पष्ट नकार दिला. प्रभू येशू स्वतः आपल्यासाठी चिन्ह आहे, म्हणून त्याने प्रकट केलेल्या वचनांकडे आपण कधी डोळेझाक करू नये, तर त्याचा दिव्य शब्द आपल्या अंतःकरणात साठवून त्याच्यावर विश्वास ठेवणे हेच ह्या घटकेला गरजेचे आहे.

प्रार्थना : हे ज्ञानाच्या उगमा, सर्व समर्थ परमेश्वरा, आमची अंतःकरणे नम्र बनव, आमच्यातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा कर व आम्हाला कृपेचा प्रकाश बहाल कर, आमेन. 

✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या